Arranged marriage - 3 books and stories free download online pdf in Marathi

Arranged marriage - 3

💕💕💕Continue💕💕💕

रात्री कृतार्थ त्याच्या रुम मध्ये येऊन बघतो तर हिमानी अजुनही जागी असते. ती सोफ्यावर बसून कोणती तरी बुक वाचत असते. तो येतो तरी तिचं लक्ष नसते. तिने नाइट ड्रेस घातला होता.तिची केस पण मोकळी होती. तिचे केस फक्त खांद्यावर येतील एवढेच होते पण तरी ते तिला suit व्हायचे.



" madam आज पण जाग्या आहेत?? आणि बुक वाचतेय??😵😵 आज पण काहीतरी बोलणार असेल का?? नाही म्हणजे काल पण तर कंपनी जॉईन करवून घेण्यासाठी माझी वाट बघत बसली होती. आज काय बोलणार असेल??" तो मनातच विचार करत रुम मध्ये शिरला.

तो हळूच तिच्या जवळ जातो आणि बुक वरिल नाव वाचायचा प्रयत्न करतो.

Book वरील नाव वाचताच कृतार्थ च्या कपाळावर आठ्या पडतात. 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️

" मुलींना नेहमी love stories का आवडतात वाचायला??? Don't tell me की हिच्या पण तश्याच अपेक्षा असतील like पांढर्या घोड्यावर बसून तिचा राजकुमार येईल.... तिला फुलं देईल..आणि तिला आपल्या सोबत त्याच्या palace मध्ये घेउन जाईल and all"🙄🙄 त्याने डोळे फिरवत मनातच म्हटले.


तो सरळ उभा होऊन त्याचा घसा खाकरून तिचं लक्ष त्याच्या कडे करवून घेतो.

तसं ती लगेच book बाजूला ठेवते.
ती त्याच्याकडे बघत उभी होते.

" कसा होता आजचा कामाचा पहिला दिवस??? "😁😁😁 तिने बत्तीशी दाखवत विचारले

तिला तो जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा तेव्हा त्याला तिची खोडी काढायची लहर येते. पण तो एकदम सीरियस होऊन बोलतो.

" नवरा थकून आला आहे ना कामावरुन??? आल्या आल्या त्याला पाणी आणून द्यायचं.. जेवणासाठी ताट घेऊन यायचं... अन् एक तू आहेस... फक्त बत्तीशी दाखवते" तो हे सगळं😑😑 गंभीर चेहरा करून सांगत तर होता पण मनात मात्र जोरजोरात हसत होता.

" अहो असं काय बोलताय?? मी ऐकलं आहे.. जेव्हा नवरा कामावरुन थकून घरी येतो तेव्हा त्याचे स्वागत हसुन करायचे म्हणजे त्याचा सगळा थकवा जातो.. पण तुम्ही😤😤 तुमचं तर उलटच आहे सगळं... आल्या आल्या ऑर्डर झाडायला लागले. पाणी काय आण... जेवण काय वाढ..😤😤
तशीही मी तुम्हाला जेवणासाठी विचारणारच होते. तुम्हाला उपाशी नसतं ठेवलं मी.😠😠 पण म्हंटल आधी विचारते तुम्हाला की तुमचा दिवस कसा गेला?? पण मला तर वाटायला लागलं आहे की मला फटकारल्या शिवाय तुमचा दिवस पुर्ण होणार नाही आहे" ती कमरेवर हात ठेवून त्याच्या कडे डोळे मोठे करून तावातावाने बोलत होती.

हा मात्र चेहर्यावर अगदी शांत भाव ठेवून मनातच हसत तिची reaction बघून हसत होता. त्याला जाम मज्जा आली होती.

ती शांत झाली तसा तो जाऊन बेड वर बसतो.

"कशी बायको मिळाली आहे मला?? कामावरुन आल्या वर अशी रागावते नवर्यावर", कृतार्थ ने तिच्याकडे बघत नाक मुरडत सांगितले.😏😏


तशी हिमानी तर आ वासून त्याच्याकडे बघत राहिली.

"😤😤😤 लवकर लवकर फ्रेश होऊन या किचन मध्ये मी जेवण वाढून ठेवते आहे.. नाहीतर नंतर सांगाल की बायको नवर्यावर जाच करते", हिमानी राग गिळून म्हणते आणि पाय आपटत निघून जाते.

ती गेल्यावर तो हासतच बाथरुमकडे जातो.

🍂🍂🍂🍂🍂🍂

इकडे किचन मध्ये हिमानी रागानेच जेवण गरम करत असते. खरंतर तिला भांडे आपटायची होती पण आवाजाने घरातील इतरांची झोप मोड होईल म्हणून तिने तिचा राग कण्ट्रोल केला.

" समजतात काय हे स्वत:ला?? 😤😤 असे बोलत होते की रोज कामाला जातात... आज चा तर फक्त पहिला दिवस होता. काय माहित काय दिवे लावले आहेत यांनी आज जे एवढे वट दाखवत आहेत मला...😤😤 ते तर मी सांगितले कामावर जा म्हणून जात आहेत नाहीतर काय माहित कुठं भटकत असते आता. He should be happy that i make him working man" , तिने स्वत:शीच बोलत होती.

ती जेवण गरम करून त्याची ताट वाढून ठेवत त्याची वाट बघत असते.


काही मिनिटांनी तो फ्रेश होऊन येतो.
तो आल्या आल्या जेवायला लागतो. पहिला घास तोंडात टाकताच तो त्याचे डोळे अलगद बंद करतो जसे की तो त्याचे अश्रु आवरण्याचा प्रयत्न करित आहे. जेवण त्याच्या आई ने बनवले आहे हे त्याला पहिल्या घासातच कळते.

किती तरी वर्षांनी तो त्याच्या आई च्या हातचे जेवण जेवत होता नाहीतर तो अमेरिकेहून आल्या नंतर बाहेरच जेवण करायचा.

त्याने स्वत:च्या भावनांना आवरत निमुटपणे जेवण केले. हिमानी त्याचे facial expressions वाचण्याचा प्रयत्न करित होती पण तिला जास्त प्रमाणात यश आले नाही.

त्याचे जेवण होई पर्यंत ती तिथेच बसून होती.
त्याने जेवण संपवताच त्याचे उष्ट ताट बेसिन मध्ये नेले आणि स्वत:च घासायला लागला.

त्याला तसं बघून तर तिला झटकाच यायचा बाकी होता. ती सश्या सारखी पळत त्याच्या जवळ गेली.


" हे काय करताय तुम्ही??? 😲😲😲 तुम्ही राहू द्या.. मी करेन हे ... माझ्याकडे द्या... ", ती त्याच्या हातातून प्लेट घेण्याचा प्रयत्न करत म्हणते.

" मी माझी काम करु शकतो. मी आधी पण केली आहेत. अमेरिकेत एकटा होतो तेव्हा मीच करायचो", तो प्लेट घासत असताना म्हणतो.

तरी त्याच्या चेहर्यावर काही विशेष असे भाव नव्हते. पण हिमानी ला मात्र त्याचं कौतुक वाटलं.

" म्हणजे तुम्हाला जेवण पण बनवता येत असेल नाही का??", तिने उत्साहित होऊन विचारले. 😃😃

" हम्म.. जमतं बनवायला तुझ्यासारख फक्त मोठया मोठ्या बाता फ़ेकायला येत मला", त्याने तिला डीचवत म्हटले.

तसा तिच्या गोर्या नकाचा शेंडा लाल झाला.

" मी कधी मोठ्या बाता मारल्या??",😠😠 तिने रागात विचारलं.

" काल नव्हती का सांगत ?? की मला चांगला स्वयंपाक जमतो म्हणून?? हा?? आज जेवताना एक पण डिश तुझ्या हाताने बनलेली नव्हती. हो ना??", त्याने धुतलेली भांडी आपल्या जागेवर ठेवत विचारलं.

ती तर त्याला अवाक होऊन बघत असते. आज चा स्वयंपाक हा कृतार्थ च्या आई ने बनवलेला असतो. हिमानी ने त्यांना काय काय बनवायचे आहे ते विचारुन तशी तयारी करुन ठेवली होती. भाजीत मसाले वैगेरे आई ने टाकले होते.

" हा म्हणजे मी आज चा स्वयंपाक नव्हता बनवलेला पण इतर वेळेस मी बनवते.हा आता तेव्हा तुम्ही नसतात जेवायला तो माझा दोष नाही", तिने त्याच्याकडे बघत खांदे उडवत म्हणाली.

" सरळ शब्दांत सांग ना की तुला स्वयंपाक जमत नाही म्हणून. कशाला एवढे खोटे सांगतेस की तुला cooking जमते म्हणून?? ", तो तिला आणखी tease करत म्हणाला.

तशी ती बावचळली.

" तुम्ही ना आता बघाच फक्त 😠 . उद्या पासून तुमचा सकाळचा ब्रेकफास्ट, टिफिन आणि रात्रीचे डिनर मीच बनवणार आहे. नाही तुम्ही तुमचे बोटं चाटत राहिले ना.. तर नावाची हिमानी नाही 😤😤😤", असं म्हणत ती तोंड फुगवून तिथून त्यांच्या रुम मध्ये निघून जाते.



कृतार्थ पण हसू दाबत तिच्या मागे जातो.
तो येतो तो पर्यंत तीने कुशन आणि ब्लँकेट आणलले असतात. ती सोफ्यावर बसून असते. तो येताच त्याच्या कडे एक जळजळीत कटाक्ष टाकून सोफ्यावर आडवी होते.

तो ही तसाच जाऊन बेड वर आडवा होतो. Lights off करतो.

" तुम्ही मला सांगितले नाही की तुम्ही मला उद्या तुमच्या सोबत तुमच्या प्राइवेट बंगलो वर घेउन जाणार आहेत म्हणून??", तिला आठवलं तशी तिने विचारलं.


" मी सांगणार होतो पण मग विसरलो", तो बेफिकीरीने बोलला.

" विसरलो?? 😒😒 जर मला ही गोष्ट आई ने सांगितली नसती तर काय तुम्ही मला तुमच्या बंगलो वर घेउन जायला विसरले असते??", तिने तिरकस पणे विचारले.

दोघेही अंधारात बोलत होते पण तरिही एकमेकांच्या आवाजाने कोणत्या tone मध्ये बोलत आहे हे जाणवत होते.

" तुला कसं विसरू शकतो??", त्याने तिला प्रतिप्रश्न केला.

त्याच्या प्रश्नाने ती चक्क लाजली.

" खरंच तुम्ही विसरला नसता मला घेउन जायला??", तिने जरा लाजतच विचारले.😳😳

" आता माझ्या सकाळ, दुपार आणि रात्रीच्या जेवणाची जबाबदारी तुझ्यावर आहे ना.. मग मी माझ्या जेवण बनवणारया मशीन ला न्यायला कसा विसरू शकतो??", त्याने हसू दाबत विचारले. 🤭🤭


त्याचं ऐकून तर तिला त्याच्या एक ठेवून द्यावीशी वाटली.

" नाही उद्या मी बनवलेल्या जेवणाने तुमचे तोंड पेटले ना तर बघाच ", तिने रागाने लालबुंद हौट म्हटले.😡😡

" जर तू माझ्या जेवणाशी काही मस्ती केली ना तर मी कंपनीत जाणारच नाही. बघ हा .. मग रडत नको बसू माझ्याशी", त्याने जरा तिला धमकावत सांगितलं.

त्याचे ऐकून तर ती चिडीचूप झाली. तिला असे रिस्क घ्यायचेच नव्हते जेणेकरून कृतार्थ कंपनीत जायचं सोडून देईल. म्हणून ती शांत झाली.



बराच वेळ दोघेही काहिच बोलले नाही.

ती काहिच बोलत नाही म्हणून त्यानेच बोलायला सुरुवात केली.

" उद्या संध्याकाळी तयार राह. मी लवकर येऊन तुला माझ्या प्राइवेट बंगलो वर घेउन जाईल",
तो softly म्हणाला.

तसा तिनेही हुंकार भरला आणि संमती दर्शवली.

कृतार्थ थकल्यामुळे लवकर झोपी जातो. पण हिमानी बराच वेळ जागी असते. तिला खरंतर excitement असते कृतार्थ चा प्राइवेट बंगलो बघण्यासाठी.

ती पण कधीतरी विचारात झोपी जाते.


🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक आहे.

Comments नक्की करा....
कथा आवडल्यास coin ही द्या....

And stay safe