सोमवारची सकाळ...
आज कॉलेजच्या गेट जवळ नेहमीपेक्षा जास्तच गर्दी होती..
कोणाच्या हातामध्ये फाईल्स, कोणाच्या हातामध्ये कॉफी, कुणी बस पकडण्यासाठी पळत होते, तर कोणी अटेंडंस कमी असल्यामुळे प्रोफेसरच्या मागे फिरत होतं.
आरव आजपण नेहमीप्रमाणे थोडा लवकर आला होता.
त्याच्या हातात लॅपटॉप बॅग होती आणि दुसऱ्या हातात प्रॉजेक्ट ची फाइल होती.
तो थेट क्लासरूम मध्ये शिरला ...
तिथे अगोदरच चारपाच मुलं होती..
त्याने त्याची नेहमीची जागा पकडली..
लॅपटॉप सुरू केला आणि प्रोजेक्ट ची फाइल चालू केली.
काल रात्री त्याने प्रश्नावली पुन्हा एकदा पाहिली होती..
प्रोफेसर कुलकर्णी ने दिलेला प्रोजेक्ट साधा दिसत होता पण प्रत्यक्षात बरंच काम होतं...
प्रोजेक्ट टॉपिक होता..
Consumer Behaviour and Digital Buying Patterns Among Young Investors
टीम मध्ये आरव... समीर... ओंकार... नेहा.. आणि रोहित होता..
आणि आत्ता सायली सुद्धा त्याच्या मधे सामील झाली होती.
किमान प्रोफेसर ने तर तसंच सांगितला होता..
आरव त्याच्या लॅपटॉप मध्ये excel sheet वर काही काम करत होता..sheet मधली काही कॉलम्स तयार केले होते..
Age
Occupation
Monthly income
Investment Preference
Risk
Investment Frequency
Primary source of Financial Information
त्याने स्वतःहून दोन ते तीन sample entries टाकल्या होत्या. आणि तो ते सगळं चेक करत होता.
तेव्हड्यात मागून आवाज आला.
तू खरंच हे सगळ आत्ताच करतोय?
आरवने वळून मागे पाहिलं..
सायली....
हातात नोटबुक..चेहऱ्यावर अजून सकाळची झोप बाकी असल्यासारखी दिसत होती...
हो.... आरवने एकरी उत्तर दिलं..
लेक्चर ला अजून दहा पंधरा मिनिट बाकी आहेत..सायली म्हणाली
हो माहिती आहे मला... आरव म्हणाला
मग?
मग काय?
ती त्याच्या शेजारी बसली..
तू कॉलेज मधे येतोस का डेटा शीट मधे राहतोस..?
आरव हसला..आणि म्हणाला
दोन्ही मधे..
मला वाटतं तू खूप बोरिंग आहेस..
आणि मला अस वाटतं की तू खूप बडबड करतेस..
मला माझ्याबद्दल माहिती आहे...ती म्हणाली
काल मी प्रोजेक्ट चा प्रश्नवली पाहिली..
हम्म...
मला एक प्रश्न आवडला नाही आहे त्यामध्ये...
आरवने लॅपटॉप तिच्याकडे फिरवत म्हणाला..
कोणता...?
ती स्क्रीन कडे बघत म्हणाली..
What factors influence your financial product selection?
का ...काय झालं? ती म्हणाली..
खूप टेक्स्टबुक वाटत आहे..
म्हणजे..? तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्या कडे बघितला आणि म्हणाली..
अरे ती प्रश्नावली आहे ना...
हो पण आपल्याला लोकांकडून खरे खरं उत्तर हवी आहेत...
हो मग? ती म्हणाली
मग प्रश्न असा विचार की इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही अगोदर काय पाहता?
आरव स्क्रीन कडे बघत तिला म्हणाला...
तो प्रॅक्टिकली बोलत होता..
ओके...बेटर आहे...
म्हणजे? आरव ने तिच्याकडे बघत म्हणाला..
अरे म्हणजे तू बरोबर आहेस अस म्हणते.. ती त्याच्या कडे बघत म्हणाली.
एवढ्या लवकर हार मानली...वाह...
काय...काय म्हणाला तू?
तू accept केलस....
त्या मध्ये जे आहे ते आहे..
I thought argue करशील....
जर तू भांडण करणार असशील तर मी कशाला?
ती त्याच्याकडे हसत म्हणाली.. तू विचित्र आहेस..
Thanks...
ते compliment नव्हतं.. ती म्हणाली..
हो मग...तरी सुद्धा thanks
ती पुढे काहीतरी बोलणार इतक्यात समीर आतमध्ये आला..
समीर ने त्या दोघांकडे बघितलं....लॅपटॉप कडे पाहिलं पुन्हा त्या दोघांकडे बघितलं...
Do I disturbing both of you?
सायली ने तिच्या उजव्या बाजूची भुवई वर करत त्याच्याकडे कटाक्ष लावला आणि त्याला म्हणाली..
ते तर तुझं रोजचं काम आहे..नवीन काय?
समीर गालातल्या गालात हसत होता...त्याने आरव च्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाला..
मला अगोदरच जाणवलं होतं... I can sense it.. काय ते इंटुसियन...
काय? तुला काय जाणवलं होतं?
काही नाही रे असंच...
समीर...आरव जोरात म्हणाला..
मी शांत आहे....समीर तोंडावर बोट ठेवत समोर जाऊन बसला..
पाच मिनिटांनी त्याने मागे वळून पाहिलं...
आरव....त्याने आरव ला आवाज दिला..
बोल...तो म्हणाला..
आज कॅन्टीन...
कशासाठी..?
कशासाठी काय? कॅन्टीन मध्ये कशाला जातोस..? समीर उद्गारला..
रोज खात नाहीस का? आरव म्हणाला...
अरे म्हणूनच तर बोलतोय...कावळे ओरडत आहेत...
हे बघ..काव काव....
सायली हसू लागली....
आरवने तिच्याकडे कटाक्ष टाकला..
तुला काय झालं हसायला.?
का माणसाने हसू नये का? तो किती फनी आहे ना...
हो आहे ना...मला रोज सहन करावं लागत हे...
हो मग काय झालं....तू तर नशिबवान आहेस...
आरव पुढे काही बोलला नाही पण त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी smile आली..
काही वेळानी प्रोफेसर कुलकर्णी आतमध्ये आले..
Good morning....
सगळ्यांनी एकसुरात उत्तर दिलं...
Good morning sir...
प्रोफेसर ने बोर्ड वर लिहिल...
Consumer Behaviour part 2.
तर आज आपण काही महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत.. ते म्हणाले.
Consumer एखादी वस्तू किंवा सर्विस का निवडतो?
फक्त price मुळे? क्वालिटी मुळे? ब्रँड मुळे? की त्याच्या मागे काही सायकॉलॉजिकल कारण असतं?
सायली एकदम लक्ष देऊन ऐकत होती.
आरव नेहमीप्रमाणे सिरीयस होऊन नोट्स लिहित होता..
प्रोफेसर ने एक उदाहरण दिलं..
समजा दोन म्युच्युअल फंड आहेत.. एक टाटा च आहे आणि दुसरा इन्व्हेस्को चा फंड आहे...दोघांचे रिटर्न जवळपास सारखे आहेत... आत्ता ह्या मध्ये मी कोणता फंड कोणाला किती माहिती आहे हे नाही बोलणार....मला सांगा इन्व्हेस्टर कोणता फंड निवडेल?
क्लास मधे एकदम शांतता झाली होती...
प्रोफेसर आरव कडे बघत विचारलं...
आरव....तू सांग...
आरव ने लगेच उत्तर दिलं....
टाटा सर...
का? प्रोफेसर लगेच उतरले...
Known Brand sir...
Why?
Trust Factors सर...
प्रोफेसर ने मान हलवली... एक्झॅक्टली....
सायली ने आरव कडे बघितलं...आणि हळू आवाजात म्हणाली..
तू खरं फायनान्स वाला आहेस वाटतं... ती त्याच उत्तर ऐकून जॅम इंप्रेस झाली होती..
का? आरव ने दोन्ही भुवया वर करत तिला म्हटलं..
म्हणजे काय....प्रश्न विचारला नाही का तुझ उत्तर तोंडावर असतं..
आणि तुझं काय?
मी फक्त प्रश्न विचारते...
आणि उत्तर कोण देणार...
ते तुझ्यासारखे लोक...
आरव हसला...आणि सायली त्याच्याकडे बघू लागली...
प्रोफेसर बोलत होते...
ब्रँड loyalty म्हणजे...फक्त ब्रँड आवडणे नाही... Repeated purchase, ट्रस्ट, satisfaction.... ते बोलतच होते की..
सायली ने अचानक नोटबुक मध्ये काहीतरी लिहिल...
आरवने ते पाहिलं...
"Trust is also like brand loyalty"
आरवने शंकेने तिच्याकडे बघितलं...
काय? त्याने तिला कुतुहलाने विचारलं..
नाही...काही नाही...
तू आत्ता काय लिहिलंस?
तुला का सांगू मी...
कारण ते मला दिसत आहे....
मग तू नको वाचूस...
हे तुझा handwriting आहे?
म्हणून तुला वाचायचं आहे?
नाही मला curiosity आहे..
तू खूप curious आहेस....ती नोटबुक बंद करत त्याला म्हणाली...
आणि तू खूप secretive आहेस...
मी? सायली त्याच्या कडे बघत म्हणाली...
हो तूच...अजून कोण आहे इथे...
ती थोडावेळ शांत झाली...
मग म्हणाली...
असेल कदाचित....
आरवने पुढे काही विचारलं नाही...
सायली खूप बोलकी असली तरी काही गोष्टी ती जाणीवपूर्वक बोलायच टाळते हे त्याने नोटीस केलं होतं....
दुपारी जवळपास 2 वाजता लायब्ररी च्या discussion room मधे सगळे जमा झाले ...
समीर ने चेअर मागे ओढत attitude मधे म्हणाला...
चला....आज आपण देशाचे भविष्य ठरवूया...
नेहाने फाइल त्याच्या समोर आपटतात म्हणाली...
आधी प्रोजेक्ट पूर्ण कर.... तेच देशाचे भविष्य आहे..😅
ओमकार तर हसायला लागला....
आपल्या टीम मध्ये एक प्रोब्लेम आहे.
काय? सायलीने लगेचच विचारलं.
आपण सहा जण आहोत आणि काम करणारे फक्त दोघच.
कोण दोघ....नेहाने विचारलं.
हे दोघ... ओमकार ने आरव आणि सायली कडे बोट दाखवत म्हणाला
त्यावर समीर लगेच उतरला ... मी morally सपोर्ट करतो की...
तो बोलला आणि सायलीने त्याच्या कडे पेन फेकत म्हणाली..
नको तुझा moral सपोर्ट....ठेव तो तुझ्याकडे...
इकडे आरव ने लॅपटॉप उघडला आणि म्हणाला...
Okay guys...lets devide the work..
सगळेच एकदम शांत झाले...
प्रश्नावलीच मी आणि सायली बघतो....
सायलीने होकारत मान डोलावली...
डेटा कलेक्शन च कोण बघणार.....
समीर आणि ओमकार....आरव म्हणाला...
Why me? समीर ने चिडतच विचारल.
कारण तू लोकांशी बोलण्यात पटाईत आहेस...जास्तच बोलतो जरा तू म्हणून...
हे compliment होती की पनिशमेंट? समीर म्हणाला...
तुझ्यासाठी दोन्ही आहेत.... आरव म्हणाला..
सगळ्यांचा हशा उडाला..
रोहित आणि नेहा एक्सेल ॲनालिसिस मधे मदत करतील...
आणि प्रेझेन्टेशन...नेहा ने विचारलं .
सगळेच देतील. सायली लगेच म्हणाली..
प्रेझेन्टेशन च सुरुवात मी करेल...ती म्हणाली...
आरवने आश्चर्याने तिच्याकडे बघितलं.
तुला भीती नाही वाटत.. स्टेज वर बोलायची?
नाही...मी घाबरत नाही..
वाह..चांगल आहे...तो म्हणाला.
आणि तुला.. तू घाबरतोस का?
हो थोडा थोडा घाबरतो....
मग मी तुझ्यासाठी बोलेल... ती बोलताना बोलून गेली..
आरव तिच्याकडे बघत बसला आणि म्हणाला..
काय?
नाही काही नाही....सायली म्हणाली
तू पुन्हा तसंच बघत आहेस...ती म्हणाली
पुन्हा म्हणजे ..?
नाही माहिती...
मग? आरव थोडा विचारातच म्हणाला..
काही नाही ..
समीर मधेच म्हणाला.. तुम्ही दोघांशी एकमेकांसोबत बोलताना subtitle लावा...
आणि सगळेच हसू लागलेत...
To be Continued...
©DipakRinge05