तोतया वारसदार भाग 75 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | तोतया वारसदार भाग 75

Featured Books
Categories
Share

तोतया वारसदार भाग 75

 तोतया वारसदार

पात्र रचना

सारंग         - वकील,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

डॉ प्रशांत       - डॉक्टर,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

किरीट         - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

निशांत        - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता

नयना         - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर  

महादेवराव      - घराण्याचा मूळ पुरुष.

सखारामपंत     - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक

विश्वनाथ       - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक.

कौशिक        - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला.

दिनकर       - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून

               कानपूरला गेला

चंद्रकांत गोखले                - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर

उज्ज्वला                    - चंद्रकांत गोखल्यांची बायको.

विश्वास                     - चंद्रकांत गोखल्यांचा मुलगा अमेरिका.

स्वानंदी                     - विश्वास ची बायको.

सुनील                      - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका.

 

नर्मदा आणि गोदावरी – महादेवरावांच्या मुली, लग्न होऊन चिपळूण आणि नंतर

पुण्यास स्थलांतर पण पुण्याच्या प्लेग मधे दोन्ही कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली.

 

रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला

स्थायिक

रेवती          सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने यांच्याशी लग्नं करून सांगलीला

स्थलांतर.

अक्षय साने     - महादेवराव – सखाराम – रेवती -अक्षय

सहावी  पिढी. सुरतला स्थायिक.

अंबिका        सखाराम पंतांची मुलगी  अकाली मृत्यू.

कावेरी         रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न

श्रीरंग         कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या  वेळेस सैन्यात गेला.

सीता, सरिता जान्हवी    – श्रीरंग च्या मुली.

शंकरन               - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा.

 

विनायक       भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक

व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.

जय           व्यंकटेशचा मुलगा.

रोहन          - सौमित्रचा मुलगा

लक्ष्मण आणि वर्षा      - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.

  गोकर्णला स्थायिक.

वसुधाबाई             - लक्ष्मणची आई.

विश्राम आणि अनिल           - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -गंगाधर –

सहावी पिढी.

  साताऱ्याला  स्थायिक.

दिनेश आणि प्रांजल            - विश्रामची मुलं. सातारा

विनय                       - अनिलचा मुलगा सातारा.

विश्वंभर                     - महादेव – विश्वनाथ- ओंकार- विश्वंभर.

माधव                      - विश्वंभर – राजाराम – माधव. तंजावरला

 स्थायिक

वसुंधरा                      - माधवची बायको.

चिन्मय आणि विवेक           - माधव ची मुलं.

हेमांगी                      - चिन्मयची बायको. 

कावेरी                      - महादेव – विश्वनाथ- कावेरी. विश्वास परांजपे शी लग्न.

वसंतराव परांजपे                     कावेरी परांजप्यांचे आताचे वंशज

प्रभावती                            वसंतरावांच्या पत्नी

त्र्यंबक                             वसंतरावांचे काका.

गोविंद                             वसंतरावांचा धाकटा भाऊ.

श्रीकांत आणि विक्रम            -वसंतरावांची मुलं. अमेरिकेत असतात. 

 

सुधाकर गोखले         निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले.

विशाखा               सुधाकररावांची बायको.

बबन                 - सारंग सरांचा चपराशी

सुभाष गोखले          -बबनचा मित्र. कटातला भागीदार. तोतया वारसदार

 

भाग  ७५                          

भाग ७४ वरुन पुढे वाचा .......   

 

मग सारंग म्हणाले की “सर्व एकाच वेळेस बोलले तर कोणालाही  कोणाचं काय म्हणण आहे ते कळणार नाही. त्यामुळे एक एक जण बोला. सर्वांचं बोलणं झाल्यावर आपण जरूर पडली तर व्होटिंग घेऊ.”

सर्वात सीनीयर व्यंकटेश, म्हणून सर्वांनी त्यालाच आपलं मत मांडायला सांगीतलं. मग व्यंकटेश बोलायला उभा राहिला.

“मला सुधाकररावांच म्हणण पटतंय. म्हणजे असं की समजा जयच्या हातून काही चूक झाली, तर त्याला रागवीन, समजावून सांगीन, फार तर त्याचे काही अधिकार काढून घेईन. काही दिवस त्याच्या कामावर लक्ष ठेवीन, काही दिवस त्याच्याशी कठोर पणे वागीन, बस. मी काही लगेच त्याला घराबाहेर काढणार नाही. तो पुन्हा अशीच काय, कुठलीच चूक करणार नाही, याची डोळ्यात तेल घालून काळजी घेईन .त्यामुळे मला असं वाटतं की सुभाषला पण आपण एक चान्स द्यायला हरकत नाही. म्हणजे सुधाकरराव म्हणाले, तसं तो सुद्धा एक गोखलेच आहे आणि आपण त्याला सांभाळून घ्यायला पाहिजे. बाकी सर्वानुमते जो निर्णय होईल त्या नुसार करू.” एवढं बोलून व्यंकटेश खाली बसला.

थोडी कुजबूज झाली, मग आवाज वाढला,  अजून काही वेळ तसाच गेला. लोकांनी आपापल्या खुर्च्या सरकवून कोंडाळं केलं आणि बरीच चर्चा झाली. नुसतीच बडबड, निष्पन्न काहीच नाही, सारंग उठला. हात वर करून सर्वांना गप्प केलं. म्हणाला,

“हे बघा सुधाकरराव आणि व्यंकटेशने आपलं म्हणण मांडलं आहे. त्यावर जी काही साधक बाधक चर्चा करायची असेल, ती करून सर्वानुमते जो काही निर्णय होईल तो सांगा. किती वेळ हवा आहे तुम्हाला? तुमचा सर्वांचा नाश्ता झाला आहे, माझा नाही, म्हणून मी पण तेवढ्या वेळात करून येतो. तुम्हाला चहा पाठवून देतो.” असं म्हणून सारंग काय नाश्ता आहे ते बघायला गेला. नाश्ता करून येई पर्यन्त या लोकांचा निर्णय झाला होता. सारंग आल्यावर विश्राम उभा राहिला म्हणाला,

“सर्वानुमते असं ठरलं आहे की सुभाषला एक चान्स द्यायला पाहिजे, पण सर्वांना एक शंका आहे, की जर तो उलटला आणि पुन्हा काही गडबड घोटाळा करायचा प्रयत्न केला, तर काय करायचं?” – विश्राम

“हूं, मग आपण असं करू, त्याच्याकडून त्याने संपत्तीत वाटा मिळवण्यासाठी काय काय लटपटी केल्या हे सविस्तर लिहून घेऊ आणि त्या सोबतच माफी नामा पण लिहून घेऊ. हा कागद आपल्या जवळ असला तर आपल्या विरुद्ध काही करण्याची त्याची हिम्मत होणार नाही.” सारंगने सोल्यूशन दिलं.

“पण असं करायला त्याने नकार दिला तर?” – रोहन.

“तसं झालं तर सरळ पोलिस केस. मग त्याला कोणी वाचवू शकत नाही. पण तो हुशार आहे, त्याला एवढं नक्कीच कळतं की त्याच्या जवळ आता पर्याय नाहीये. तो आपण म्हणू ते सर्व नक्कीच लिहून देईल.” – सारंग.

“सारंग सर तुम्हाला एवढी खात्री असेल, तर देऊया आपण त्याला एक चान्स. पण या बाबतीत तुमचं काय म्हणण आहे?” – व्यंकटेश.

“तुम्ही त्याला सुधरण्याची संधी देत असाल तर माझी काही हरकत नाहीये”- सारंग.

“पण काही उलटं सुलटं झालं तर तुम्हालाच निस्तरावं लागणार आहे, कारण आम्ही कोणीच इथे असणार नाही.” – विश्राम.

“नो प्रॉब्लेम. मी आहे, चिंता करू नका. पण संधी द्यायची म्हणजे नेमकं काय करायचं ते पण ठरवा.” – सारंग.

पुन्हा चर्चेला सुरवात झाली. सुभाष आणि बबनला काहीच कळत नव्हतं की समोरच्या हॉल मधे काय चाललंय ते. दोघंही फार अवघडून गेले होते. ही अनिश्चितता त्यांना खूप अस्वस्थ करत होती.

“निशांत साहेब, काय चाललंय समोरच्या हॉल मधे? आम्ही तुम्हा लोकांचा फार मोठा अपराध केला आहे. आमचा नाही पण आमच्या बायकांचा, मुलांचा तरी विचार करा हो. प्लीज.” – सुभाष.

“हे बघा, मी फक्त शोधकर्ता आहे. माझ्यावर जे काम सोपवलं होतं ते मी केलं. निर्णय घेण्याचा मला अधिकार नाहीये. माझा इस्टेटीशी काही संबंध नाही, आणि हे काम संपल्यावर गोखल्यांशीही काही संबंध असणार नाहीये. त्यांनी आमच्या कंपनीला हे काम दिलं होतं. काम झालं आहे. आमची कंपनी कामाचे पैसे घेईल, मी मोकळा. मला पगार मिळतो. या उप्पर माझा काहीही संबंध नाही. तुम्हाला जी काही विनंती करायची असेल, ती गोखल्यांना करा.” – निशांत.

“निशांत साहेब, असं नका हो म्हणू, तुम्ही सांगीतलं तर, सगळे ऐकतील, तुमचा शब्द डावलणार नाहीत. आम्ही पुन्हा या वाटेला जाणार नाही, हवं तर लिहून देतो.”- सुभाष

“ठीक आहे, मी सांगून बघतो.” असं सांगून निशांत समोरच्या हॉल मधे आला. तिथे संधि द्यायची म्हणजे नेमकं काय करायचं यावर चर्चा चालली होती. निशांत सारंग सरांच्या कानाशी लागला आणि सुभाष काय म्हणाला ते सांगीतलं. सारंग सरांनी  समाधानाने मान डोलावली.

“मी तुमचं बोलणं सारंग सरांच्या कानावर घातलं आहे. बघू काय ठरतं ते.” निशांतने सुभाषला सांगितल.

समोरच्या हॉल मधे नुसतीच चर्चा चालली होती, निष्कर्ष काहीच निघत नव्हता. मग पुन्हा एकदा सुधाकरराव उभे राहिले, त्यांना उभे राहिलेले पाहून, सर्व जण बोलायचे थांबले.

“मंडळी, या इस्टेटी वर दर वर्षाला किती इन्कम होते, हे मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की सुभाष जर समाजकार्य करतो आहे, आणि त्याला त्यासाठीच पैसा हवा होता, तर त्याला पहिल्या वर्षी लाख, दोन लाख रुपये अनुदान म्हणून द्यावे. त्याचा अगदी पै न पै चा पूर्ण हिशोब, त्याच्या कडून घ्यायचा. हिशोब आणि काम जर समाधानकारक वाटलं, तर पुढच्या वर्षी पण अनुदान चालू. नाही तर बंद. बघा तुम्हाला माझं मत पटतंय का.” – सुधाकरराव.

थोडीफार चर्चा होऊन सर्वांनाच त्यांचं म्हणण पटलं. सर्वांच्या वतीने व्यंकटेशने सारंग सरांना फायनल सांगीतलं.

“हे सर्व ठीक आहे, पण जो पर्यन्त इस्टेटी बद्दल फायनल निर्णय होत नाही तो पर्यन्त काहीच करता येणार नाही. आपण फार तर सुभाषला इथे बोलावून, त्याला आपला निर्णय सांगू शकतो.” – सारंग.

“ठीक आहे, निदान तो त्याच्या घरी बिना टेंशन चा जाईल.” – विश्राम.

“ठीक आहे, मग विनय, बोलावतो का त्याला?” – सारंग.

विनयने  सुभाष आणि बबनला घेऊन आला. निशांत पण पाठोपाठ आला.

सारंग सरांनी बोलायला सुरवात केली.

“सुभाष, तू गोखले आहेस म्हणून या गोखले मंडळींनी तुझ्याबद्दल तुझ्या बद्दल सहानुभूतिपूर्वक विचार केला आहे. तू यापुढे अश्या कुठल्याही कारस्थानात सामील होणार नाहीस अशी शपथ घेतलीस आणि मुख्य म्हणजे पाळलीस, तर हे लोकं तुला माफ करायला तयार आहेत. बोल.”

“साहेब, मी कान पकडतो. मी एकदा चूक केली, पुन्हा नक्कीच करणार नाही. माझं आत्ता पर्यंतचं आयुष्य स्वच्छ आहे. आयुष्यात एकदाच प्रलोभनात अडकलो, पण पुन्हा असं कधीच होणार नाही. मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो.” सुभाषनी सपशेल शरणागती पत्करली होती.

“ओके, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो, पण एक वकील म्हणून मला असं वाटतं की तू तुझ्या हस्ताक्षरात, तू जे काही केलस ते सविस्तर लिहून दे, आणि त्या सोबत माफी नामा जोड. हे मी गोखल्यांच्या जवळ देईन. जर तू यापुढे सद्विचाराने वागलास, तर हे कागद फायलीतच राहतील, अन्यथा आम्हाला त्याच कागदाचा उपयोग करणे भाग पडेल. बघ मंजूर आहे का तुला?” – सारंग सर.   

“आत्ताच लिहून देतो सर, तुम्ही सांगाल तसं.” – सुभाष.

ओके, तू उद्या ये, मी ड्राफ्ट तयार ठेवतो, तो तुझ्या हस्ताक्षरात व्यवस्थित लिहून दे. झालं.” – सारंग सर.

“अजून एक गोष्ट,” विश्राम म्हणाला, आता हे आणखी काय सांगणार, असा भाव सुभाषच्या चेहऱ्यावर आला, आणि तो घाबरला.

“हे बघ तू सामाजिक कार्य करतो आहेस हे ऐकून आम्हाला आनंद वाटतो आहे, म्हणून आम्ही सर्वांनी असं ठरवलं आहे की जर एक गोखले सामाजिक कार्यात सक्रिय असेल, तर त्याच्या कार्यात आपण पण सहभागी व्हावं. चालेल का तुला?”

सुभाष काही बोलला नाही पण विश्रामच्या पायाच पडला म्हणाला “साहेब, मी तुमच्या विरुद्ध एवढं कारस्थान केलं तरी सुद्धा तुम्ही मला मदत करण्याची भाषा करता आहात, इतक्या मोठ्या मनाच्या लोकांशी मी वाकडा वागलो, याची मला आता लाज वाटते आहे.” आणि तो पुन्हा रडायला लागला.

विश्रामने त्याला उठवलं  आणि म्हणाला, “हे बघ दर वर्षी आम्ही तुझ्या कार्या साठी, दोन लाख देऊ, जर तुझं काम संतोशजनक वाटलं तर ही रक्कम आम्ही वाढवू. यात अट एकच की तू प्रामाणिक पणे काम करायचं आणि त्याचा लेखाजोखा सारंग सरांना वेळो वेळी द्यायचा. तुझ्या आदल्या वर्षीच्या कामाचं ऑडिट होईल, आणि समाधानकारक वाटलं तर, आणि तरच पुढचा हप्ता दिल्या जाईल. ही सगळी व्यवस्था सारंग सर पाहतील त्यामुळे तू त्यांच्या संपर्कात कायम रहा. माझी खात्री आहे की आता तुला अडचणी येणार नाहीत. बाकी पुढच्या वर्षी आम्ही येऊ तेंव्हा भेट होईलच.”

विश्रामनी आपलं बोलणं संपवलं

“आता तू गेलास तरी चालेल. उद्या ये. आणि आपल्या हस्ताक्षरात सर्व लिहून दे, मग पुढची कार्यवाही करू.” – सारंग म्हणाला.  सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार करून आणि चार चारदा माफी मागून सुभाष गेला.

बबन नुसताच उभा होता, सारंग सर आपल्याला सोडणार की शिक्षा करणार? असाच भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता.

“तू, बबन, इतकी वर्ष इमाने इतबारे तू माझ्याकडे काम केलस, म्हणून तुला फक्त वॉर्निंग देऊन सोडतो आहे, पण पुन्हा जर अश्या काही करामती केल्या, तर  तुझी खैर नाही. तेंव्हा माफी मिळणार नाही. तू सुद्धा काय लटपटी केल्या त्या माफी पत्रा सोबत उद्या लिहून आण.” – सारंग.

बबन सरांच्या पायावर कोसळला. पुन्हा पुन्हा माफी मागत राहिला.

“जा आता तू. उद्या ये.” – सारंग म्हणाला. मग बबन पण गेला.

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com