VEGLA - 1 books and stories free download online pdf in Marathi

वेगळा - भाग १

 

भाग – १

अंगाच मुटकुळ करून बारा-तेरा वर्षाचा मुलगा एका पडलेल्या घराच्या ओसरीतअगदी डोक्या पर्यंत पांघरून घेऊन झोपला होता , सकाळचे पाच - साडेपाच वाजले होते , वस्तीला बऱ्याच प्रमाणात जाग आली होती, तो जिथे झोपायचा त्या घराच्या ओसरीला लागुनच एक सार्वजनिक नळ होता सकाळी सर्व वस्ती तिकडे येऊन पाणी भरायची,  तिकडे त्यांची कलकल , भांडण , पण ह्याला मात्र जणू ते नेहमी होत, त्याला त्यातही गाढ झोप लागलेली असायची.

शेजारी त्याच घर होत सहा वाजले कि आई त्याच्या नावाचा सपाटा सुरु करायची " बाबू , ए बाबू , शाळेत जायचय न तुला चल उठ , बास झाली झोप, आईच्या जवळपास दहा हाका ऐकल्यानंतर बाबू एकदाची कूस बदलून अंगावरच पांघरून काढून उठून बसायचा, उठल्या उठल्याच त्याला समोरच्या नळावर पाणी भरणारी बायडा दिसायची जवळपास त्याच्याच वयाची पण ती शाळेत जायची नाही , नळावर पाणी भरायला सकाळी सकाळी आलेली, तिचा नंबर यायची वाट बघत तंबाखू मळत उभी होती , खांद्यावर शाल लपेटलेल्या सारखा एक जुनेरसा  टॉवेल आणि सतत गळणार नाक , बाबू ला तिचा प्रचंड राग यायचा

त्याला ती त्याच्या घरात आलेली पण चालच नाही, तो तिच्याकडे उगीच रागाने पाहतच उठला , आणि अर्वारायला घरात निघून गेला.

शाळेत बाबू बऱ्यापैकी हुशार होता , शाळेत जाणे, अभ्यास करणे, त्याला मनापासून आवडत असे,  घरी राहाण त्याला जास्त पसंत नसायचं  म्हणून तो  उरलेला  बराचसा वेळ मित्रांमध्ये राहणे पसंत करे, त्याला गोट्या खेळायची प्रचंड आवड होती , गोट्यांची जर आंतरराष्ट्रीय स्पर्धा  असती तर त्यात तो नक्की पहिला आला असता , अश्या प्रकारे त्याची त्या खेळात प्रगती होती,

घरात तो जास्त वेळ राहायचा नाही , जेवण झाल कि तडक मित्रांसोबत गोट्या खेळणे नाहीतरी त्या शेजारच्या पडक्या घराच्या अंगणात जाऊन काहीतरी वाचत बसने ह्यातच त्याचा दिवस निघून जायचा , आई ,वडील छोटा भाऊ -बहिणी , ह्याच्या सोबत त्याच जास्त बोलन नसायचं, लहानपणीच काही गोष्टी लवकर कळायला लागल्यामुळे स्वभावात आलेला थोडासा शिष्टपणा, त्याला देखील एक कारण होत म्हणा त्याचे वडील त्यांना तो दादा म्हणत असे , ते सुरुवातीला खूप दारू पीत असत , आणि अश्यातच आईला दिवस गेले , आई मानसिक त्रासात असताना बाबूचा जन्म झाला , फारच कमजोर आणि कमी वजनाच बाळ जगेल कि नाही अशी शंका होती सर्वाना,  पण हा काही महिने काचेत राहिला पण तरीही कमजोरच , आईने जेव्हा त्या बाळाच अंगावरच दुध पाजण जस बंद केल त्यानंतर त्याला तिने आजोळीच ठेवलं, त्याच्या आजोळी आर्थिक सुबब्त्ता\ होती , काही वर्ष तो शाळेत देखील तिकडेच होता इयत्ता पाचवी पर्यंत , पण नाही म्हंटल तरी आई आणि आज्जी मधला फरक त्याला जाणवायचा , आईने आपल्याला इथे का ठेवलंय ह्याच कारणही त्याला ह्या वयात कळू लागल होत, आईची, घराची खूप आठवण यायची, कारण त्याचे आजोबा कडक शिस्ती चे होते त्यांना सर्व काही त्याच्या मना प्रमाणे लागे , एक दिवस बाबूने सकाळी शाळेत जायचा कंटाळा केला नको वाटल उठायला त्याला  त्यावर ते त्याला इतके बोलले अगदी तुझ्या बाबा सारखाच आहेस तू देखील, बाबुला त्याचं ते बोलन फारच मनाला लागलं,पण तो त्यांना काही बोलला नाही , पाचवीची वार्षिक परीक्षा संपल्यानंतर जेव्हा आई कडे आपल्या घरी गेला त्याने आईला निक्षून सांगितलं कि आता मी इथेच राहणार मी पुन्हा आज्जीकडे जाणार नाही हव तर मी मजुरी करून शिकेन पण आता मला त्या पैसेवाल्या माणसांच्या घरी राहायचं नाही , आणि त्या नंतर तो खरच नाही गेला तो आई कडेच राहिला मजुरी करायची वेळ काही त्यावर आली नाही कारण दादा आता बरे वागत होते ,खूप नाही पण निदान हातातोंडाची गाठ बसेल आणि मुलांना शिकता येईल इतकी परीस्थिती तर नक्कीच होती,

म्हणून बाबू आता त्याच्या कुटुंब सोबत होता , शिक्षण , खेळण , मित्रांसोबत सायकल चालवन , त्या वेळी पाच पैशात एक तास सायकल चालवायला मिळायची, एक दिवस असाच बाबू  सायकल चालवायच्या उत्साहात समोरच्या खड्यात कसा पडला हे त्याच त्यालाच कळल नाही , त्या अजिबात हलता येईना, तो जोरजोरात ओरडू लागला , डाव्या पायाच्या गुडघ्यातून प्रचंड वेदना होत होत्या , आसपास जास्त माणसां ची वरदळ न्हवती , पण अश्यातच बायडा त्याच वाटेवरून घरी जात होती , कुठून तरी तीला ओरडण्याचा आवाज येत होता पण तिला कोणीही  दिसत न्हवत, काही सेकेंद शोधल्या नंतर तिला बाबू सापडला , त्याला खड्यात पाडलेल बघून इतर वेळी ती मनापासून हसली असती , पण तो आता ज्या प्रकारे ओरडत होता त्याला बघून ती प्रचंड घाबरली होती , तिला काही एकट्याला त्याला खड्यातून काढता येणार न्हवत , तिने मदतीसाठी एक दोन माणसाना हाका मारून बोलवलं , त्याच्या मंदतीने ती त्याला घरी घेऊन आली.

क्रमशः