Ek Premkatha Ashihi - 2 in Marathi Love Stories by Adv Nikhil Deore books and stories PDF | एक प्रेमकथा अशीही.... - भाग 2

Featured Books
Categories
Share

एक प्रेमकथा अशीही.... - भाग 2

एक प्रेम कथा अशीही.... भाग 2 


   भाग 1 वरून पुढे 


   अभिमन्यू आणि अनिकेत हे दोघेही हॉस्टेलमध्ये ऍडमिशन करून घेतात. सुदैवाने त्यांना खोलीही एकच मिळते. ऋतुजा मॅडम तर तिथल्याच मुळच्या रहिवासी असतात पण थोडं स्वछंदी जीवन जगावं. आपल्या कॉलेजच्या दुनियेत मुक्तपणे वावरावं म्हणून तीसुद्धा होस्टेलला ऍडमिशन करून घेते आणि घरी काय सांगतेय मला शिस्त लावून घ्यायचीय.. खरंच  शिस्तच ना. 

            अभिमन्यू आणि अनिकेत चालतच कॉलेजला पोहचतात. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कॉलेजमध्ये थंडगार असे वातावरण होते. कॉलेजच्या मुख्य द्वारावर असलेल्या पिंपळाच्या झाडावरून टप.. टप. करत पाण्याचे तुषार अभिमन्यूच्या अंगाला स्पर्शून जात होते. थंडगार वाऱ्याची झुळूक मनाला तृप्त करीत होती. पाऊस बराच पडून गेल्यामुळे कॉलेज मध्ये रानझुडपे उगवली होती पण ती कुठल्या प्रकारची होती हे तर कुणालाच ठाऊक नव्हती. रानझुडपाबरोबर गवतही कॉलेजमध्ये जागोजागी उगविली होती त्याला लागलेली पांढरी आणि आकाशी रंगाची सुमने मन मोहून टाकीत होती. 

                   आज वनस्पतिशास्त्राचा (Botany) पहिलाच तास होता. वर्गात डाव्या बाजूला मुलं बसलेली होती तर उजव्या बाजूला मुलींचे साम्राज्य होते. ऋतुजा उजव्या बाजूला असलेली खिडकी हळुवार उघडते त्यातून येणारी थंडगार वाऱ्याची झोत तिच्या रेशमी केसाला अलगद चेहऱ्यावर आणून सोडते जणू ती वाऱ्याची झोत देखील तिचे सौंदर्य  खुलविण्यास हातभार लावत होती. ऋतुजा हळुवारपणे अभिमन्यूला चोरनजरेने पाहते. अभिमन्यू आपल्या नोटबुक मध्ये नोट्स काढण्यात गुंग असतो त्याच्याच बाजूला अनिकेत आणि वरूनही बसले असतात. 
" काय राव किती बोरिंग लेक्टर आहे हे " अनिकेत अभिमन्यूला म्हणाला. 
" अरे आता सवय करून घे रोजचंच राहणार आहे हे"
" हो पहिले काही दिवस नियमित करणार आहे नंतर मग रोजच बंग करणार आहे कॉलेज " अनिकेत म्हणतो. 
" ते ही आहे म्हणा " दोघेही हसू लागतात.

                 वनस्पतीशास्त्राचे लेक्टर संपते आणि प्रॅक्टिकल (प्रात्यक्षिक ) चा तास सुरु होतो. वनस्पतिशास्त्राची प्रयोगशाळा U आकाराची होती. एका बाजूला मुले विच्छेदन ( Dissection) करत असतात तर दुसऱ्या बाजूला मुलीची कुजबुज सुरु होती. आज पहिल्या लेक्टरला शिकविल्याप्रमाणे पायनस (pinus) या झाडाच्या खोडाचे Dissection करून स्लाईड बनवायच्या होत्या. अभिमन्यू, अनिकेत आणि वरुण एका रंगतेच बसून निमूटपणे dissection करत होती. ऋतुजा ही आपली स्लाईड बनवण्यात मग्न होती. 
" किती कठीण काम आहे यार हे स्लाईड बनवणं " अनिकेत अभिमन्यूला म्हणाला. 
" पण करा तर लागणारच ना भावा ".
" तुला आठवते का रे आपल्याला बारावी ला जास्वदांच्या फुलाचं dissection होत? "
" हो आठवत ना " अभिमन्यू म्हणाला. 
" मला तर ते स्लाईड बनवणं कधी जमलंच नाही जेव्हाही प्रॅक्टिकल चा तास असायचा तेव्हा पूर्ण दोन तास एका हातात ब्लेड आणि एका हातात जास्ववंदाचं फुल घेऊन सारखा कापत बसायचो पूर्ण वर्षात दहा डझन जास्वदांचे फुले कापले असेल तरी पण स्लाईड बनायचा काही पत्ता नाही " असे म्हणून अभिमन्यू आणि अनिकेत दोघेही हसू लागतात. 
ऋतुजा आपली स्लाईड बनवण्यात मग्न होती. ती हलक्याच नजरेने अभिमन्यू कडे पाहते. अभिमन्यू ही आपल्या चोरनजरेने तिच्याकडे पाहायला लागतो तर ती लगेच आपली नजर हटवून खाली पाहते. त्यांचा हा नजरेचा लपंडाव किती तरी वेळ सुरु होता. तो खरचं नजरेचा लपंडाव होता कि......... सुरवात होती कुठल्या नवीन भावनेची. 

                   अभिमन्यू आपली स्लाईड बनवण्यात गुंग होता. इतक्यात ऋतुजा  त्याचा जवळ जाते आणि हलकेच विचारते " झाली का स्लाईड तयार? " तिचा हात त्याचा हाताला अलगद स्पर्शुन जाते. अभिमन्यूला तिचा तो रेशमी स्पर्श रोमांचित करत होता तो काही बोलणार एवढ्यात वर्गात काही थर्ड इयर चे काही विद्यार्थी आलेले होते त्यातला एक उंच पुरा मुलगा सर्वात समोर होता..... समीर.. तो सर्व कॉलेज मध्ये प्रसिद्ध होता. 
" मॅडम दहा मिनिट घेऊ का एक सूचना द्यायची  आहे? " समीर म्हणाला. 
" अहो दहा काय काय पूर्ण तासच घ्या तशेही तुम्ही अमावश्या पौर्णिमेला कॉलेज मध्ये येता काहीतरी नवीन असणारच म्हणून तर इथपर्यंत आलाय " वर्गातले सर्वजण हसू लागतात. समीर थोडा गोंधळून जातो आणि सूचना द्यायला सुरवात करतो. 
" प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उद्या कॉलेजच्या सांस्कृतिक हॉल मध्ये फ्रेशर पार्टी म्हणजेच सुस्वागतमाचा कार्यक्रम ठेवला आहे तरी सर्व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी हजर राहावे " ही सूचना देऊन समीर वर्गातून बाहेर निघून जातो. प्रथम वर्षाचे सर्व विद्यार्थी मनात आनंदाचे मनोरे रचत होते. 

                   दुसऱ्या दिवशी मुलांच्या हॉस्टेलमध्ये प्रथम वर्षांच्या मुलांची टापटीप दिसण्याची जणू स्पर्धाच सुरु होती. कुणी अंगभर पर्फुम मारत होत... तर कुणी आरशात पाहून स्वतःची शर्टींग करत होत..... तर कुणी जेल लावून केस उभे करत होते. अभिमन्यू आणि अनिकेत दोघेही तयार झाले. अभिमन्यूने ब्लॅक शर्ट आणि त्यावर नेव्ही ब्लु पॅन्ट घातला होता जो त्याच्या गोऱ्या वर्णावर उठून दिसत होता. सर्वजण कॉलेजच्या सांस्कृतिक भवन मध्ये पोहचतात. अभिमन्यूची नजर ऋतुजा वर पडली आज तिने साडी घातली होती आणि हलकासा मेकअप केला होता. सौंदर्यवती अशीच असते का असा प्रश्न अभिमन्यूला पडला होता. 

                  स्टेजवर माइक घेऊन सिनियर नि बोलण्यास सुरवात केली आणि सांगितले कि फर्स्ट इयर च्या विद्यार्थ्यांसाठी काही खेळ ठेवले आहे तसेच एक सरप्रायसिंग टास्क ठेवलाय ज्यातून मिस्टर फ्रेशर आणि मिस फ्रेशर ची निवड करण्यात येईल. फर्स्ट इयर च्या सगळ्या विद्यार्थांच्या नावाच्या चिठ्ठ्या घेतल्या ज्यातून दहा मुलं आणि दहा मुली निवडल्या गेली  मुलामध्ये अभिमन्यूही होता तर मुलींमध्ये ऋतुजाही होती. त्या वीस जणांसाठी विविध खेळ ठेवले होते जसे डम शराज, कॅच द वर्ड, संगीत खुर्ची, फुगे फोडणे. प्रत्येक खेळातून काही मुले आणि मुली बाद होत गेल्या आता फक्त चारच जण उरली होती ऋतुजा, अभिमन्यू, अंकिता आणि शुभम. स्टेज वर सिनिअरची  परत annoucement झाली आता वेळ आली आहे सरपर्सिंग टास्क ची तर सरप्रासिंग टास्क असा आहे जे ही जोडपं कपल डान्स करेल तेच बनेल मिस्टर फ्रेशर आणि मिस फ्रेशर. शुभम आणि अंकिता कपल डान्स न करायचं ठरवतात आणि स्टेजवरून खाली येतात. आता स्टेजवर फक्त अभिमन्यू आणि ऋतुजा होती. अभिमन्यूने लाजतच ऋतुजाकडे पहिले तिनेही नजरेनेच होकार दिला. क्षणार्धांतच गाणं सुरु झालं. 
💕💕 केहते है  खुदा ने इस जहाँ मे सभी के लिये किसी ना किसी को है बनाया हर किसी के लिये तेरा मिलना है उस रब का इशारा मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिये...... 💕
             ऋतुजाचा हात हातात घेऊन अभिमन्यू कपल डान्स करायला सुरवात करतो त्यांच्या नजरांनी तर केव्हाच पळ काढला होता.... शेवटी हळुवारपणे त्यांची नजर एकमेकांना भेटली आणि एका नयनरम्य दुनियेत ते मग्न झाले होते... सर्व काही शांत शांत वाटत होत... त्यांच्या भावनेच्या जगात अलवारपणे ते एक झाले होते... बाहेरच्या जगाचा केव्हाच विसर पडला होता. कडाडणाऱ्या टाळ्यांनी दोघेही भानावर आले आणि स्टेजवरून Announcement झाली या वर्षीचे मिस्टर फ्रेशर आहे अभिमन्यू आणि मिस फ्रेशर आहे ऋतुजा. फ्रेशर पार्टी संपली होती कित्येक तरी ओळख नसलेल्या मुलांना स्मितहास्य देऊन अभिमन्यू बोलत होता. खरं तर कंटाळा आला होता त्याला या सर्व गोष्टीचा. त्याची नजर फक्त तिलाच शोधत होती. शेवटी ती दिसली त्या दोघांनीही whatss app नंबर ची अदलाबदली केली. एव्हाना त्यांचा एक नवीन ग्रुप बनला होता ज्यात अभिमन्यू,अनिकेत,  ऋतुजा, वरुण आणि अवनी हे पाच जण होते. 

                रात्रीचे 11 वाजले होते. हॉस्टेलमधील सर्व खोल्यांचे दिवे बंद झाले होते. अभिमन्यू च्या खोलीतील दिवा मात्र सुरु होता. अभिमन्यू वनस्पतीशास्त्राच पुस्तकं वाचत बसला होता तर अनिकेत अंगावर पांघरून घेऊन झोपला होता. 
" झोप न रे भावा किती वेळ वाचणार आहे आत्ताच तर कॉलेज सुरु झालंय " अर्धवट झोपलेला अनिकेत अभिमन्यूला म्हणाला. 
" अरे हो बस झालंच "
अभिमन्यू दिवा बंद करतो आणि त्यांच्या पलंगावर जाऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागतो.... पण छे ! त्याला झोपच येत नव्हती. इकडे ऋतुजाही हॉस्टेलमध्ये झोपण्याचा प्रयत्न करीत होती पण तिलाही झोप येत नव्हती. दोघेही कसल्यातरी विचारात हरवले होते.. खरं तर ते त्या विचाररम्य दुनियेत एकमेकांच्या विचारांची गुंफणंच करीत होते. 

अभिमन्यू :- खूप वर्षानंतर एवढं हर्षुल्लासात 
                 जगतोय. जीवनात वणवा पेटून गेलेल्या 
                जंगलाला नवी पालवी फुटावी असेच 
                वाटतंय..... कुठलातरी रंग चढलाय 
                 माझ्यावर. 

ऋतुजा  :-   रंग..... प्रेमरंग हो.. हा प्रेमरंगच तर आहे 
                 आहे. जीवनात प्रत्येक वळणावर 
               कुणीतरी भेटलय पण कुणाकडेही एवढे 
               ओढले नाही गेले मी. त्याचा तो       
               स्पर्श   अजूनही माझ्या मनात भिनभिनतोय. 

तो (अभि ) :- आज सारख मन भिनभिनतंय... पण 
                   कशानि?  उत्तर तर माझ्या समोरच 
                    आहे पण मन मानत नाही.... काय 
                   करत असेल ती? सध्या झोपली असेल 
                    का?  कि माझाच विचार करत असेल. 

ती (ऋ ) :- तो  ही माझा विचार करत असेल का?  
                कि मीच त्याचा एवढा विचार करतेय... 
                 आज कसला handsome दिसत होता 
                   तो... 

तो    :- सौंदर्यवती..... हो सौंदर्यवतीच भासत होती 
          ती.. माझी नजर काहीही करून आज 
         तिच्यावरून हटतच नव्हती. जीवनात केलेला 
          हा पहिलाच कपल डान्स आहे. 

ती   :-कपल डान्स.... एव्हाना कपल डान्सचं नावही काढलं 
        तरी चिडणारी मी आज चक्क होकार दिला...
         खरचं काय भावनिक सत्य आहे याच?  

तो  :- सत्य काहीही असू शकत... पण आपण एवढा 
        विचार करून घाई करायला नको. ती आपल्याला 
         मित्रही मानू शकते... अरेच्या तिचा whatss
      app नंबर आहे कि आपल्याकडे. 

ती :- whatssapp नंबर तर आहे पण मॅसेज कराव 
       कि नाही त्याला खूप उतावळेपणा वाटेल जर 
      मी प्रथम मॅसेज केला तर. 

तो  :- माझ्याविषयी पूर्वग्रह दूषित तर नाही ना होणार 
        जर मी प्रथम मॅसेज केला तर... काय कराव?? 

दोघेही जण आपला मोबाईल हातात घेतात. अभिमन्यू whatss app वर जाऊन तिचा प्रोफाइल उघडतो आणि Hiii हा whatss app msg टाईप  करतो तो msg पाठवणारच एवढ्यात कसलातरी विचार करतो आणि msg काढून टाकतो. मोबाईल तसाच टेबलावर ठेवून देतो आणि झोपण्याचा प्रयत्न करतो. अभिमन्यूचा मोबाईल खणाणतो. मोबाईल घेऊन पाहतो तर काय त्याला ऋतुजाचा whatss app वर Hiiii हा msg आला असतो. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वलय निर्माण होते. 

to be continue.......
       
आपल्याला हा भाग कसा वाटला हे अभिप्रायाने कळवा..