Raatrani - 7 books and stories free download online pdf in Marathi

रातराणी.... (भाग ७)

विनयला सगळं आठवतं होते. दोन महिने झाले ना आज. आपण हॉस्पिटल मधेच आहोत. सगळे येतात चौकशी करायला. हे चौघे येतात अधूनमधून .... अव्या रोज येतो डब्बा घेऊन दुपारचा. दिक्षा, मी सकाळी जागे होण्याआधी रातराणीची फुलं घेऊन येते. अनुजा फार कमी वेळेस येते. हेमंत तर येतोच , दर २ दिवसांनी... सुरुवातीला खूप विचित्र होता ना... पण नंतर चांगला बोलायला लागला. नेहमी कसा राग राग करायचा माझा. तशीच एक भेट आठवली त्याला.


त्यादिवशी, विनय ऑफिसच्या आवारात असलेल्या बागेत काही करत होता. चंदन आणि अव्या होता तिथेच. हेमंत आला गेटमधून. विनयला बघितलं त्याने. मुद्दाम हसला त्याला बघून.
" हेच होणार होते... सारखा पुढे पुढे करतो ना... कचरा उचलायला लावला शेवटी.. " चंदनने ऐकलं ते..
" हेमंत... नीट बघ... रोपटं लावतो आहे तो... कचरा नाही उचलत... " हेमंत ने पुन्हा बघितलं त्याकडे.
" तरीही... मातीतच राहणार तू... माझी बरोबरी करू शकत नाही तू.... " गॉगल लावला डोळयांवर आणि निघून गेला. अव्याने सुद्धा ऐकलं ते..
" याला देऊ का खर्चापाणी... " अव्या बडबडला.
" नको.. राहू दे... प्रत्येक वेळेला काय मारामारी.. आणि विनय... आवर आता तुझे.. झालं ना झाड लावून... " ,
" झाडं नाही रे... रातराणी... " विनय प्रेमाने म्हणाला.
" हो हो... रातराणी... चल आता.. " अव्या बोलला. दोघे गेले पुढे. विनय बागेतून बाहेर आला. तर समोरून दिक्षा येतं होती. तसाच झट्कन वळला आणि दिक्षा कडे पाठ केली त्याने. तिलाही त्याचा तो अवतार बघून हसायला आले.


" wow !! congratulation... !! " , दिक्षा मागून पुढे आली. विनयला कसंसं झालं..
" कश्याबद्दल.. " विनयला कळलं नाही.
" promotion झाले म्हणून... " आणि दिक्षा स्वतःच हसली.
" हाहाहा.... very funny ... मी जरा बागेत काम करत होतो. ",
" कोणी सांगितलं का हे झाड वगैरे लावायला.. कि माळी तुला पैसे देतो याचे पण... " पुन्हा हसली...
" by the way .... त्याला झाडं नाही... रोपटे असे म्हणतात... शुद्ध मराठीत... समजलं का मॅडम.. " ,
" हो हो... समजलं " दिक्षाने मान हलवली. हे दोघे बोलत बोलत लिफ्ट जवळ आले.
" जरा ते बटन दाबा ना मॅडम.. माझे हात खराब आहेत म्हणून... नाहीतर मीच मदत केली असती तुम्हाला.. " उगाचच टोमणा मारला विनयने.
" हो सर... करते हा तुम्हाला मदत... " लिफ्ट आली तसे दोघे आत शिरले. विनयला तिने निरखून पाहिलं.
" काय ते ध्यान... असाच बसणार आहेस का ऑफिस मध्ये... ",
" किती काळजी करतेस ना माझी तू .... थँक्स... " विनय मस्करी करत बोलला.
" excuse me... काळजी वगैरे काय... कपडे खराब आहेत... ऑफिस मध्ये सगळे मातीचे पाय उमटणार.. म्हणून बोलते आहे. ... बाकी काही नाही.. " ,
" हो हो... तुझा ड्रेस पण खराब होईल ना मग.. पण एक सांगू का.. means तुला इंप्रेस करायला बोलत नाही... चंदन बोलला होता.. तुझे dressing sense छान आहे खूप... दिसते रोज ते... तुला बघितलं ना ऑफिसमध्ये तर बघावंसं वाटते सारखं.. तरी असं वाटते कि तुझ्यामुळे त्या ड्रेसना चारचाँद लागत असतील... बरोबर ना... " दिक्षा लाजली जरा.. पण तिने लगेच आवरलं ते लाजणे... लिफ्ट सुद्धा थांबली होती.
" मस्का लावून झाला असेल तर.. जा कपडे change करून ये... माती लागली आहे सगळी कडे... " असं बोलून दिक्षा लगेचच निघून गेली. actually , तिला हसू येतं होते विनयच्या बोलण्याचे... ते हसू थांबवत पळतच जागेवर आली. विनयलाही समजलं होते ते. कपडे साफ करण्यासाठी जावे लागणारच होते, नाहीतर मागून गेलो असतो. विनय मनातल्या मनात हसला.


काय छान दिवस होते ना ते. दूर गेलेले एकत्र येतं होते हळू हळू. हेमंत तेव्हा नाटकं करायचा उगाचच. अव्या तर मित्रच झालेला. अनुजा सोबत तेव्हाही भीती वाटायची.. आताही वाटते म्हणा. त्याचे विचार सुरु होते. आणि अनुजा आलीच त्याला बघायला. विनय जिथे ऍडमिट होता.. त्या रूमला लागूनच एक बाल्कनी होती. तिथेच उभा होता विनय.
" काय रे... आराम करायला सांगितलं ना.. मग इथे काय करतोस... " आल्या आल्या विचारलं तिने.
" आठवणी... आपले जुने दिवस आठवतं होतो... " ,
" पुन्हा तेच तेच... " ,
" काय करू... आठवणी आहेत त्या... येणारच पुन्हा पुन्हा परतुनी... बरं ते जाऊदे .. तू कविता करणार होतीस ना... केलीस कि नाही... " ,
" हो... केली आहे...तुला आवडेल का माहित नाही... तू बोलला म्हणून केली. " ,
" बरं आहे ना मग... मी बोललो म्हणून लिहिते तरी..किती मुडी असतात ना कवी... " तशी अनुजाने त्याच्या पाठीवर चापट मारली.
" किती आगाऊ आहेस तू... " ,
" ऐकव आता .. कि मुहूर्त काढणार आहेस... " विनय हसत बोलला.
" थांब ... " अनुजाने एक दीर्घ श्वास घेतला.


" Comeback like rains.
Be the soft drizzle,
or be the storm if you may.
And I promise to hold my hands out of the window,
And listen to the thunder without flinching my eyes.
But you have to come back like rains,
All of sudden-
Taking over my entire sky,
Not leaving a space behind,
So you must come back like rains."


झाली कविता... छान संध्याकाळ होती. मावळतीचा सूर्य होता सोबतीला. विनयला गलबलून आलं. अनुजाला समजलं ते. " बघ ... म्हणून करत नव्हते कविता. तुला वाईट वाटलं ना..... सॉरी, खरच सॉरी... " आता अनुजाच्या डोळ्यात पाणी आलेलं. तशीच " Bye " म्हणत धावतच बाहेर आली. विनय समोर रडायचं नाही कोणी, असं ठरवलं होते सर्वानी. एका झाडाआड गेली. मनसोक्त रडली. नाहीच थांबवू शकली स्वतःला. तिची scooty सुरू केली आणि परतीची वाट धरली तिने. तरी पाणी होतेच डोळ्यात... बाजूलाच एक बाग दिसली तिला. जाऊन बसली तिथेच. " का केलंस विनय तू असं... का नाही सांगितलं आधी ... का आलास माझ्या life मध्ये.. " एकटीच रडत बसली. थंडीचे दिवस. कातरवेळ.. संधीछाया..... आठवलं तिला काही....


===========================================================

अनुजा एका महत्वाच्या कॉल वर होती. त्यामुळे वर ऑफिसमध्ये न बोलता, खाली पार्किंगमध्ये फोनवर बोलत होती. पुढच्या १५-२० मिनिटांनी तिचे बोलणे संपले. निघायला वळली तर समोर विनय. त्याच्याच बुलेट वर बसलेला आणि कानात इअरफोन... गाणी ऐकत बसलेला. अनुजा तशीच त्याच्या जवळ आली. ती जवळ आली तस त्याने कानातले इअरफोन काढले.
" मिस्टर विनय... आपले ऑफिस वर आहे. हा तळमजला आहे... शिवाय पार्किंग...मध्ये आहात.. " ,
" मग ... " ,
" मग तुम्हाला काम नसते का... ऑफिस मध्ये... पहिल्यांदा भेटलात तेव्हा हि इथेच.. अगदी याच जागी पाहिलं होते तुम्हाला... आताही इथेच.. " ,
" हा ... ते.. " विनयला काय उत्तर द्यावे सुचेना... घाबरला नव्हता.. तरी समोर अनुजा होती ना... बाकी मुलींसोबत बोलताना काही वाटायचे नाही. पण हिचे डोळे इतके बोलके होते ना... नशिले होते, धारदार होते.. कि विनय विसरून गेला उत्तर... शब्दच फुटेना तोंडांतून.. अनुजाला समजलं ते. ऑफिसमध्ये बरेच तिच्या मागे होते, त्यात आणखी एक " Add " झाला, असा विचार करत निघाली.


-------------------------- क्रमश: ------------------