Kondan Parva One - Part 37 in Marathi Love Stories by Shabdbhramar books and stories PDF | कोंदण पर्व एक - भाग 37

Featured Books
Categories
Share

कोंदण पर्व एक - भाग 37

बंधन


त्यावर्षी पाऊस शाळा सुरु झाली तरी आला नव्हता.  शाळा आता रेगुलर सुरु झाली. पहिला दिवस होता. मला जाडुने मधल्यासुटीत गाठली.


"सुने चल! गुलमोहराच्या पारावर डबा खाऊ आज." तो म्हणाला.

मी गेले त्याच्यासोबत. कधीतरी लहर आल्यागतच वागतो हा. मी इकडे तिकडे बघितलं. 

"श्वेता नाहीये. रेणुसोबत बसलीये आज. असू दे.. सुने! ऐक, मी काय म्हणतोय. दहावीच वर्ष आहे आणि यावर्षी मला अजिबात हयगय नको आहे हा तुझ्याकडून!! तुझं ते समाजसेवेच व्रत पुढल्यावर्षी परत सुरु कर. पण तू तुझं काम करताना आणि इतरांसाठी वेळ न घालवतानाच मला दिसायला हवी. मी खूप भांडेन तुझ्याशी तू आता इकडे तिकडे involve होताना दिसलीस तर." जाडू बोलला.

"बापरे. इथं धमकवायला घेऊन आलायस का मला तू..? असं करणार जाडू? " मी म्हणाले.

"सुने!! मला काल तुझ्यासाठी खूप वाईट वाटलं यार. स्वतःला एकदम दुर्बळ असल्यासारखं जाणवत होतं. श्वेताने परिस्थिती हॅन्डल केली म्हणून थोडं तरी बरं झालं. तू इतकं सगळ्यांसाठी चांगला विचार करू पाहते आणि हे असले लोकं किती चुकीचं वागतात तुझ्यासोबत. मला नाही रुचलं अजिबात. तू बस कर यार आता खरंच. कोणीही तुझ्या स्वभावाअडून जर तुझा असा फायदा घेणार असेल तर मग या गोष्टीला कुठंतरी स्टॉपर लावायला हवा. मी आता तूला असं गाफिल सोडणार नाही. बसच झालं आता. तुझं यश मला हवंय." जाडू खूप भावुक होत म्हणाला.

"मला कळतंय रे.. पण काय करू? सवय जडलीये इतक्या वर्षांची. आलं कोंणी मदतीचा हात मागायला तर मग मागे सरायला मनं करतं नाही. ही पल्ली जरी परत आली तरी मला नाही वाटत मी तीला लगेच झिडकारू शकेन. " मी माझ्या स्वभावात अडकून पडलेले काय करणार. मनात आलं ते बोलले.

"तीला तर आता मी जवळपास पण नाही फकटून द्यायचा तुझ्या बघ कि नाही. कोणीपण सुनीबद्दल काहीही बोलायला सुनी म्हणजे काय स्वस्त वाटली का? माझा हट्ट समज आणि पूरव. एकच वर्ष एवढं. मग मी नाही बोलणार काही तूला. रविवारी सुद्धा तूला आता माझ्याकडून सुट्टी नाही. माझं प्लिज एवढं ऐक सुनी." जाडू अर्जव करतं होता.

"सगळं जग एकीकडे आणि जाडूचा हट्ट एकीकडे. तू जसं म्हणतो तसं नाही झालं तर सुनी.. सुनी नाही." एरवी मी असं म्हणलं पण असतं. पण सचिन मला जे बोलला होता. ते आत कुठंतरी जाऊन रुतलं होतं. 

"प्रेमाचं वादळ मैत्रीला उडवून लावू शकतं." मग ती दुर्बळ मैत्री हवेत विरून जाण्याचं दुःख साजरं कसं करायचं? सहन होत नसताना दुःख जिरवायला कोणाचा खांदा वापरायचा त्यावेळी? अशी शक्यता मनात आणून मी अजून रोपटं ही न बनलेल्या या वैचारिक विष बिजाला वृक्ष समजायला लागले होते. पण तो समज झटकून टाकणं काही मला जमेना. म्हणून मी जाडूला समजवायला निघाले. कठीण होतं पण करावं लागणार होतं. त्याची माझ्याबद्दलची काळजी किती मनापासून आहे माझ्याशिवाय कोणाला कळणार?

"जाडू.. मैत्रीचे बंध मनाच्या मेहनतीने कामावलेले असतात ना? ते बंध असे तोडून कसं जमेल रे? बरं पल्ली, स्नेहाचं जाऊ देत. त्यांचा विषय सोडते मी. पण इतर लोकं आहेत त्यांचं काय करु? कसं मी अचानक बदलू त्यांच्यासाठी? माझं यश मी दुसऱ्यांच्या कामी येऊन रोजचं मिळवते. त्यात मला आनंद वाटतो. तू म्हणतो त्याप्रमाणे मी वागू लागले तर सुनी ही सुनीचं नाही राहणार. तू मला सुनी म्हणून ओळखतो ना? मग सुनी अशीच आहे सगळ्यात रमणारी. तीला बदलून कसं चालेल? " मी म्हणाले.

तो मान खाली घालून बसला. माहित नाही काय चाललं होतं त्याक्षणी त्याच्या मनात.

"कधी कधी वाटतं ना सगळ्या जगापासून ओढून तूला लांब नेऊन ठेवावं." जाडूचा आवाज घोगरा झाला होता. पटकन पाण्याचा एक थेंब त्याच्या डोळ्यातून डब्यात पडला.

"जाडू यार.. नको ना!!" मी त्याला असं पाहिलं कि सगळं विसरून जाते त्याला माहित आहे. म्हणून मुद्दाम करतो.

"मला वाटलंच होतं. तू असंच काहीतरी बोलणार. सुने.. मला नव्हतं माहित त्या पल्लवी आणि स्नेहा तूला नेमकं काय टोमणे देत होत्या. तूला सोडल्यावर श्वेताने सांगितलं मला. तूला असं हलकं कोंणी कसं काय बोलू शकतं गं? माझा जीव पेटला होता ते ऐकल्यावर. तूला नाही मला कोणात जाऊ द्यायची. नालायक लोकं आहेत सगळे." चिडलेला जाडू परत तोच लहानपणीचा जाडू झाला होता. आत्ता पाय घासून रडत बसेल असं वाटत होतं.

"अरे यार जाडू तू असं करशील तर मला पण रडायला येईल हा.. तू स्वतःला आवर यार जाडू.. शाळेत आहोत आपण. कसं वाटतंय ते? काय म्हणतील सगळे. माझा जाडू, एवढा हिरो आणि शेम्बड्या पोरागत रडतोय." मी म्हणाले.

"असू देत.. मला नाय फरक पडत पण तूला कोंणी काही बोललेलं मला लागतं. माहिते ना तूला?" जाडू म्हणाला.

" बरं.. ऐक.. एक करू आपण..तू म्हणतो तसं मी आता थोडं लिमिट मध्यें राहीन सगळ्यांसोबत. पण atleast जुने मित्र तरी जपेन. ह्यावर्षी no new entry. कुठं कोणाला काय मदत हवी होती आणि केली याचा हिशोब तूला देईन. काही चुकलं माकलं आमचा कान आपली चिमटी. ठीक?? आणि इथून पुढे रविवारी फक्त जाडू. इकडे तिकडे जाणार नाही. तुझ्यासोबत अभ्यास नायतर timepass. ए पण श्वेताला असू देत हा आपल्यासोबत. खूप गोड आहे रे ती. " मी म्हणाले.

"सुने मी बोलतोय त्याला मजेत घेऊ नको. मला तू म्हणाली तसं मी ऐकलं ना? आता तुझी वेळ आलीये ते करायची. मला सुनी एकतर सोबत हवी नायतर माझ्या पुढे. जीला बघून मला प्रेरणा मिळत आलीये. तीला मी मागे पडू देणार नाही. खडूस,रागीट, क्रूर काय समजायचं ते समज." जाडू सावरत म्हणाला.

"गप्प!! माझा जाडू खूप प्रेमळ आहे. हा कधी कधी थोडा खडूस कांद्यासारखा वागतो, पण its ok. सुनीसाठी गरजेचं असतं ते." मी म्हणाले.

"मनात पक्क कर हा मी जे बोललोय ते. माझं नीट लक्ष असणारे आता. यावर्षी तुझ्याच मागे असणारे मी. कुठं पळते बघतोच." जाडू म्हणाला.

" अरे देवा!! म्हणजे आता कसं होणार?" मी केली जाडूची खेचायला सुरुवात. 

" कोणाचं?!" जाडू संशयित पणे बघायला लागला.

" टेकडीवरच्या विमान दर्शनाचं. " मी म्हणाले.

" त्याचं काय मधेच सुने?? " जाडू गोंधळून म्हणाला.

" संध्याकाळी विमानदर्शन हव्या हव्याश्या संगतीत. किती विलोभनीय असेल नाही?? " बारीक हसत मी म्हणाले.

" तू.. आता.. गप्प.. बस. तिने हट्ट केला म्हणून गेलो होतो. बाकी काही नाही. " जाडू म्हणाला.

"असं असं. मग कवित्व दाखवायचा हट्ट पण तिनेच केला होता वाटतं? गुळ ए जाड कडे?" मी मिश्किल पणाने विचारलं.

" सुनेss!!" जाडू डोळ्यांचा उर्ध्व लावत ओरडला.

" बाई गं. मला वाटायचं तूला चॉईस नाही. पण पल्लीला टाळून आणि श्वेताला आपले कविमनाचे कौशल्य दाखवून सुनीला चूक ठरवलंस कि तू." मी त्याचा तो गोरामोरा चेहरा बघत मजा घेत होते.

" असं काही नाहीये.. उगाच नाही तसलं डोक्यात आणू नको. मी आपलं ते सहज सुचलं म्हणून बोललो. " तो म्हणाला.

" एरवी सुनीचं सोडून कोणाचं म्हणणं ऐकत नाही तू.. चक्क श्वेताचा हट्ट पुरवला म्हणजे पाणी मुरायला scope आहे. " मी म्हणाले.

" सुने!! डोकं फिरलंय तुझं. जेव पटपट." जाडू परत ओरडला.

" बरं ऐक कि.. खरंच तसा स्कोप असेल तर पाणी मुरु दे बरं का? माझ्याईतका आनंद कोणालाच होणार नाही. श्वेतासारखी मुलगी क्वचितच भेटते. पुन्हा पुन्हा नाही. " मी म्हणाले.

"गरज नाही मला. भरून पावलंय आधीच माझं." तो म्हणाला.

" म्हणजे? " मला कळलं नाही जाडू काय म्हणाला ते.

" वाघाचे पंजे.. जेव मुकाट्याने. पाणी मुरवतीये. आजपासून तुझं रुटीन सुरु. माझा वॉच असणारे लक्षात ठेव. " तो कडकपणे म्हणाला.

माझ्याबाबतीत काही चूक घडत असेल तर जाडू इकडेतीकडे लक्ष देणं शक्यच नव्हतं. हे मला माहित होतं. पण सुनी त्याला आयुष्यभर पुरणार कि नाही तिलाच कळत नव्हतं. किमान सुनीसारखी किंवा त्याच्यापेक्षा better त्याला सोबत म्हणून मिळो असं त्याच्यासाठी माझ्या मनात इतकंच येत होतं.. पण जाडू आज काय म्हणाला होता? मी किती मन्थन करुन बघितलं मला कळलं नाही. 
"माझं भरून पावलंय आधीच" म्हणजे??...


🍁🍁🍁🍁


पदभ्रष्ट न होण्याची शाश्वती
अन न भरकटण्याची भीती
तुझी आकृती सतत पाठी
हित माझं सदैव तुझ्याच चित्ती 🍁🍁


- क्रमशः

शब्दभ्रमर🍁🍁