Naklat sare ghadale - 1 books and stories free download online pdf in Marathi

नकळत सारे घडले (भाग १)


अजय एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा.आई वडील,आणि दोन लहान बहिणी ,मोठी स्वाती तर लहानी नीता.अजयची आई म्हणजे सीमाताई नोकरी करीत असतात तर अजयचे वडील सुरेशराव ह्यांना पॅरॅलीस झाल्याने ते घरीच असतात.त्यांच्या जागेवरच सीमाताईंना नोकरी लागलेली असते, परिस्थिती ने खूप श्रीमंत नसले तरी आनंदी असं अजयचे कुटुंब असतं..
अजय दिसायला देखणा, प्रामाणिक, प्रेमळ,समंजस,मोठ्या माणसांचा आदर करणारा,इतरांची मदत करणारा .आईवडीलां ना अजयचा फार अभिमान वाटायचा ,खूप विश्वास होता त्यांचा अजयवर .
अजयचे 3 जिवलग मित्र होते संतोष, अवी आणि राजू ,हे तिघेही श्रीमंत घरातले होते मात्र त्यांना त्याचा गर्व नव्हता.हे चौघेही नेहमी एकत्र असत,मित्र परिवार चांगला असल्याने अजयच्या आईला त्याची जास्त काळजी नव्हती.पाहता पाहता अजयचे पदवी शिक्षण आटोपते,घराला हातभार म्हणून तो एके ठिकाणी काम ही करू लागला,अजयच्या बहिणी शिक्षण घेत होत्या .असं एकंदरीत सगळं छान सुरू होत.
अजयच्या वडिलांनी गावातच एक प्लॉट घेऊन ठेवला होता ,तिथे घर बांधायची त्यांची इच्छा होती ,अजयच्या आईने बँकेतुन कर्ज घेऊन बांधकाम सुरू केले,पाहता पाहता घर बांधून ही झाले आणि अजयचे कुटुंब तिथे राहायला गेले..इथूनच त्याचा जीवनाला कलाटणी मिळाली.. अजयच्या अगदी घरासमोर एक कुटुंब राहत होत,मोठं घर होत त्यांचं ,त्यांची आणि अजयच्या कुटूंबाची ओळख झाली.त्या कुटुंबात सुभाष राव ,त्यांची पत्नी रेखाताई,त्यांच्या दोन मुली अश्विनी ,कविता आणि लहान मुलगा सिद्धार्थ त्याला सगळे सिद्धू म्हणत असत असे हे पंचकोनी श्रीमंत कुटुंब. सुभाष राव मोठया पदावर कार्यरत होते मुळातच घरी श्रीमंती असल्याने अंहकारी होते, खुप तापट स्वभावाचे,रेखाताई गृहिणी होत्या तर अश्विनी पदवी च्या प्रथम वर्षाला,कविता 10 ला आणि सिद्धू 7 ला .अश्विनी ही घरात मोठी मुलगी खूप समंजस ,लोभस ,सुंदर अशी ,आई वडिलांचा गर्व जणू,खूप विश्वास ,आशा अपेक्षा होत्या तिचा कडून. अस हे कुटूंब
या दोन्ही कुटूंबाची आता छान मैत्री झाली होती,एकमेकांकडे येणं जाणं ही वाढलं होत .सिमाताई आणि रेखाताई ची पक्या मैत्रीण झाल्या होत्या,तसेच त्यांच्या मुलांची ही मैत्री झाली असते,खूप छान असं मैत्री च नातं या दोन्ही कुटूंबाचं निर्माण झालेल असते.अजय अश्विनी ला तिच्या अभ्यासात मदत करत असतो त्यामुळे त्यांच वारंवार भेटणं होत असते ,अश्विनी सारखी अजयच्या घरी जात येत असते परंतु दोन्ही घराचे मैत्रीचे संबंध असल्याने तिला रोखटोक कोणी करत नाही.अश्विनीला मात्र अजय आवडायला लागतो ती त्याच्या प्रेमातच पडते.मुळात अजय असतोच तसा की कुणीही त्याच्या प्रेमात पडावं..
इकडे अजयला ही अश्विनी आवडू लागते पण सांगत दोघेही एकमेकांना नाही,दोघांनाही भीती वाटत असते की जर आपण आपल्या प्रेमाची कबुली तर मैत्री तुटेल की काय म्हणून दोघेही चूप असतात.एक दिवस अश्विनी अशीच अजयकडे गेलेली असते ,अजय घरी नसतो.त्याच्या घरी फक्त त्याची लहान बहीण घरी असते बाकी सगळे लग्नाच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेले असतात.अचानक एक फोन येतो हॉस्पिटलमधून की अजयचा अकॅसिडेंट झाला आहे आणि त्याला सरकारी दवाखान्यात भरती केलं आहे.हा फोन अश्विनीच उचलते हे ऐकून ती शॉक होते.तेंव्हा नीता तिला विचारते काय झालं ,कोणाचा फोन होता ,अन अश्विनी रडायला लागते आणि तिला सांगते अजयचा अकॅसिडेंट झाला आहे ते,दोघीही लगेच हॉस्पिटलमध्ये जातात ,बघतात तर अजयला फार काही लागलेलं नसते ,पण हाताला थोडं खरचटले असते,अश्विनी च्या डोळ्यातून मात्र सारखे अश्रू वाहत असतात ,त्यांला जाऊन त्या भेटतात."अरे दादा किती लागलं रे तुला,कसा झाला अपघात, फार दुखतंय का? असे एकामागे एक प्रश्न नीता अजयला विचारते,अजय म्हणतो,"अग फार नाही लागलं मला ,छोटासा अपघात होता,गाडी स्लिप झाली म्हणून पडलो बाकी फार काही नाही झालं,तू रडू नको बरं शांत हो आधी," अश्विनी मात्र काही बोलत नसते ती एकसारखी अजयकडे पाहत असते आणि रडत असते.तेवढ्यात डॉक्टर येतात आणि काही औषधी लिहून देतात .लवकर घेऊन या म्हणून सांगतात.नीता औषध आणायला म्हणून जाते आणि अश्विनीला अजय जवळ थांबायला सांगते,आता तिथे फक्त अजय आणि अश्विनी असतात.अजय,"अश्विनी अशी रडते कशाला, मी ठीक आहे रडू नको ,शांत हो,"आता मात्र अश्विनी च्या मनावरचा ताबा सुटतो आणि ती रडतच अजयला घट्ट मिठी मारते आणि म्हणते,"तुला काही झालं असतं तर काय केलं असतं मी,कशी जगली असती तुझ्याशिवाय, माझं खूप खूप प्रेम आहे अजय तुझ्यावर" भावनेच्या भरात अश्विनी आपल्या मनातली गोष्ट बोलून मोकळी होती ,अजय मात्र चूप असतो त्याला विश्वास बसत नाही की अश्विनी ही त्याच्या वर प्रेम करते आणि तिने स्वतः हे कबूल केलंय.अश्विनी भानावर येते आणि आपण हे काय बोलून बसलो असे तिला वाटते आणि पटकन अजय कडे पाठ करून उभी राहते. 'अश्विनी इकडे बघ'अजय तिला खूप प्रेमाने आवाज देतो,अश्विनी मान खाली घालून त्याच्या समोर उभी राहते." अग माझ्याकडे बघ तर,प्रेम केलं आहेस न माझ्यावर कुठला गुन्हा तर नाही केलास,म्हणून अशी मान खाली घालून उभी आहेस,तू जितकं प्रेम करतेस न माझ्यावर त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रेम मी तुझ्यावर करतो,कधी तुझ्या प्रेमात पडलो कळलंच नाही ग,love you so much"अजय. अश्विनी अजयचे बोलणं ऐकून धावत त्याच्या जवळ जाते आणि पुन्हा एकदा त्याला मिठी मारते,आणि अजयच्या आणि अश्विनी च्या प्रेमकहाणी ला सुरुवात होते." आशु बरं झालं न माझा आज accident झाला,म्हणजे त्यामुळे कळलं तरी तुझं प्रेम आहे ते माझ्यावर" अजय." वेडा आहेस अजय तू काही काय बोलतो आहेस,म्हणे बर झालं माझा accident झाला"अश्विनी आणि दोघेही हसतात .तेवढ्यात नीता येते,'' काय झालं तुम्ही इतके हसता आहेत". अजय लगेच गोष्ट मोडून नेतो ,अजय ला संध्याकाळी डिस्चार्ज मिळतो आणि ते तिघेही घरी येतात.
अजय ला घरी सोडून अश्विनी घरी परत येते, खरतर अजयला सोडून अस जाण्याची तिची इच्छा नसते पण घरी तर जावं च लागणार असते,अश्विनी च्या घरी ही कोणी नसतं ,ती घरातली कामं आटोपते ,शरीराने घरी असली तरी मनाने मात्र ती अजय जवळच असते,आज ती खूप खूप खुश असते,इकडे अजय दिवसभर घडलेल्या गोष्टींचा विचार करून खूप आनंदी असतो, अश्विनीच्या विचारात त गुंग असतो.अश्विनी सारखी गोड मुलगी आपल्या वर प्रेम करते याचा फार आनंद त्याला असतो..
क्रमश ....