Naa kavle kadhi - 1-32 books and stories free download online pdf in Marathi

ना कळले कधी Season 1 - Part 32

      सिद्धांत सकाळी आर्याला घ्यायला आला. आर्या छान तयार होऊन आली. सिद्धांत मनातच म्हणाला अशी इतकी छान तयार होऊन येत जाऊ नको ग, गाडी चालवताना लक्ष नसत माझं मग! ती आली त्याचा बाजूच्या सीट वर बसली चला निघायचं, आर्या म्हणाली. बाय द वे जायचं कुठे आहे. म्हणजे तिच्या घरी or बाहेर कुठे आर्याने त्याला विचारलं. अग हो आर्या थोडा धीर धर तिकडेच निघालो आहे आपण कळेलच  थोड्या वेळात. बर नका सांगू मला असही काय करायचं आहे, बर कोण आहे ती मुलगी काय करते? कुठे शोधली? नाव काय आहे? फोटो असेल ना एखादा बघू मला आर्या म्हणाली. मला तर वाटत न आर्या माझ्या पेक्षा जास्त घाई तुलाच झाली आहे, तिला भेटायची. थांब थोड्यावेळ फोटोमध्ये काय बघते थोड्यावेळात साक्षात भेटेल तुला. पण खूप सुंदर आहे ह ती she is just beautiful  तो आर्या कडे पाहून म्हणाला.  मी facebook पण प्रोफाइल वगैरे चेक केली मस्त आहे आवडली मला तर आता बघू काय होत. आर्याला हे ऐकून अजूनच राग येत होता पण ती नॉर्मल असल्याचं दाखवत होती पण तिचा चेहरा स्पष्ट बोलत होता की तिला कीती राग येतोय. बापरे हा तर एकदम हो म्हणण्याच्या तयारीत आहे.इतकी काय आवडली काय माहिती पण तिला तर आवडला पाहिजे  ना, पण ह्याला बघून कुठली मुलगी नाही म्हणणार. अरे पण तिला काय माहिती ह्याचा स्वभाव हा ह्याला नाही तर कोणी म्हणणार नाही पण ह्याच्या सोबत पटणार पण नाही कुणाचं. तिचा मनातच विचार चालू होता. सिद्धांत सर पण तुम्हाला बरच बदलावं लागेल स्वतःला म्हणजे रागावर नियंत्रण ठेवावं लागेल, कारण ती का सहन करेल ना हे सगळं. आर्या म्हणाली. सिद्धांत ला तिची insecurity पाहून मजा येत होती. हे बघ आर्या कस असत न आपल्याला एखादं माणूस आवडलं तर मग त्याच्या आनंदासाठी थोडस बदललेलं काय हरकत आहे. मी करेल हा माझ्यात बदल आणि ते ही आनंदाने. तो म्हणाला. बापरे हा खरच serious आहे! ती मनातच म्हणाली. पण सर तुम्हाला अस नाही वाटत का की जर आपलं खर प्रेम असेल तर आपण समोरचा जसा असेल तसा स्वीकारायला हवा, त्याच्या गुणदोषांसकट.कारण आपलं म्हंटल की संपलं अस मला वाटत,आर्या म्हणाली. हो तुझं बरोबर आहे पण आपणही बदलायला हव, सिद्धांत म्हणाला. ही तडजोड झाली समोरच्याला आवडाव म्हणून बदलणं हे खरं प्रेम नाही, आर्या म्हणाली. सिद्धांत ने गाडी थांबवली, काय झालं आर्या म्हणाली अग पोहचलो आपण बघ एकदा बाहेर. wow खूपच सुंदर जागा आहे  नक्की इथेच येणार आहे ती? मला वाटलं आपण एखाद्या कॅफे मध्ये वगैरे भेटणार, तुम्ही अश्या जागी भेटणार असेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आर्या म्हणाली. सिद्धांत ने आर्या ला जिथे आणलं होत ती एक खूप सुंदर जागा होती तिथे बाजूलाच छोटी टेकडी, त्यावर महादेवाचं हेमाडपंथी मंदिर खाली छोटीशी बाग आणि एकदम शांत वातावरण आजूबाजूला कुणीही नव्हतं. एकदम निसर्गरम्य ठिकाण होत ते.आर्याला निसर्ग सगळ्यात जास्त प्रिय आहे हे त्याला माहिती होत त्यामुळे तो तिला ह्या ठिकाणी घेऊन आला.
          सर काय सुंदर जागा आहे ही. कुठे आहे पण ती, फोन करून बघा न एकदा,आर्या म्हणाली. आर्या इथे कुणीही येणार नाही सिद्धांत म्हणाला. म्हणजे तीच काही cancel झालं का ? आर्या ने विचारलं. नाही अशी कुठलीच मुलगी मुळात येणारच नव्हती! काय!!!! dont tell me की इतक्या वेळ  तुम्ही माझी चेष्टा करत होतात, my god माझ्या कस लक्षात आलं नाही,सर तुम्ही पण ना ......आर्या म्हणाली. हो बर झालं पण मी सांगितलं नाही की आपण दोघेच आहोत नाही तर प्रेमावरच इतकं तत्वज्ञान नसत ना ऐकायला मिळालं! बरोबर ना? सिद्धांत तिच्या कडे रोखून बघत म्हणाला. काय सर प्रत्येक वेळेस चेष्टा ह्या वेळेस तर माझा जीव जाण्याची वेळ आली होती, आर्या म्हणाली.का? सिद्धांत ने विचारलं. तिच्या कडे आता उत्तर नव्हते ती त्याच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हती. तिने बाजूला पाहिले नाही काही नाही. ती म्हणाली. हेच माझ्या कडे बघून सांग ना आर्या,  तो तिला म्हणाला. सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं जरुरीचच आहे का? तिने विचारलं. नाही मला अजिबात उत्तराची अपेक्षा नाही आहे. फक्त स्वतः पासून लपवू नको म्हणजे झालं. तो म्हणाला. बर आपण इथे का आलो काही कळेल का मला? आर्या म्हणाली. हो सांगतो न!हे बघ गेले कित्येक दिवस आपण बरेच तणावामधे होतो. आणि तुला ही बरच suffer करावं लागलं. directly असो वा indirectly  कारण कुठे ना कुठे तरी मीच होतो अस मला वाटत. आणि तुला निसर्ग खूप आवडतो आणि थोडसा तणाव हलका करण्यासाठी ह्या पेक्षा दुसरी चांगली जागा माझ्यातरी पाहण्यात नव्हती. म्हणून आपण इथे आहोत. सिद्धांत च्या डोक्यात अस काही असेल अशी आर्या ने कल्पनाही केली नव्हती.
         आता तो विषय बदलायचा म्हणून आर्या म्हणाली, वर मंदिर आहे न आपण जाऊन यायचं का? तू जाऊन ये आर्या माझा काही देवावर विश्वास नाही, मी थांबेल इथे.सिद्धांत तिला म्हणाला. का सर तोच आहे आपलं सर्वकाही आपलं चांगलं वाईट घडवणारा तोच असतो आणि तुम्ही त्याच अस्तित्वच मान्य करायला तयार नाही. तुला एक सांगू का आर्या, मी लहान असताना इथे माझी आई घेऊन यायची म्हणजे तेव्हा परिस्थिती वेगळी खूप खराब होती म्हणजे माझे वडील खूप त्रास देत होते आम्हाला, म्हणजे सगळीकडुनच खूप त्रास होता तेव्हा ती इथे येऊन म्हणजे ह्याच मंदिरात खूप वेळ घालवायची देवा कडे खूप प्रार्थना करायची पण काहीही झालं नाही मला थोडं कळायला लागलं मलाही वाटलं की आता हाच आहे जो आपली ही परिस्थिती बदलू शकतो मग मी ह्यच्याशी अक्षरशः भांडायला लागलो पण कशाचाही काहीही फायदा झाला नाही, माझी परिस्थिती तर नाही बदलली पण मनस्थिती मात्र नक्की बदलली, तेव्हा पासून मला कळाल की आपलं आपल्याला करावं लागतं मागून काही मिळत नाही.  आणि मला मंदिरात ती शांतता कधी मिळत नाही जी बाहेर मिळते,सिद्धांत तिला म्हणाला. त्या मुळे मला कधीही टेन्शन आलं खूप down feel होत असल की मी इथे येतो पण मंदिरात नाही, हे बाजूचंच वातावरण मला जास्त positive वाटत. त्यामुळे मी तुला नाही अडवणार तू जाऊन ये पण मला मात्र आग्रह नको करू.सिद्धांत तिला सांगत होता. इतकं ऐकल्यावर आर्या कडे आता त्याला समजून सांगायला शब्दच नव्हते. ती मंदिरात जाऊन आली. आता खर तर तिला प्रसन्न वाटत होते. किती प्रसन्न वाटत मंदिरात जाऊन, पण सिद्धांत नाही आला मी ही आग्रह नाही करणार कधीही ज्या दिवशी स्वतःहून वाटेल त्या दिवशी येईल तो. ती खाली आली तो खालीच एका बाकावर बसलेला होता. ती त्याच्या जवळ येऊन बसली.
क्रमशः