Ishq ka Rang Safed Piya - 1 books and stories free download online pdf in Marathi

इश्क का रंग सफेद पिया... - 1

मी सिया.....

" तुझं नाव काय आहे??", त्याने कडक आवाजात विचारलं.. तशी माझी बोबडीच बंद झाली.. काय बोलावं सुचेना..

आधीच हे पोलिस स्टेशन पाहून माझ्या मनात धडकी भरली होती.. मला तर माहित पण नाही की काय चालू आहे.. आणि हे पोलिस मला असे रागात का पाहत आहेत??

" मी विचारलं तुझं नाव काय आहे??", त्याने जरा ओरडून रागात विचारलं..

" सि.. सिया.. ", मी घाबरुन म्हणाले..

" वय किती?? ", तोच पुन्हा भितीदायक आवाज..

"ए.. एकोणीस... ", मी माझ्या कपाळावरचा घाम पुसत म्हणाली...

" एवढं लहान वय आहे तुझं.. आणि अशी कामं करत फिरतेस 😡", तो पोलिस एकदाच चवताळून ओरडला.. तसं माझा हुंदका बाहेर पडला..

माझ्या सोबत अजुन काही मुली होत्या.. ज्या मात्र आरामात बसल्या होत्या.. कोणाच्याच चेहर्यावर भिती नव्हती...

पण मला मात्र खुप भिती वाटत होती..

" साहेब ऽऽ मला का ओरडत आहात तुम्ही?? मी.. मी काय केलं??", मी रडतच विचारलं..

" अजुन तोंड वर करुन मलाच विचारतेस.. तू काय केलं म्हणून!! मूर्ख मुलगी.. हीच अशी कामं करायला रात्रीच्या फिरतेस का?? तेही अश्या ठिकाणी!! तुझ्यातर.. ", तो पोलिसवाला जोरात ओरडत म्हणाला आणि माझ्यावर हात उगारला..

" आह ऽऽऽ ",

त्याचा हात माझ्या गालावर जोरात पडला तशी मी बँचवरुन खाली पडली..

खुप जोरात लागलं मला...

मी तशीच पुन्हा जोरात रडू लागली..

" मी.. मी.. काही नाही केलं.. मी तर केवळ काम शोधायला गेली होती.. तुम्हीच मला पकडून आणले.. मी.. मी काहीच नाही केलं.. ", मी माझे डोळे दोन्ही हाताने पुसत रडतच म्हणाली..

" साहेब.. अहो सोडा त्या मुलीला.. लहान दिसते आहे पोर.. नसेल समजलं.. ", एक दुसरा पोलिस त्या पोलिसाला म्हणाला जो माझ्यावर नजर रोखून होता..

" काय काम करायला गेली होतीस??", त्या पोलिसाने पुन्हा रागात विचारले..

" मला नाही माहित.. माझी मैत्रीण... म्हणाली की... त्या .....ठिकाणावर काम ....भेटते.. आणि पैसे पण चांगले.. मिळतात.. मला तर फक्त माझ्या घराचे भाडे भरायचे होते.. म्हणून पैसे हवे होते मला.. म्हणून काम शोधायला गेली होती.. ", मी रडत हुंदका देत डोळे पुसत म्हणाली..

मी अजुनही खालीच बसली होती..

" तुझे आई वडील कुठे आहेत?? ", यावेळी त्याचा थोडा शांत आवाज आला...

" मी.. मी अनाथ आहे.. आई बाबा नाही.. माहित नाही कोण आहेत??", मी रडतच म्हणाली..

" ओह साब.. उस लड्की को छोड दो.. लगता है उसे पता नहीं था वो कहा गई थी.. वैसे भी वो तो कोठे के अंदर भी नहीं गई थी.. अंदर जानेही वाले थे.. की आप लोगों ने पकड कर यहा लाया.. बच्ची मासूम लग रही है.. छोड दो.. ", एक वयाने थोडी मोठी बाई म्हणाली..

पण ती कशाबद्द्ल बोलत होती.. ते नाही समजलं मला..

मला तर फक्त माझ्या गालाचे पडले होते.. कारण गाल खुप दुखत होता माझा..

मी मुसमुसत त्या पोलिसाकडे पाहिले.. जो अजुनही माझ्याकडे पाहत होता..

" तुझं घर कुठं आहे??", त्याने विचारले..

" माझ्याकडे आता घर नाही आहे... मी आधी अनाथाश्रम मध्ये राहायची..पण अठरा वर्ष झाली तसं ते सोडलं.. आता मी माझ्या मैत्रिणीसोबत राहत होती.. पण ती तिच्या गावी गेली आणि परत आलीच नाही.. मी कॅफे मध्ये काम करत होती.. तिथं एवढा पगार नव्हता.. म्हणून मला घरचे भाडे भरता येत नव्हते.. म्हणून आणखी पैसे मिळतील म्हणून एका मैत्रिणीला विचारलं.. तर तिने मला इथला पत्ता दिला... आणि म्हणाली की इथे फक्त रात्रीला काम मिळते.. म्हणून मी तिकडे गेली होती.. ", मी सगळं सांगितलं.. हेच तर कारण होतं..

" तुला माहित आहे.. तिथं काय काम करतात??",त्या रागीट पोलिसवाल्याने पुन्हा एकदा शांतपणे विचारले..

" नाही मला माहित.. माहित नाही म्हणूनच तर गेले होते ना तिथे... उगीच कशाला जाईन?? माझ्याकडे तर रिक्षा भाड्यासाठी पण पैसे नाही.. मग मी कशाला माझे पैसे बुडवायला जाईन??", मी नाक वर ओढत गालावर हात चोळत विचारलं.. त्यालाच..

तसं तिथे असलेले सगळेजण हसायला लागले..

आता मी काय केलं??

कशाला हसत आहेत ते..

हा रागीट पोलिसवाला पण हसला काहीसा..

" किती भाडं आहे तुझ्या घराचं??", त्या रागीट पोलिस वाल्याने विचारलं..

" तीन हजार.. ",

" हे घे.. हे पैसे घेउन भाडं भर.. ", त्याने तीन हजार माझ्या पुढे करत म्हंटले..

तसा मला राग आला.. मी तशीच उठली..

" मी गरीब आहे.. पण भिकारी नाही!! मला नको आहेत तुमचे हे फुकटचे पैसे.. मला पण पैसे कमावता येतात.. पण सध्या माझ्याकडे काम नाही म्हणून.. मला नको तुमचे पैसे.. मी करेन काहितरी मॅनेज ", मी त्याला रागवत म्हणाली..

तसा तो माझ्याकडे पाहतच राहिला..

" देवा.. रागाच्या भरात जास्तच बोलून गेली की काय??? परत नाही ना मारणार???", मी मनातच विचार करत आवंढा गिळला..

मी घाबरुन त्याच्याकडे पाहिले..

" शिंदे मॅडम.. हिला आज तुमच्या घरी घेउन जा.. आणि उद्या पुन्हा सकाळी इकडे घेउन या.. ", तो पोलिसवाला एका लेडीला म्हणाला.. ती पण पोलिस होती वाटतं..

पण मला कुठं घेउन जाणार त्या.. ती बाई जरा डेंजरच दिसत आहे..

ह्या पोलिसवाल्याने तर कानफटात दिली आहे.. ती तर मला चांगलंच बुकलून काढेल की काय..

" ओह साहेब.. मी.. मी नाही कुठं जाणार.. मला फक्त सोडा इथुन.. मी जाईन कुठंतरी.. ", मी लगेच नाक वर ओढत म्हणाले..

तसं त्याने पुन्हा एकदा रागात पाहिले..

" चुपचाप त्या मॅडमसोबत जायचं.. आणि चुपचाप परत यायचं सकाळी इथे.. ", त्याने दम दिला.. तसं मी घाबरुन पटकन खाली वर मान डोलावली..

मी त्या डेंजर मॅडम सोबत निघुन गेली..

तिच्या घरी आली तर.. त्यांची लहान मुलगी होती.. आणि सासू सासरे होते.. त्यांचा नवरा काहितरी कामानिमीत्त बाहेर गेला होता... असं त्या म्हणाल्या..

" एवढ्या पण डेंजर नाही त्या.. जेवढ्या वाटतात.. त्यांनी मला जेवायला दिलं.. मी पहिल्यांदा जरा पोट भरुन जेवली.. असं घर असतं का?? कदाचीत असंच राहत असेल.. मला तर नाही माहित काही घर परिवारा बद्द्ल .. पण असंच राहत असेल कदाचीत.. ", मी मनातच विचार केला..

दुसर्या दिवशी सकाळी.. मला परत तिथे घेउन गेले .. पोलिस स्टेशनला.. मी काय चोर थोडीच आहे... ना मी काही गुन्हा केला आहे.. मग कशाला उगाचच घेउन जात आहेत मला??

मी मनातच रागावली होती..

आज पुन्हा तो खडूस रागीट पोलिसवाला साहेब भेटेल.. आज पण मारेल की काय??

हा विचार मनात येताच मी पटकन माझ्या गालावर हात ठेवला..

" आह ऽऽ ", कालचं मारलेलं अजुन पण दुखत आहे.. हात आहे की हातोडा!! ",

" सिया.. इकडेच थांब.. रुद्राक्ष सर येतील.. ", त्या डेंजर पण चांगल्या मॅडम म्हणाल्या..

" ह्या?? कोण द्राक्ष???? ", मी तोंड वाकडं करुन विचारलं..

" काल ज्यांनी तुझ्या गालावर नक्षा काढला ना.. तेच रुद्राक्ष सर.. इथले आय.पी.एस पोलिस ऑफिसर.. ", त्या मॅडम काहिश्या हसत म्हणाल्या..

कालचा सीन आठवून अंगावर शहारा आला माझ्या..

मॅडमला जरा जास्तच हसू येत आहे वाटतं.. काल चांगला एन्टरटेन्मेन्ट मिळाला ना त्यांना.. म्हणून फ़िदिफ़िदी तर हसणारच ना या गरिबावर..

मी काही बोललेच नाही..

मला त्या बाकड्यावर बसायला सांगितले.. तसं मी तिथेच बसली.. थोड्याच वेळात तोच कालचा रागीट द्राक्ष साहेब आले..

एकदम टवका दिसत होता..

तो धाडधाड करत पायरी चढत आला.. तसं तिथे कामात व्यस्त असलेले दुसरे पोलिस लगेच लगिबगीने उठत त्याला सल्यूट करु लागले.. सगळ्यांच्या चेहर्यावर अगदी गंभीर भाव..

तो मात्र कोणालाच भाव न देता सरळ येत होता.. मी तर आवंढाच गिळला.. सगळेजण त्याला सल्यूट करुन उभे होते..

तो तसाच माझ्या समोर येउन उभा राहिला.. आणि माझ्यावर नजर रोखली..

" मला पण सल्यूट करावं लागेल का?? करायचं असेल कदाचीत.. ", मी मनातच विचार केला..

आणि मी धाड़कन उठली आणि दोन्ही हात कपाळावर ठेवून त्याला सल्यूट केला..

काय भरोसा.. एक सल्यूट कमी पडला तर..

मी तशीच उभी मोठे मोठे डोळे करुन दोन्ही हात डोक्याच्या दोन्ही बाजूने लावुन त्याला सल्यूट देऊन अगदी कडक उभी राहिली..

आणि!!


एकदाच तिथे असलेले सगळेजण जोरजोरात हसायला लागले..

मी तशीच हात डोक्यावर ठेवत गरगर करत मुंडी फिरवून सगळ्यांकडे पाहिले.. तर सगळेजण दात काढुन हसत होते..

एवढं काय झालं यांना हसायला..

तसं मी त्या द्राक्ष साहेबाकडे पाहिले.. तर असंच भासलं मला.. जणू तोही हसत आहे..

" शिंदे मॅडम.. हिला चहा पाजा.. ", तो म्हणाला आणि पुढे चालू लागला..

" मी चहा नाही पीत.. ", मी लगेच माझ्या डोक्यावरचे हात खाली करत म्हणाली..

" मग काय दुध पीते काय??",

" तुम्हाला कसं माहित??", मी जरा आश्चार्याने विचारलं..

तसं तो मला तर काहिच बोलला नाही..

" शिंदे मॅडम.. हिला एक ग्लास दुध पाजा.. ", तो म्हणाला आणि आत एक रुम होती.. तिथे निघुन गेला..

मी परत एकदा त्या बाकड्यावर बसली..

" जिथे मी अनाथाश्रम मध्ये होती ना.. तिथे एक सिस्टर होती.. जी आम्हा मुलांना सांभाळायची.. तिथे तसं खाण्याचे काही हाल माझे झाले नाही.. तिथे चहाच्या बदल्यात आम्हाला दुध द्यायचे.. म्हणून मी चहा नाही पीत.. ",

थोड्याच वेळात त्या डेंजर मॅडम खरंच माझ्यासाठी एक दुधाचा ग्लास घेऊन आल्या..

" शप्पथ.. वर्ष झालं असेल मला आता दुध पिऊन .. जेव्हापासून अनाथाश्रम सोडले तेव्हा पासून मी दुध पिले नाही.. ", मी पटकन दुधाचा ग्लास घेतला आणि लगेच तोंडाला लावला..

" आह.... ", मी जोरात किंचाळले..

" हू ही... हू ही.. हू..ही.. आह.. ", मी पटकन माझ्या ओठांवर हात ठेवला..

भाजली मी..

" अगं बाई हळु जरा.. गरम आहे ते.. ", त्या डेंजर मॅडम म्हणाल्या..

तसं मी फक्त मान डोलावली..

मी तोंड उघडून हाताने वारा घालत होती माझ्या जिभेला.. तेवढ्यात माझी नजर समोर गेली.. तर तोच द्राक्ष साहेब दिसले..

पण मी पाहिलं तसं ते लगेच आत शिरले..

मी पण मग हळु हळु दुध फुंकून पिले..

" बघितलं सिया.. लालचीपणा केलास ना.. म्हणून गॉड ने तुला पनिश केलं.. आता असा लालची पणा करायचा नाही.. ओके??", मी स्वत:लाच खडसावले..

तसं तर माझं कोणी आहे नाही चांगलं वाईट सांगणारं.. म्हणून आलेल्या परिस्थीतून स्वतःला रोज धडा शिकवते..

मी मस्त दुध पिले..

पण आता मला जरा टेन्शन आले होते.. कारण माझ्याकडे राहायला घर नव्हते.. घराचं भाडं दिलं नाही म्हणून मला घरातून काढून टाकलं आहे.. आता काय करु मी???

" सिया ऽऽऽ ", त्याच डेंजर मॅडम चा आवाज आला तसं मी तिच्याकडे पाहिले..

" तुला रुद्राक्ष सरांनी आत बोलावले आहे.. जा तिकडे.. ", त्यांनी त्या रूम मध्ये इशारा करत म्हंटले.. जिथे ते द्राक्ष साहेब गेले होते..

मी मान डोलावली आणि तिकडे निघुन गेली..

" गॉड.. बचा लेना... ", मी प्रार्थणा करतच आत गेली..

तो तसाच त्याच्या त्या चेयर वर बसुन होता.. माझ्याकडे पाहिलं तसा माझा जीवच घशात आला.. काल सणसणीत कानात हाणली होती.. मला तेच आठवलं.. आणि अचानक हात गालावर गेला..

" नाही मारणार मी परत.. बस.. ", द्राक्ष साहेब म्हणाले.. तसं मी जरा बिचकतच त्यांचया समोरच्या चेयरवर बसली..

" तुला माहित आहे.. काल तू जिथे गेली होतीस काम शोधायला ते काय होतं??", त्याने गंभीरपणे विचारलं..

तसं मी फक्त नाही मध्ये मान हलवली..

" तिथे मुलीच्या शरीराची किंमत मोजली जाते.. तिथे कितीतरी मुलींच आयुष्य बरबाद होते.. ", साहेब बोलला आणि मला धडकीच भरली...

गॉड!!!!!

काय झालं असतं माझ्यासोबत.. जर काल वेळेवर हे साहेब आले नसते..

मी तर घाबरलीच..

थोडंफार सायन्स तर मला माहित आहे.. आणि एवढं मात्र कळलं की तिथे मुलीला तिच्या मर्जीशिवाय तिच्या शरीराला स्पर्श करत असतील..

ईव.. धस्स झालं माझ्य काळजात..

भितीने काटा आला माझ्या शरीरावर..

फक्त तीन हजारासाठी कदाचीत माझं आयुष्य खराब झालं असतं..

मी पटकन खुर्चीतून उठली आणि साहेबांच्या पायाच पडली..

" थँक यू द्राक्ष साहेब.. थँक यू.. काल जर तुम्ही मला वेळेवर थांबवले नसते तर कदाचीत माझं आयुष्य स्पॉईल झालं असतं.. ", मी पटापट बोलली...

" अरे.. सोड.. सोड.. पाय सोड.. ठीके ठीके.. यू आर सेफ नाव.. ", ते म्हणाले तसं मी लगेच त्यांचे पाय सोडले..

आणि पुन्हा एकदा त्यांना नमस्कार केला.. आणि खुर्चीत बसली परत..

" मग आता तू कुठे राहणार???", साहेबने विचारले..

" सध्या तर काहिच ठिकाण नाही आहे.. पण शोधून पाहते.. कुठे तरी जागा मिळेल... ", मी जरा कसनुस हसून म्हणाली.. पण मलाच आता प्रश्न पडला होता तो.. राहायचं कुठं म्हणून..

" माझ्याकडे एक जॉब आहे तुझ्याकडे.. जर तुला आवडेल तर सांग... पण फक्त आजच्या दिवसासाठीच ऑफ़र वॅलिड आहे.. ", साहेब म्हणाले.. तसं मी जरा विचारात पडले...

" बोला ना साहेब.. कोणता जॉब आहे माझ्यासाठी तुमच्याकडे??",

" माझी वाइफ होण्याचा जॉब.. ",

" सॉरी कदाचीत माझे कान वाजले.. मला असं का ऐकू आलं की तुम्ही मला तुमची वाइफ होण्याचा जॉब ऑफर केला?? नक्कीच माझे कान वाजले असणार.. तुम्ही परत एकदा सांगा सर.. ", मी माझे कान साफ करत पुन्हा एकदा कान पुढे केले..

" तू बरोबर ऐकलेस.. माझ्याकडे तुझ्यासाठी माझ्या वाइफ चा जॉब आहे.. ", ते पुन्हा एकदा तेच वाक्य म्हणाले.. आणि मी तर डोळे विस्फारुन पाहू लागले..

" यू मिन मॅरेज.. वेडिंग?? शादी.. लग्न??? ", मी त्यांच्या त्या टेबलवर दोन्ही हात टेकवून अगतिकपणे विचारलं..

" हो.. ", ते एवढंच म्हणाले..

नो एक्सप्रेशन अॅट ऑल!!!

दगड!!!!

" अचानक ही ऑफ़र का?? आय नो मी फक्त एकोणीस वर्षांची आहे.. पण मॅरेज चा अर्थ मला माहित आहे.. ओनली लोयल अँड गुड पर्सन आय वोन्ट... मॅरेज इस लाइफटाईम कमिटमेंट ...
मी काय खेळण्याची वस्तू नाही आहे.. माझ्या मागेपुढे कोणी नसलं तरिही मी स्वत: सक्षम आहे स्वत:ला सांभाळून घ्यायला.. ", मी धडधड बोलली..

" डोंट वरी.. आय एम सिरियस अबाउट अवर मॅरेज.. ", ते शांतपणे म्हणाले...

मी जरा शांतच राहिली..

तसंही माझ्या मागे पुढे कोणी नाही आहे.. मी करेन तरी काय???

रिस्क घेऊ का लग्न करायची???

" अम्म.. तुन्ही सिंगल आहात ना???", मी जरा संशयाने विचारलं..

" येस.. आय एम सिंगल.. ",

" हाव ओल्ड आर यू??? ",

" 28 ",

" ओह माय गॉड!! किती मोठे आहात तुम्ही माझ्यापेक्षा.. पण ठीक आहे.. एज इस जस्ट अ नंबर.. ", मी तशीच चेयर वर बसली..

" काही अफेयर वैगेरे नाही आहे ना तुमचं??",

" नाही.. ",

" लाइफटाईम कमिटमेंट???",

" येस.. लाइफटाईम कमिटमेंट.. ",

" ओके देन.. लेट्स गेट मॅरेड!!! ",



क्रमशः

लेखिका सावी ♥️....