Devache Thane in Marathi Thriller by Balkrishna Rane books and stories PDF | देवाचे ठाणे - 4

Featured Books
Categories
Share

देवाचे ठाणे - 4

देवाचे ठाणे ४    मी माझं सामान गाडीला बांधून बाहेर पडलो.गाडीला किक्मारणार तेवढ्यात माझं लक्ष वर गॅलरीत उभ्या असलेल्या सुजाता कडे गेले.ती एकटक माझ्याकडे बघत होती.खरतर मी ठरवलं होतं की काही झाले तरी वर पाहायचं नाही पण शेवटी वर लक्ष गेलेच होते.मी सहज राहायचं ठरवलं व हात हलवला.तिनेही हात हलवला.     जर त्या सड्यावर एखादी अमानवीय शक्ती असेल तर ती रात्रीच्या वेळी सक्रीय होईल असा माझा कायास होता.शिवाय अफाट माळावर राहून आकाशातले तारे न्याहाळत रात्र घालवायची गंमत मला अनुभवायची होती.मी सड्यावर पोहचलो तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते.मी त्या कातळ शिल्पाला लागूनच असलेल्या उंचवट्यावर टेन्ट उभा केला.आत कोणताही सरपटणारा प्राणी शिरणार नाही याचीखात्री केली. फोल्डींगचे टेबल लावून मी बाहेर बसलो.सभोवारच्या अंधाराचा मी भाग बनून गेलो होतो.आज आकाश ब-यापैकी निरभ्र होतं.अनंत तारका नभात चमचमत होत्या. या तारका आकाशातून धरतीकडे बघून डोळे मिचकावत तर नसतील ना असा विचार माझ्या मनात आला.वर सप्तर्षी ठळकपणे दिसत होते.उत्तरेकडे ध्रुव तारा चमचमत होता. व्याध नक्षत्र दिसत होते.या अफाट तारांगणा समोर आपण बिंदूतले एक सूक्ष्मातील बिंदू आहोत.मानवाच्या बढाया किती व्यर्थ आहेत याची मला जाणीव झाली.मी डोळे बंद करून अंगाला स्पर्श करणारा वारा अनुभवू लागलो. मध्येच कुठेतरी कोल्हेकुई ऐकू येत होती.बेडकांचे आवाज कानी पडत होते. मी साडे बाराला झोपण्यासाठी टेन्टमध्ये गेलो. मी सर्व तयारीनिशी आलो होतो.चार्जींगची बॅटरी , टॉर्च, माझं लायसन्स असलेलं रिव्हाॅल्वर इत्यादी.मी चटई पसरली.कोणतीही लाईट न लावता गाणी गुणगुणत मी शांत पहुडलो.हळुहळू झोप येवू लागली.असा किती वेळ गेला कुणास ठाऊक! अचानक मला जाग आली.आजूबाजूच्या वातावरणात काहीतरी बदल झाला असं वाटू लागलं मी डोळे चोळीत उठलो. तंबूची चेन थोडी दूर करून मी बाहेर डोकावले .जे दिसले त्याने माझ्या मेंदूत झिणझिण्या उठल्या.यापूर्वी मी अनेक गूढ आणि भयप्रद घटना पाहिल्या होत्या.पण समोरच जे घडत होते ते निव्वळ अद्भुत होते.सौम्य फिकट निळ्या रंगाचा एक अलौकिक प्रकाशझोत आकाशातून त्या शिल्पावर पडला होता. तो प्रकाश या पृथ्वीवरचा नव्हता हे नक्की.तो प्रकाश झिरझिरीत रेशमी धाग्यासारखा हलत होता.बघता बघता त्या प्रकाशानेत्या शिल्पा सभोवताली फेरा घातला.एक मंद नाद कानात पडला. मग शिल्पाचा भाग सोडून शुभ्र धुक सर्वदूर पसरल.मी टेन्ट मधून आवाज न करता बाहेर आलो. समोर जे दिसत होते ते सत्य की भ्रम हे कळत नव्हतं.माझा मेंदू तर्कांच्या पलिकडे पोहचला होता. शिल्पावर प्रकाश पडल्यावर त्या शिल्पाचा एक एक अवयव जीवंत होत आकार धारण करु लागला. काही क्षणातच ते सात फूट उंच शिल्प उठून उभं राहिलं. अंतराळविरांसारखा पोषाख... डोक्यावर शिरस्त्राण त्यावर दोन उंचवटे.... डाव्या हातात निळ्या प्रकाशाचा गोळा...अंगात चिलखतासारखा कवच त्यावर अनेक चमकदार उंचवटे हे उंचवटे कंबरे पासून वर मानेपर्यंत होते.कदाचित यामुळेच तिथे चुंबकीय गुणधर्म बदलत असावेत. त्या आकृतीने मानेला झटका दिला व लांब पावले टाकत डावीकडे जिथे सकाळी मोजणी करून सिमेंटचे खांब उभे करून त्याला तारा ठोकल्या होत्या तिथे पोहचली. हे अगदी क्षणात घडलं होतं.बघता बघता त्या आकृतीने ते खांब उखडून दूर आकाशात भिरकावून दिले.त्या आकृतीची अमानवीय ताकद अफलातून होती.ते खांब व तारा किती दूर जाऊन पडल्या ते दिसतही नव्हत.ती आकृती काही वेळातच परत फिरली.तिच्या भोवतालचनिळ्या प्रकाशाच वलय  मनाला मोहून टाकावे असं होतं.मला जाणवलं  की त्या आकृतीला हा सड्यावर मानवी हस्तक्षेप नको आहे . पण मग माझं काय? मी त्या सड्यावर तंबू ठोकून होतो.माझा टेन्टही तो उध्वस्त करणार होता काय?मी थरारलो.जे होईल त्याला तोंड देणे भाग होते. ती आकृती काही वेळातच मूळं जागेवर आली.क्षणभर तीने आपली नजर माझ्यावर स्थिर केली. एक निळा प्रकाश किरण त्याच्या चिलखतातल्या एका चमकदार उंचवट्यातून बाहेर पडला.तो तंतू सारखा प्रकाशकिरण जसा माझ्या डोळ्यात पडला तसं मला जाणवलं की कोणीतरी माझा मेंदू वाचत आहे.मी यंत्रवत उभा होतो. क्षणभरातच तो प्रकाश तंतू बंद झाला.त्या आकृतीने आपला उजवा हात वर केला.जणू ती आकृती  मला अभय देत होती. नेमकं काय केलं होतं तिने माझा मेंदू वाचला होता काय. माझा इथं येण्याचा हेतू त्या आकृतीने जाणून घेतला होता का? ती आकृती आपल्या मूळ जागी स्थिरावली.त्याबरोबर आकाशातून तिथं येणारा दिव्य निळा झोत हळूहळू विरत गेला.      माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले होते.ती आकृती रोज जागृत होते की मानवी अतिक्रमण झुगारण्यासाठी ती आजच जागृत झाली होती.ती नेमकी कोण होती . पृथ्वी बाहेरून आलेली एखादी अनोळखी जमात की यक्ष... गंधर्व की ज्यांना मानव देव समजतो त्या पैकी कुणी ?मला खात्री होती की काही काळानंतर मला या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.त्यासाठी वाट पहावी लागणार हे नक्की!आता धुकं सुध्दा नाहिसे झाले होते.मी भारावलेल्या सारखापुन्हा टेन्ट मध्ये गेलो.काही क्षणातच मला गाढ झोप लागली.         सकाळी जाग आली ती तंबूबाहेरचा कोलाहल ऐकून.मी मोबाईल मध्ये वेळ पाहिला सकाळचे साडेआठ वाजले होते. मी उठलो. टेन्टचा चेन दूर करत बाहेर आलो.माझ्या लक्षात आलं की टेन्टला पोलीसांनी गराडा घातला होता.तीस पोलीस सड्यावर होतं.त्यातले काही डावीकडे जिथे तारा ठोकल्या होत्या तिथे होते तर पंधरा एक पोलीस माझ्या टेन्ट भोवती होते.मला बघताच एक इन्स्पेक्टर माझ्याकडे आला." तुम्ही रात्री इथे राहायची परवानगी घेतली होती का ?"" कश्यासाठी? आणि कोणाची परवानगी?" " हे बघा तुम्ही उलटे प्रश्न विचारु नका ?"मी फक्त हसलो." मी पुरातत्त्व संशोधक आहे.माझ्याकडे तसं ओळखपत्र आहे. ह्या शिल्पाचा अभ्यास करण्यासाठी आलोय."माझं ओळखपत्र बघताच तो चमकला.  "तुम्ही तेच ' तांडव 'प्रकरणातील रत्नकांत ?"" हो."" सर, तुम्ही यात पडू नका.अगदी केंद्रातून आदेश आलेत.ही जागा मोकळी करण्याचे."" त्याचा काही उपयोग होणार नाही. इथं एक मोठं केंद्र काम करतंय त्यापुढे कोणाचंच काही चालेल असं वाटतं नाही."" तुम्ही ते तारांच कुंपण उध्वस्त केलात असा फिर्याद आहे तुमच्यावर."" तुम्हाला वाटत का मी एकटा किंवा सगळे गावकरी मिळून हे करू शकू ?"" हे बघा शक्य झालं तर इथून निघा. मला तुमच्या सामानाची झडती घ्यायची आहे."    दोन पोलीस आत शिरले.माझ सगळं सामान त्यांनी उलट पालट केले. माझ्या उशाशी असलेल्या बॅगेत त्यांना रिव्हॉल्व्हर सापडलं." बोला याच्याबद्दल काय सांगणार?"मी शांतपणे माझं लायसन्स काढून त्यांना दाखवलं." मला सतत अनोळखी जागेत वावरावं लागत.अनेक संकटांना सामोरे जावे लागते.त्यामुळे स्वसंरक्षणासाठी शस्त्रजवळ असणे गरजेचे असते."" मी एवढंच सांगेन जपून रहा.पावला पावलावर धोका आहे.ती माणसं खूप ताकदवान आहेत."" मला सवय आहे."" कुंपन कोणी उखडल? काही कल्पना आहे?"मी नाही या अर्थाने मान हलवली.समजा मी खरं सांगितलं असतं तरी ते त्यांना पटलं नसतं.कदाचित त्यांनी मला वेड्यात काढले असते." आत्ता पासून पलिकडे पोलीस तैनात राहतील "पोलीस किंवा अन्य कोणीही इथं काही करू शकतील असं मला वाटतं नव्हते.-------******------*******------******-------****---बाळकृष्ण सखाराम राणे 8605678026