Pralay - 14 books and stories free download online pdf in Marathi

प्रलय - १४

प्रलय-१४


    " मी कोण आहे......?
मोहिनी विचारत होती . 
"  तू प्रलयकारिका आहेस.....?
आरुषी तिला सांगत म्हणाली..
"  पण मला इतक्या दिवस हे सारं आठवत नव्हतं ......आणि अचानक आठवायला का सुरुवात झाली.....? 
" तुला संधी दिलेली होती , आतापर्यंत तुला तुझं जीवन जगण्यासाठी दिलं होतं । तू आतापर्यंत यासारखी बरीच आयुष्य जगली आहे . ती आयुष्य तुझ्या खऱ्या जीवनाचा भाग नाहीत . तुझे खरे जीवन आहे मारुत राज्याची सेवा .  मारूतांची सेवा .....त्यासाठीच तुला इथं बोलावले आहे .  आता तू आमच्या बरोबर येशील . माझ्या आदेशाचे पालन करणे तुला बंधनकारक असेल आणि तू ते न सांगता करशीलच   .तुझ्या रक्तातच आहे ते . 
" पण माझे वडील त्या गावातील धर्मशाळेत एकटे आहेत.... आणि आयुष्यमान माझा शोध घेत असेल .....मला त्यांना सांगितलं पाहिजे...." 
" पुरे ....आज जाऊन विश्रांती कर . उद्या पर्यंत तू हे सर्व विसरून जाशील .  तुला मागच्या आयुष्यातील काही आठवणार  नाही आणि तुझ्या पुढे फक्त एकच उद्देश असेल तर तो म्हणजे मारुत राज्याची सेवा . उद्या सूर्योदयाला आपण जंगली सेनेवरती आक्रमण करायला निघणार आहोत ......
" जंगली सेने बाबत एक खास गोष्ट सांगते . जंगली सेनेची सर्व बिषाद त्यांच्या प्राण्यांवर अवलंबून आहे . त्यांच्याकडे बरेच प्राणी आहेत .  त्याच प्राण्याचा उपयोग करून जंगली सेना आतापर्यंत प्रत्येक युद्ध जिंकता आलेली आहे .  त्याच प्राण्यांना तुला आता आपल्या बाजूने करून घ्यायचा आहे .  हे तुला काही नवीन नाही .  माहिती असावे म्हणून सांगितलं . त्यांचे प्राणी जरा फारच वेगळे आहेत ,  हे मात्र लक्षात ठेव . बाकी काही नाही...... जाऊन विश्रांती घे.... बाकीच्या गोष्टी आपण परत बोलू ......

   मोहिनीच्या मनामध्ये द्वंद्व चालू होतं . एक मन आरूषींने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करण्यासाठी धडपडत होतं , तर दुसर्‍या मन त्या आदेशांविरुद्ध जाऊन , आयुष्यमानला , तिच्या वडिलांना भेटायला जाण्यासाठी सांगत होतं .  तेच मन तिला सांगत होतं ,  हे सर्व खोटे आहे . खर आयुष्य आधी जे होतं तेच आहे.... तिला कळत नव्हतं खरं काय खोटं काय.......? 
 
   तिनं एक निर्णय घेतला . तिने ठरवलं आत्ताच्या आत्ता या ठिकाणाहून बाहेर पडायचं , आणि आयुष्यमान भेटायचं .....ती एका उंच डोंगरातील गुहेमध्ये होती .  ज्या ठिकाणी उतरली होती , त्या ठिकाणी ती पोहोचली , तिथे गरुड नव्हता .  तिने आजूबाजूला पाहिले . तिथे कोणताच प्राणी किंवा पक्षी नव्हता .  तिने अंतःप्रेरणेने कोणता प्राणी दिसतो का हेही पाहण्याचा प्रयत्न केला.... पण तिच्या पदरी घोर निराशा पडली . तिला बाहेर जाण्यासाठी दुसरा मार्ग माहीत नव्हता . ज्या मार्गाने जाता येत होतं ,  त्या मार्गाने जाता येणे शक्य नव्हते..... शेवटी नाइलाजाने ती आत गेली . ज्या ठिकाणी तिला विश्रांतीसाठी कक्ष देण्यात आला होता , त्या ठिकाणी गेली आणि निपचित पडून राहिली........

    मंदार त्या तंत्रज्ञानाचे नाव मंदार होतं . पिढ्यानपिढ्या चालत आलेलं ज्ञान त्याच्यापाशी होतं ,  त्याने स्वतः अभ्यास करून व प्रयत्न करून कमावलेले ज्ञानही त्याच्या जोडीला होतं .  त्याला या विश्वातल्या अशा बऱ्याच गोष्टी माहीत होत्या , ज्या कोणीही कधीच ऐकला नव्हत्या किंवा पाहिल्या नव्हत्या. भिंती बाबतच्या बऱ्याच गोष्टी बरेच जण सांगत असायचे . ती भिंत कधी बांधली गेली ....? का बांधली गेली....?  आणि कशी बांधली .....?  भिंत बांधण्यासाठी कोणत्या प्रकारचे साहित्य वापरले गेले ....?  
    प्रत्येक जण आपापल्या परीने भिंतीची गोष्ट सांगायचा .  पण ज्यावेळी भिंत बांधली गेली त्यावेळचा एक मंदार सोडला तर आज कोणीही जिवंत नव्हतं .  त्याला माहित होतं की भिंत का बांधली गेली होती... कशासाठी बांधली गेली होती .....कुणी बांधली होती .....कधी बांधली होती आणि भिंत पडल्यानंतर काय होईल.........? 

   मंदार उत्तरेच्या सैनिक तळाकडे निघाला होता . ते सैनिक तळ चालत जाण्यासाठी फार दूर होते . त्यामुळे त्याला घोडा शोधणे भाग होते . त्याने त्याच्या पिशवीतून एक बासरी सारखी दिसणारी गोष्ट बाहेर काढली .  त्याने बासरी जोरात शिट्टी सारखी वाजवली . त्यानंतर त्याच्या आजूबाजूला बरेच प्राणी गोळा होऊ लागले . लहानातल्या लहान मुंगीपासून मोठ्या  प्राण्यापर्यंत सर्व प्राणी आले जे बासरीचा आवाज ऐकू शकत होते  . त्याच बरोबर त्या ठिकाणी तो अश्वराज पवनही आला होता . 
   त्या अश्वराज पवनच्या जवळ जात , मंदारने पुन्हा एकदा शिट्टी वाजवली . बाकी सर्व प्राणी आल्या वाटेने निघून गेले . पण आज मात्र तिथेच होता....

    " मला वाटलं तुझा बळी दिला असेल कोणीतरी.....?  त्यामुळेच तू दिसला नव्हतास इतकी वर्षे.....
   " बळी जाताजाताच वाचलो ,  हाताच्या मुठीत जीव धरून पळत होतो  , तेव्हाच तुझी शिट्टी ऐकली वाटलं कोणीतरी सापडला  आपला मित्र .....
  " कोणापासून पळत होतास एवढं जीवाच्या आकांताने.....
" मंदार तुला कळालंच असेल ....प्रलयकारिकेचा चा जन्म झालेला आहे.....? अरे ती माझी जुनी मैत्रीण होती रे...... मोहिनी नावाची .....प्राण्यांच्या मनात पाहू शकणारी ,  त्यांच्याशी बोलू शकणारी , त्यांना आपल्या मनाप्रमाणे वागूवू शकणारी..... तीच प्रलयकारिका असेल असं मला वाटलं नव्हतं...।
 " अरे बऱ्याच गोष्टी असतात अशा..... मलाही वाटलं नव्हतं की मी जिवंत असेपर्यंत कधी प्रलय येईल ....पण येत आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा एकत्र व्हावे लागणार आहे.........
" तुला म्हणायचे आहे का कि भिंतीपलीकडे सम्राट जागृत झाला आहे....
" अरे भिंतीपलीकडे सम्राटाला कसेही करून आपण पराभूत करू शकतो , पण प्रलयाचं काय करणार आहे......?  सुरू होणारी जी शृंखला आहे , ती जर तोडली नाही तर आपलं वाचणं सर्वथैव अशक्य होऊन बसेल......
" त्यासाठीच मी उत्तरे कडे चाललोय , उत्तरेकडे असलेल्या सैनिक तळावरती आणि तू मला मदत करणार आहेस .....।
      मंदार अश्वराजावरती स्वार झाला व उत्तरेकडे निघाला......

      इकडे मंदारचा मुलगा शौनक , आयुष्यमान व भरतला शोधण्यासाठी फिरत होता . त्याच्या वडिलांनी रूपांतरणकापडा वरती त्याचे चित्र दिलं होतं .  तो जंगलात चालून चालून थकला होता .  त्याने त्याच्या वडिलांकडून एक शिट्टी चोरली होती .  ती शिट्टी त्याने काढली व वाजवली . एक एक करत सगळ्या प्रकारचे प्राणी त्या ठिकाणी जमा झाले . काही क्षण थांबल्यानंतर दोन घोडेही त्या ठिकाणी आले.....

      त्या घोड्यावरती बरेच सामान लादलेले होते .  याचा अर्थ हे घोडे कोणातरी यात्रेकरूचे होते . उत्तरेच्या जंगलात सहसा यात्रेकरू नसतात आणि असलेच तर ती माणसे साधी नसतात . त्याला कळून चुकले की  ते दोन घोडे आयुष्यमान व भरतचेच होते . त्यामुळे तो पटकन एका घोड्या जवळ गेला व त्यावर ती बसला . त्याने पुन्हा शिट्टी वाजवली . आलेले सर्व प्राणी आल्या मार्गाने निघून गेले . दुसरा घोडा हे ही आलेल्या मार्गाने निघाला .  शौनक ही त्या घोड्या मागोमाग आपला घोडा दामटवत निघाला . काही अंतर गेल्यानंतर त्याला आयुष्यमान दिसला........

   जंगली सैना संसाधन राज्याच्या उत्तरेस असलेल्या जंगलात वास्तव्याला होती .  त्यांचा निश्चित ठावठिकाणा कोणालाच माहीत नव्हता . आतापर्यंत कोणीही त्या जंगलात गेलेला जिवंत बाहेर आलेला नव्हता . त्यामुळे त्यांचा ठावठिकाणा माहीत असलेला माणूस या पृथ्वीतलावरती नाही असं म्हटलं जायचं . जंगली सेनेचा संख्या फार मोठी नव्हती आणि कमीही नव्हती . चार ते पाच हजारांच्या आसपास त्यांची सैना होती .  जंगलामध्ये ते टोळ्याटोळ्यांनी राहायचे , आणि ज्यावेळी एखादं शहर किंवा गाव लुटायचं असेल त्यावेळी ते मिळून हल्ला करायचे . त्यांना जे काही हवं असायचं ते सर्व काही लुटून पुन्हा जंगलात जायचे . त्यामुळे जंगली सेनेच्याबद्दल भीती सर्वांच्या मनात होती . जंगली सेनेचे नाव ऐकल्यावर ती मोठ-मोठे राजेही घाबरायचे .  त्यांच्याकडे असलेले प्राणी आणि  योद्धे संपूर्ण जगातील महान योद्ध्यांना सहज राहू शकतील इतके शक्तिमान होते...

      जंगली सैना प्रसिद्ध होती की त्यांच्या गतीसाठी  ,  त्यांच्या व्युक्तीसाठी , त्यांच्या शक्तीसाठी आणि मुख्यत्वेकरून त्यांच्याकडे असलेल्या प्राण्यांसाठी.... ज्या कोणी जंगली सेनेच्या प्राण्यांना पाहिले तो माणूस एकतर जिवंत राहत नसे आणि जर एखादा जिवंत राहिला तर लोक त्याला वेड्यात काढत .  त्यांच्या प्राण्याबद्दल ज्या काही गोष्टी सांगितल्या जात होत्या त्या सर्व ऐकिव होत्या . कुणी म्हणायचं त्यांच्याकडे फार मोठे हत्ती सारखे प्राणी आहेत जे हरणाच्या गतीने धावू शकतात , कुणी म्हणायचं त्यांच्याकडे लहान मुंग्यासारखे प्राणी आहेत ज्यांच्याकडे हत्ती एवढी शक्ती आहे . कोणीही काही म्हणायचं पण कोणालाच त्यांच्याकडे खरंच काय आहे हे माहीत नव्हतं . 

       आरुषी व मोहिनी आता त्यांच्यच शोधात निघाले होते ....