Curapt life thru control over thort process - 6 books and stories free download online pdf in Marathi

करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 6

ती लगेच तिथून बाहेर पडते..... लग्न झाल्यापासून कियारा शांत स्वभावाची...! आर्याला ती इतक्या खुरापती करेल हे कधीच वाटलं नसल्यामुळे, कदाचीत या डोअरवर तो सिक्योरिटी ठेवण्यासाठी कॉन्फिडन्ट नसतो.......


कियारा बंगलोपासून लांब पळत येते...... चेहरा स्कार्फने आणि डोळे गॉगलने कव्हर असतात..... जेणेकरून, डोळ्यांवरून ही कोणी ओळखू शकणार नाही..... कॅब आधीच बुक करून ठेवल्याने, पीक लोकेशन वर कार येऊन उभीच असते...... कॅबचा नंबर एकदा कन्फर्म करत, ती आत जाऊन बसते...... ओटीपी सांगते आणि वीस मिनिटांत ड्रॉप लोकेशन वर पोहचते.... ही तीच लोकेशन असते...... जिथे तिला आर्याचं मागील काही दिवसांपासून सुरू असणारं डाऊटफुल वागणं नकळत घेऊन आलेलं असतं.....😣 वाटल्यास नंतर तिचा गैरसमज दूर होतो की, नाही समजेलच.....🧐


ती त्याच जागी उभी असते..... जिथे, तो कपल तिला त्या दिवशी भेटतो..... ती उभी राहून, इकडे - तिकडे बघते.... मात्र दूर पर्यंत कोणीच दिसत नाही..... थोड्या वेळाने एक छोटा मुलगा येऊन, तिचा हात पकडतो आणि तिला घेऊन जातो..... ती त्याला इच्छा असून ही नकार देऊ शकत नाही..... ही कोणती शक्ती तिला तिकडे ओढत आहे तिचे तिलाच समजत नाही आणि विचारात असताच, ती एका झोपडी बाहेर येऊन थांबते..... तिथे तिला तोच कपल बसून दिसतो आणि नकळत तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात...... 😢😭


ती त्यांच्या सांगण्यावरून आत शिरते आणि बघतच बसते...... तिथे तिच्या बालपणीचे फोटो जे की, तिच्या घरी एका अल्बममध्ये आणि मोठ्या फ्रेममध्ये तिच्या रूमच्या वॉलवर असतात..... इथेही त्याच फोटो, त्या कपल सोबत भिंतीवर पिनने टोचल्या असलेल्या बघून..... ती घाबरून त्या कपलकडे बघते...... तिला आशा असते की, तिचा त्या लोकांशी काय संबंध आहे हे तिला लवकरच समजावं....... तिला शांत राहायला सांगून, ते बोलायला सुरुवात करतात.....


@@@ : "बेटा मी तुझा बाबा...... प्रसाद यादव.... मी तुझ्या प्पाच्या ऑफिसमध्ये एक एम्प्लॉइ होतो.....😣"


कियारा : ".. व्हॉट...😲😲😲🤯.."


प्रसाद : "हो..... तुझा प्पा खूप डेंजर माणूस..... कुठलीच चूक खपवून घेत नव्हता..... झालीच तर खूप वाईट पनिशमेन्ट असायची.....😢😢 माझ्यामुळे एकदा ऑफिसच्या कामात चूक झाली आणि त्यांना मोठ्या डीलचं नुकसान.....! याचाच राग म्हणून त्याने तुला त्याच्या घरी ठेवून घेण्याची शिक्षा मला दिली...... खूप वाईट वाटलं होतं तुला स्वतःपासून दूर करणं....... पण, सिच्युएशन पुढे हेल्पलेस......! तुला त्याच्या घरी ठेवण्याचं कबूल केलं...... काहीच दिवसांची गोष्ट म्हणून, आम्ही मनातून तयार नसून ही तुला त्यांच्याकडे ठेवलं..... त्याची एक मुलगी होती कियारा......😣"


कियारा : "व्हॉट....🤯🤯🤯😲😲 मग..... मी कोण.......??"


प्रसाद : "सांगतो, तू आमची लाडकी...... प्रार्थना......🥺"


प्रार्थना : "पण, मग.....🤯🤯😣😣"


प्रसाद : "सगळं सांगतो...... बस..... तू शांत रहा बेटा..... तू त्यांच्या घरी गेल्यावर, एक दिवस कियारा आणि तू दोघीच टेरेसवर खेळत असता, तुम्हा दोघींची फाईट झाली..... ज्यात तुझ्या ऐवजी कियारा वरून खाली पडली....😣 आणि तिचा मृत्यू झाला.... या रागातच तुझ्या प्पाने मला ऑफिस मधून हाकलून दिलं आणि तुला कायमची कियारा म्हणून ठेऊन घेतलं..... डीलचं झालेलं नुकसान आणि त्याच्या एकुलत्या एक मुलीच्या जाण्याने त्याच्या मनात माझ्याविषयी इतका राग भरला होता की, तुला तो त्रास देऊन, त्याचा बदला घेणार हे नक्की.....! तुला इतकं मजबूर करणार होता की, तुझ्याकडे सगळं असून सुद्धा तू प्रेमाला तरसशिल.....😣😣😣 मी कोर्टमध्ये गेलो पण, खोट्या डी. एन. ए. रिपोर्ट्स बनवून तू त्याची कियारा असल्याचं त्याने कोर्टात सिद्ध केलं....... कारण, मुलीच्या डेथ ची रिॲलिटी मला आणि त्याला सोडून त्याने कोणासमोर येऊच दिली नाही..... टॉपचा बिझनेसमन म्हणून, त्याच्यासाठी काहीच अशक्य नव्हतं...... याचाच फायदा म्हणून त्याने हे केलं......😢"


प्रार्थना : "म्हणजे भाग्यश्री, क्रियांश आणि आता आर्या.....🥺🥺🥺"


प्रसाद : "हो...... सगळे तुझ्या प्पाच्या प्लॅन नुसारच, तुझ्या लाईफमध्ये आले........ भाग्यश्रीला मैत्रिवरून तुझा विश्वास उठावा म्हणून, बालपणापासून तुझ्या सोबत ठेवण्यात आलं..... ती एका गरीब कुटुंबातून होती म्हणून, तिच्या फॅमिलीला फिनान्शिअल सपोर्ट करून, तिला विकत घेण्यात आलेलं........ आणि क्रियांश तो ही एक गरीब कुटुंबातून पण, तुझ्या प्पाने त्याला एक रीच मुलगा वाटावा म्हणून, हायर केलं...... जस्ट बिकॉज, तुला त्याच्या थ्रू भुरळ पाडून तुझा प्रेमावरून विश्वास उठावा..... आर्याचं आणि तुझं लग्न ही एक बिझनेस डीलच होती.....😒😒"


प्रार्थना : "पण, असं का.......???"


प्रसाद : "तुझ्या प्पाची जुनी सवय सर्वांना कंट्रोलमध्ये ठेवायची... पण, वयात आल्यावर कोणीच - कोणाच्या कंट्रोल मध्ये नसतो...... जो - तो हवेसारखा वाहत जातो..... म्हणून, आयुष्यातील नात्यांवर तुझा अविश्वास निर्माण केला..... जेणेकरून, नंतर तुला तुझे प्पा हेच बरोबर वाटावेत आणि तू त्याच्यानुसारच वागाविस.....😣😣"


प्रार्थना : "व्हॉटहेल......🤯🤯🤯🤯 म्हणजे, फिजिकल इंज्युरी न करता कोणाला मेंटल इंज्युरीने करप्ट करणे.....😣😣🤯🤯 सो दॅट, पुढचा माणूस डिसिजन घेण्याआधीच क्रॅश होईल.....🤯🤯"


प्रसाद : "हो बेटा.....😣"


प्रार्थना : "पण, आता मी काय करू......😣😣"


प्रसाद : "तू परत आर्या जवळ जा...... कारण, ही जरी बिझनेस डील असली...... तरी, जर त्याचं तुझ्यावर खरंच प्रेम असेल, तर.....? त्याची या सगळ्यात काय चूक???? जा बेटा आधी हे कन्फर्म कर..... त्याचं प्रेम नसेल तर मग तू आमच्या सोबत राहू शकतेस....☺️"


प्रार्थना : "नक्की....... येते मी.....☺️"


.


.


.


.


क्रमश:


❤️ खुशी ढोके ❤️