इश्क – (भाग १६) (8) 460 132 ईटरनीटी…ए प्युअर ब्लिस्स… तो क्षण किती वेळाचा होता दोघांनाही ठाऊक नाही.कदाचीत काही सेकंद..कदाचीत एखादा मिनिटं..कदाचीत कित्तेक मिनिटंही… जणू सर्व काळ त्या क्षणापुरता थांबुन गेला होता. समुद्राच्या लाटा, वार्याच्या झुळुकीने हलणार्या नाराळाच्या झाड्यांच्या झावळ्या, एकसंध आकारात उडणारे पक्षांचे थवे.. सर्व काही.. राधा आणि कबीर भानावर आल्यावर एकमेकांपासुन दुर झाले.“वॉव्व.. आय… आय नीड अ बिअर…”, खाली मान घालुन कपाळ चोळत कबीर म्हणाला..“का रे? टेस्ट आवडली नाही का?”, पहील्यासारखेच खळखळुन हसत राधा म्हणाली..“तु ना.. खरंच.. अशक्य आहेस…” कबीर..“तु मला ओळखलं कुठे आहेस अजुन? चल जाऊ या? उशीर होतोय.. अजुन ६ तासाचा ड्राईव्ह आहे…”, असं म्हणुन राधा कारकडे जाऊ लागली. कबिर अजुनही तिच्या पाठमोर्या आकृतीकडे बघत होता. राधा अगदी तश्शीच दिसत होती जशी त्याने त्याच्या पुस्तकात ‘मीरा’ रंगवली होती. अचानक त्याच्या डोक्यात प्रकाश पडला.. “राधाssss..”, त्याने जोरात हाक मारुन राधाला थांबवलं आणि तो धावत धावत तिच्या जवळ गेला.“काय झालं?”, राधा वाळूमध्ये बसुन त्यातले शंख शिंपले गोळा करत होती..“हे.. हे तु सर्व आधीच प्लॅन केलं होतंस ना?”’हे म्हणजे? शंख-शिंपले? त्यात काय प्लॅन करायचंय, दिसले म्हणुन घेतेय.. तुला नाही आवडंत?”“शंख-शिंपले नाहीत स्ट्युपीड… किस्स.. तु आधीच प्लॅन केला होतास ना?”, कबिर वैतागुन म्हणाला“ऑफ़कोर्स नॉट.. इट वॉज स्पॉन्टॅनिअस…”“ओह नो.. इट वॉज प्लॅन्ड.. तु हे नक्कीच आधीच ठरवलं होतंस राधा..”, कबिर खात्रीने म्हणाला..“नाही कबिर.. हे असं कुणी आधीच ठरवुन करतं का?”“हो.. तु केलं आहेस.. नाही तर तुझे कपडे.. तुझी हेअर-स्टाईल.. तुझे डायलॉग्ज.. सगळंच कसं त्या कथेनुरुप होतं..”“ओह.. ओह खरंच की कबिर.. योगायोग अजुन काय..”, अडखळत राधा म्हणाली“यु वेअर रॉंग राधा.. मी तुला चांगला ओळखतो…“नो कबिर.. बट एनिवेज.. तुला तसं वाटतं तर तसं..सो व्हॉट…?”“देन इट वॉज नॉट ए किस्स टु से थॅंक्यु…”“अज्जीब्बात नाही.. आणि भारतात, अजुन तरी थॅंक्सचा किस्स गालावर देतात.. ओठांवर नाही..”“तेच मला म्हणायचंय.. मग तु मला किस का केलंस?”, आपला पॉईंट प्रुव्ह झाल्यासारखा कबिर म्हणाला.. राधा आपले कपडे झटकत उठुन उभी राहीली… “आपण हे गाडीत बोलुयात का? सुर्य ऑलमोस्ट बुडालाय समुद्रात…”“नाही.. मला आत्ता.. इथे.. ह्या क्षणालाच उत्तर पाहीजे.. आजचा दिवस खुप मस्त गेला राधा.. आपल्या दोघांसाठी.. लेट्स पुट अ क्रिम ऑन इट.. पट्कन सांग सुर्य पुर्ण अस्ताला जाण्याआधी..”, कबिर“तु काय वकीलीचं ट्रेनिंग घेऊन आला आहेस का आज? आधी तिकडे पोलिस-स्टेशनमध्ये कसले एकावर एक फंडे मारत होतास.. आणि इथे प्रश्नावर प्रश्न…”“विषय बदलु नकोस.. राधा सुर्य मावळतो आहे.. प्लिज बोल..”“अरे काय चाल्लंय.. सुर्य मावळतो.. सुर्य मावळतोय.. चल प्लिज जाऊयात इथुन…” राधाच्या मनामध्ये चाललेला गोंधळ तिच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता. “कबिर तु म्हणालास ना तु ओळखतोस मला? मग झालं तर.. तुला उत्तर माहीती असेलच ना?”“माहीती आहे.. पण मला तुझ्याकडुन ऐकायचंय राधा..”“का पण? समजुन घे ना तु?”“हे बघ राधा.. मी एक लेखक आहे. आणि पुस्तकांमध्ये प्रत्येक गोष्ट पात्रांच्या तोंडुन यावी लागते. वाचक समजुन घेतील, त्यांना कळेल वगैरे गोष्टींना अर्थ नसतो. चित्रपटांमध्ये हाव-भाव करुन सांगता येतं, पुस्तकांत नाही..”“हे पुस्तक नाहीए ना पण…”“कमॉन राधा.. किस करताना तु लाजली नाहीस.. मग आता काय होतंय एव्हढं…” “हे सगळं आत्ताच बोलायला हवं का?”, राधा“हो.. आत्ताच.. तुझा काही भरवसा नाही, त्या दिवशी सारखी रात्रीतुन गायब होशील…”, कबिर चिडुन म्हणाला.. राधा पुन्हा एकदा खळखळुन हासली… तिने एक दीर्घ श्वास घेतला.., कबिरचे दोन्ही हात हातात घेतले आणि मान खाली घालुन ती कबिरच्या जवळ जाउन थांबली..तिची नजर अजुनही जमीनीकडेच खिळलेली होती. मनात येणारे हासु दाबण्याच्या प्रयत्नात तिचे चिक-बोन्स फुगुन वर आले होते. सुर्यास्ताच्या प्रकाशाने का अजुन कश्याने कुणास ठाऊक पण तिच्या गालावर एक लालसर छटा पसरली होती. “आय…..”..मोठ्या प्रयत्नांनी तिने पहीला शब्द उच्चारला..जणु काही मनातल्या मनात एक ते दहा आकडे म्हणुन होइपर्यंत राधा थांबली आणि मग पुढे म्हणाली…“लव्ह…..”ह्यावेळी मनातल्या आकड्यांची संख्या एक ते किती होती कुणास ठाऊक… पण तिने बर्याच वेळानंतर कबिरकडे बघीतले. तिची ती नजर.. ज्याने कबिरच्या काळजाचा अनेक-वेळा वेध घेतला होता, ज्याने कबिरला तिच्यासाठी वेडापिसा बनवले होते, जिच्यासाठी कबिर खरोखरच सगळं जग मागे सोडुन यायला तयार होता.. ती बराच वेळ कबिरच्या डोळ्यात काही तरी शोधत होती. त्या क्षणामध्ये कबिरला तिची नजर जणु त्याच्या डोळ्यामार्गे त्याच्या मनामध्ये, तिच्यासाठी लिहीलेल्या भावना वाचते आहे असेच वाटुन गेले. जेंव्हा तिची खात्री पटली तेंव्हा राधा पुढे म्हणाली…“….. यु” कबिरने तिला जवळ ओढले आणि घट्ट मिठी मारली. त्याला आयुष्याकडुन अजुन काहीही नको होते. जे त्याला हवं होतं, ज्यासाठी तो गेले काही महीने तडफडत होता.. ते त्याला मिळालं होतं. त्याने आकाशाकडे पाहीलं आणि दोन बोटं कपाळाला टेकवुन सलाम ठोकला. अर्थात.. पुढे काय होणार आहे ह्याची त्याला त्या क्षणी कल्पना नव्हती… अंधार पडायला लागला तसं दोघंही कारपाशी परतले.कबिरने राधाला थांबवले, स्वतः दार उघडले आणि राधाला आत बसायची खुण केली.. “अरे बापरे.. इतका रिस्पेक्ट… आय एम फ्लॅटर्ड..”, गाडीत बसतं राधा म्हणाली.“ये तो शुरुवात है.. आगे आगे देखो होता है क्या..”, असं म्हणुन कबिरने गाडी सुरु केली आणि दोघंही गोव्याला जायला निघाले.. गाडीमध्ये कोणीच कुणाशी बोलत नव्हतं. त्याच दिवशी सकाळी दोघं एकमेकांशी इतकं काही काही बोलत होते, पण आता मात्र बोलायला शब्दच सापडत नव्हते. कबिरला तर शरीर पिसासारखं हलकं हलकं झाल्यासारखं वाटत होतं. म्युझिक-सिस्टीमवर अर्जित-सिंगची गाणी वाजत होती. प्रत्येक गाण, गाण्यातले प्रत्येक शब्द कबिरला जणु आपल्यासाठीच लिहीले आहेत असंच वाटत होतं. चोहोबाजुला गर्द झाडी, थंडगार वारा.. कबिरला हा प्रवास कधीच संपु नये असंच वाटत होतं. दुसर्या दिवशी मस्त बाईक घेऊन राधाबरोबर गोवा फिरण्याची स्वप्न रंगवण्यात कबिर बुडुन गेला होता. फोन वाजला तसा तो भानावर आला. मोनिकाचा फोन होता.कबिरने काही क्षण फोनकडे बघीतले आणि फोन बंद करुन ठेवुन दिला. परंतु थोड्यावेळाने पुन्हा फोन वाजला. “अरे फोन वाजतोय.. घे ना..”, राधा कबिरला म्हणाली..क्षणभर चलबिचल झाल्यावर कबिर म्हणाला… “मोनिकाचा आहे.. काय करु? घेऊ का नको घेऊ?”“तुझी मर्जी.. मी काय सांगु?”, खांदे उडवुन राधा म्हणाली. कबिरने गाडी कडेला लावली आणि फोन उचलला. “हॅल्लो.. कबिर! कुठे आहेस?”, मोनिका“गोव्याला.. का? काय झालं?”, कबिर“कुणाबरोबर?”, मोनिका“काय झालं काय?”, कबिर“कबिर.. मी विचारलं, कुणाबरोबर आहेस?”“राधा…” “कबिर.. तुला काहीच वाटत नाही का रे? का माझ्या मनाची काहीच पर्वा नाहीए तुला? इतका निर्दयी कसा असु शकतोस तु?” , मोनिका“निर्दयी? आणि मी? आणि तु मला असं अचानक सोडुन निघुन गेली होतीस तेंव्हाचं काय?”, कबिर“कबिर.. मी दहा वेळा माफी मागीतली तुझी.. अजुन दहा हजार वेळा सॉरी म्हणायला तयार आहे? तु जरा पण आपल्या दोघांबद्दल विचार करणार नाहीयेस का?”“मोनिका.. मला वाटतं ती वेळ आता निघुन गेली आहे..मी तुला तेंव्हा पण सांगीतलं आणि आता पण सांगतोय.. आपण त्यां त्याच गोष्टींवर बोलुन खरंच काही अर्थ नाहीए…”“पण कबिर…” “मोनिका प्लिज.. आय एम इन रिअल्ली गुड मुड राईट नाऊ, अॅन्ड आय डोन्ट वॉंन्ट टु स्पॉईल इट.. आपण मी परत आल्यावर बोलुयात ओके.. बाय..”, असं म्हणुन मोनिकाला बोलायची संधी न देता कबिरने फोन बंद केला.. राधा इतका वेळ त्यांच बोलण ऐकत होती.कबिरने राधाकडे बघीतलं. राधा थोडी अपसेट दिसत होती. “तुला नाही आवडलं का तिने फोन केलेला?”, कबिर हसत म्हणाला..राधा काहीच बोलली नाही. “समबडी इज बिकमींग पझेसिव्ह..”, हसत हसत कबिर म्हणाला राधा खिडकीतुन खाली दिसणारा समुद्र बघत होती. “ओके.. दोन मिनीटं खाली उतर…”, कबिर राधाला म्हणाला.“कबिर प्लिज.. आधीच उशीर झालाय.. इथे असं आडवळणावर नको थांबुयात..”, राधा“फक्त दोनच मिनीटं.. थोडे पाय मोकळे होतील…”, कबिर राधा आणि कबिर दोघंही खाली उतरले. एखाद्या परिकथेमध्ये वर्णावे तसं ते दृश्य होतं. एव्हाना सर्वत्र अंधार पडला आणि पोर्णिमेच्या चंद्राच्या चांदण्याने रस्ता न्हाऊन निघाला. घाटातुन खाली दुरवर पसरलेल्या समुद्राचं चांद्रप्रकाशात चमचमणारं पाणी सुंदर दिसत होतं. सर्वत्र निरव शांतता होती. कबिर राधाच्या समोर आला आणि एक पाय वाकवुन गुडघ्यावर खाली बसुन राधाचा हात हातात घेत म्हणाला..“लेट्स गेट मॅरीड राधा….” “एक्स्युज मी? व्हॉट?”, राधा म्हणाली..“आय सेड.. लेट्स गेट मॅरीड”, कबीर“पण तुला माहीते.. ते शक्य नाहीए…”, कबिरच्या हातातुन हात सोडवुन घेत राधा म्हणाली“हो म्हणजे.. आय नो.. यु आर स्टील मॅरीड.. तुमचा डिव्होर्स झाला नाहीए.. पण आज ना उद्या होईलच ना…”, कबिर “नो कबिर.. प्रश्न डिव्होर्सचा नाहीचे…”“मग?”, कबिर उठुन उभा राहीला “आय डोंन्ट वॉंट टु बी इन रिलेशनशिप..”, राधा म्हणाली..“आय डोंन्ट गेट ईट… काल तु मला किस केलंस.. स्वतःहुन ‘आय-लव्ह-यु’ म्हणालीस.. मग?”, कबिर“मग? आय लsssव्ह यु…”, लव्ह शब्दावर जोर देत राधा म्हणाली.. “आय स्टील लव्ह यु कबिर.. पण ह्याचा अर्थ असा नाही होतं की आपण लग्न करावं” “मला तु आवडतेस… तुलाही मी आवडतो.. मग लग्न करण्यात प्रॉब्लेम काय आहे?”, गोंधळुन कबिर म्हणाला“कबिर.. मी आधीच्या लग्नातुन बाहेर का पडले ते तुला माहीती आहे ना.. मी..मला स्वातंत्र्य हवंय कबिर.. आय वॉंन्ट टु लिव्ह लाईफ़ ऑन माय टर्म्स…”“ठिक आहे ना मग.. मी तुला प्रॉमीस करतो की तुला.. किंवा तुझ्या स्वातंत्र्यात मी कधीच येणार नाही.. तुला तुझं आयुष्य जसं जगायचंय तसं जगायला तु मोकळी आहेस..”, कबिर “ओके.. काल तु वकिल झाला होतास.. आता मी वकिल होते..”, कबिरला थांबवत राधा म्हणाली..”तुला ऐकायचंय ना मला रिलेशनशिप का नकोय.. किंवा आपलं लग्न का शक्य नाहीए… तर ऐक…” “सगळ्यांत पहील्यांदा.. मगाशी तुला मोनिकाचा फोन आला होता… यु नो.. फ़ॉर ए सेकंद आय फेल्ट `जे’, मला नाही आवडलं तिचा फोन आलेलं..”“अग पण दॅट्स ओके.. इट्स नॅचरल.. रिलेशनशीप मध्ये असं होतंच.. त्यात काय एव्हढं? दॅट्स हाऊ इट इज टु बी इन रिलेशनशिप”, कबिर म्हणाला“अॅंन्ड दॅट इज द एक्झॅक्ट रिझन आय डोंन्ट वॉंन्ट एनी रिलेशनशिप कबिर.. हे अस्ं आयुष्यात प्रत्येकवेळेस कधी मी तर कधी तु माझ्या बाबतीत पझेसिव्ह व्हायचं..! कश्यासाठी?” कबिर काहीच बोलला नाही.. “मी जेंव्हा जेंव्हा तुझ्याकडे बघते कबिर.. तुझ्या चेहर्यावर फक्त एकच भाव असतात.. लेट्स गेट मॅरीड.. लेट्स हॅव किड्स… माझ्या स्वप्नात ते आयुष्य नाहीए कबिर जे तु बघतो आहेस. माझी स्वप्न वेगळी आहेत..”“ओके.. काय स्वप्न आहेत तुझी?” “मला सगळं जग फिरायचंय.. मला प्रत्येक वेळी नविन ओळखी हव्यात.. त्याच त्याच लोकांबरोबर मला अख्खं आयुष्य घालवणं मान्य नाही. रुटीन लाईफ़ माझ्या लेखी नाही कबिर.. तुला माहीते, मी परत आल्यावर काही दिवसांनी जेंव्हा मला डिव्होर्सचं कळलं तेंव्हाच मी ठरवलं किंवा खरं तर त्या आधीच मी ठरवलं होतं की ह्या घरातुन बाहेर पडायचं. सो व्हॉट आदर ऑप्शन्स आय हॅव.. मला आई-वडीलांनी दुर लोटलं होतं. मित्र-मैत्रींणीनीही माझ्याशी नातं तोडलं होतं. मला माझ्या पायावर उभं रहाणं आवश्यक होतं. मी माझ्यासाठी जॉब शोधायचं ठरवलं. विचार केला, कुठलं काम असेल जे मी आनंदाने आणि एकाग्रतेने करु शकेन? आणि मग मनात विचार आला.. व्हाय नॉट ट्राय इन ट्रॅव्हल कंपनी. मी स्ट्रॉबेरी-टुर्समध्ये इंटर्व्ह्यु दिला.. आय ट्राईड माय बेस्ट टु कंन्व्हींन्स देम.. खुप अवघड होतं कबिर.. आय मीन कुठली टुरीस्ट कंपनी एका तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या, ड्रग्ज अॅडीक्टचा शिक्का असलेल्या व्यक्तीला कामावर घेईल. दे वॉंन्टेड टु बिलीव्ह मी.. पण…” राधा दोन क्षण थांबली.. “काल पोलिस-स्टेशनमध्ये मला क्लिन चिट मिळाल्यावर मी त्या ट्रॅव्हल कंपनीच्या ऑफीसमध्ये फोन केला होता…”“वेट व्हॉट..? तु काल फोन केला होतास त्यांना? कधी? आणि मला नाही सांगीतलंस ते?”, कबिर तिचं बोलण तोडत म्हणाला..“ते बघ.. बघीतलंस.. तु स्वतःच बघ.. तु नकळत एक्स्पेक्ट केलंस ना माझ्याकडुन की मी तुला सगळ्ं सांगाव, माझे निर्णय तुला विचारुन घ्यावेत…” कबिर खजील झाला.. त्याने काही न बोलता मान खाली घातली.. “मला माहीते तु मुद्दाम नाही केलेस, किंवा तु अनुरागसारखा पण नक्कीच नाही.. पण हे सगळं होतंच अरे रिलेशनशिपमध्ये.. आणि तेच मला नकोय.. एनिवेज.. तर मी त्यांना सांगीतलं क्लिन-चिट बद्दल.. पोलिसांकडुन ऑफीशीअल क्लिन-चिट मिळेल दोन-चार दिवसांत ती पण त्यांना फॅक्स करेन.. अॅन्ड दॅट लेडी वॉज हॅप्पी.. शी इज रेडी टु टेक मी ऑन पेरोल.. अर्थात एकदम ‘टुर-लिड’ ची पोस्ट नाही मिळणार.. पण ‘टुर-ऑपरेटर’ची नक्कीच मिळेल.. इफ़ एव्हरीथींग गोज वेल.. देन…”, राधा काही क्षण थांबली.. “देन??”, कबिरने विचारलं..“देन मोस्टली आय विल बी फ्लाईंग टु इटली ऑन माय फ़र्स्ट टुर असाईनमेंट..”, राधाच्या चेहर्यावरुन आनंद ओसंडुन वाहात होता. कबिर काही तरी बोलणार होता, पण त्याने शब्द गिळुन टाकले… थोडा वेळ विचार करुन तो म्हणाला.. “तु जे म्हणते आहेस ना.. ते काही अंशी मला पटतंय राधा.. गुड की तु तुझ्या आयुष्याबद्दल.. आयुष्याकडुन असलेल्या अपेक्षांबद्दल फर्म आहेस.. पण मग काल…”“काल काय कबिर.? काल मी तुला आय-लव्ह-यु म्हणाले असंच ना? अरे तुच सांग त्याचा अर्थ काय होतो? माझं तुझ्यावर प्रेम आहे.. हाच ना? मग आहेच ना, मी नाही म्हणतच नाहीए.. पण ह्याचा अर्थ असा कधी होतो की `लेट्स-हॅव-सेक्स’.. `लेट्स-गेट-मॅरीड’, `लेट्स-स्टार्ट-ए-फॅमीली’, `यु-लिसन-टु-मी’ वगैरे? हा अर्थ आपण जोडतो त्याला हो ना?” “हे बघ, तु ब्लाईंडली मी म्हणतेय म्हणुन अॅक्सेप्ट कर असं मी म्हणत नाहिए, पण मला जेन्युईनली असं वाटतंय की तुला माझं मत, माझे विचार समावेत, पटावेत..” कबिरचा जे घडतंय, आपण जे ऐकतोय, त्यावर विश्वासच बसत नव्हता. खांदे पाडुन तो गाडीला टेकुन उभा राहीला “ओके.. समजा.. समजा मी तयार झाले लग्नाला.. तरी तुझे आई-बाबा तयार होतील आपल्या लग्नाला? एक डिव्होर्सी, तुरुंगात गेलेली.. ड्रग्ज्सच्या नशेत झोकांड्या खाताना अख्या नॅशनल टीव्हीवर झळकलेली.. आपला वंश कधीच पुढे न्हेऊ शकणारी मुलगी त्यांना…..” “व्हॉट?? व्हॉट?? आता हे काय अजुन नविन…”, कबिर उसळत म्हणाला..राधा स्वतःशीच हसली.. “कसली विचीत्र आहे ना मी.. ऐकावं ते नवलंच नाही.. तुला आठवतं मी म्हणलं होतं माझं आणि अनुरागचं डिव्होर्सचं कारण मी घर सोडुन जाणं नाहीये, समथींग पर्सनल आहे.. आठवतं?” “हम्म..”, कबिर म्हणाला “वेल हेच ते कारण.. त्या दिवशी मला पोलिसांनी पकडल्यावर मला मेडीकल टेस्टला न्हेलं होतं. युझवल प्रोसीजर असते ती. अॅटेंप्टेड रेपची केस होती, सो मला गायनॅककडे पण न्हेलं होतं.. जस्ट टु मेक शुअर की रेप झाला नाहीए .. युजवल प्रोसीजर… नंतर नंतर जामीनावर मी सुटले, आम्ही घरी आल्यावर, काही दिवसांनी पोलिसांनी त्यांचे मेडीकल रिपोर्ट्स कुरीअर केले.. अर्थात अनुरागनेच ते मागीतले होते.. जस्ट टु मेक शुअर…” तर.. बिसाईड्स रेप झाला नाहीए बरोबर त्या टेस्टमध्येच असाही रिपोर्ट आला की मी कधीच कन्सीव्ह नाही करु शकणार.. जेनेटीक डिसॉर्डर आहे.. पहील्यापासुनच.. अर्थात आम्हाला कुणालाच हे माहीत नव्हते. पण अनुरागला मुल होऊ शकणार नाही हे कळल्यावर त्याचा माझ्यातला उरला-सुरला इंटरेस्टही संपला. ती पोलिस-केस वगैरे एक कारण आहे डिव्होर्सचं. खरं कारण हे आहे कबिर…” बोलता बोलता राधाच्या डोळ्यात अश्रु उभे राहीले… “ओह.. आय एम सो सॉरी…”, कबिर..“आठवतं.. आपली सगळ्यांत पहीली भेट.. त्या मेडीकल शॉपमध्ये.. त्या वेळी आम्ही गेले सहा महीने बेबी साठी ट्राय करत होतो.. नंतर मी पळुन गेले आणि इथे आल्यावर त्या आठवड्यात यु नो.. आय मिस्ड माय पिरीएड्स.. अर्थात थोडं लेट झाले.. त्यात मला उलट्या होत होत्या.. मी सॉल्लीड घाबरले.. मला वाटलं की मी घर सोडुन यायला आणि मी कन्सीव्ह व्हायला एकचं वेळ आली का.. बट लकीली तसं काही नव्हतं.. जस्ट फुड-पॉईझनींग होतं.. एनीवेज.. डोन्ट बी सॉरी.. तर तु सांग तुझे आई-बाबांना चालेल अशी मुलगी सुन म्हणुन.. त्यांच जाऊ देत.. तु किती दिवस जुळवुन घेशील माझ्याशी. माझं सौदर्य अजुन १५-२० वर्ष.. पुढं काय? माझ्या शरीराचा अणु आणि रेणू स्वातंत्र्यासाठी झगडत राहील.. तुला जशी आदर्श पत्नी हवी तशी मी कधीच होऊ शकणार नाही कबिर..” “मी..समजावीन आई-बाबांना.. आपण दत्तक घेऊ मुलं..”, कबिर शेवटचं अस्त्र काढत म्हणाला “पण का कबिर? का तु अॅडजस्टमेंट करावीस…? यु नो व्हॉट.. यु आर सो स्विट.. यु डिझर्व्ह ए मॅरेज-मटेरीअल गर्ल. बाहेर अश्या हजारो मुली आहेत हु बिलीव्ह इन ट्रु लव्ह.. अॅन्ड लुकींग फ़ॉर बॉईज लाईक यु.. कश्याला माझ्यासाठी तु कॉम्प्रमाईज करतोस..? हे बघ उगाच भावनेच्या भरात निर्णय नको घेऊस.. निट विचार कर… मोनिका खरंच चांगली मुलगी आहे, एकदा तिच्या हातुन चुक घडली असेल.. त्याची जन्मभरासाठी तिला शिक्षा देऊ नकोस..” कबिर काहीच बोलला नाही. “एनिवेज.. आपण सोफी ऑन्टीकडे नको जाऊया.. लेट्स गो होम कबिर…”, राधा..“पण का? जाऊ या की.. मे बी तुझा मुड ठिक होईल..”, कबिर“नको कबिर.. खरंच.. लेट्स गो होम.. मला बाकीची पण बरीच काम आहेत.. उद्या त्या स्ट्रॉबेरी टुर्सला भेटुन नोकरी तरी पदरात पाडुन घेते..”, कबिरच्या संमतीची वाट न बघता राधा गाडीत जाऊन बसली.. कबिरने एकवार आकाशाकडे बघीतले आणि मग गाडीत बसुन त्याने गाडी माघारी वळवली… [क्रमशः] *** ‹ Previous Chapter इश्क – (भाग १५) › Next Chapter इश्क – (भाग १७) Download Our App Rate & Review Send Review shaila 7 months ago Vidhya 8 months ago Mate Patil 8 months ago Kanchan Deepak Choudhary 9 months ago Shraddha 9 months ago More Interesting Options Short Stories Spiritual Stories Novel Episodes Motivational Stories Classic Stories Children Stories Humour stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Social Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Aniket Samudra Follow Shared You May Also Like इश्क – (भाग १) by Aniket Samudra इश्क – (भाग २) by Aniket Samudra इश्क – (भाग ३) by Aniket Samudra इश्क – (भाग ४) by Aniket Samudra इश्क – (भाग ५) by Aniket Samudra इश्क – (भाग ६) by Aniket Samudra इश्क – (भाग ७) by Aniket Samudra इश्क – (भाग ८) by Aniket Samudra इश्क – (भाग ९) by Aniket Samudra इश्क – (भाग १०) by Aniket Samudra