Pahil prem books and stories free download online pdf in Marathi

पहिल प्रेम

शाळेचा पहिला दिवस आणि जोरात पाऊस पडत होता. मी पुस्तक भिजू नये म्हणून,वर्गात जात होतो तेवढ्यात मागून मला कोणीतरी हाक मारली.मी मागे वळून पाहिलो तर माझा मित्र विनोद होता. आम्ही एकाच वर्गात शिकत होतो मी म्हणालो काय रे उशीर कस काय झाला तो म्हणाला असच बर जाऊ दे असं म्हणत आम्ही वर्गात गेलो . पाऊस काहि कमी होत नव्हता. दुपारीची सुट्टी झाली आणि मी जेवणासाठी घरी जायला निघालो .वर्गाच्या बाहेर आलो आणि माझी नज़र ऐका मुलीवर पडली दिसायला काळी सावली तेवढी काहि सुंदर नव्हती पण कोण जाणे माझी नजर तिच्यावरून सरकत नव्हती .मग् मी भानावर आल्यावर बघितलं तर ती मुलगी कुठ गेली कळालंच नाहि मग मी घरी गेलो हातपाय धिऊन जेवायला बसलो पण त्या मुलीचा चेहरा सतत डोळ्या समोर येत होता.मग मी जेवण करून घराबाहेर पडलो विचार करत कोण असेल ती मी तिला पहिले कधी शाळेत बघितलं नाही दुसऱ्या गावातील असेल, असे अनेक विचार मनात करत शाळेत गेलो माझं मन काहि शाळेत लागत नव्हत  मी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण ती मला 8 दिवस दिसली नाही आणि अचानकच मला दुसऱ्या दिवशी मला ती दिसली मला तिच्या बद्दल सर्व माहिती काढायची होती पण कशी मला तर तीचं नाव पण माहित नव्हतं. मग मी रोज तिला प्रार्थना च्या वेळी तिच्या शेजारी उभे राहायचो आणि तिला बघायचा तेवढाच वेळ असायचा मग मला कळलं कि ती 8 वि मध्ये शिकते. मग मला तीच नाव माहित करून घ्यायचं होत, पण कसं मग आठवलं कि त्याच वर्गात माझी चुलत बहिण शिकायला होती.तसं तर आम्हा दोघच नेहमी भांडण व्हायचं पण आता तिच्या बद्दल माहिती काढायची म्हणल्यावर काहि तरी करावे लागेल. 4 ची शाळा संपली आणि मी माझ्या चुलत बहिणीची वाट बघत थांबलो.ती आली मी उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होतो .माझ्यावर शंका आली ती म्हणाली काय रे बरा आहेस ना , आज माझ्याकडे काय काम काढलास मी म्हणालो का काय झालं तर ती म्हणाली मला बोलायला तुला घरी वेळ नसतो आज अचानक काय झालं म्हणून विचारल. बर सरळ मुद्यावर येतो तुझ्या वर्गात ती नवीन मुलगी कोण आहे ती म्हणाली नवीन म्हणजे नेमकी कोणती माझ्या वर्गात 4 नवीन मुली आल्यात त्यापैकी कोणती मला आता समजत नव्हतं की कोणती मग मी म्हणालो ती छोट्या केसाची काळी सावली हा ती काय ती तर अस्मिता आजच आली ती बर तुला काय करायचं तिच्याहून एवढ विचारपूस करायला काही नाही ग सहजच विचारलं आस म्हणून मी तिथून सरळ शेतात जाऊन बसलो शेत शाळपासून जवळ च होत. मी एवढा आनंदात होतो कारण मला तिच नाव कळलं होत. मग रात्री मी तिचाच विचार करत झोपी गेलो. असं वाटत होत सकाळ कधी होती कि, सकाळी लवकर च उठून दात घासून अंघोळ केली आज पाऊस पडत नाही असा अंदाज काढत डोकं विचारलं माझं mi मी आरश्यात पाहून हसत होतो मागून आई आली आणि म्हणाली काय झालं दात काढायला मी म्हणालो काही नाहि . असं म्हणत वही पुस्तक घेत आईला चालो म्हणून घरा बाहेर पडलो आणि समोर बघतो तर ती माझ्यासमोर चालतं होती . मला एवढा आनंद झाला आस वाटत होत मी कोणत्या परीक्षा मधेच पास झालो. मला वाटलं तिला मागून आवाज द्यावा पण वाटलं नाही नको, उगाच रागावायची माझ्यावर मग मला राहावलं नाही आणि मी आवाज  to bee continue