ALIBI - 11 books and stories free download online pdf in Marathi

ॲ लि बी. - (प्रकरण ११)

ॲलिबी (प्रकरण ११)

: प्रकरण ११

पाणिनी पटवर्धन शुक्रवारी सकाळी ऑफिस ला आला तेव्हा त्याच्या टेबल वर टपालातून पत्र आले होते आणि सौम्या ने त्याला सांगितलं की टेंबे बाई ऑफिस मध्ये त्याची आतूर होऊन वाट बघत्ये.

पाणिनी ने पत्रातला मजकूर वाचला. पत्र आदिती हुबळीकर ने पाठवले होते. त्याचा मजकूर असा होता.

संबंधित व्यक्तींशी संपर्क झाला आहे. आज पर्यंत ज्या ज्या घटना घडल्या आहेत,त्यात काळजीचे कारण नाही. पुढे काम चालू राहू दे.

पाणिनी ने कागत खिशात टाकला. “ सौम्या, त्या बाई ला आत बोलव काय म्हणायचयं तिला ते ऐकू आणि वाटेला लावू.”

“ कसे आहात पटवर्धन तुम्ही?” आत येत असतानाच ती म्हणाली. ” काय विशेष अस शोधून काढलाय का तुम्ही ? “

“ फार मोठ नाही पण बऱ्यापैकी प्रगती आहे.” - पाणिनी

“ त्या पन्नास लाखाच्या शेअर्स व्यवहाराचे काय?”

“ मी तो सध्या प्रलंबित ठेवणार आहे.”

“ त्या लायकीचे शेअर्स आहेत ते? “

“ ते शेअर्स वेस्टर्न माईन कंपनीच्या अध्यक्षाचे खाजगी मालकीचे होते. त्याचे पैसे दिले जाण्यापूर्वी टोपे मेला होता या कारणास्तव मी तो व्यवहार रद्दबादल करणार आहे. “

“ पटवर्धन, तुम्ही जर सिद्ध करू शकलात की मंगळवारी सकाळी अकरापूर्वीच टोपे मेला तर ती रक्कम पुन्हा गेयता बाब्रस च्या ट्रस्ट च्या निधीत येईल, बरोबर?”

“ बरोबर.”

“ ते पन्नास लाख कोण देणार? “

“ आपण ते बुटाला अॅण्ड काळे या फर्म कडून मिळवायची कारवाई करू. ते बोरगीकर कडून मिळवतील.

“ पटवर्धन तुम्ही आदिती हुबळीकर चे वकील पत्र घेतलंय का? कोणत्याही एखाद्या प्रकरणात? अगदी स्पष्ट विचारते, समजा तिने टोपे चा खून केलं असेल तरी तुम्ही तिची वकीली घ्याल का? .”

“याचे उत्तर देणे अवघड आहे .”

“ तिच आणि गेयता बाब्रस च अजिबात जमत नाही एकमेकींशी, आदिती अत्यंत उद्धट आणि माज असलेली स्त्री आहे.पण तरीही ती खून नाही करणार , तेवढे मी सांगू शकते., खुनाच्या वेळी ती तिथे नव्हती हे सिध्द करण्यासाठी बारा वाजल्या नंतरच टोपे मेला हे दाखवणे तिच्या फायद्याचे आहे पण तसे झाले तर गेयता बाब्रस ला पैसे परत मिळण्यात अडचण निर्माण होऊ शकते.”

“ पटवर्धन तुम्ही कोणाची वकीली घेताय यात मला रस नाही पण एका गोष्टीत आपल्यात गैरसमज असता कामा नयेत की टोपे हा शेअर्स चा व्यवहार पूर्ण होण्या पूर्वीच मेला होता.” एवढे बोलून ती उठली आणि ऑफिस बाहेर पडली.

पाणिनी आणि सौम्या ने फक्त एकमेकांकडे बघितले.

“ सौम्या आपल्याला बाहेर जायचय. तुझी शॉर्ट हॅण्ड ची वाही घे बरोबर. त्या नोटेचा दुसरा तुकडा जिच्या कडे आहे,तिला भेटायला.”

“ तुम्हाला माहिती आहे कोण आहे ती?”

“ आता माहित्ये मला, तीन दिवस उशीर झाला समजायला.”

“ तिला कसं शोधून काढलंत?”

“ जरा डोक वापरलं, मला आधीच समजायला हवं होत ते. चल, निघू लगेच.”

गाडीतून जे जसजसे पुढे जाऊ लागले, तसे सौम्या च्या लक्षात येऊन ती एकदम उद्गारली, “ मिसेस टोपे ! “

“ पण ते कसे शक्य आहे? ती रेणापूर ला होती. सोमवारीच ती तिकडे जायला निघाली मैत्रिणीकडे, मग ती रात्री तुमच्या ऑफिस मधे कशी येऊ शकते?”

“ती एकच अशी आहे की तिने सोमवार रात्री पासून आपला ठाव ठिकाण कुठे होता याचा हिशोब ठेवला. बाकीच्या सर्वांनी मंगळवार दुपार चा.”

“ बर मग?”

“ ती एकमेव अशी आहे की टोपे सोमवारी रात्री मारला गेला आहे हे माहीत होते. तिला याचा अंदाज होता की टोपे चा सेक्रेटरी मंदार हा टोपे मंगळवारी दुपार पर्यंत जीवंत होता असे भासवून त्याला मिळणारे पैसे मिळतीलच याची दक्षता घेईल.” पाणिनी म्हणाला.

“ ज्या क्षणी तिने मला सांगितलं की सोमवारी दुपारीच मी रेणापूर ला जायला निघाले, आणि तिने रात्रभर गाडी चालवली, त्याचं वेळी माझ्या लक्षात यायला हवं होत.” पाणिनी स्वतः शीच बोलल्या सारखा म्हणाला.

“ म्हणजे तीच तुमच्या ऑफिस ला आलेली बुरखा धारी होती?” सौम्या ने विचारले.

“ हो. तीच. माझी इच्छा आहे की इन्स्पे. होळकर च्या लक्षात येऊन तो तिला गाठण्यापूर्वी आपण तिथे पोचले पाहिजे.”

थोड्याच वेळेत त्यांची गाडी टोपे चे प्रेत ज्या बंगल्यात सापडले होते त्या बंगल्याच्या आवरत पोचली. पाणिनी ने दारावरची घंटा वाजवली. मिसेस टोपे ने दार उघडले ” अरे वा ! सुप्रभात पटवर्धन, तुम्ही गाडीतून उतरल्यावरच मी तुम्हाला ओळखलं., या ना आत या.” तिने दोघांना आत बोलावलं.

“ सगळा गोंधळच आहे ,पटवर्धन. दुपारी दहन विधी आहेत म्हणतात. त्यांना खुनाच्या तपासाच्या दृष्टीने काही हवे होते म्हणून उशीर झाला.तुम्हाला काही समजलय का?” मिसेस टोपे ने विचारले.

“ जर ते शव ताब्यात देणार असतील तर त्याचा अर्थ त्यांची तपासणी झाली आहे.” - पाणिनी

‘’ आम्ही वेगवेगळे रहात होतो, मला तो आवडत नसे, तरीही या घटने मुळे मी जरा कोलमडून गेले आहे.”

“ मी समजू शकतो., मी आज तुमच्या कडे त्या नोटेचा एक तुकडा नेण्या साठी आलोय.” पाणिनी म्हणाला.

“ कशा बद्दल बोलताय पटवर्धन?”

“ फुकट चा वेळ घालवू नका भाबडेपणाचा आव आणून प्रश्न विचारण्यात. पोलीस इथे येण्या पूर्वी मी तुमच्याशी बोलणे पूर्ण करणे आवश्यक आहे. नाहीतर तुमचा मृत्यूच समोर उभा ठाकेल.”

पाणिनी पुढे बोलला,” तू आणि पळशीकर जेव्हा माझ्या ऑफिसला आलात तेव्हा मला दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. एक म्हणजे जेव्हा वकिलाची गरज लागेल तेव्हा दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळेला मला भेटायचंच याचे पद्धतशीर नियोजन त्याने केले होते. दुसरे असे तुमच्या ऑफिस मधल्या भेटीचे वेळी तुमची अती घाई, आणि अपूर्ण तयारी.पळशीकर ने मला त्याचे खोटे नाव सांगणे, की जे डिरेक्टरीत सुध्दा नव्हते. दुसरे म्हणजे तुझा बुरखा.काळ्या रंगाचा, त्यावर कलाबूत लावलेली .”

‘’ त्यातून काय सिध्द होणार मला नाही कळले” मिसेस टोपे म्हणाली.

“ नियोजन तर त्याने आधीच केले होते पण मला भेटायला येताना तुम्हाला फार घाई करावी लागली. त्यातच तुझी ओळख लपवण्यासाठी तुला हाताला येईल तो बुरखा, मोठे बूट, हातमोजे घालावे लागले. का यावे लागले एवढया घाईत तुम्हाला, कारण खून झालाय हे तुला माहीत होत, केव्हा झालाय हे पण माहीत होत आणि त्याच वेळी म्हणजे खुनाच्या वेळी मी पटवर्धन च्या ऑफिसात होते असे ही दाखवायचे होते.”

काहीही न बोलता तिने आपली पर्स उघडली, आणि नोटेचा एक तुकडा काढला आणि पाणिनी कडे दिला.

सौम्या ने तो पाहिल्यावर आ वाचला, पण पाणिनी पटवर्धन ने आपल्या पापण्या सुध्दा फडकवल्या नाहीत.

“तो मेल्याचे तुला कधी समजले?” पाणिनी ने प्रश्न केला.

“ अर्थात मी रेणापूर हून परतल्यावरच.” ती म्हणाली.

ही किती वेळ काढू पण करत्ये अशा नजरेने पाणिनी ने हातातल्या घडल्यावर नजर टाकली.

“तुम्ही माझ्याशी ऑफिस मधे बोलत होतात त्याच वेळी टोपे तुमच्या घरात मरून पडलेला होता. तू त्याला मारलेस की पळशीकर ने?”

“ दोघांपैकी कोणीच नाही.”

“ पण तो मेल्याचं तुला माहीत होत?”

बऱ्याच वेळाने ती म्हणाली. “ हो. “

“ ज्याने त्याला खोलीत आणून अंथरुणावर झोपवले ती व्यक्ती तूच होतीस?”

“ हो.”

“ कोणी मारलं त्याला? “

“ प्रामाणिक पणे सांगते पटवर्धन, मला नाही माहिती.”

“ काय माहिती आहे ते सांग.”

“मला घटस्फोट हवा होता पटवर्धन .मी राजू वर म्हणजे राजेंद्र पळशीकर वर प्रेम करते.त्याला समजलं होत की हुबळीकर हॉस्पिटल च्या ट्रस्ट च्या फंडा च्या गैरव्यवहारात मध्ये माझा नवरा अडकला होता.तो आदिती हुबळीकर बरोबर काम करून बऱ्याच गोष्टी मार्गी लावण्याचा प्रयत्न करत होता. त्यानेच तिच्या तर्फे ऑडीट करून घेण्याची मागणी केली. अशा स्थितीत जर माझे आणि पळशीकर चे मैत्रीचे संबंध जर समोर आले असते तर गहजब झाला असता.”

सौम्या ने पर्स मधून वही काढून समोर ठेवली.” सौम्या, नको लिहून घेऊ काहीच.तिला मोकळे पणाने बोलू दे.” पाणिनी म्हणाला.

“ अजित, माझा नवरा माझ्याशी समेट करण्याच्या प्रयत्नात होता. मी त्यासाठी तयार नव्हते. त्या रात्री राजू आणि मी सिनेमाहून परत येत होतो.वाटेत आम्हाला अजित, ची गाडी रस्त्याच्या कडेला दिसली. मरणाचा पाऊस पडत होता. अजित, व्हील जवळ पडला होता,त्याची मान कलंडली होती. त्याच्या छातीत गोळी शिरली होती. थोडी नाडी लागत होती.आम्ही दोघांनी त्याला कसेबसे घरी आणले आणि अंथरुणावर झोपवले. डॉक्टरांना आणि पोलिसांना फोन करायला मी जाणार तेवढ्यात राजू म्हणाला, तो गेलाय. काही उपयोग नाही , पोलिसांना बोलावले तर आपल्यातल्या प्रेम प्रकरणामुळे पोलीस आपलाच संशय घेतील त्यामुळे,त्याने सुचवले की मी माझी गाडी गॅरेज मधे ठेवावी, आणि विमानाने रेणापूर ला माझ्या मैत्रिणी कडे जावे. त्या आधी आम्ही त्याचा कोट,बूट आणि पलंगपोस काढला जेणे करून कोणत्याच वस्तूवर पावसात लागलेला चिखल कोणालाच दिसणार नाही म्हणजे मृत्यू पावसाच्या रात्री न होता दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी झाल्या सारखे भासेल आणि त्या वेळेला मी रेणापूर ला असेन.”

“ त्या वस्तूंचे काय केलेत तुम्ही?” – पाणिनी

राजू म्हणाला की मी बघीन त्याचे काय करायचे ते.मग मी राजू ची गाडी घेतली आणि राजू ने अजितची, माझ्या नवऱ्याची ची. त्या बंगल्यापासून जेवढी लांब लावता येईल तेवढी त्याला लावायची होती.ती लावल्यावर त्याने तुम्हाला फोन केला.

तो म्हणाला की काही अडचण आली तर पटवर्धन लाच वकील नेमू पण मी रेणापूर ला असल्याचे खपून गेले आणि प्रेत सापडायला चार पाच दिवस लागले तर वकील नेमायची गरज नाही.”

“ तू रेणापूर ला गेलीस ना? तिथे प्रवेश करताना सीमेवरच सर्व वाहनांची नोंद घेतली जाते.विमानाने जाताना तुझी गाडी कुठे ठेवलीस?’

“ एका गॅरेज मधे. तो ओळखीचा आहे माझ्या.”

“ काय नावाने ओळखतो तुला? मिसेस पळशीकर ही मिसेस टोपे ?” – पाणिनी

“ दोन्ही नाही. मिसेस हसबनीस म्हणून.”

“ हा हसबनीस कोण ?”

“ पळशीकर.”

त्याच वेळी कर्कश्य पणे ब्रेक लावून गाडी थांबवल्याचा आवाज आला. “ पोलिसांची गाडी.” सौम्या उठून अंदाज घेत म्हणाली.” होळकर आणि एक पोलीस येताहेत.”

“ मला एक वाचन दे. पोलिसांना काहीही सांगायचं नाही. मला खर सांग तू मारलं आहेस का त्याला? तू खर सांगतेस हे गृहित धरून मी माझी बचावाची आखणी करणार आहे.मी दोषी माणसाचे वकीलपत्र घेत नाही, माझा बचाव हा सत्याच्याच आधारावर उभा असतो. तेव्हा खरं सांग.”

“ मी त्याला मारलेले नाही.”

दारावर जोरजोरात थापा मारल्या जाऊ लागल्या आणि घंटा वाजायला लागली. मिसेस टोपे ने जाऊन दार उघडले.

“ तुम्ही दोघे इथे काय करताय?” होळकर, पाणिनी आणि सौम्या ला बघून जोरात ओरडला.

“ अशिला बरोबर चर्चा करतोय.”

“ तुला कळल कसं पटवर्धन,मी येणार आहे म्हणून? “

पाणिनीने मानेने नकार दिला.

“ तुला कशासाठी वकिली दिल्ये तिने?”

“ तिचा व्यवसाय हाताळण्यासाठी.”

“ कसला व्यवसाय?”

“ वकील कधीच आपल्या अशीलाची गुपिते उघडी करू शकत नाहीत.”

“ मिसेस टोपे, तुम्ही रेणापूरला गाडीने गेल्याचे खोटे सांगताय. रेणापूरच्या सीमेवर तुमची गाडी आल्याची नोंद नाहीये.ज्या गॅरेज मधे तुम्ही गाडी लावली त्या माणसाने अजित टोपे ला ओळखलंय. त्याचा फोटो हसबनीस म्हणून ओळखलाय. तुमचा ही फोटो ओळखलाय. आता बोला काय म्हणायचय तुम्हाला.” होळकर ने तोफच डागली.

“ कोणत्याच प्रश्नाचे उत्तर न देण्याची मी तिला सूचना दिली आहे.” - पाणिनी.

“ती उत्तरे देणार नसेल तर तिला पोलीस स्टेशनात यावे लागेल.तिथे तिची सरकारी वकिलांशी चर्चा होईल.तिला काय काय माहीत आहे याची शहानिशा होईल.”

“ मिसेस टोपे चला निघू या आपण “ पाणिनी म्हणाला.

(प्रकरण ११ समाप्त)