Dhukyataln chandan - 2 books and stories free download online pdf in Marathi

धुक्यातलं चांदणं .....भाग २

" OK. विसरलोच मी.… हा… हो, आठवलं मला. मीचं टाकलं होतं profile मध्ये. " विवेकलाही chatting मध्ये मजा वाटत होती आता. तेवढयात सरांचा call आला, सुवर्णा आणि त्याला एकत्र केबीन मध्ये बोलावलं होतं. त्याने लगेच पूजाला message टाकला, " हे पूजा, मला जरा बॉसने बोलावलं आहे. जरा जाऊन येतो मी… Bye." , " OK , खूप दिवसांपासून तुझ्या बरोबर बोलायची इच्छा होती, छान वाटलं बोलून." , " same here " ," Bye" ,"Bye" . विवेकने chatting बंद केली आणि बॉसच्या केबीनमध्ये गेला. दुसरा दिवस, विवेकचं काम चालू होतं, पुन्हा पूजाचा MSG आला," Good Morning", विवेकला आठवण झाली… हि तर कालचीच. त्यानेही reply केला, " शुभ प्रभात ! " ," हो . विसरले मी, शुभ प्रभात ! कसा आहेस ? " , " एकदम छान… तू कशी आहेस ? " ," मी पण छान … " आणि त्यांची chatting सुरु झाली. दिवस भर ते chatting करत होते. विवेक प्रथमच कोणा अनोळखी मुलीशी chatting करत होता, तीही छान बोलत होती. संध्याकाळी तो ऑफिसमधून निघाला तेव्हा chatting थांबली त्यांची. मस्त वाटत होतं विवेकला.


Next day, विवेकला तसं काही काम नव्हतं. तो असंच time pass करत बसला होता. पूजा online दिसली त्याला. त्यानेच MSG केला तिला आणि त्यांचं बोलणं means chanting सुरु झाली पुन्हा. छान पैकी एकदम. तिचं बोलणं विवेकला खूप आवडत होतं. तीही अगदी त्याच्यासारखीच बोलायची. छान गट्टी जमली होती. सुवर्णाला हे माहित नव्हतं. हल्ली, रोजच विवेक , पुजाबरोबर गप्पा मारायचा. कामाबरोबरच दोघंही chatting करत असायचे. पूजा बँक मध्ये जॉबला होती. सकाळी ऑफिसमध्ये आल्यावर " Good Morning " ने बोलणं सुरु व्हायचे आणि संद्याकाळी " Good Bye " ने निरोप व्हायचा. हळूहळू सुवर्णाला विवेक मधला बदल कळायला लागला होता.


याला काय झालंय ? …. आजकाल फोन घेत नाही कोणाचे , सकाळी आल्या पासून त्या PC लाच चिकटून असतो. एकेदिवशी, न राहवून सुवर्णा गुपचूप विवेकच्या मागे जाऊन उभी राहिली. बघते तर chatting चालू होती. हे सुवर्णासाठी नवीन होतं.


" तू chatting कधीपासून करायला लागलास रे… " , ते ऐकून विवेक दचकला . लगेच त्याने chatting चा box बंद केला.
" बंद कशाला करतोस…. दाखव तरी कोणाबरोबर बोलतोस ते. " ,
" राहू दे गं ", विवेक बोलला.
" OK .... , आता मला समजली कारणं सगळी. ऑफिसमध्ये आल्या आल्या PC च्या मागे लागणं, माझ्याकडे कमी आणि PC वर जास्त लक्ष असणं, lunch भरभर करणं आणि Fan's चे फोन कमी अटेंड करणं." ,
" ह्या… तसं काही नाही आहे." .
" तसच आहे, आणि हो… काल किती धावत होतास … त्या IT department कडे. इंटरनेट बंद होतं म्हणून. पहिलं कधी तुला गरज सुद्धा नसायची इंटरनेटची. काल तर कावराबावरा झाला होतास. साहेबांना chatting करायची असते ना. " ,
" सांगतोस का आता …. कोणाबरोबर बोलत होतास ते… " विवेक गप्प.
" सांग लवकर ,नाहीतर सरांना सांगेन.".
" थांब थांब सांगतो. " सुवर्णा बसली खुर्चीवर ऐकायला. विवेक तरी तसाच बसून.
" आता काय भटजीला बोलावून मुहूर्त काढणार आहेस का ? ",
" थांब गं, किती घाई " ,
" ठीक आहे नको सांगूस ", सुवर्णाने तोंड वाकडं केलं. आणि ती काम करायला लागली.


" ये पागल… ऐक सांगतो. " ,
" सांग … " ,
" पूजा …",
" पूजा काय ? " ,
"पूजा नावं आहे तिचं… "
," पुढे… ",
" माझ्या ब्लॉगची fan आहे ती. सगळ्या स्टोरी, कविता तिने खूप वेळा वाचल्या आहेत. म्हणून तिच्या सोबत chatting करतो मी ",
" आधी कधी मी तुला कोणासोबत chatting करताना पाहिलं नाही, ती काय एवढी special आहे का ? " ,
"special नाही गं . पण तिच्या सोबत बोलताना छान वाटते एकदम. मनातलं बोलते ती, असं म्हणालीस तरी चालेल. शिवाय माझ्या आणि तिच्या आवडी-निवडी same आहेत जवळपास. फिरायला आवडते, फोटोग्राफी आवडते, Soft music, वाचन…. सगळ्या काही माझ्याच सवयी, छंद आहेत. " ,
" म्हणजे खूप मोठी fan आहे तर…. आणि हि chatting कधीपासून चालू आहे ? ",
" झाला असेल एक महिना ." ,
" १ महिना !! चांगलीच friendship झाली आहे दोघांची. " ,
" असंच गं, चालता हैं " ,
" तरी मी बघायचे तुला. मीही विचार करायचे , एकटाच हसतो आहे काम करताना, कशाला हसायचास रे ? " ,
"अगं , ती एवढं छान बोलते ना, मज्जा वाटते. मग येते हसायला कधी कधी. " ,
" आणि त्या दिवशी उभा राहून टाळ्या कशाला वाजवत होतास ? " ,
" पूजा सांगत होती, ती गरीब मुलांना मदत करते, म्हणून तिला ' 'standing ovation ' दिलं मी. " ,
" बरा आहेस ना तू " ,
" असचं गं, मज्जा " ,
" ठीक आहे , कर chatting तू, पण सांभाळून, जास्त गुंतून जाऊ नकोस.",
" नाही गं. माझा माझ्या मनावर पूर्ण कंट्रोल आहे." ,
" ते दिसतेच आहे , एकंदरीत. " तसा विवेक हसला थोडासा.
" माझं नावं ठेवलं आहे तिने " गोलू " म्हणून." ,
" का ? ",

" मला बघून … ",
" तिला कसं माहित तू कसा दिसतोस ते. " ,
" माझ्या profile वर माझा फोटो आहे ना, परत अजून एक फोटो send केला तिला मी.",
" म्हणजे…. फोटो वगैरे सुद्धा share झाले तर. " ,
" हो…. तीही छान आहे दिसायला आणि मी पण तिचं नावं ठेवलं आहे.… " पूजू "… म्हणून." ,
" चांगलं चाललं आहे तुमचं , दोघांचं. मला तरी कधी प्रेमाने हाक मारलीस का कधी.",
" बोलतो तर तुला राग येतो." ,
" काय ? " ," पागल " विवेकला हसायला आलं.
" गप रे… " ," Sorry …. Sorry , पण छान आहे ती. दिसायला तर आहेच, त्याहीपेक्षा मनाने जास्त सुंदर आहे." " OK , ठीक आहे. पण पुन्हा सवय झाली तर बघ. सांभाळ… " म्हणत सुवर्णा कामाला लागली.


विवेक chatting मध्ये पुन्हा गुंतून गेला. सुवर्णासुद्धा कामात होती, डोक्यात मात्र विवेकचे विचार. याला कळत कसं नाही माझ्या मनात काय आहे ते, कि तो मुद्दाम असं वागतो. कळत नाही त्याच्या मनात नक्की काय आहे ते.

अजून काही दिवस गेले. जून महिना सुरु झाला. सगळीकडे पावसाळी वातावरण तयार होत होते. मुंबईत अजून पाऊस सुरु झाला नव्हता. विवेक आणि सुवर्णाच्या friendship मध्ये थोडी कमी निर्माण झाली होती, असं सुवर्णाला जाणवू लागलं होतं.एक दिवस, सुवर्णा तशीच कामात बिझी होती.
विवेक आला," ये पागल… " ,
" काय रे ? " ,
" अगं पूजू…. I mean… पूजा , इकडेच आहे जॉबला. " ,
" इकडे ? म्हणजे कूठे नेमकं ? " ,
" ती बँक आहे ना पुढे. तिथे ती accountant आहे. मस्त ना. " ,
" हम्म… " , सुवर्णा परत कामाला लागली.
" अरे… मी काहीतरी सांगतो आहे तुला. " ,
"सांगितलस ते ऐकलं मी. " ,
" पुढची गोष्ट main आहे. ती सुद्धा आपल्याच रस्त्याने, म्हणजे ट्रेनने जाते. In fact , ती सुद्धा C.S.T ला राहते… तू राहतेस तिथेच.",
"means what ? ",
"means आज तुला वेळ आहे का जरा ? " ,
" आता हे कूठे आलं मधेच ? ",
" अगं , तिने भेटायला बोलावलं आहे." ,
"तिने ? " ,
"तसं … म्हणजे… मीच बोललो तिला. भेटूया म्हणून . ती तयार झाली आहे. ",
" OK , मग मी कशाला ? मी बोलले कधी जाऊया का फिरायला तर तुला वेळ नसतो. आज ती बोलली तर लगेच …. तुला बोलावलं आहे ना , मग तूच जा… मी नाही येत आहे." ,
" काय गं सुवर्णा…. चल ना, please, माझ्यासाठी." , सुवर्णा विचार करू लागली.
" सरांची परवानगी नाही मिळणार. " ,
" त्यांना मी मघाशीच सांगितलं. तू चल पटकन. " म्हणत विवेक तिला ओढतच बाहेर घेऊन गेला.

============ क्रमश: ===========