Nirpeksh Prem - 2 in Marathi Love Stories by manasvi Manu books and stories PDF | निरपेक्ष प्रेम ( जगा वेगळं) - भाग 2

Featured Books
Categories
Share

निरपेक्ष प्रेम ( जगा वेगळं) - भाग 2

भाग २ 

आपण बघितलं : अर्णव ला त्याच्या कामात यश मिळतं आणि ते यश तो कोणाच्या तरी नावाने जपून ठेवतो .. त्याच्या इंडस्ट्री मधे त्याच खूप नाव होतं ... 

आता पुढे : आज सकाळपासून घर फक्त फोन च्या आवाजाने दणाणून गेलं होतं . नितीन सकाळपासून फोन वर उत्तर देऊन - देऊन वैतागला होता . अर्णव अजून उठला नव्हता म्हणून त्याला हे करणं भाग होतं शेवटी तो त्याचा मित्र आणि secretary दोन्ही होता . शेवटी वैतागून तो डोक्याला हात लावून सोफ्यावर बसला होता . 

" काय रे नितीन!! काय झालं असा डोक्याला हात लावून का बसला आहेस" . आई ने देवघरातून बाहेर निघताना नितीन ला डोक्याला हात लावून बसलेलं  बघितलं म्हणून ती त्याच्या जवळ आली . 

" काय सांगू मावशी ! आज हा दिवस येणार मला माहित होतं . आपल्या अर्णव चा पराक्रम च तसा आहे .पण यार वैताग आलाय सकाळ पासून फोन घेऊन घेऊन. आणि साहेब अजून झोपले आहेत. " 

" अरे हो ...हो ... किती त्रागा करतोय . घे प्रसाद घे आणि शांत हो . थोड्या वेळाने अर्णव येईलच खाली मग सोबत नाश्ता करू . तो आला की त्याला सांग काही फोन घ्यायला. " आई नितिन च्या हातावर प्रसाद ठेवत बोलते . 

" वाह... म्हणजे तू अजून तुझ्या लेकराला ओळखले नाहीस च. तो कसला घेतो फोन .... त्याला जर सांगितलं ना तर तो सरळ सांगेल " landline  ची तार काढून ठेव mobile switch off  कर . खडूस " . नितीन आई च्या मागे मागे स्वयंपाक घरात जात बोलतो 

" नितिन दादा ... तसं न्हाय हो ... आमचे दादा लय प्रेमळ हायत ... खडूस बिडूस न्हाय बरं ... " ते . 

" या ... या ... फक्त आपलीच कमी होती .. अरे माधव काका कधीतरी ... नाही म्हणजे अगदी कधीच तरी.. त्याच्या बद्दल काही वाईट बोलू देत जा की .. " नितिन. 

हे आहेत माधव काका ह्या घरचे हितचिंतक , लहानपणापासून.. म्हणजे अर्णव ची आज्जी होती तेव्हा गावाकडून जे इथे आले तर इथलेच झाले . अर्णव ला अंगाखांद्यावर खेळवलं ह्यांनी . अर्णव वर प्रचंड प्रेम .. तर पुढे....

नितीन च्या बोलण्यावर सगळे हसायला लागतात . तितक्यात अर्णव खाली येतो . तो सुद्धा तिथे येऊन बसतो . 

" काय गप्पा चालल्या आहेत ." अर्णव 

" यावे राजे ... आज आपली विजय पताका संपूर्ण महाराष्ट्रात डौलाने फडकत आहे... राजे आपली प्रजा आपल्यास भेटण्यास उतावीळ झाली आहे . तर कृपा करून आपल्या प्रजेच मन राखण्याचा प्रयत्न करावा. " नितीन नाटकीय भाषेत बोलतो त्यावर तिथे एकच हशा पिकतो . 

" गप ऐ ... नौटंकी ... नको यार ती डोकेदुखी तूच बघ ते . आई coffee दे ना .. आणि नाश्ता झाला का तुमचा . " अर्णव 

" अरे नाही अजून ... तुझीच वाट बघत होतो. चल खाऊन घेऊ. माधव दादा आणा पटकन. " आई 

" हो ताई साहेब आत्ता आणतो ." माधव काका

" ऐक ना ... यार मी काय म्हणतो एकदा बोलून घे ना सगळ्यांशी... काय हरकत आहे " . नितीन अर्णव ला समजवायचा प्रयत्न करतो . 

" सगळ्यांशी ...?? तुला वेड लागलंय का ?? मला इतका वेळ नाही . दोन गाणी तयार आहे त्यांची आहे त्यांची composition बघायची आहे. एक story complete झाली आहे ती reading साठी पाठवून दे . आणि त्या पुढच्या आठवड्यात dates conform होणार होत्या त्याच काय झालं " अर्णव नाश्ता करता करता बोलतो . 

" ते सगळं व्यवस्थित चालू आहे . सगळं वेळेवर होऊन जाईल.पण यार काही interview आहेत reporters वेळ मागत आहेत त्यांना काय सांगू. " नितीन.

" अरे जे नेहमी सांगतो तेच सांग ना .‌ आत्ता काही नवीन झालं आहे का .." अर्णव. 

" तुला खरंच माहीत नाही .... की तू माझी फिरकी घेतोय " नितीन आश्चर्याने अर्णव कडे बघतो . 

" त्याची गरज नाही... तू आधीच फिरलेला आहेस " अर्णव हसतो सोबत आई आणि माधव काका पण हसतात 

" हां ... हसा ...हसा ... सगळे माझ्यावरच हसा ... त्याला कोणी काही सांगू नका . त्याच्या fan following ला सांभाळता - सांभाळता मला नाकी नऊ येतात. मला एक कळत नाही ज्या माणसाला कदर नाही , देव त्याला इतकं उत्कर्ष देऊच कसं शकतो . 

" कारण .. हे उत्कर्ष माझं नाहीच आहे . जिचं आहे तिला भरपूर कदर आहे त्याची आणि जोवर तिची इच्छा नसेल तोवर हे थांबणार नाही . जेव्हा तिला समाधान होईल तेव्हाच हे थांबेल .... कळलं ...??? " अर्णव टेबल वरून उठता - उठता बोलतो . 

" अरे पण मला एक सांग ...." नितिन पुढे काही बोलणार तेवढ्यात आई ने नितिन चा हात धरून दाबला. नितीन तिथेच थांबला . अर्णव आपल्या study room मधे निघून जातो. 

नितीन अर्णव च्या पाठमोऱ्या आकृती कडे बघत आई ला विचारतो . 

" मावशी हे असं कधी पर्यंत चालणार.तिला जाऊन पाच वर्ष झाली. ह्या पाच वर्षांत त्याने कामात स्वतःला वाहवून दिलं आहे. आयुष्य काय असतं हे तो विसरुन च गेला जणु . असं कसं चालेल. " 

" हो रे मला सुद्धा खूप काळजी वाटते त्याची अख्खं आयुष्य एकटाच कसा काढणार हा मुलगा... बरं काही बोलायला जा तर डोळ्यात लगेच पाणी असतं त्याच्या आणि तोंड बंद .. आता तूच सांग कसं बोलणार त्याच्या शी, मला तर काही सुचेना झालं आहे ." आई डोळ्याला पदर लावते . 

" तेच ना ... काही सुचतच नाही , कुठल्या party , function, events ला नाही जात फक्त  award ceremony असली की च तिथे जातो . मावशी आमची industry इतकी सोपी नाही गं . जर संपर्कात नाही राहिलो तर काम मिळवणं इतकं सोपं नसतं . पण .. ह्याला लोकं शोधत असतात... हा अपवाद आहे ह्या industry  ला . खरंच का गं ... जसं तो म्हणतो तसं...हे  सगळं तिच्या मुळेच होत असेल का ..?? " नितीन आई ला विचारतो.

" मला खरंच माहीत नाही रे तिच आणि ह्याच नातं आणि त्यांचं प्रेम . हे माझ्यासाठी सुध्दा न उलगडणारं कोडंच आहे बघ. चल जाऊ दे... म्हणतात ना ....वेळ ही प्रत्येक जखमेवर औषध असतं. त्याचे घाव खूप गहिरे आहे ... थोडा वेळ तर लागेलच ना .." आई अर्णव च्या study कडे बघत इतकंच बोलते आणि उठून आपल्या कामाला निघून जाते आणि नितिन पुन्हा फोन अटेंड करता - करता study room कडे जातो. 

"  उद्या त्या नवीन चित्रपटाच music lounch आहे . तू तर येणार नाही च ना . " नितीन अर्णव ला माहिती देतो .

" जेव्हा तुला माहीत आहे तर कशाला उगाच तुझा आणि माझा time waste करतो . ते producer कधी येणार आहे म्हणाले. " अर्णव आपल्या laptop मधे डोकं घालून च बोलतो . 

" परवा .‌ आपल्याला तिथे जायचं आहे ... चालेल ना..??? " नितीन

" Hmm चालेल.. बरं चल दुपारची शिफ्ट आहे ना . सगळं ready आहे का ...?? निघुया का .. ??? " अर्णव आपलं साहित्य आवरत बोलतो . 

" होय सगळं तयार आहे ... चला निघुया. " नितिन

अर्णव आणि नितीन studio जाण्यासाठी निघतात. 

क्रमशः

🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷