Shevanta books and stories free download online pdf in Marathi

शेवंता

------“शेवंता .. yes

शेवन्त्ये अग ये पाय्लेस का कोन आलया
ताई आल्याती तुजा “खावू घेवून ..
इति ..मावशीबाई ..
आणी मग जोरात खुळ खुळ आवाज ..
आणी शेवन्ताचे दोन पायावर दुडूक्या उडया मारणे ..
हो शेवंता ..कुणी माणुस नाहीबर का .
तर ही आहे एक करड्या रंगाची शेळी !!
नेहेमी फिरण्याच्या रस्त्यावरील आमची एक सखी म्हणा ना !!!
आमच्या सख्या सोबत्या मध्ये रस्त्यावरची कुत्री ..म्हशी ..शेळ्या हाच भरणा जास्त आहे
अहोंचा नेहेमीचा शिरस्ता म्हणजे भाजी मार्केट मधून आठवड्याची भाजी रविवारी एकदम आणणे
मग दोघांचे काम म्हणजे
ती व्यवस्थित साफ सूफ करून निवडणे
यात चार पाच पालेभाज्या ..कोथिंबीर जुडी ..
एक दोन शेंगवर्गीय भाज्या जसे की मटार .श्रावण घेवडा ..असे
मग हे सारे निवडून झाल्यावर खूप मोठा भारा ..शेंगाची फोलपटे
असे सारे तयार झाले की एका मोठ्या पेपर मध्ये ते गुंडाळून ठेवणे ..
मग दुसऱ्या दिवशी सकाळी फिरायला जाताना तो भारा बरोबर घेवून जाणे
मग रस्त्यावर पहिली झोपडी लागते तिथे मावशीबाई असत ..
एका वाचमन ची बायको ..
त्यानीच सांभाळ केलेली ही करड्या रंगाची शेळी शेवंता
लुकुलुकू .दोन गोल डोळे फिरवणारी ..आणी गळ्यात बांधलेली घुंगरे हलवणारी
मग हा सारा भारा शेवंता पुढे ठेवला की ..बाईसाहेब खुष ..!!
भरा भर खायची तिची गडबड ..आणी त्यातून थोडे तिलाच नंतर देण्या साठी
राखून ठेवायची मावशी बाईंची गडबड ..!!
असा दर सोमवार चा कित्येक दिवस चालत आलेला रिवाज !!
रोज फिरायला निघालो की शेवंता आमच्याकडे पाहून पाय वर करून बे बे असे ओरडून
जणु आम्हाला बोलवायची ..
ती हाक मला आपुलकीची वाट्त असे
मग आम्ही पण तीला बाय बाय करून पुढे चालत असू
असेच एका सोमवारी आम्ही तीला तिचा खावू दिला आणी पुढे निघालो
येताना आम्ही आमच्या गप्पात दंग होतो ..
मावशी बाईंच्या झोपडी समोर शेवंता होती रिकामीच फिरत ..
आमचे काही तिच्या कडे लक्ष नव्हते
आणी बाय बाय करायचे राहूनच गेले ...
बोलत बोलत आम्ही आमच्या घरापर्यंत म्हणजे जवळ जवळ एक किलोमीटर
चालत आलो आणी अचनक आम्हाला मागे कोलाहल ऐकू आला
शेवंता ...शेवंता ..अशा हाका पण ऐकू आल्या ..
मागे वळून पाहतो तो काय शेवंता बाई साहेब आमच्या मागे मागे चालताना दिसल्या
आणी त्याच्या मागे आपल्या मावशी बाई पळत येताना ..
काय प्रकार आहे क्षण भर समजेना ..
मग मावशीबाई नी येवून शेवंता च्या गळ्यातली दोरी पकडली आणी तीला धरले
बगा वो ताई ..तुमास्नी बगून ही बाय दाव तोडून की हो पळाली
आणी थांब ..थांब म्ह्न्तोया तर ऐक्तीया कुट ..?
म्हणजे आमचे लक्ष पण नव्हते आणी शेवंता चक्क गळ्यातले दावे तोडून आमच्या मागोमाग
आमच्या घरा पर्यंत पोचली होती ..
असा हा प्रकार पाहून आम्हाला तर काय बोलावे समजेना ..
तिच्या डोक्यावरून मी हात फिरवला आणी डोळ्यात पाणी आले माझ्या ..
अव ताई आज तुमी ..तीला ते बाय का काय ते करायचे विसरला न्हव
आणी ही भायेरच ..थया थया ..नाचाया की वो लागली ..
म्या बी झोपडी तुन भायेर आली ही का नाच्तीया बगाया
तवर ही दोरी तोडून तुमच्या माग धावली बगा ..
म्हणजे मी तिचा निरोप घ्यायचा विसरले ..आणी हे रामायण घडले तर ..
मावशी बाई म्हणाल्या ..
ही प्राण्याची जात लै प्रेमाची बगां ..
तुमास्नी यक डाव जीव लावला की कवाबी इसर्नार नाय बगा ..
त्या मुक्या प्राण्याचे हे “जीव लावणे “पाहून आम्ही तर “हतबुद्ध च झालो !!!
इतका जीव तर आपल्या “रक्ता मासाची “माणसे पण आपल्याला लावत नाहीत
आता या गोष्टीला बरेच दिवस झालेत ..
मावशीबाई ती झोपडी सोडून माझा निरोप घेवून कधीच निघून गेल्या .
पण अजूनही फिरायला जाताना त्या जागेवर आले की “शेवंता ..”हमखास आठवतेच ..!!!