Badalate Rang - 1 books and stories free download online pdf in Marathi

बदलते रंग - 1

बदलते रंग - भाग १

----------- -------

"आई मी काकूंकडे जाऊन येते,ग!" घाईघाईने घरातून निघताना गीता म्हणाली."लवकर

परत ये.संध्याकाळी पाहुणे येणार आहेत माहीत आहे नं? थोडी तयारी करायची आहे."आई

म्हणाली."काळजी करू नको आई! मी लवकर येते."गीता म्हणाली निशाताई त्याच इमारतीत

रहात होत्या.गीता लहान असल्यापासूनच तिची त्यांच्याशी जवळीक होती. त्यांचा मुलगा

अक्षय दिल्लीला सरकारी अधिकारी होता.आणि मुलगी नेहा बारावीला होती.गीता गेल्या वर्षी

ग्रॅज्युएट होऊन आता MBA करत होती.घरी असल्यामुळे ती दिवसातून एकदा तरी काकूना

भेटून जात असे.आज दरवाजा उमेशकाकांनी उघडलेला पाहून तिला आश्चर्य वाटले."काका तुम्ही

आज घरी कसे? ऑफिसला नाही गेलात?"तिने विचारले."आज तुझ्या काकूला बरे वाटत नाही.

नेहा क्लास बुडवू शकत नाही, आणि हिला सकाळपासून ताप आहे कोणीतरी तिच्याबरोबर

असणे आवश्यक होते;म्हणून मी घरी राहिलो."काका म्हणाले.गीता काकूंजवळ गेली,त्यांना

चहा बिस्किटे खायला लावली.डाॅक्टरांकडून आणलेले ऒषध दिले. स्वयंपाकाच्या बाई येणार

होत्या,तरी त्यांच्यासाठी खिचडी बनवली आणि त्यानंतरच घरी जायला निघाली. तिची लगबग

निशाताई पडल्या - पडल्या कॊतुकाने पहात होत्या.

घरी येऊन पहाते,तर तिची आई पाहुण्यांच्या तयारीत गुंतली होती.संध्याकाळी येणा-या

मुलाचा फोटो तिच्यासमोर धरत त्या म्हणाल्या "स्मार्ट आहे न?आणि नोकरीही चांगली आहे.

देवाच्या कृपेने आज योग जुळून आला तर फार बरे होईल." गीता त्यांच्याएवढी उत्साही नव्हती.

"आई! दरवेळी काय होते माहीत आहे नं? पत्रिकेचे कारण सांगून नंतर नकार येतो.तेव्हा जास्त

स्वप्ने बघू नको.नंतर दुःखी होशील," ती कडवटपणे म्हणाली.

गीताचे शब्द खरे ठरले. यावेळीही नेहमीच्याच कारणासाठी नकार आला.आईची काळजी

वाढली पण गीताला उलट आनंदच झाला.आता तिला MBA चा अभ्यास नीट करता येणार होता.

"आई! आता थोडे दिवस हे वरसंशोधन बंद ठेव. मला इतक्या लवकर लग्नच करायचे नाही.

MBA करून करीयर करायचे आहे." तिने स्पष्ट शब्दात सांगून टाकले.यावर सुप्रिया काही

बोलली नाही पण मनातून गीताच्या लग्नाविषयी धास्तावलेली होती.

काही दिवसानी सुप्रिया आणि निशाताई बाजारात भेटल्या.सुप्रियाचा उतरलेला चेहरा पाहून

निशाने विचारले,"कसल्या काळजीत आहेस सुप्रिया! तब्येत बरी आहे नं?राहुलचा अभ्यास कसा

चाललाय?इंजिनियरिंचे पहिले वर्ष कसे वाटतेय त्याला? " "ते सगळं ठीक आहे.पण मला चिंता

आहे ती गीताच्या लग्नाची!"सुप्रिया सांगू लागली."तिच्या लग्नाची कसली चिंता? किती गोड

आणि सालस आहे तुझी मुलगी! "निशा म्हणाली."ते सगळं खरं आहे पण पत्रिका जमत नाही

म्हणून नकार येतात."सुप्रियाने आपले मन मोकळे केले.या सोसायटीत अगदी नवीन रहायला

आल्यापासून दोघींची मैत्री होती.कोणतीही गोष्ट एकमेकीना सांगितल्याशिवाय त्यांना चैन पडत

नसे.एकमेकींचा खूप आधार वाटे दोघींना! "अजून गीता खूप लहान आहे.आतापासून तिच्या

लग्नाची काळजी करू नको.मला ती सांगत होती,की तिला अजून शिकायचे आहे.मग तिला

शिकू दे करीयर सुरू करू दे.लग्न वेळ आली की होईलच." निशाताईंच्या या शब्दानी सुप्रियाला

धीर आला.निशाताई मात्र घरी आल्या त्या तणतणतच.उमेश नुकतेच घरी आले होते त्याना त्या

तावातावाने सांगू लागल्या,"इतकी सुंदर आणि सुसंस्कारी मुलगी गीता! तिच्या अंगचे गूण पहायचे

सोडून हे लोक पत्रिकेतले गूण कसले शोधतात?""या आपल्या परंपरागत पद्धती आहेत.त्या

अचानक् कशा बदलतील?"उमेश त्यांना समजावण्यासाठी म्हणाले."तुम्हीसुद्धा अजून जुन्या

जमान्यात वावरताय.आपण आता एकविसाव्या शतकात आहोत."निशाताई ठसक्यात म्हणाल्या.

गीताने अभ्यासाला सुरुवात केली.MBA चांगल्या मार्कानी पास केले.तिला मोठ्या कंपनीत

नोकरीही मिळाली.या सर्व धावपळीत निशाकाकूंकडे तिचे जाणे खूपच कमी झाले.फक्त रविवारी

एखादी फेरी मारणे शक्य होत असे.नेहाच्या बारावीच्या परीक्षेच्या गडबडीत निशाताईनाही तिची

आठवण नव्हती. दोन महिने गेले.नेहाची परिक्षा संपली आणि अक्षयचा फोन आला की

'मी महिनाभर रजा घेऊन मुंबईला येत आहे.'अक्षयला दिल्लीला जाऊन चार वर्षे झाली होती.

दरवर्षी नेहाची परीक्षा झाली की निशाताई,नेहा आणि उमेश दिल्लीला जात असत; अक्षय

त्यांना उत्तर प्रदेश, कलकत्ता, ओरिसा, हिमाचल प्रदेश,सगळीकडे फिरवून आणत असे.चार

वर्षानी तो मुंबईला येत होता.निशाताईंचा आनंद गगनात मावत नव्हता.मुलासाठी काय करू

आणि काय नको असे झाले होते.त्याच्या आवडीचे पदार्थ करताना, घर नीटनेटके लावताना

त्या वय विसरल्या होत्या.उमेशनी त्याना समजावले,"जरा सांभाळून काम कर,नाहीतर अक्षय

येईल आणि तू आजारी पडशील." पण त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही.मदतीला नेहा होतीच.

दोन दिवसानी अक्षय आला.शांत घरात हास्याचे तरंग उठू लागले दिल्लीचे किस्से सांगून

तो सगळ्याना हसवत होता. इथल्या मित्रांची चॊकशी करत होता.संध्याकाळी काॅलनीतले

मित्र त्याला भेटायला आले.शाळा - काॅलेजच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.पण असे

वाटत होते की त्याचे बोलण्याकडे लक्ष नव्हते.अधून मधून दरवाजाकडे नजर जात होती.

त्याच्या त्याच्या एका मित्राने विचारले सुद्धा " कोणी येणार आहे का?" अक्षयने गडबडून

उत्तर दिले "छे! तुम्ही सगळे तर आला आहात." चहा- फराळ झाल्यावर सगळे फेरफटका

मारायला बाहेर पडले.तो परत आला तेव्हा बरीच रात्र झाली होती.रात्री जेवल्यावर निशाताई

अक्षयसमोर बसल्या.थोड्या गंभीर दिसत होत्या."तू आलास ते बरे झाले. तुझ्याशी थोडे

विस्ताराने बोलायचे होते.फोनवरून महत्वाचे विषय बोलणे शक्य होत नाही." " काय

प्राॅब्लेम आहे आई! स्पष्ट बोल!" अक्षय धास्तावून म्हणाला."काही प्राॅब्लेम नाही रे! तुझ्या

लग्नाविषयी बोलायचे होते. ब-याच मुलींचे फोटो आले आहेत; ते बघून घे.बघ तुला कोणी

पसंत पडते का! दिल्लीला एकटा किती दिवस रहाणार आहेस? एकदा तुझे लग्न झाले की

माझी काळजी कमी होईल." निशाताई म्हणाल्या. "आई! माझ्या लग्नाची घाई करू नको."

अक्षय म्हणाला.आई ह्या विषयावर बोलेल याची त्याला कल्पना नव्हती; त्यामुळे तो

गडबडला होता."ह्या मुलींचे फोटो नजरेखालून घालवलेस तर बरे होईल.बघ एखादी

पसंत पडली तर!"निशाताईंनी त्यांच्यापरीने प्रयत्न चालू ठेवला.अक्षय मात्र जराही फोटो

पहायच्या मूडमध्ये दिसत नव्हता."आई!आज आम्ही मित्र खूप चाललो. मला झोप येतेय

आता! उद्या पाहू."असे म्हणून तो बेडरूममधे निघून गेला.

दुस-या दिवशी रविवार होता. अक्षयने सकाळचा चहा घेताना सहज स्वरात आईला

विचारले,"अग आई!ती गीता कालपासून कुठे दिसली नाही.तुला भेटल्याशिवाय तर तिला

चैन पडत नसे." "ती हल्ली नोकरी करते त्यामुळे तिचे येणे खूप कमी झाले आहे.तरी रजा

असली की भेटून जाते.आज रविवार आहे;नक्की फेरी मारेल."निशाताई म्हणाल्या.अक्षय

वर्तमानपत्र वाचत हाॅलमध्ये बसला.निशाताई किचनमधे होत्या.बेल वाजली म्हणून त्याने

दरवाजा उघडला. दरवजात गीता उभी होती.

अक्षय आल्यापासून गीताची वाट पहात होता; पण तिला समोर पाहिल्यावर मात्र

त्याला काय बोलावे तेच सुचेना.तीही क्षणभर स्तब्ध झाली आणि आश्चर्यचकित होऊन

त्याच्याकडे पहात राहिली." आजकाल अगदी दुर्मीळ झाली आहेस." अक्षय काहीतरी

बोलायचे म्हणून म्हणाला."तू कधी आलास?आणि अचानक् कसा? काकू काही बोलल्या

नाहीत तुझ्या येण्याबद्दल!" गीता गोंधळून गेली होती. पट्कन किचनमधे पळाली. तिचे

गोंधळणे, लाजणे अक्षयला नवीन होते.त्याला आठवली पूर्वीची अवखळ गीता.त्याच्याशी

वाद घालणारी,त्याने चेष्टा केल्यावर रुसणारी!आजची गीता काही वेगळीच होती.पण त्याला

पूर्वीएवढेच तिचे हे तारुण्यसुलभ भावही आवडले.तोसुद्धा बदलला होताच नं! पुर्वी तो तिची

चेष्टा करत किचनपर्यंत जात असे आणि आईलाही चेष्टामस्करीत सामील करून घेत असे.

पण आज तो हाॅलमधेच बसून राहिला. संध्याकाळी आईने परत फोटो पहाण्यासाठी

भुणभुण लावली,पण परत टाळाटाळ करून तो बाहेर घराबाहेर पडला.परत येताना वाटेत

गीता भेटली.बरोबर नयना-तिची काॅलेजची मॆत्रीण होती."अरे अक्षय! कधी आलास तू? ही

गीता सतत तुझे नाव घेत असते आणि तू तर तिकडे जाऊन सगळ्याना विसरून गेलास."

ती म्हणाली."मी कसा विसरेन?बघ! मी समोर असूनही तुझी मॆत्रीण माझ्याशी बोलतेय का?"

तो नयनाशी बोलत होता पण नजर गीताकडे होती. नयनाच्या लक्षात आलं की त्याला गीताशी

  • बोलायचं आहे,म्हणून घाईत असल्याचा बहाणा करत म्हणाली,"मला थोडे काम आहे.मी निघते
  • आता. परत भेट होईलच.बाय!"आणि तिच्या घराकडे निघाली.
  • Cntd.....part2