Sang na re mana - 8 books and stories free download online pdf in Marathi

सांग ना रे मना (भाग 8)

निनाद सुजय आणि मितेश पार्टीला आले होते. एक छोटी मितेशची मुलाखत ही ठेवली होती. त्याच्या फैनस ना या कार्यक्रमाचे पासेस ही दिले होते. ऑफ़कोर्स सयुंक्ता आणि पल्लवी ही या कार्यक्रमाला जाणार होत्या. मितेश ला समोरा समोर तिला बघायचे होते. एका मोठ्या फाइव स्टार हॉटेल मध्ये ही पार्टी होती. हॉटेल च्या सेमिनार हॉल मध्ये मितेश ची मुलाखत होती. हॉल छान सजवला होता. मितेश च्या हारजीत नॉवेल चे कव्हर पेज चे मोठे पोस्टर लावले होते. एका बाजूला मितेश चा स्पेक्टेकल घातलेला मस्त फोटो होता. त्याच्या हातात हारजीत ची एक कॉपी होती. संध्याकाळी 7 वाजता कार्यक्रम सुरु होणार होता. मितेश ने लाईट पर्पल कलर चा शर्ट आणि डार्क आमसुली कलरचा ब्लेझर घातला होता. निनाद ने ही ब्लू ब्लेझर घातला होता. तो ही दिसायला स्मार्टच होता. ऊंच गोरा स्ट्रीम बियर्ड असा. सयुंक्ता आज पहिल्यांदाच मितेश ला समोरा समोर बघनार होती तिला कधी एकदा मितेशला बघते अस झाले होते . ती ही छान तयार होऊन आली होती. पल्लवी आणि संयू लवकर येऊन पहिल्या रांगेत बसल्या होत्या. हळूहळू संपूर्ण हॉल भरून गेला. ख़ुप लोक मितेश चे फैन होते जास्त करून मूली आल्या होत्या. थोड्याच वेळात मितेश हॉल मध्ये आला निवेदकाने सगळ्याना जोरात टाळया वाजवून त्याचे स्वागत करायला सांगितले. सगळेजन उभे राहुन टाळया वाजवू लागले मितेश आला त्याच्या पाठोपाठ निनाद आणि सुजय ही आला. हे तिघे बेस्ट बड़ी होते त्यामुळे जिथे तिथे शक्यतो तिघे जात असत. सयुंक्ता भान हरपुन एकटक मितेश कड़े पाहत होती. आणि पल्लू निनाद कड़े पाहण्याचा मोह टाळू शकत नव्हती. पल्लू काय हैंडसम दिसतो ग मितेश. पल्लू अग लक्ष कुठेय सयुंक्ता ने पल्लवी ला विचारले. संयू तो मितेश च्या बाजूला बसलेला कोण ग? तसे संयू ने निनाद कड़े पाहिले माहित नाही ग असेल त्याचा मित्र बऱ्याच मितेश च्या फोटोत तो सोबत असतो. मस्त दिसतो ग . ओह्ह पल्लू डार्लिंग आवडला वाटतो तो. हम्म्म्म पल्लू हसली. निवेदक बोलत होता. मितेश च्या हारजीत नॉवेल बद्दल. आणि त्याने मितेश ला रिक्वेस्ट केली की त्याच्या नॉवेल बद्दल काही सांगावे. तसा मितेश उठून माईक जवळ आला. सर्वप्रथम मी तुम्हा सर्व वाचकांचे आणि माझ्या फैनस चे मनःपूर्वक आभार मानतो. माझी हारजीत ही कादंबरी तिच्या एक हजार प्रति विकल्या गेल्या. याचा मला आनंद च आहे. हे तुम्हा सर्वांच्या प्रेमा मुळे शक्य झाले माझे लिखान तुम्ही वाचता आणि त्याच कौतुक करता या मुळेच मला अजुन चांगल्या कथा कविता लिहीणया साठी प्रेरणा मिळते. माझ्या लिखाना वर असच प्रेम करत जा. आणि अजुन एक रोमैंटिक कथा मी तुमच्या साठी लवकरच घेवून येत आहे. त्या कथेचे शीर्षक आहे "सांग ना रे मना" सो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना ख़ुप ख़ुप धन्यवाद. इतके बोलून मितेश आपल्या जागेवर बसला. संयू ने त्याचा वीडियो शूट केला होता. मितेश ने तिला पाहिले होते. त्याला लवकर आठवेना की हिला मी कुठे बघितले आहे तो विचार करू लागला. मग कार्यक्रम संपला तसे सगळे जण मितेश कड़े गेले त्याच्या सोबत सेल्फ़ी काढ़ायला आणि त्याचा आटोग्राफ घ्यायला. मितेश ने सर्वान सोबत सेल्फी काढले. संयू आणि पल्लवी मात्र बाजूला थांबल्या होत्या.

सगळे जन गेले तसे मितेश आणि निनाद ही निघाले सर एक्सक्यूज मि प्लीज. मितेश ने मागे वळून बघितले संयू हसत उभी होती. त्याच्या जवळ ती आली. तेव्हा त्याला आठवले अरे ही एफ़ बी वाली सयुंक्ता. येस म्हणत मितेश बोलला सर मला ओळखले का मी संयुक्ता. हो ओळखले मितेश म्हणाला.सर सेल्फी आणि आटोग्राफ प्लीज. ओके म्हणत मितेश ने तिच्या सोबत सेल्फी काढला पल्लवी आणि निनाद सुजय यांचा एकत्र एक सेल्फी काढला. सर ऑटोग्राफ द्या पण विथ शायरी सयुंक्ता बोलली. ओके म्हणत मितेश ने तिच्या नोटबुक मध्ये शायरी लिहिली. गहरी झील से आंखे तेरी,इनमें बसती दुनिया मेरी

प्यार इश्क तो कहने को है,हम तो करते है इबादत तेरी। थँक यु सर संयु म्हणाली. पल्लवी निनाद कडेच बघत होती हे निनादच्या लक्षात आले तो गालातल्या गालात हसला.


क्रमश