The day we met... - 1 books and stories free download online pdf in Marathi

The day we met... - 1

भाग १




आज तो परत दिसला . खर तर त्याचं दिसणं या दोन दिवसात जरा जास्त होत होत .
तोच शांत चेहरा , त्याची एका हिरो ला पण लाजवेल अशी style .
तीच नजर आज परत माझ्याकडेच पाहत राहिली होती. तीच माझी अवस्था त्याला पाहतच राहिले होते मी .
त्याचे ते बोलके डोळे पुन्हा मला काही तरी सांगत होते पण मला ते आज वाचता येत नव्हते .
तो म्हणजे माझ पहिलं प्रेम सौरभ. काही कारण नसताना पण नात्यात दुरावा येवू शकतो हे मला आज कळत होत . काही हि कारण नसताना आम्ही बोलण भेटणं सगळच अचानकच बंद केल होत .
त्याचे दिसणे ही हळु हळू कमी होत होते .
ते त्याला ही जाणवत होते पण ना तो बोला ना मी बोले .



या दोन दिवसात त्याच अस अचानक येण खर या वेळी आवडत नव्हत . त्याची ती नजर ही मला आता त्रास देत होती . तो पहिलाही असाच घरा जवळच्या रस्त्यावरुन त्याची आवडती बुलेट घेऊन यायचा .
त्यावेळेस त्या बुलेटच्या आवाजानेच हृदयात धडधड होत असे पण आज मात्र त्या आवजाचा प्रचंड राग येत होता .



हे सगळ काय होतय हे मला कळत नव्हते . काही कामानिमित्त तो आला असेल अशी मी मनाची समजुत घातली . पण त्याच आजही त्याच वेळेला दिसण मन बैचेन करणार होत . आमच्या या दुराव्याला ३ वर्षे झाली . या ३ वर्षात तो एकदाही हि दिसला नाही . तो कुठे आहे काय करतो हे ही कोणालाच माहीत नव्हत .



आमच्या नात्यातल्या अश्या दुराव्यामुळे मी पुरतीच खचले होते . काय कारण असेल आमच्या या दुराव्याच याच विचारात मी रात्र रात्र जागून काढत होते .
या सगळ्या गोष्टींचा परिणाम माझ्या जीवनात खूप झाला . ते वयही नव्हतं माझ स्वतः ला सावरण्याच . खर तर ते वय प्रेम करण्याचही नव्हत .



मी तनिष्का घरातील एकलुती एक मुलगी म्हणजे मला एक भाऊ आहे पण आमच्या घराण्यातील एकमेव मुलगी . काकांना दोनीही मुलच होती आणि आत्यालाही मुलचं . त्यामुळे माझे खुप लाड होत असे .
शाळेत प्रथम क्रमांक पटकावण माझ्या नसातच भिडल होत . मुलांनपेक्षा हुशार आहेस असा डंका घरात नेहमी असायचा . अश्या या लाडावून ठेकलेल्या घरात मी वाढले .


या सगळ्या विचारात मी माझी ती डायरी कधी हातात घेतली हे ही कळले नाही . वाऱ्यामुळे त्या डायरीची पान फडफडू लागली त्या आवजान मी विचारांच्या गर्दीतून बाहेर आले . हातातील डायरीच पहिल पान मी हळुच पलटल .


तुझ्यापासून सुरू होऊन
तुझ्यापाशीच संपत
माझ हे जग फक्त तुझ्या
अवती -भोवतीच फिरत

पहिल्याच पानावरच्या या चार ओळीतच मी भूतकाळात डोकाऊ लागले .

या ओळी वाचल्या कि मला आमच्या दोघांची ती पहिली नजरानजर आठवली . मी आठवीत असताना शाळा बदलून त्याच्या शाळेत प्रवेश घेतला होता . नवीन आलेल्या विद्यार्थ्यांनच स्वागत केल जात होत . या स्वागत कार्यक्रमाची सुत्र सगळी तो संभाळत होता . त्याच ते शेवटच वर्ष होत त्या शाळेतल म्हणजे तो दहावीला होता त्यानंतरच शिक्षणही होत तिथ तरीही त्याच ते शेवटच वर्ष होत .


पांढरा कुर्ता परिधान करून तो आला होता . हातात काळ्या बेलट असलेल वॉच . पायात बुट , भली मोठी पण त्याला शोभेल अशी गोड स्माईल . पाहताच क्षणी त्याचा प्रेमात पडेल अशी त्याची style . झाल ही तसच मी त्यालाच बघत होते त्याच लक्ष नसावे अस मला वाटल म्हणून मी तसच त्याच्याकडे पाहत बसले .
नवीन आलेल्या विद्यार्थ्यानाच स्वागत कॅडबरी आणि एक पेन देऊन केल जात होत . हे सगळा कार्यक्रम दहावीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केल्यामुळे पेन , कॅडबरी पण त्यातील मुलच देत होती . हे समजल्यावर माझी आता देवाकडे प्रार्थना चालु झाली होती .

प्लीज बाप्पा मला त्याच्या हातूनच कॅडबरी हवी आहे प्लीज प्लीज प्लीज ....

आता माझा नंबर जवळ येत होता तस माझी प्रार्थनेचा वेगही वाढला होता . माझा नंबर आला पण तो तिथ नव्हताच तो दुसऱ्या कामात व्यस्त होता . माझा मूड सगळा खराब झाला पण त्या दिवशी बाप्पा ची साथ होती वाटत . माझ्या समोर असलेल्या मुलाने त्याला हाक मारली .

सौरभ ये सौरभ हा पुढच्यां राहिलेल्या विद्यार्थ्याना तु दे ना - तो मुलगा

हो आलो - सौरभ

आता मला चक्कर येऊन पडायच राहील होत आज बाप्पा साथ देत आहेत बघून मला वाटयला लागल वाह! देव पण आपल्याच बाजूने आहे .
त्याच्या हातून कॅडबरी , पेन घेऊन मी माझ्या वर्गात जाऊन बसले . या सगळ्या विचारात मी एक गोष्ट विसरलेच त्याच नाव मला कळल होत .
सौरभ भारी नाव आहे आणि तो ही .

मी या सगळ्या गोष्टीत इतक हरवून गेले की मला हे सुद्धा आठवल नाही की मी माझ्या बेस्ट फ्रेंड सोबत शाळेत आले आहे . विचारांच्या तंद्रीत असताना मागून मला कोणी तरी डोक्यात टपली मारली . मागे वळून पाहिल तर ती खोडकर शयतान जिवभावाची मैत्रीण .

काय गं किती जोरात मारल . लागल ना मला - मी

अरे येवढ्या जोरात मारल म्हणून तर तु विचारांच्या तंद्रीतून बाहेर आलीस ना - सारा

मी आणि विचार करत होते काय पण काय बोलतेय - मी ( काही झालच नाही अस चेहरा करून विचारत होते )

मॅडम , तुझ्यापेक्षा जास्त ओळखते मी तुला - सारा

हो का मग सांग कोणत्या विचारात होते - मी
( थोडे घाबरलेल्या आवाजात . )
आपण पकडले तर गेले नाही ना .

अरे मस्करी केली . एवढी का घाबरली - सारा

अरे काय नाही असंच - मी


मी मनात - हुश्श हि ला काय कळल नाही . तुलाच बघयाच होत ना बघ आता हिला कळल असत तर काय हालत केली असती हिन जरा जपुन रहा ना . पहिला तरी दिवस झालय , का नवीन शाळेत येऊन लगेच suspend होण्याची इच्छा आहे का .


अचानकच आवाज झाला मी भूतकाळातून बाहेर पडले पाहिलं तर ती डायरी हातातून खाली पडली होती ....


क्रमशः

कस फुलतय प्रेम . साराला कधी कळत माझ्या मनात काय चालूय ते . तो उद्या पण त्याच वेळेस येईल का ? का येत असेल तो ?

सगळ्या गोष्टी हळू हळू समजतील तुम्हाला असे च वाचत रहा आणि असाच support करत रहा

कमेंट्स आणि स्टिकरद्वारे सपोर्ट करायला विसरू नका.. धन्यवाद 🙏🙏🙏