Pralay - 26 books and stories free download online pdf in Marathi

प्रलय - २६

प्रलय-२६

देवव्रत त्रिशूळ घेऊन जलधि सैन्य तळावरती आला होता . आल्या आल्या महाराज कैरवांनी त्याला बोलावलं .
" युवराज असं मुर्खासारखं काळा महालातील त्रिशुळ आणायला जाणं तुम्हाला शोभत का ...? जलधि राज्याचे बारावे महाराज आहात तुम्ही , आणि तुम्हीच असे मूर्खपणाचे निर्णय घ्यायला लागल्यावर ती संपूर्ण राज्यानं काय करावं ......."
" पण बाबा मी जर गेलो नसतो तर आपलं म्हणायला राज्याच राहिलं नसतं . सारी जनता त्रिशुळ सैनिक बनून आपल्यापुढे उभा होती . काळी भिंत पडणार नव्हती त्यामुळे मला हातावरती हात ठेवून बसणे नको वाटलं . म्हणूनच मी त्रिशूळ आणायला निघालो . तुम्हाला विचारलं असतं तर तुम्ही कधीच जाऊ दिलं नसतं . म्हणूनच गपचूप निघालो आणि महत्त्वाचं म्हणजे त्रिशुळ आला आहे . आता आपली माणसे परत आणुया....
महाराज केरवानी राज महर्षींना बोलून ईश्वर त्यांच्या स्वाधीन केला की शिवसैनिकांना माणसात आणण्याची तयारी चालू झाली......

बारावे अग्नेय महाराज तरुण होते . वयाची तीस वर्षे देखील पूर्ण झाली नव्हती . त्यांनीच तंत्रज्ञ मंदार , म्हातारा मांत्रिक आयुष्यमान व त्या दोन बुटक्यांचे राजमहालात स्वागत केले .
" काय आश्चर्य तंत्रज्ञ मंदार , मांत्रिक आणि सुरूकुचालक स्वतः उडत्या बेटावरती .....? आम्ही तुमचे कोणत्या प्रकारे आदरातिथ्य करू ....।.
" महाराज प्रलयकारिका जन्मली आहे , हे तर तुम्हाला माहीतच असेल. प्रलयकारीकेला थांबवण्यात यश आलेलं नाही . तीन बहिणीकडून काही मदत मिळेल या अपेक्षेने त्यांच्या शोधार्थ या ठिकाणी आलोय ..."
तंत्रज्ञ मंदार म्हणाला ....
" तुम्हाला वाटतंय का की त्या तीन बहिणी उडत्या बेटांवरती असतील...
" या शिवाय इतकी प्रशस्त समृद्ध आणि सर्वकाही उपलब्ध असणारी जागा दुसरीकडे थोडीच आहे.....
तो म्हातारा मांत्रिक म्हणाला
" पण तुम्ही त्यांना शोधणार कसे ...? त्यांची इच्छा असल्याशिवाय त्या कोणालाही सापडत नाहीत हे तर सर्वज्ञात आहे..... महाराज
" पण प्रयत्न तर करावा लागणारच पहिले हा फार गंभीर विषय आहे हे तर त्यांनाही माहीत आहे .....
तो तंत्रज्ञ बोलला . त्याच वेळी एक सैनिक आत आला . महारजांकडे पाहत बोलू कि नको म्हणत उभारला . महाराजांनी नथरेनचं विचारलं , तेव्हा बोलला...
" जलदी राज्याच्या कैरव महाराजांचा एक दूत आपले दर्शन मागत आहे...
" चला तर मग तुमचा शोधायला शुभेच्छा आणि महाराज निघून गेले
" मला कोणीतरी सांगेल का की या तीन बहिणी कोण आहेत आणि त्यांच्या शोध कशासाठी घ्यायचा आहे ....." आयुष्यमान वैतागून म्हणाला...

" त्या तिघी नसत्या तर मानवजातीचे भविष्य काहीतरी वेगळं असतं . पहिल प्रलय थांबवण्यात या तिघींचा मोठा वाटा आहे. त्यांच्या मदतीविना तो परिपूर्ण जागृत झाला असता आणि मानव जमात काही वेगळ्याच दुनियेत असली असती..... तंत्रज्ञ मदार बोलून गेला .

महाराज आग्नेयांपुढे तो दूत उभा होता व त्याच्या हातातील पत्रा वाचत होता ...
" मागच्या प्रलयापासून अग्नेया यांनी या जगताशी संपर्क तोडला. सर्व काही त्यांनी स्वतःच्या स्वतः उत्पादन करायला सुरुवात केली . सर्व गोष्टी निर्माण केल्या . या जगात गोष्ट आहे व ती उडत्या बेटांवरती नाही असे होत नाही . या घडीला अतिशय सुख समृद्धीने युक्त असलेले राज्य म्हणजे अग्नेय .
मात्र पुन्हा एकदा प्रलयकारिकेचा जन्म झाला आहे . मारुतांच्या पुजार्‍याने हे सारे षड्यंत्र मांडले आहे . तो स्वतःचं राज्य निर्माण करू इच्छित आहे त्यासाठी प्रलयकारी केला तो शास्त्र म्हणून वापरत आहे . पण प्रलय हा कोणाच्या अंकुश खाली राहत नाही हे तो विसरला आहे . काही क्षणांचा अवधी आहे आता प्रलयाच्या जागृतीला....
तुम्ही पलय जागृत करण्यासाठी लागणारी महत्त्वाची गोष्ट कडेकोट सुरक्षेत इतकी वर्षे सांभाळली आहे . मात्र प्रलयकारीकेला काहीच अशक्य नाही . जर तिला नष्ट करावयाचे असेल तर बाराव्या पिढीने एकत्र यायलाच हवं. त्यासाठी बैठकीचं हे निमंत्रण पाठवत आहोत.....
पुढेही बऱ्याच गोष्टी त्या दूताने वाचून दाखवल्या व नंतर तो निघून गेला . महाराज अग्नेय अग्नी कक्षात गेले . एक ज्वाला प्रकाशित झाली व आवाज येऊ लागला...
" सध्यातरी प्रलयकारिका त्या भैरवच्या ताब्यात आहे पण फार काळ राहणार नाही . कैरव महाराजांनी रास्त सुचवलेलं आहे . बाराव्या पिढीने एकत्र यायलाच हवं . पण बारावीला पिढीचा मारुत राजा मारुतांमधे नाही . त्यांना वाटत आहे तो मृत आहे . मात्र बाराव्या पिढीचा राजा जंगलातील लोकांचा प्रमुख झालाय .... त्याला आम्ही बोलू . तू जाण्याच्या तयारीला लाग..."

रुद्राला सकाळी जाग आली . त्याचं डोकं भयंकर दुखत होतं . झोप नीट लागली नव्हती . रात्री झालेला फारसं काही आठवत नव्हतं . एवढंच माहीत होतं की तो मीराच्या कुशीत रडला होता . सारेच लोक आज उशिरा उठले होते . रात्रीच्या उत्सवाचा पसारा आजूबाजूला पडलेला होता . मोकळ्या हवेसाठी आणि अंघोळीसाठी तो तलावाकडे निघाला . वाटेत मीरा परत येताना दिसली .
" मीरा.... मीरा.... रुद्रा तिला पहात म्हणाला .... त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती तशीच पुढे चालत राहीली . तिला थांबवण्यासाठी त्याने तिचा हात धरून ओढला....
" सोड मला..... त्याच्या हातातून हात सोडून घेत तिने रुद्राच्या कानशिलात भडकावून दिली ... " परत हात लावलास तर याद राख....
" काय झालं तरी काय .....?"
रुद्रा काही न समजून बोलला
" वा रे वा ... मलाच विचार अजून काय झालं... अगोदरपासूनच असा होतास का ....? एवढं काही बोलला आणि परत घाण केली सगळी....
" काय बोलतेस तरी काय ...? काय घाण केली मी..."
" तुझा तूच आठव काय घाण केली काल रात्री .....
आणि ती निघून गेली . रुद्राला आता अधिकच प्रश्न पडले . काल रात्री नशेत काही केलं का आपण ? तसे अजून एकदाही त्याने नशेत काही उलटेसुलटे केले नव्हते . मग काल रात्री त्यानं काय केलं असावं ...? पटकन सारे काही आवरुण तो माघारी वळला . त्याच्या कक्षात आल्यावर त्याचा सेवक त्याची खोली व्यवस्थित करताना दिसला.
" अरे काल रात्री काय झालं ...? मी काय केलं सांगशील का.....?
त्यानं सारेकाही सांगितलं त्यात काही वेगळं नव्हतंच. फक्त शेवटी म्हणाला
" आणि काल रात्री खोलीत कोणीतरी होतं तुमच्या झोपायला , मिराबाई साहेब सोडून....
आता त्याला कळलं मीरा एवढी का भडकली होती तो मीरा समजून दुसऱ्याच बाईसोबत झोपला होता....