Wilderness - Part 5 in Marathi Thriller by Balkrishna Rane books and stories PDF | रानभूल - भाग 5

Featured Books
Categories
Share

रानभूल - भाग 5

रानभूल ५ रानकुत्र्यांचा एक कळप रात्रीच्या शिकारीसाठी बाहेर पडला होता.अत्याधिक क्रूर असलेला हा रानटी पशू!एकदा शिकार टप्प्यात आल्यावर त्यांचे लचके तोडल्या शिवाय सोडत नाही.अमानुष पध्दतीने ते शिकार करतात.वाघ सुध्दा ह्या कुत्र्यांच्या कळपां पासून दूर राहणे पसंत करतात. ह्या कुत्र्यांच्या प्रमुखाला मानवी रक्ताचा वास आला.त्याने इतरांना सूचित केले.नेमक्या दिशेचा अंदाज घेत त्याने कळपाला पळण्याचा हुकूम दिला.बघता बघता ते सुसाट धावू लागले खडपांवरून...झुडपांतून.धडाधडउड्या मारत भुकेलेले पशू धावत होते.मानवी मांस खायला मिळणार या कल्पनेनेउत्तेजीत होत ते पळत होते. त्यांच्या तोंडातून लाळ गळत होती.विचित्र आवाज करत ते एकमेकांशी संपर्क करत होते. यांची गंध ओळखण्याची व त्याचा माग काढण्याची क्षमता अफाट असते.बघता बघता ते सगळे नदीजवळ पोहचले. समोर पाच कोवळे तरुण पाहताच त्यांच्या डोळ्यात क्रूर झाक चमकली.       कळपाच्या प्रमुखाने सगळ्यांना गोलाकार घेरा घालण्याचा इशारा केला.कळपात एकूण बारा कुत्रे होते.प्रत्येकाने आपल्या जागा पकडल्या...आता ते झेप घेण्याच्या तयारीत होते.समोरच्या तरुणांचे कधी लचके तोडतो असं त्यांना झाले होते. रान कुत्र्यांच्या ह्या हालचाली वनराणी पाहत होती.पण ती निश्चिंतहोती. रानातल्या दिशांच्या देवता ह्या रानटी पशूंना रोखण्यासाठी शस्त्र सज्ज होत समोर उभ्या ठाकल्या होत्या.कुत्र्यांनी काही आगळीक केली असती तर त्यांना शिक्षा ही होणारच होती. खरंतर रानाचा एक नियम असतो तो म्हणजे एक प्राणी दुसर्या प्राण्याला मारून खातो.यात रानातले राखणदार हस्तक्षेप करत नाहीत.पण ही पाच मुले  रानातली रहिवासी नव्हती.त्यांना वनराणीने अभय दिले होते. याच कुत्र्यांचे हिरवे डोळे मनस्वीने पाहिले होते.पण त्यांना माहित नव्हते की शिकारी आणि सावज यांच्यामध्यूकोणीतरी उभे ठाकले होते.-----****-----*****------*****------****------ पोलीस आणि गावकरी मुलांना शोधण्यासाठी जवळच्या मार्गाने धावत पळत वर सरकत होते.सगळ्यात पुढे पोलीस निरीक्षक गवस आणि रुक्मिणी होते.गवस मध्यें मध्ये शिटी मारत  सगळ्यांना सुचेना देत होते.कोणीतरी मध्येच घसरणीवरून घसरत खाली येत होता.त्याच्या मागचा गावकरी त्याला सावरत होता.जराही वेळ न दवडता सगळे पुढे सरकत होते." मावशे जरा दमान...रानात भूता असतत."गवंडेचा मुलगा दामू म्हणाला.." शिरा पडो व्होरान तूझ्या तोंडावर...रानात भूता आसलीच तर ती वाघाची...कोल्हाची..असतली.. पण मीया त्यांचयपेक्षा मोठा भूत आसय समाजाला मा."त्याही परिस्थितीत सगळे खळखळून हसले.थोडा ताणही कमी झाला." पोरांक सुखरूप बघलय काय माका समाधान जातालाहा.सायबांनू नदी जवळ इलीसा."तेवढ्यात गवसांना समोर वर उडत चाललेल्या आगीच्या ठिणग्या दिसल्या." त्या बघा ठिणग्या ! मुलं तिथेच आहेत...चला लवकर."गवस साहेबांनी खडपांवरून उड्या मारत धाव घेतली. परमेकर, हवालदार रुपाली कुबल आणि वारंग यांनीही त्वरा केली. शिट्या वाजवत...हाकारे देत त्यांनी मुलांना इशारा दिला की मदत येत आहे.-----******----*****-----****-----****----शिट्यांचा आवाज मनवेलने प्रथम ऐकला." बहुतेक मदत येतासा. देव पावलो.."त्या आवाजापाठोपाठ बोलण्याचे ....पावलांचे आवाज बॅटर्यांचे प्रकाशझोत दिसू लागले.एवढा वेळ आवरून धरलेला अश्रूंचा बांध फुटला.मनस्वी ढसाढसा रडू लागली. येणार्या माणसांची चाहूल लागताच रान कुत्री  पाय मागे घेत...पळून गेली.बघता बघता कोळोखाचा पडदा चिरत ...प्रकाशातून गवस साहेब देवदूतासारखे समोर आले.त्यापोठोपाठ रूक्मिणी...इतर पोलीस आणि गावकरी नदीच्या पात्रात उभे ठाकले.समोर एकमेकांना घट्ट चिकटून बसलेल्या व थरथरत असेलेल्या मुलांना बघून सारे गहिवरले.मुलांना सध्या कोणताच प्रश्न विचारायचा नाही असं गवस व परमेकर साहेबांनी सगळ्यांना आधीच बजावलं होतं.त्या मुलांच्या घरच्यांची अवस्था काय झाली असेल ह्याचीकल्पना पोलीस म्हणून गवसांना आली होती. तरुण रक्त असल्याने मुल उन्मादात चुकली होती.घरच्यांना कल्पना न देता परस्पर अनोळखी परीसरात भटकंती साठी आली होती.रूक्मिणी मावशीने रडणार्या मनस्वीला जवळ घेतलं." माझी बाय ती ...उगी.,उगी... उगी राव गो."हवालदार रुपालीने तिच्या खांद्यावर हलकेच थोपटले.इतरही चारजणही रडतच होते.हे आनंदाचे अश्रू होते.काळरात्र...संपली होती.एका जीवघेण्या संकटातून ती मुल सुखरुप बाहेर पडली होती.आयुष्यभर हा अनुभव त्यांच्या सोबत राहणार होता. पोलीसांची तत्परता...गावकर्यांच मदत यामुळेच हे शक्य झाले होते.गवसांनी सोबत आणलेले मारी बिस्कीटचे दोन पुडे व शरदने सोबत घेतलेल्या पाण्याच्या बाटल्या त्यांनी मुलांसमोर ठेवल्या.पाचही जण भुकेलेले होते.त्यांनी कोणतीही लाज न बाळगता बिस्कीटांचा फडशा उडविला." चला,परतायला हवं.गावात जेवण मिळेल. यांच्या घरच्यांनाही कळवावे लागेल. पोलीस मुख्यालयात सुध्दा कळवावे लागेल." गवस म्हणाले.मुलं सुखरूप भेटली याच समाधान त्यांना झाले होते.सगळे आनंदाने परत फिरले.तेवड्यात वार्यावर एक मंद सुगंध रानभर पसरत गेला." भाग्याची फूला फुललीहत खयतरी."रूक्मिणी म्हणाली.मनस्वीने सहज परतून मागे पाहिले.त्या अंधारातही एक चमकती आकृती तिला दिसली.एक सुंदर फुला पानांनीसजलेली एक स्री.जिच्या चेहर्यावर समाधानाचे हास्य विलसत होत.तिच्या मुकूटात ती भाग्याची फुले शोभून दिसत होती.  होय ती त्या वनाची वनराणी होती.आणखी एक प्राणी सुखावला होता तो म्हणजे तिथे झाडावरून हे सगळं न्याहाळणारा कोतवाल पक्षी!------*****-----****----****----****----**** भाग पाचवा (अंतिम )समाप्त ( ह्या कथेत...समांतर दोन कथानक आहेत एक मुलांना पडलेली रानभूल...आणि दुसरं वनराणी...व वनातल्या देवता जे काल्पनिक आहे.)