Prem Hai - 1 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम हे ? - 1

मी तुम्हाला बोलले होते "मी तुमच्यासाठी एक नवीन कथा घेऊन येणार आहे. "
माझ्याकथेच नाव तुम्हाला समजलेच असेल.
प्रेम हे 🥰❤️

प्रेम ही अशी गोष्ट आहे जी सगळ्या ना होते. त्यात गरीब,श्रीमंत पाहिले जात नाही.कधी ,कोनावर,कस प्रेम होईल कोनीच सांगु शकत नाही.यालाच तर प्रेम बोलतात ना 😁 .
आपली कथा पण अशीच आहे.
साधी ,सरळ ,सोज्वळ मुलगी. कधीच कशाचा गर्व नाही.स्वतःच्या आनंदापेक्षा दुसऱ्याचा आनंद महत्त्वाचा आहे अस सतत बोलणारी ,दुसऱ्यासाठी सदैव मदतीसाठी तत्पर असणारी अशी एक मुलगी .पण परिस्थिती साथ देत नाही तिला हेच एक तिच दुदैव. तिच्या आयुष्यात खुप काही अडचणी आल्या तरी सुद्धा त्यामागे खंबीरपणे उभा राहणारी अशी ही .
तर दुसऱ्या बाजुला खुप मोठा बिजनेसमेन ,दिसायला Handsome ,जिम करुन मिळवलेली ती Body ,लाखो मुली याच्या वर फिदा होत्या.पण याच्यासाठी फक्त पैसा महत्त्वाचा आहे.मुलींना कधीही किंमत न देणारा .त्याच्यासाठी त्याचा बिजनेस आणि त्याची family इतकच महत्त्वाचे आहे.राग आला तर कोनाला ही न ऐकणारा असा हा मुलगा.
आता बघुया या दोघांच्या आयुष्यामध्ये नक्की काय काय घडत.

आदु ,चल पटकन आवर ना ग........
ए पिहु, "थांब ग ".एवढी काय तुला घाई असते ग .काँलेज काय पळुन जात नाही. मला माझा मेकअप तरी करुदे.
हे बराय ग आदु तुझ, अभ्यास कर बोलले तर त्यासाठी तुला वेळ नाही ,आणि मेकअप साठी वेळ आहे.
ए पिहु ,तुला माहिती आहे ना माझ आणि अभ्यासाच कधी पटलय का ? 😣😂
मी आपल तु जातेस म्हणून येते.नाही तर मला अजिबात इंटरेस्ट नाही काँलेजला जायला .
पिहु कपाळावर आठ्या पाडत मान डोलावते आणि बोलते,"ही मुलगी कधीच सुधरणार नाही."
ए पिहु ,"हा ड्रेस छान आहे ना ग ? कि दुसरा कोनता घालु ?
पिहु रागाने तिच्या कडे बघते 😡😡
आदु जिभ बाहेर 😜 काढत थोडस घाबरत 😢 बोलते ,"हाच असुदे नाही चेंज करत."
अग आदु तुला माहीती आहे ना आज लास्ट चा पेपर आहे. आजच्या दिवशी तरी लेट नको व्हायला आपल्याला.
ओय जानेमन ,"हमारे पास हमारी परमसुंदरी है ना ।" टेंशन नही लेनेका 😜😝
"हो ना आणि ती परमसुंदरी मध्ये च बंद पडते त्याच काय ?"
"ए पिहु माझ्या परमसुंदरी ला काही बोलायच नाही हा .ती माझी जान आहे जान."
"हो तु ये निवांत तुझ्या परमसुंदरी वरुन मी जाते बस ने."
ए पिहु ,"थांब ना झालय माझ,दोघी सोबत जाउ."
पिहु रागाने खाली येते ,मागुन आदु ओरडच येते ."
"Oyye पिहु रुक ना मेरी जान."
"इतना गुस्सा मत कर पगली."
तितक्यात आदुचे बाबा बोलतात,"काय झालं अजुन तुम्ही दोघी इथेच आहात ?"
"तुम्हाला उशीर नाही का होत ?"
पिहु आदुकडे रागाने बघत बोलते,"काका किती उशीर झाले मी इकडे आले आहे. पण या आदुच आवरतय का ?"
"पेपर पेक्षा मेकअप महत्त्वाचा आहे या मँडमांना."
आदुचे बाबा बोलतात,"आमच ध्यान काही सुधरायच नाही."
तस पिहु आणि आदुची आई मोठ्याने हसु लागतात.
आदु बोलते,"मी जातेय काँलेजला ,""पिहु तु इथेच बस हसत."
पिहु बोलते,"काका काकु राग आलाय बघा कोनालातरी "
"मी पण जाते नाही तर तो राग जास्त निघायचा माझ्या वर."
आदुची आई बोलते,"सावकाश जावा ग पोरींनो."
पिहु ओरडच बोलते,"हो काकु तुम्ही काळजी नका करु."
तर या दोघी जनी एकदम जिवलग मैत्रीणी.
पिहु आणि अदिती.
अदितीच्या फँमिली मध्ये अदिती तीचे आईवडील आणि छोटा भाऊ आदित्य इतकेजन आहेत.
आदितीला कधीच शिकायला इंटरेस्ट नाही ,पण पिहुमुळे ती सुध्दा काँलेजला जायची.अदिती ला graduation complete झाले की स्वतः चे बुटिक सुरू करायचे होते.
पिहु ही गरीब मुलगी आहे. एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत एकटीच राहते.लहान असतानाच आईवडील गेले.
काका काकु होते पण त्यांनी तिला कधीच जवळ केल नाही. त्यांच्या साठी जमीन, घर महत्त्वाचे होते.पिहुचे आईवडील एका accident मध्ये गेले. लगेचच काका काकूंनी पिहुला सावली अनाथाश्रम मध्ये सोडले.त्यावेळी पिहुला थोडेफार समजायचे पण अन्यायाविरुद्ध लढायची ताकद नव्हती.
पिहु दिसायला गोरीपान होती.नाजुक ओठ,चेहर्याला शोभेल असे टपोरे डोळे, लांबसडक केस,ओठांच्या वरती सौदर्यांत भर घालायला एक छोटासा तीळ होता.
एखाद्या हिरोईन लाजवेल अशी सुंदर पिहु होती.पण राहणीमान अगदी साध.कधीच चेहर्यावर मेकअप चा लवलेशही नाही फक्त ओठांवर लिपबाम ,आणि आणि डोळ्यात काजळ .
इतकच बाकि होत तिच सौदर्य आणखीन वाढवण्यास.

आश्रमामध्ये च लहानाची मोठी ,बारावी झाल्यानंतर काँलेज करत करत एका हाँटेल मध्ये काम करत होती.त्यातुनच तिने स्वतः साठी एक भाड्याची खोली पाहिली ,कारण आश्रम आणि काँलेज यांमध्ये खुप अंतर होत.त्यामुळे तिला नोकरीची सुध्दा आणि एका छोट्याशा खोलीची सुध्दा गरज होती.
काँलेजला जाणे हे सुध्दा तिच्या साठी खुप महत्त्वाचे होते.
तर हीच आपल्या कथेची हिरोईन आहे."पिहु कुलकर्णी"........

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

Mumbai airport वर सगळीकडे गर्दी झाली होती.खुपसारा पोलीसांनी बंदोबस्त केला होता तरी सुध्दा लोकांनी गर्दी केली होती.मिडियाचे लोक तर आधीपासूनच तयार होते.
मोठमोठे बिजनसमेन याच्या स्वागतासाठी आलेले होते.
जसा तो समोरुन आला तसा सगळ्यांनी याच्या मागे घोळका केला होता. याचे Bodygard त्याच्या मागेच होते.
तो आला आणि हवेसारखा मोठ्या गाडीतुन निघुन ही गेला .कोनाशीच न बोलता.
यालाचतर Attitude 😎 बोलतात.
होताच तसा तो ",दिसायला गोरापान ,जिम करुन ती मिळवलेली मजबुत body,लोखो मुली याच्या मागे होत्या पण हा मात्र कोनालाच किंमत देणार नाही . कामापेक्षा त्याच्या साठि काहीच महत्त्वाचे नव्हते. काम पैसा इतकच त्याच्या साठी महत्त्वाचे होते. ...... MBA complete करुन लंडनमध्ये स्वतःची मोठी कंपनी उभी केली होती.
भारतात नाहीतर दुसर्या देशात सुध्दा स्वतःचे मोठे नाव कमवले होते.बिजनेस मध्ये मोठे स्थान प्रस्थापित केलेले होते.

तर हा आपला हिरो आहे बर का 😁
रियांश देशमुख 😍





आता बघुया दोघांच्या आयुष्यात काय घडत.
लवकर नवीन पार्ट घेउन येईन.
हा पार्ट कसा वाटला नक्की कमेंट्स करुन सांगा....
मी तुमच्यासाठि कथा लिहते ना मग तुम्ही सुध्दा माझ्या साठी ,माझ्याकथेसाठी चार शब्द लिहित जावा.
तुमच्या कमेंट्स मुळे आम्हाला लिहायला प्रेरणा मिळते.
भेटु लवकरच.........