Chhedlya tara hrudyachya - 2 books and stories free download online pdf in Marathi

छेडल्या तारा हृदयाच्या - 2

भाग ...2

अखिल ने दरवाजा वाजवला तस्स पाटील सरांनीच दरवाजा उघडला. बाकीचे तिघे अमेय,सविता व अस्मिता घाबरून थोडे मागे झाले.सर जरा रागातच अखिल कडे पाहत होते तसा तो त्यांच्या कडे पाहून नम्रपणे च बोलला," सॉरी सर तुम्हाला मध्येच अस डिस्टर्ब केलं पणं सर आम्ही बाहेर गावा हुन येतो..आमची बस कधी कधी लेट असते त्यामुळे तुमच्या लेक्चर ला आम्हाला वेळेत पोहचता येत नाही ...पणं आम्हाला ही तुमचा लेक्चर अटेंड करायचा असतो."

त्यांचं बोलणं ऐकून पाटील सर खुश होतात आणि स्माईल करत च त्याला पाहून बोलतात," अरे अशी काही अडचण असेल तर सांगत जा ..आता स्टुडंट्स नी सांगितल्या शिवाय आम्हाला त्यांचे प्रोब्लेम कसे कळणार ? ठीक आहे उद्या पासून मी दरवाजा उघडा ठेवत जाईन...तुम्ही लेट आला तरी न बोलता येऊन लेक्चर ला बसत जा."

अखिल ही खुश झाला सरांच बोलणं ऐकून आणि त्याने मागे वळून अमेय व अस्मिता कडे पाहत या म्हणून हात केला व तो सरा ना थँक्यु बोलून त्याच्या डेस्क वर जाऊन बसला.त्यांची एक प्रोब्लेम तर अखिल ने आज सोडवली होती..आता अस्मिता चा लेक्चर मिस होणार नव्हता त्यामुळे ती ही खुश होती..पलिकडच्या डेस्क वर बसलेला अखिल तिच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहून मनोमन सुखावला होता.

लेक्चर संपला आणि अस्मिता सविता सोबत क्लास रूम बाहेर आली..तर मध्येच तिला पंकज नी अडवल .पंकज त्यांच्या कॉलेज मधला थोडा गुंड टाईप मुलगा होता .सगळे त्याला थोड घाबरून च राहत ..त्याचा ग्रुप ही नेहमी फक्त मारामारी आणि भांडणात च असायचा..पंकज अस्मिता ला निहाळत बोलला," हाय आशू..या ब्ल्यू ड्रेस मध्ये खूपच छान दिसतेस..एकदम नील परी सारखी.."

अस्मिता ने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल व ती सविता चा हात धरून पुढे जाऊ लागली.तस्स पंकज ने परत तिला अडवल," अग थांब तर इतकी काय घाई आहे ?"

अस्मिता एकदम शांत पने बोलली," पंकज मला जाऊ दे,माझा जॉग्राफी चा लेक्चर आहे."

पंकज ही तिच्या कडे पाहून हसत बोलला," जाशील ग लेक्चर तर काय रोज असतो..अगोदर बोलू तरी आपण.. ."

पंकज पुढे काही बोलण्या अगोदर अखिल तिथे आला व रागातच त्याच्या कडे पाहत बोलला," पंकज जाऊ दे तिला."

पंकज नी अस्मिता वरची नजर हटवली व अखिल कडे पाहत बोलला," तुला का इतका त्रास होतोय? मी आणि ती पाहून घेईन ना ?तू जा तुझं काम कर. "

अखिल तिथून हलला ही नाही उलट अस्मिता कडे पाहत बोलला," अस्मिता तू जा.."

अस्मिता ने त्याच्या कडे पाहिलं तर तो रागात आहे पाहून ती ही मग काहीच न बोलता तिथून निघून गेली.ती गेल्या नंतर पंकज मात्र अखिल वर दात खातच बोलला," तुला काय अडचण आहे रे मी तिच्या सोबत बोललो तर ?"

अखिल शांत पने बोलला," पंकज ती माझ्या गावची आहे आणि ती खूप साधी सरळ मुलगी आहे उगाच तिच्या मागे लागू नकोस.."

पंकज मात्र अखिल च्या बोलण्यावर मोठ्याने हसत च बोलला," ती तुझ्या गावची आहे म्हणून तुला त्रास होतोय की तूच तिच्या मागे आहे म्हणून?तशी तुझी चॉईस चांगली आहे रे.."

अखिल ला पंकज चा खूप राग आला होता पण अमेय ने त्याला ओढत च तिथून दुसरी कडे नेल.अखिल अजून ही रागात होता ..अमेय आणि ते दोघे बोलत उभे होते इतक्यात अस्मिता सविता ला घेऊन तिथे आली व अखिल कडे रागात पाहत च बोलली," अखिल तुला मध्ये पडायची काय गरज होती ? "

अखिल त्रासिक चेहऱ्याने बोलला," अग अस्मिता तो नेहमी तुला अस त्रास देतो .तू उगाच का त्याचं ऐकत बसते ?"

अस्मिता ही त्याला रागात पाहत बोलली," मला त्रास देतो ना तो देऊ दे तू मध्ये पडणारा कोण ? पुन्हा माझ्या साठी त्याच्या सोबत भांडू नको."

अस्मिता सविता ला घेऊन तिथून निघून ही गेली .दोघी थोड बाजूला आल्या तशा सविता अस्मिता वर चिडून च बोलली," आशू अग अखिल ची काय चूक ?तू त्याच्या वर का चिडली ? बिचारा तो तर तुला च प्रोटेक्ट करत होता ना ? त्या पंकज ला तर काही बोलली नाही पणं अखिल वर मात्र बरसून आलीस ना ?"

अस्मिता थोड काळजीत बोलली," सावू तुला तर माहित आहे ना तो पंकज कसा आहे ? उगाच माझ्या मुळे त्याने अखिल ला काही केलं तर ? तो तर आहेच ग नालायक पणं अखिल ला त्रास नको ..त्याचं तोंड आहे बोलू दे काय बोलतो ते आपण लक्ष नाही द्यायचं."

अखिल साठी तिची काळजी पाहून सविता तिला चिडवत बोलली," ओ हो बरीच काळजी आहे की अखिल ची तुला ही ."

अस्मिता मात्र तिच्या कडे रागात पाहत बोलली," चल काही ही बोलू नकोस ..तो चांगला आहे उगाच त्रास नको माझ्यामुळे त्याला म्हणून म्हटलं मी तू लगेच काही ही विचार करायला लागते..इतकं डोक अभ्यासात लावलीस ना तर फायदा होईल तुझा ही."

अस्मिता सविता वर रागावून च लेक्चर ला गेली .त्यांचे सगळे विषय सारखे च होते पणं अस्मिता ला जॉग्राफी आवडत होता म्हणून तिने तो विषय निवडला होता.त्यामुळे एका लेक्चर ला ती वेगळी असायची.बाकी मग इतर वेळी चौघे ही एकाच क्लास रूम मध्ये असायचे.

अस्मिता अखिल ला ओरडुन गेल्या नंतर अमेय ही तिच्या वर थोडा रागावला च व अखिल कडे पाहत बोलला," आक्या बस झाल हा आता नेक्स्ट विक मध्ये वेलेंनटाईन डे आहे आणि त्या दिवशी तू अस्मिता ला प्रपोज करायचंय आणि ती नाही बोलली ना तर बास तिचा नाद सोडून टाकायचा..एक तर तू तिच्या साठी च भांडला स त्या पंक्या सोबत आणि ती तुलाच येऊन सूनवून गेली ? बास हा आता तुला काही वाटत नसेल पणं मला नाही आवडत अस तुला तिने काही ही बोललेल ."

अखिल त्याला समजावत बोलला," आम्या काही ही काय बोलतोय ? प्रपोज करायचय आणि ते ही पुढच्या आठवड्यात ? नाही माझ्या ने नाही होणार रे..तिला राग आला तिने फ्रेन्ड शिप ही तोडली तर ?"

अमेय त्याच्या कडे रागाने पाहत बोलला," तू आयुष्यभर फक्त घाबरत च बस ..तो सिनियर चा सतीश तिला प्रपोज करणार आहे अस मी ऐकलं आहे..तू घाबरत बस आणि कोणी तरी दुसर करू दे तिला प्रपोज..तू तुझी भीती कवटाळत बस..आणि माझं ऐकायचं असेल तर बोल माझ्या सोबत नाही तर काही गरज नाही माझ्या सोबत हि बोलायची."

सतीश अस्मिता ला प्रपोज करणार आहे हे ऐकून तर अखिल खूपच अस्वस्थ झाला त्याने अमेय ला अडवत विचारल," आम्या तू ..तू खर सांगतोय? सतीश अस्मिता ला प्रपोज करणार आहे ?"

अमेय तोंड वाकडं करत बोलला," मग तुला काय मी पोकळ गप्पा मारतोय अस वाटत का? ठीक आहे वाट बघ त्या दिवशी ..खर होईल तेव्हा तुला खर वाटेल."

अखिल टेन्शन मध्ये येतच बोलला," आम्या तस्स नाही आय ट्रस्ट यू पणं आता मी काय करू रे?"

अमेय गालात हसला व अखिल च्या खांद्यावर हात ठेवत बोलला," आक्या तू फक्त मी सांगतो तस्स कर .. वेलेनटाईन डे ला तिला प्रपोज कर ..अरे एकदा बोलून तरी बघ होईल ते होईल ..पुढचं पुढे बघू ना."

अखिल ही शेवटी कसा बसा अस्मिता ला प्रपोज करायला तयार झाला.

क्रमशः