Abhijeet in Marathi Love Stories by Reshma books and stories PDF | अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 5

The Author
Featured Books
Categories
Share

अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 5

♥️अभिजित ♥️5

"गुरुजी"... हाताच्या मुठी घट्ट आवळत दात ओठ खात तो रागात कडाडला...

मंत्र पठण करणाऱ्या गुरुजींनी मान तिरकी करत त्याच्या कडे पाहिले त्यांच्या ओठांतून आजून ही मंत्रांचे उच्चारण होत होते.... प्रतापला पाहून ही त्यांनी पूजा थांबवली नाही....

आणी का थांबवतील?.. काय कारण?.. ती देविची पूजा होती... तेथे पहिल्या येणाऱ्या पालखीचा मान होता.. ती कोणत्या ही गावची असेना.. पूजा पहिल्या येणाऱ्या पालखीचीच होणार होती.. मान त्याच पालखीला मिळणार होता...
तेथे प्रताप काय कोणाचीच मक्तेदारी चालणार न्हवती...गिरुजींनी लगेच पुढच्या आचमनाला सुरवात केली..



"पण हे विक्रमला कोणी सांगावे रागाने लाल झालेला विक्रम पूजा उधळून दयायला गाभाऱ्यात शिरू लागला... पण त्याच वेळी गाभाऱ्याच्या समोर अभी उभा राहिला.... त्याला समोर पाहून विक्रम जागीच थबकला..

समोर तो एकटा होता आणी विक्रम बरोबर त्याचा सारा गाव तरी ही पुढे पाऊल टाकण्या आधी त्याचे पाय थबकले...

' अभिजित'.. त्याच्या नावातच इतकी दहशतच होती  कि गाव पाठीशी असताना ही त्याला भीडण्याचे सामर्थ्य नव्हते विक्रम मध्ये '...
त्याने माघे वळून पाहिले, त्याच्या माघे प्रताप होता आणी त्याच्या माघे सारा गाव... आपल्या भावाला पाहून विक्रम मध्ये पुन्हा जोर चढला....


"मला माहित आहे अभ्या तू काय तरी घोळ केलाईस... ही पालखी तुमची नाहीच.. तुमची पालखी तर अजून माघे आहे. आणी हित हाये ती नकली आहे"...अभी पासून चार हाताच अंतर ठेवून विक्रम रागाने म्हणाला...

"तू काय यडा बिडा झालास काय विक्या"... काठी पालखी असली नकली असती का कधी?.. यड कुठल!... अभिच्या माघोमाघ अजय गाभाऱ्यातून बाहेर आला अन रील्याक्स पणे अंग मोडत तो म्हणाला...

समोरचे लोक अर्धवट आहेत आणी भडकले तर सगळे अंगावर येतील कश्याचिच भीती न्हवती त्याला.. आणी असेल तरी कशी शेवटी ईनामदरांचे रक्त होते त्याच्यात.. त्यात त्याचा पाठीराखा सोबत होता त्याच्या...

"अज्या तोंड संभाळून बोल . नाहीतर....".रागाने लाल झालेला विक्रम पुढे आला..

"नाहीतर"....कंबर मोडत असलेला अजय सरळ ताठ उभा राहिला... भुवया गोळा करत त्याने रागात विक्रम कडे पाहिले....बोल नाहीतर काय?..अजय ही त्याच जोशात पुढे आला...

विक्रम ही रागात पुढे सरकला... 
अजय तर याच वेळेची वाट पहात होता..त्याला भिडायचेच होते त्यांच्या बरोबर... त्यांचा सगळा माज सगळी गुर्मी उतरवायची होती त्याला... आबासाहेबांनी विना कारण मारामारी करायला बंदी केली होती..
पण समोरचे चालून आले तर गप्प पण बसायला सांगितले न्हवते.... आणी आज विक्रम स्वतः चालून येत होता... ही आयती शिकार सोडायची न्हवती त्याला ....हाताची खुमखूम मिटवायची होती त्याला... एकदा तरी या सरपोतदारांच्या पिल्लानां हाताखालून काढायचीच होतीत त्याला...


पण त्याच वेळी सर्जीराव तेथे आले... 
आणी त्यांनी विक्रमला अडवले...
समोर श्वेतपूरच्या देवीचे पूजन होत होते त्यांची पालखी गाभाऱ्यात आरुड झाली होती..

हे कस झाल?.. कधी झाल?.. त्यांना ही समजत न्हवते...रक्त तर त्यांच ही खवळून निघालं होत.. रागात एका एकाला फोडून काढण्याची ईच्छा होत होती...
पण ते असे न्हवते करू शकत, शेवटी माझी आमदार होते ते शिवाय गावचे जेष्ठ नागरिक ही होते, असा आतताई पणा शोभणार न्हवता त्यांना... 

"तो आब्या हारून ही प्रत्येक वेळी गप्प बसतो, अगदी मुकाट असतो, आमंचा सगळा जलोष अगदी गुमान पहातो, हारून ही आमंच्या पालखीच्या पाया पडतो... मला ही त्याच्या सारखंच गप्प बसाव लागणार आहे... हाताच्या मुठी घट्ट आवळत त्यांनी स्वतःला शांत केले... मनात तर प्रचंड संताप भरला होता पण काय करणार गप्प तर बसावंच लागणार होत...

त्यात गुरुजी आतून सर्वांन वर नजर ठेवून होते..गुरुजी म्हणजे पंक्रोशीतील मोठे प्रस्थ.
अगोदरच त्यांच्या मनात आबासाहेब आणी त्यांच्या पोरान बाबद जरा जास्तच लोभ होता.. ते सगळे संस्कारी वाटायचे त्यांना आणी आत्ता इथ भांडण करून त्यांच्या मनात असलेली आपल्या कुटूंबा बाबतची धारणा अजून खराब न्हवती करायची सर्जीरावांना ..

"विक्या आर अस काय करतोस,? हार जीत तर चालायचीच.. इतके वर्ष झाल आपण जिकंत आलोय.. एक वर्ष ते जिंकले तर काय फरक पडतोय"..मनात नसतांना ही सर्जीराव विक्रमची समजूत घालत म्हणाले....

"चुकताय तुम्ही आण्णासाहेब,..
तुमच्या माहिती साठी सांगतो...
तुम्ही जिंकत आला नाही तर आम्ही तुम्हाला इतके वर्ष जिंकून दिले...गालात हसून अभी म्हणाला..
आणी त्याच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून तर सर्जीरावांची आगमाती झाली.. त्यांनी एक रागीट कटाक्ष अभी वर टाकला आणी मोठ्या चालखीने चेहऱ्यावरचे भाव बदलत चेहऱ्यावर हसू पांघरले.....

जो तो आपल्या हिमतीने लढतो आणी जिंकतो अभिजित... यावेळेस आमंची हिम्मत थोडी कमी पडली...... रागात प्रताप कडे पहात त्यांनी आपली मान अभिजित कडे वळवली पण आत्ता चेहऱ्यावर राग नाही तर हसू होते..

इतक्या वेगात तर सरडा ही रंग बदलत नाही.. तितक्या जलदगतीने ते चेहऱ्यावरील भाव बदलत होते..

"हिम्मत नाही कावा म्हणत्यात त्याला... आणी तुम्ही कावा करायला यावेळेस ही कुठंच कमी पडला नाही आण्णासाहेब... फक्त यावेळेस आम्ही सावध होतो"...चेहऱ्यावर शांत भाव ठेवत अभिजीतने दिले...

ते ऐकून तर विक्रमचें रक्त खवळून उठले...
"आण्णा सोडा तुम्ही मला, आज यांची गुर्मी उतरवायचीच आहे मला".. सर्जीरावांना बाजूला करत विक्या पुढे जाऊ लागला... आणी यावेळेस ही सर्जीरावांनी त्याला प्रचंड ताकदीने रोखले त्यांच्या बोटांची नखे अगदी विक्रमच्या दंडात ऋतली... अभ्याचा राग विक्रम वर निघत होता....

आर म ऐ कि पुढ,... आम्ही पण तयार आहे... आज होऊनच जाऊ दे!... अजय देखील पुढे होत म्हणाला.. त्याच वेळी अभिने अजय समोर आडवा हात केला...

"आत्ता नको .. याच्या कडे  पाहू... पण उद्या,..ते ही आखड्यात"...अजयला रोखत अभी म्हणाला....

तशी विक्रम आणी सर्जीरावांच्या चेहऱ्यावर मूर्तीमंत भीती पसरली... क्षणात त्यांना आखाडा आठवला... त्या आखाड्यात दंड थोपटत अभी विक्रमच्या छातीवर उभा होता... जसे दरवर्षी त्यांचे लोक ईनामदरांच्या रक्ताने आपली तहान भगवायचे अगदी तसाच अभी विक्रमच्या रक्तात न्हाहून निघाला होता...

म्हणजे उद्या आखड्यात ते विक्रमला आव्हान करणार आणी त्याला यमसदणी धाडणार... विक्रमचे हात पाय भीतीने कापु लागले, सर्जीरावांच्या छातीत ही कधी न्हवे ती धडकी भरली..
पण प्रताप मात्र अजून ही मगरुळीने अभी कडे पहात होता..
त्याच रक्त जणू खवळून निघाले होते.... हार सहन होत न्हवती त्याला....हाताच्या मुठी घट्ट आवळून धरत तो अभी वर धावून आला...
आणी अजय समोर आडवा हात धरलेला अभिजित ही त्याला पाहून सरळ पुढे आला..

आत्ता अभ्या भिडणार प्रतापला म्हणून अजयचा आनंद गगनाला भिडला होता.... याच क्षणाची तो वाट पहात होता...

कसा वाटला पार्ट कमेंट्स करून नक्की सांगा...
धन्यवाद 🙏🤗

"क्रमश".....