Saanika - 2 in Marathi Love Stories by manasvi Manu books and stories PDF | सानिका - 2

Featured Books
Categories
Share

सानिका - 2

भाग २ 

आपणं बघितलं :- जोशी कुटुंबातील खेळीमेळीचे वातावरण . त्यात भर म्हणजे त्यांच्या मुलीचा म्हणजे सानिका चा रिझल्ट. 

आता पुढे :- सानिका च्या रिझल्ट मुळे घरात आनंदी वातावरण निर्माण झालं होतं . सगळे खूप खुश होते . जोशी साहेबांनी मनीषा ताईंना म्हटलं ... 

" मनीषा ... अगं इतकी आनंदाची बातमी कळली आहे तर आज काहीतरी विशेष स्वयंपाक होऊन जाऊ दे . " 

" नाही हां बाबा ....आज बाहेर जाऊ जेवायला . मस्त मज्जा करू . दोन दिवस ब्रेक घ्यायचा विचार केला आहे मी . तर आज आपण बाहेर जाऊ आणि उद्या मी माझ्या मित्र मैत्रिणीं सोबत बाहेर जाणार , मग पुन्हा अभ्यासाला सुरुवात करणार . मला IIM गाठायचे आहे बाबा . ते सुद्धा with scholarship . "  सानिका ने फर्मान सोडला . 

" हो बाबा !! आज बाहेर जाऊ जेवायला . सानू ची इच्छा आहे ना तर होऊन जाऊद्या पूर्ण . तुलिक जोशी साहेबांना बोलली . 

" बरं ठीके .... जाऊयात बाहेर . चला आवरा पटापट . उशिर होईल . चला... चला ... " इतकं बोलून जोशी साहेब त्यांनी आणलेल्या भाज्या पिशवी मधून काढण्यात गुंतुन गेले . 

त्या दिवशी जोशी कुटुंब बाहेर निघालं घरातून तर एका नंतर एक त्यांचे कार्यक्रम बनत गेले . सगळे आधी जेवायला गेले , जेवण झाल्यावर तिथे बसल्या बसल्या च सिनेमा ला जायचं ठरलं . मंगेश ने online तिकीट बुक केले . सगळे  रेस्टॉरंट मधून सरळ सिनेमा बघायला गेले . सिनेमा बघून झाल्यावर कोणाला विशेष भूक नसल्याने . सगळे सरळ घरी आले . घरी येऊन आवरून सगळे एकत्र बाहेर च्या खोलीत बसून गप्पा मारत होते तेवढ्यात मंगेश मनीषा ताईंना बोलतो ...

" आई मस्त काॅफी कर ना यार सगळ्यांसाठी .‌ किती दिवसांनी आपण सगळे एकत्र बसलोय . उद्या पासून पुन्हा सगळे आपापल्या कामात व्यस्त होतील. " 

" बरं ठीके " म्हणत मनीषा ताई उठणार तेवढ्यात सानिका त्यांना थांबवत स्वतः उठते आणि बोलते . 

" दादू !!! कधी कधी तू एकदम बरोबर बोलतो . थांब आई मी करते सगळ्यांसाठी काॅफी . उद्या पासून मी तुमची नसणार . " इतकं बोलून सानिका काॅफी करायला स्वयंपाक घरात जाते आणि सगळ्यांसाठी काॅफी करुन घेऊन येते . सगळे कॉफी पीत - पीत गप्पांमधे रंगून जातात . थोडा वेळ गोष्टी करून सगळे त्यांच्या खोल्यांमध्ये झोपायला निघुन जातात . 

दूसऱ्या दिवशी सकाळी मंगेश , तुलिका आणि जोशी साहेब त्यांच्या कामांवर निघून जातात . थोड्या वेळाने सानिका पण आवरून बाहेर येते आणि मनीषा ताईंना सांगते ...

" आई !! मी थोड्या वेळात निघेन गं ... आधी कॉलेज ला जाणार  आहे , तिथे बघू काय कार्यक्रम ठरतो ,  तसं तुला कळवते . " 

" बरं ठीके !!   जा पण वेळ च्या वेळी फोन कर . उपाशी जाऊ नकोस नाश्ता तयार आहे खाऊन जा . " 

" हो आलेच ... तू पण केला नसणार ना नाश्ता ... चल सोबत करू . तू हो पुढे मी आलेच . " 

मनीषा ताई आणि सानिका दोघी मिळून नाश्ता करतात . त्या नंतर सानिका तिची गाडी घेते आणि कॉलेज साठी निघून जाते . सगळे गेल्यानंतर मनीषा ताई सुध्दा त्यांच्या घरकामात गुंतून जातात . 

सानिका कॉलेज मधे पोहोचते आणि सरळ कॅन्टीन गाठते . तिथे तिच्या ग्रुप चे निम्मे जणं बसलेले असतात . तिला बघताच सगळे तिथूनच तिला हाक मारत बोलतात ...

" या ....या.... कॉलेज ची शान ... University topper ... आपलं स्वागत आहे . " इतकं बोलून सगळे टाळ्या वाजवायला  लागतात . सानिका हसत त्यांच्या जवळ येऊन बसते आणि बोलते ... 

" ऐ..... काय हे ....हा काय प्रकार आहे ... " 

" अरे ....तर ... ?? . सानू तू ते करून दाखवलं जे किती वर्षात कोणाला जमलं नाही . तुला माहित आहे दहा वर्ष झालीत आपल्या कॉलेज मधून आपल्या department मधून कोणीच टॉप केले नाही . यंदा सगळ्यांना तुझ्या कडून अपेक्षा होती आणि तू ती पूर्ण केलीस .... " चिन्मय बोलला . 

" मग काय ... आठवतंय प्रोफेसर रेचल किती अपेक्षेने तुझ्या कडे बघायच्या यार ... " रुची चिन्मय ला सहमती देत बोलते . 

" हो ना ... आणि इतकंच नव्हे तर तीन्ही वर्षात तू business plan competition सुध्दा जिंकली यार . " कविता त्या दोघांना जोडत  बोलते . कविता 

" अरे ऐ ....बास की आता . आज काय माझी खेचण्यासाठी गोळा झालोत का आपण . " त्यांच्या कौतुकाच दडपण येऊन सानिका त्यांना थांबवत बोलते . 

" ऐ ....खेचत नाही आहोत . जे आहे तेच बोलतोय . " कविता ने उत्तर दिलं . 

" बरं बाई .... ऐकलं ... बरं मला सांगा हा अनिरुद्ध कुठे अडकला . अजून आला नाही . " सानिका ने सगळ्यांना बघत विचारलं . 

" तुमने पुकारा और हम चले आये .... " अनिरुद्ध च नाव घेताच तो मागून येऊन गाणं म्हणत तिथे येऊन बसतो . 

" यावे . लेट लतीफ .... कुठे होतास . कधी पासून आम्ही सगळे इथे जमलोय " सानिका अनिरूद्ध वर चिडत बोलली 

" यार माझी काहीच चूक नाही ....मी कौशल ला घ्यायला गेलो होतो . पण as usual .... Kaushal wasn't ready in  time . आता यात मी कुठे चुकलो ...??? " अनिरुद्ध ने कौशल कडे बोट दाखवत सांगितले . 

" Sorry yaar ...काल पिताश्रीं च्या लेक्चर ची क्लास रात्री जरा उशिरा पर्यंत चालली त्या मुळे झोपायला उशीर झाला , आणि म्हणूनच सकाळी उठायला उशीर झाला . " कौशल चेहरा पाडून बोलला . त्यावर सगळे हसायला लागले . 

( ही आहे सानिका ची गॅंग . जूनियर कॉलेज पासून ते BBA पर्यंत चा प्रवास सगळ्यांनी सोबत केला . त्यात अनिरूद्ध आणि सानिका ची आधी मैत्री झाली आणि मग एक एक नग येऊन भेटत गेले .... सानिका , अनिरुद्ध , रूची , चिन्मय , कविता आणि कौशल . ) 

" बरं ते जाऊदे .... आता पुढचा काय प्लॅन आहे . " रुची ने सगळ्यांना थांबवत विचारलं . 

" हो यार ... काय प्लॅन आहे त्या वर बोलुयात ना. वेळ नको घालवायला . Guys हा आपला एकत्र शेवट चा प्लॅन आहे . " कविता बोलली . 

हे ऐकून थोडावेळ सगळे एकदम शांत झाले . सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची दुःखा ची छटा दिसत होती  . सगळे  थोडे emotional झाले होते . सानिका सगळ्यांकडे बघते आणि बोलते .... 

" अरे यार !!!  ही काय फालतुगिरी आहे . उद्या काय होईल काय नाही , माहित नाही . त्या साठी आजचा दिवस कशाला घालवायचा . तुम्ही काय डोक्यावर पडलात का ... Chal yaar... चला पटापट ठरवा आजचा काय प्लॅन आहे तो . आणि आपल्या कडे हा एकच आजचा दिवस आहे उद्या पासून CAT च्या तयारी ला सुरुवात करायची आहे . माहित आहे ना ....?? "

सानिका  हळवं झालेलं वातावरण सैल करत बोलली . त्या नंतर सगळे तो दिवस कसा घालायचा या साठी वेगवेगळे प्लॅन बनवू लागले . 

क्रमशः 

→⁠_⁠→→⁠_⁠→→⁠_⁠→→⁠_⁠→→⁠_⁠→→⁠_⁠→→⁠_⁠→→⁠_⁠→→

कॉलेज चे दिवस असेच असतात ना जेव्हा सोबत असतो तेव्हा नाही जाणवतं , पण आता वेगळे होणार ही जाणीव होताच मन भरून येतं .....