कामातुराणाम् न भयम् न लज्जा.( केवळ प्रौढांसाठी) in Marathi Thriller by Abhay Bapat books and stories PDF | कामातुराणाम् न भयम् न लज्जा. - भाग 2

Featured Books
Categories
Share

कामातुराणाम् न भयम् न लज्जा. - भाग 2




प्रकरण २
जय शिरोडकरला ती ओळखीची भावना पुन्हा जाणवली. छातीत किंचित जडपणा. जणू श्वास पूर्ण भरत नव्हता. पण अजून तरी त्याने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. काही वेळा तो लोकांकडे जरा जास्तच बारकाईने पाहत असे. त्यांच्या स्वभावाच्या आड नेमकं काय दडलंय, ते शोधण्याचा तो प्रयत्न करत राहायचा.
तो दुकानासमोरून गेला. कुणीतरी दुकान बंद करून गेलं होतं. फक्त रात्रीचे दिवे चालू होते. शोकेसमध्ये ठेवलेले दोन टीव्ही   अजूनही सुरू होते. एका पडद्यावर पाश्चिमात्य चित्रपट चालू होता, तर दुसऱ्यावर कुस्तीचे सामने.
शिरोडकर चा एक सिद्धांत होता. बाहेरून बघत उभे राहणाऱ्यांपैकी एखादा-दुसरा आत शिरेल, आणि मग त्याच्या खिशापर्यंत पोहोचायला एक पाऊल कमी पडेल. म्हणूनच ते टीव्ही  तो रात्रभर सुरू ठेवत असे. कदाचित सकाळी कुणीतरी परत येईल. कधी कधी तर तो स्वतःही मध्यरात्रीपर्यंत तिथे थांबत असे.
तो गल्लीकडे वळला आणि दुकानाजवळून सावकाश गाडी चालवत गेला.
समोरच्या बाकावर त्याचा तंत्रज्ञ  लतीफ खान काम करत बसला होता.
शिरोडकर ने टेम्पो जागेवर लावला. शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या वाहनाच्या रेषेत काळजीपूर्वक उभा केला. एक टेम्पो कामावर बाहेर गेला होता.
चोवीस तास सेवा.
हे सगळं कशासाठी? आठवड्याच्या शेवटी खिशात पैसे असले तरी ते स्वतःचे नसावेत म्हणून. मोठी गुंतवणूक करा,मोठं जोखमीचं ओझं वहा,आणि कधीतरी मोठा फायदा होईल अशी आशा बाळगा.
त्याने इमारतीच्या मागच्या बाजूकडे, दुकानाकडे पाहिलं.
मोठा व्यवसाय?
छे!
अजूनही तो तुटपुंज्याच पातळीवर होता.
 
तो शांतपणे स्वतःच्या मोटारीकडे गेला. सेवा ची त्याला चांगलीच सवय झाली होती. मागच्या आसनाजवळ जमिनीवर लपून बसण्यासारखं काहीतरी ती नक्कीच करू शकली असती.
पण ती तिथे नव्हती.
तो गाडीत बसला आणि घरी निघाला.
सेवा चा कुठेही मागमूस नव्हता.
इमारतीच्या पार्किंग मध्ये शिरण्यापूर्वी त्याने एकदा पूर्ण फेरी मारून परिसर पाहिला. रस्ते शांत होते. इमारतीसमोरही ती दिसली नाही.
वर जाऊन त्याने अंघोळ केली. मग स्वतःसाठी एक ड्रिंक तयार केलं.
त्याच्या डोक्यात सतत रीना परेरा फिरत होती.
तिचा चेहरा.
तिचं बोलणं.
आणि ती जी काही मनात आलं ते सरळ तोंडावर बोलून टाकण्याची सवय.तरुण.नाजूक.
तो झोपायला गेला.
रात्रीच्या मध्यावर फोनची रिंग वाजली.तो उठून बसला.तीन वाजून गेले होते.
सेवा होती.
ती  रडत होती. आणि ती रडते आहे हे त्याला कळलंच पाहिजे,याची ती खात्री करत होती.
"मला तुला भेटायचं आहे,जय."
"नाही."
"हे योग्य नाही. तू माझ्याशी जे करतोयस ते भयंकर आहे. माझ्याशी असं वागू नकोस. "
"जाऊन झोप काढ,सेवा. आपण ब्रेक अप घ्यायचं ठरवलंय. विसरलीस?"
"कृपा कर,जय.मी वर येऊ का?"
जयने उत्तर न देता फोन ठेवून दिला आणि पुन्हा झोपायला गेला.
खरं तर त्याला सकाळची आतुरता लागली होती.
कारण सकाळ झाली की तो पुन्हा रीना परेरा च्या घरी जाऊ शकणार होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी तो दहापर्यंत दुकानातच रेंगाळत राहिला. तयारी करत होता.
शेवटी  दुकानातल्या कामगाराने त्याला दोन टीव्ही  सेट टेम्पोमध्ये चढवायला मदत केली. एक मोठं कपाटासारखं मॉडेल आणि दुसरा बेडरूमसाठी योग्य असा लहान सेट.
जयने कामाची आखणी केली. नोकराला सांगितलं की हे काम एका जवळच्या मित्रासाठी आहे आणि संपूर्ण जबाबदारी तो स्वतः घेणार आहे.तू येऊ नको.
त्याने सोबत बरंच सामान घेतलं.
पुस्तिका,ग्राहक अहवाल,फोटो,खोल्यांच्या मांडणीचे नमुने.ग्राहकांना भुरळ घालणारं सगळं.
त्याला नेहमी एक गोष्ट समजत नसे.
ग्राहकांना ही सगळी रंगीत,चकचकीत कागदपत्रं का एवढी आवडतात?
वस्तू महत्त्वाची नसते.महत्त्वाच्या असतात त्या पुस्तिका,पत्रकं आणि त्या सगळ्या दिखाऊ गोष्टी.आणि शेवटी त्यांच्याकडे ते नीट पाहतही नाहीत.
रस्त्यात तो एका  टेलोफोन शॉपीत  थांबला. विविध प्रकारच्या चार इंटर कॉमची  ऑर्डर देऊन ठेवली. घेतली आणि दुकानदाराला सांगितलं की चांगली विक्री होण्याची शक्यता आहे.
घरासमोरून तो सावकाश गेला.दिवसाच्या उजेडात ते घर वेगळंच दिसत होतं.
फक्त एक घर.समोर नारळासारखी उंच झाडं.हिरवळ.
आणि ओसरीपर्यंत जाणारा उताराचा मार्ग.कदाचित तो चुकीचाही असू शकत होता.
त्याने गाडी आत घेतली आणि एका झाडाखाली उभी केली.
शेजारच्या घराला वेगळं करणारी सुपारीच्या झाडाची दाट कुंपण-झाडं मागच्या बाजूपासून थेट रस्त्यापर्यंत पसरली होती.
सगळीकडे शांतता होती.
अचानक त्याचं मन खट्टू झालं.
हे सगळं काम तो एकट्याने करणार होता.
टीव्ही  सेट उचलणे.तारांची जुळवाजुळव. सगळंच.
आणि ते काही सोपं नव्हतं.
"अहो!"
त्याने वर पाहिलं.
"नमस्कार."
रीना परेरा ओसरीवर उभी होती. हात हलवत.
तिला पाहूनही त्याला बरं वाटलं नाही.एकच विचार त्याच्या डोक्यात घोळत होता.
इतकी तरुण स्त्री.आणि ती ज्या आयुष्यात अडकली होती...
देव जाणे किती काळ एका म्हाताऱ्या माणसाबरोबर कैद झाल्यासारखी जगत होती. आणि तो माणूस मरायलाही तयार नव्हता.
"गुड मॉर्निंग" तो म्हणाला. "सगळं ठीक?"
"अगदी ठीक"
त्या सकाळी ती अक्षरशः नजर खिळवून ठेवणारी दिसत होती.
घट्ट बसणारी काळी पायघोळ पँट.पिंडऱ्यांजवळ छोट्या चिरा.वर पांढरा,स्लीव्ह-लेस टॉप.
तिचं सौंदर्य लपवण्याचा त्यात कोणताही प्रयत्न नव्हता.
पायात सँडल.चेहऱ्यावर उजळ हास्य. तांबूस-तपकिरी केस व्यवस्थित विंचरलेले,चमकदार.
ती ओसरीवरून खाली उतरली आणि गाडीपर्यंत आली.
"मी तुमची आधी अपेक्षा करत होते. मी फोनही केला होता. पण तुम्ही आधीच निघालाय असं त्यांनी सांगितलं." ती म्हणाली.
"आता वाटतं, मला खरंच लवकर यायला हवं होतं."
तिने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
"मला काम सुरू करायची खूप उत्सुकता आहे,"ती म्हणाली. "जणू दिवाळीची भेटवस्तू विकत घेतोय असं वाटतंय."
 जय खाली उतरला आणि तिच्याजवळ गेला.
आसनावरची कागदपत्रं आणि पुस्तिकांचे खोके त्याने बाहेर काढले.
"मी दुकानातही आले असते," ती म्हणाली. "डॉक्टर मिरगल आठवड्यातून दोनदा येतात. त्या दिवशी मी खरेदीसाठी आणि इतर कामांसाठी बाहेर जाते."
"असं का."
'इतर कामं'म्हणजे काय,हे त्याने विचारलं नाही.
"पण मला ही पद्धत जास्त आवडते," ती म्हणाली. "तुम्हाला त्रास नसेल तर."
शिरोडकर हसला. घराकडे मान हलवली.
तीही हसली आणि पुढे चालू लागली.
तो तिच्या मागोमाग आत गेला.
"आधी हे सगळं पाहू," तो म्हणाला. "तुम्ही निवड ठरवू शकता. मग खरं काम सुरू करू."
"छान."
बेडरूमचं दार बंद होतं.
पण जयला तो माणूस तिथे दिसत होता.मनाच्या डोळ्यांनी.
भूतकाळात हरवून रिकाम्या नजरेने पाहत बसलेला...
"नमस्कार शिरोडकर."
क्षणभर त्याच्या आत काहीतरी थांबल्यासारखं झालं.मग पुन्हा सुरू झालं.
तो डिसुझा होता.
जेवणाच्या छोट्या जागेत उभा राहून तो जयकडे त्या भेदक,गरुडासारख्या नजरेने पाहत होता.
अंगावर निळा झगा.पायात चप्पल.केस नीट विंचरलेले.हातात कॉफीचा कप.
"नमस्कार" जय शिरोडकर म्हणाला. "तुमची तब्येत सुधारतेय हे पाहून आनंद झाला."
डिसुझा काही बोलणार इतक्यात रीना परेरा झटकन मध्ये पडली.
"अंथोनी,आता परत अंथरुणावर जा. अर्धा तास झाला तुम्ही उभे आहात. डॉक्टर मिरगल यांनी काय सांगितलंय, आठवतंय ना?"
"त्यांना जाऊ दे."  तो तिला म्हणाला.
"अंथोनी..."
"ठीक आहे,बाळा."
तो हसला.
"पण तुला पाहून बरं  नाही वाटलं,शिरोडकर"
"अंथोनी!" रीना ओरडली.
पण तो आधीच वळला होता.
कॉफीचा कप टेबलावर ठेवून तो शांतपणे बेडरूमकडे गेला.दारउघडलं. आत गेला.दार बंद केलं.
"माफ करा," ती हळू आवाजात म्हणाली.
जय शिरोडकर सोफ्यावर बसला.
खोका आणि कागदपत्रं खाली ठेवली.
"तो सगळ्यांशी असंच बोलतो," ती म्हणाली. "त्याला ते विनोदी वाटतं."
"त्याला पाहून मला धक्का बसला."
ती त्याच्या जरा जास्तच  जवळ आली. हळू आवाजात बोलू लागली.
"तो स्वतःला अजूनही ताकदवान आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय असं मला वाटतं. बऱ्याच काळापासून त्याची मानसिक अवस्था पूर्णपणे ठीक नाही. हे बोलताना वाईट वाटतं, पण मला वाटतं ती आणखी बिघडते आहे."
ती क्षणभर थांबली.
"पूर्वी तो खूप हुशार होता. अजूनही आहे. पण कधी कधी अगदी विचित्र गोष्टी बोलतो, करतो. मला काळजी वाटते."
ती पुन्हा तेच करत होती.
स्वतःचं आयुष्य त्याच्यासमोर उघडत होती.
यावेळी  जय शिरोडकरने तिला बोलू द्यायचं ठरवलं.
"त्यांच्या डॉक्टरांना सांगितलं?"
"नाही."
ती थोडी थांबली.
"आज इतका वेळ उभं राहिल्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल. खरं तर त्यांनी अंथरुणातून उठूच नये. डॉक्टर फक्त दहा मिनिटांसाठी परवानगी देतात."
तिला त्याने तिची कीव करावी असं वाटत होतं.
"ते बरे होतील." जय म्हणाला. पण मनातून ते बरे व्हायला नको होते त्याला.
"नाही."
तिचा आवाज ठाम होता.
"ते फक्त आणखी खालावत जातील."
"आणि शेवटी..."
तो थांबला.
"मृत्यू."
तिने मान डोलावली.
"किती काळ?" जयने विचारलं.
"सांगणं कठीण आहे."
ती खिडकीबाहेर पाहत म्हणाली.
"हे असे खूप काळ चालू राहू शकतं."
क्षणभर जय शिरोडकर काही बोललाच नाही.
ती थकलेली दिसत होती. खिन्नही. आणि त्याने ते ओळखावं, अशी तिची स्पष्ट इच्छा होती.
"बसा," तो म्हणाला. "हे सगळं पाहून घेऊ."
तिचा आवाज निस्तेज होता.
"त्यांना रुग्णालयात ठेवायचं म्हटलं तर फार मोठा खर्च येईल."
"तुम्ही तर म्हणालात ते खूप श्रीमंत आहेत."
"अरे हो. आहेतच. खूप."
"मग खर्चाचा प्रश्न का यावा?"
"त्यांना काही फरक पडणार नाही." ती थोडी थांबली. "म्हणजे खर्चाचा. ते तर जवळजवळ पूर्ण रुग्णालयच विकत घेऊ शकतील. पण ते रुग्णालयात जाणारच नाहीत. कधीच नाही."
"समजलं." जय ने समोरची कागदपत्रं उघडली. "बरं, आधी हे पाहा."
ती त्याच्या शेजारी सोफ्यावर बसली नाही.
तिने एक कमी उंचीची खुर्ची ओढून आणली आणि सोफ्याच्या कोपऱ्याशी ठेवली. जय ने पुस्तिका आणि इतर साहित्य मधल्या टेबलावर ठेवलं.
ती मात्र सतत त्याच्याकडेच पाहत होती.
त्या कागदपत्रांत तिची काहीच रुची नव्हती.
"मी विचार करत होते," ती म्हणाली, "रिमोटची सोय लागेल. पलंगावरूनच टीव्ही  चालवता येईल अशी."
"त्याची व्यवस्था केली आहे."
"असं? छान."
"मी दोन सेट आणले आहेत. पण आधी ही माहिती पाहून घ्या. काही प्रश्न असतील तर विचारा. आणि हो, तुमच्या जुन्या  टीव्ही साठीही चांगली किंमत मिळू शकते."
"तो मी स्वयंपाकघरात ठेवेन असं ठरवलंय."
"म्हणजे प्रत्येक खोलीत एक सेट?"
"हो. तसच वाटलं."
ती वाक्य पूर्ण करताना खांदे उडवून गप्प बसली.
तिने हात कपाळावर ठेवला आणि मांडीवरच्या रंगीत पुस्तिकेकडे पाहू लागली.
जय ला तिचे डोळे दिसत नव्हते.
ती बराच वेळ काही बोलली नाही.
मग त्याच्या लक्षात एक गोष्ट आली.
ती पुस्तिका पाहत असल्याचा केवळ आव आणत होती.
समोर स्वयंपाकघरातील विद्युत शेगडीचं चित्र होतं. टीव्ही ची माहिती दुसऱ्या बाजूला होती.
"हे मॉडेल खूप विकलं जातं," तो मुद्दाम म्हणाला.
तिने तत्काळ प्रतिक्रिया दिली नाही.मग हळूहळू तिने पुस्तिका उलटली.पुन्हा त्याला तिचे डोळे दिसले नाहीत.
ती स्वतःशी झुंज देत होती, हे स्पष्ट होतं.जय चं लक्ष नकळत बेडरूमच्या दाराकडे गेलं.दार बंद होतं.पण ते पुरेसं जवळ होतं.कदाचित जास्तच जवळ.आत अंथोनी काय करत असेल?
तो विचार मनात येऊन गेला.
"मला एक ग्लास पाणी मिळेल का?" तो म्हणाला.
ती झटकन उठली.पुस्तिका खाली पडली.
"माफ करा. मी तुम्हाला चहा, कॉफी विचारायलाच हवं होतं."
ती हलकंसं हसली.
"मी फारसं काही पीत नाही. कधी घेतलं तर डोकंच फिरतं. विचित्र गोष्टी करायला लागते."
"पाणी पुरेसं आहे." तो म्हणाला.
तिने त्याच्याकडे पाहिलं.आणि त्या नजरेत काहीतरी बदललं होतं.
क्षणभर दोघांमध्ये एक निःशब्द, पण स्पष्ट ताण निर्माण झाला.
ती वळली आणि स्वयंपाकघराकडे निघून गेली.
जय तिच्या मागोमाग गेला.ती फ्रिजचं दार उघडून उभी होती.
तो आल्याचं तिला ऐकू आलं असणार, पण तिने मागे वळून पाहिलं नाही.क्षणभर दोघेही काही बोलले नाहीत.
त्या शांततेत अनेक न बोललेले प्रश्न होते.
तिने हळूहळू त्याच्याकडे पाहिलं.
त्यानेही तिच्या नजरेला नजर दिली.
काही क्षणांनी त्यांच्यातलं अंतर विरघळून गेलं.
तिने विरोधाचा एक शब्द उच्चारला, पण त्यात ठामपणा नव्हता.
भावना, एकटेपणा, निराशा आणि दीर्घकाळ दडपून ठेवलेली ओढ — सगळं एकदम वर आलं होतं.
त्या क्षणी दोघांनाही बाकी जग विसरल्यासारखं झालं.
पण पुढच्याच क्षणी तिने  त्याच्या कानात कुजबुजत बेडरूमच्या दिशेने मान वळवली.
"तो झोपलाय."
तिच्या आवाजात घाई होती.तणाव होता.
आणि त्याहून जास्त काहीतरी होतं.
जय ला अचानक जाणवलं की तो ज्या परिस्थितीत अडकत चालला आहे, ती साधी नव्हती.
घराच्या भिंती शांत होत्या.
दारं बंद होती.
पण त्या शांततेखाली काहीतरी धोकादायक हलत होतं.
रीना परेरा त्याच्या कल्पनेपेक्षाही अधिक गुंतागुंतीची होती.
बेडरूम मध्ये त्या दोघांनी एकमेकांचे कपडे कधी काढले त्यांचे त्यांनाच कळले नाही. त्यांची नग्न शरीरे परस्परांना  चिकटली होती. आणि त्या क्षणी जय ला एक गोष्ट नक्की कळली—
तो तिच्यापासून दूर राहू शकणार नव्हता.कितीही प्रयत्न केला तरी.
प्रकरण २ समाप्त.