धान्यांन भरलेलं माप ओलांडून तिचा गृहप्रवेश झाला....... अहो का म्हणून काय विचारताय... लग्न झालेल आज त्या दोघांच..... पण नवरीच्या चेहऱ्यावर होती ती भीती आणि खूप सारा गोंधळ... तर नवरदेव मात्र रागाने लाल झालेला... मान्यच नव्हतं त्याला हे लग्न .... पण काय करणार त्याच्या मोठ्या आईची इच्छा होती की त्याचं लग्न तिच्यासोबतच व्हाव.... इमोशनल ब्लॅकमेल केलं गेलेलं त्याला.... शेवटी मोठ्या आईला जास्त नाही म्हणू शकला नाही तो.... तसं तर त्याला कोणाच जास्त घेणं देणं नसायच..... पण मोठ्या आईला दुखावणं त्याच्या मनाला पटत नव्हत... कारण त्याची mom गेल्यानंतर त्याचा सांभाळ करायला मोठी आई सोडलं तर कोणीच नव्हत......
गृहप्रवेश झाल्यावर एक नजर त्याने तिथे उभ्या असणाऱ्या सर्व पाहुणे मंडळींवर टाकली... त्यांचा विला म्हणजेच वसुंधरा निवास.... बाहेरून जेवढा मोठा आणि सुटसुटीत दिसायचा... तेवढाच आतूनही होता.... अगदी थाटात उभा असलेला हा वसुंधरा विला म्हणजे भोसले कुटुंबाची शान होती.....

आणि अनंतराव भोसले म्हणजेच नवरदेवाचे बाबा... त्यांनी खूप आनंदाने या वीलाच नाव वसुंधरा ठेवलेल..... त्याचं कारण त्यांच्या बायकोचं नावही वसुंधराच होत.....
त्याने एक नजर शेजारी उभ्या असणाऱ्या तिच्यावर टाकली .. जी घाबरूनच बघत होती सर्वांकडे... त्याला खरंतर प्रत्येक गोष्टीत परफेक्शन लागायच.... अशा गोंधळलेल्या , घाबरट मुली त्याला बिलकुल पसंत नव्हत्या..... पण काय करणार होती तर त्याच्या मोठ्या आईची चॉईस... त्याच्या मॉम नंतर जास्त किंमत तो कोणाला देत असेल तर ती त्याची मोठी आई.... आणि त्याचे डॅड .....
त्याच्या खांद्यावर असलेल्या शाल ला तिचा शेला बांधलेला ... थोडक्यात काय तर लग्नात लग्नगाठ बांधताना केला जातो तो .... त्याने खांद्यावरच ते कापड काढून तसंच खाली फेकलं आणि ताडताड वर निघून गेला..
घरात अजून बरेच पाहुणे मंडळी होते... तिच्यासोबत आलेली तिची आजी पण पाहुण्यांसोबत काहीतरी बोलत होती.... तिला मात्र अगदीच घाबरल्यासारख झालेल... आणि का नाही होणार... जेमतेम 20 -21 वर्षांची होती ती.... वय पण तर लहानच होत ना.... पण आई वडील नव्हते.... जन्म देताच तिची आई वारलेली.. आणि या धक्क्याने तिचे बाबा पण दोन-तीन वर्षातच गेले... मग काय म्हाताऱ्या आजीने जमेल तसा कसा बसा तिचा सांभाळ केला....
शांताई म्हणजेच मोठी आई ही तिची चुलत आत्या.... त्यांनी आजीला तिचा हात मागितलेला.... मग त्यांनाही वाटलं लहानपणापासून सोसल आहे लेकराने तर जरा चांगले दिवस बघायला मिळतील तिला... कारण मोठ्या घरातून मागणी आलेली.... भलेही शांताई जास्त माणुसकीची नव्हती... पण तरीही शेवटी पैसा आणि प्रॉपर्टी एवढी होती की तेवढा माज तर ती दाखवणारच होती......
विधी......शांताई ने तिला आवाज दिला तेव्हा एवढ्या वेळ विलाच निरीक्षण करणारी ती त्यांच्याकडे बघू लागली......

ती म्हणजे विधी.... विधी सरनाईक...... वय जेमतेम 20 वर्ष..... फॅशन डिझाइनिंग च्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती....
घरची परिस्थिती खूपच हलाखीची होती..... आई-बाबा लहानपणीच गेलेले... त्यानंतर आजी म्हणजेच बाबांची आई त्यांनी तिचा सांभाळ केला.... पण आता पोरगी वयात आलेली तर वेळीच लग्न करून दिलेल त्यांना बरं वाटलं... कारण शेवटी मुलगी म्हणजे जबाबदारी असती असाच त्या म्हाताऱ्या माऊलीचे विचार होते.... आणि त्यात वेगळ तरी काय असणार... शेवटी विधी दिसायला पण तशीच होती.... काळजी लागून राहायची उगाच त्यांना....
विधी दिसायला अगदीच नाजूक होती.... सडपातळ बांधा, पाठ भरून केस, गोरी नितळ त्वचा, आणि अगदीच आखीव रेखीव नाकी डोळी, बघणाऱ्याच्या पहिल्याच नजरेत भरेल अशीच होती ती... आणि त्यामुळेच शांताईला पण ती सून म्हणून आवडली होती.... आता नक्की का आवडली ते पुढे समजेलच.....
इकडे रूम मध्ये मात्र एकही वस्तू जागेवर राहिली नव्हती ... रागाने नुसता तीळ पापड होत होता त्याचा.... सकाळपासून फोन बघितला नव्हता पण आता रूम मध्ये आल्यावर त्यावर एकावर एक पडणारे नताशा चे मिस कॉल बघून त्याचं डोकं आऊट झालेल... नताशा म्हणजे त्याची रिसेंट गर्लफ्रेंड..
तसा कोणत्याच मुलीला कमीटेड नव्हता तो... पण अशा लो क्लास मुलीशी पण तर त्याला लग्न नव्हतं करायच... हो हो बरोबर ऐकलं.... विधी म्हणजे त्याच्यासाठी लो क्लास मुलगी होती....
त्याच्या मते गरीब घरातल्या मुली या पैशांसाठी कोणत्याही थराला जाऊ शकत होत्या... त्याला अजूनही असंच वाटत होतं की विधिने पण लग्न पैसा आणि प्रॉपर्टी बघूनच केल... पण त्याला कोण सांगणार तिला बिचारीला याच्याशी काहीच घेणं देणं नव्हतं.... विचार तेवढे पोहोचलेले नव्हते तिचे... पण हे अंशुलला लवकर समजलं तरच चांगलं असणार होतं तिच्यासाठी आणि त्याच्यासाठी पण....
तर हा अंशुल ... अंशुल भोसले.... वय वर्ष 28 .... आपल्या विधीचा नुकताच झालेला नवरा... भोसले ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज चा एकुलता एक वारस... मोठ्या आईचा लाडका अंश.... तर त्याच्या डॅड चा लाडका प्रिन्स..... तसा तर त्यालाही एक छोटा भाऊ आणि एक छोटी बहीण होती .... ते म्हणजे शिवांश आणि शिवानी .... अंशुलच्या लाडक्या मोठ्या आईचे एकुलते एक चिरंजीव... आणि चिरंजीवी..... शिवांश अंशुल पेक्षा दोन वर्षांनी लहान होता तर शिवानी शिवांश पेक्षा तीन वर्षांनी लहान होती... पर्यायी अंशुल पेक्षा ती पाच वर्षांनी लहान होती... तसं तर दोघा भावांनी मिळून बिजनेस करायला हवा होता...पण सगळा कारभार मात्र अंशुल च्या हातात होता... कारण शिवांश ला बिजनेस मध्ये काडीचा इंटरेस्ट नव्हता..... तो त्याच्या ड्रॉइंग आणि फोटोग्राफीमध्ये बिझी असायचा....

आणि अंशुल मात्र खूपच हुशार... त्याची पर्सनॅलिटी अशी होती की बघणारा बघतच राहील.... मुळातच दिसायला देखणा होता तो... त्याचा गोरा रंग एखाद्या मुलीला लाजवेल असा होता... आणि ऑफ कोर्स त्याला त्याच्या लूक्स वर आणि लक वर गर्व होता.....
त्याच्या दृष्टीने विधीने फक्त त्याची प्रॉपर्टी, पैसा, बिजनेस बघून त्याच्याशी लग्नाला होकार दिलेला... आणि मुळातच कोणती मुलगी त्याला लग्नासाठी नाही म्हणणार होती .... पण एका लिमिट पेक्षा जास्त तो ना त्याच्या डॅडला अपोज करू शकला नाही मोठ्या आईला.... आणि त्यामुळे त्याला जास्त राग येत होता.....
पुन्हा एकदा मोबाईलची रिंग वाजली.....
आता मात्र त्याने एक उसासा सोडून कॉल रिसिव्ह केला....
What is this Anshul.... How can you ignore my phone calls.... And you married with a cheap low class village girl.... How can you do this with me..... नताशा मोठ्याने ओरडून रडत बोलत होती.... कारण कितीही नाही म्हणलं तरी तिनेही अंशुल सोबत लग्नाची स्वप्न बघितली होती जसा खूप सार्या मुली बघत होत्या....
भलेही अंशुलने काही कमिटमेंट नव्हती दिली.... पण तरीही होप्स तर होत्या तिला....
Mind your own and language..... You are nothing to me... And I don't have given right to anyone to scold on me.... आणि लग्न झालंय आता.... So behave yourself..... And by the way I am not answerable to your any question... So don't call me again and again..... फाडफाड बोलून त्याने फोन फेकला तसा तो स्लाइडिंग च्या दरवाजावर जाऊन आपटला...
आज पर्यंत कधीच कोणाच ऐकून घेत नव्हता तो... तर नताशा काय चीज.....
विधीला तर तो दाखवूनच देणार होता तिने नक्की काय चुकी केली आहे ते.....
डोक्यात खूप सारे विचार होते त्याचा.... पण सध्या तरी डोकं शांत करण्यासाठी थंड पाण्याच्या शॉवरची गरज होती... आणि त्यामुळे तो बाथरूम मध्ये गेला......
गेस्ट रूम तयार केलीये... Staf दाखवेल तुला.....तुझ्या आजीला पण घेऊन जा सोबत....फ्रेश वगैरे होऊन ये मग...
शांताई ने विधीला सांगितल..... घरात खूप सारे पाहुणे होते त्यामुळे सगळीकडेच लक्ष द्याव लागणार होत त्यांना.......
आजचा एक दिवस... मग उद्या पूजा वगैरे झाली की सगळे जाणारच होते आपापल्या घरी.... रिसेप्शनच डोक्यात होतं त्यांच्या पण अंशुल तयार होणार नाही माहित होतं त्यामुळे त्यांनी विषय पण नाही काढला..
आता कुठे निघाला आहेस तू.... अंशुल आवरून खाली आला तर शांताई ने त्याला विचारल...
आता झालय ना तुझ्या मनासारखं मोठी आई..
आणि मला खूप सारी कामे आहेत... असंच घरात नाही बसून राहू शकत मी.... रागच आलेला त्याला असं टोकल म्हणून.....
शब्दांवर मर्यादा ठेवा चिरंजीव.... नुकतेच आत आलेले अनंतराव बोलले तसा त्याने सुस्कारा सोडला..... असही घरात गेस्ट होते... त्यामुळे इथे काही इशू क्रिएट नव्हता करायचा त्याला ....त्यामुळे शांतपणे तो बाहेर निघून गेला...
Stay connected lovelies ❤️ 🤗
Enjoy the reading ....
All all rights are reserved ...no part of the story or publication maybe or can be reproduced , transferred in any other forms with digitally or in the form of print or anything without the permission of author , expect for the quotation in the book review...
copyright ©️ Shivanjali Kakade (Tanu)...