Naa kavle kadhi - 2 - 22 books and stories free download online pdf in Marathi

ना कळले कधी Season 2 - Part 22

'सिद्धांत काय करतोय तू हे आपण ऑफस च्या कॅन्टीन मध्ये आहोत घर आहे का हे आपलं?'

' shhhhh...... बोलू नको जेवून घे पटकन'.

'झालं माझं'.

'बाकी आहे', तो दटावूनच म्हणाला.

तू इतक्या प्रेमाने भरवलं ना भरलं माझं त्यात च पोट भरल बास आता.

मी काही तुझं ऐकणार अस वाटत का तुला ? ती मानेनेच नाही म्हणाली. आणि तुझ्या बोटांना लागलं आहे तुला त्रास होत होता म्हणून मी हे करतोय नाही तर मला हौस नाही आली.

अरे हो पण मला जेवताच येत नव्हतं अस तर नव्हतं ना! कस वाटत इथे !

काय कस वाटतय कस वाटतय लावलंय ग! कोण काय बोलणार आहे आणि बोललं तरी मी म्हणेल माझ्याच बायकोला खाऊ घालतोय.

तुझा स्वभाव पाहता तुला कोण काय बोलणार? हिम्मत च नाही होणार. ह्याच म्हणजे ना सगळं अतीच असत. ती मनातच विचार करत होती.

काही अती नाही आहे! जास्त विचार नको करू.

अरे यार! मला तर मनात विचार करायला पण बंदी च आहे, विसरले च होते मी.

चल आता झालं.

लंच ब्रेक संपला ते आपापल्या कामाला लागले.

काय मग आर्या आज जेवण छान झालं असेल ना म्हणजे पोटभरून सॉरी मनभरून. रेवा तिला म्हणाली.
काहीही काय ग रेवा! ती लाजुन म्हणाली.
किती लकी आहेस यार आर्या तू तुला सिध्दांत सर सारखा नवरा मिळालाय. ऑफिस मध्ये त्यांच्या कडे पाहून कुणी म्हणणार पण नाही की ते असे असतील. how romantic!

अस काही नाही आहे, ते उगाच आज मला लागलं होतं म्हणून नाहीतर......

हो मग तेच न ! बघ न तुला थोडंही काही झालेल त्यांना पाहवत नाही.किती भारी न! म्हणजे आपलं सगळं काम सोडून आप के लिये हाजीर रेहता हे!

आर्या ला ही थोड्यावेळा पूर्वी सिद्धांत सोबत घालवलेले क्षण आठवू लागले, आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. वेडाच आहे सिध्दांत! इतकं प्रेम करतो पण त्याला च कळत नाही.

घरी आल्यावर सिद्धांत ने आर्या साठी घेतलेला फोन ड्रेसिंग टेबल वर ठेवला, त्याला आर्याला surprise द्यायचं होत.आर्या टेबल जवळ गेली पण तिने काहीच रिऍक्ट नाही केलं. सिद्धांत ला वाटलं तीच लक्षच नसेल म्हणून त्याने जागा बदलली तिला स्पष्ट दिसावं म्हणून त्याने बेड वर तिच्या जागेवर ठेवला. ती आली तिने बॉक्स बाजुला ठेवला.आणि ती तिथे बसली.
किती मंद आहे आहे ही! थोडी पण excitement नाही, निदान काय आहे म्हणून तरीबघावं, कमाल आहे.शेवटी त्यानेच कंटाळून तिला तिच्या हातात दिला.
काय आहे हे? आर्याने विचारलं.

गिफ्ट आहे माझ्या कडून !

काय !!! गिफ्ट !! अचानक ..... काय झालं सिद्धांत ? एक मिनीट आज तर अस काही special occasion नाही की तू मला गिफ्ट द्यावं.

किती प्रश्न असतात ग तुझे? आधी बघ तरी.

तिने उघडून बघितला, woww न्यू फोन!!! तिचा चेहरा एकदम आनंदी झाला, पण क्षणभरासाठी च.

थँक्स सिद्धांत, पण सॉरी मी नाही घेऊ शकणार!

का आवडला नाही का ??

नाही रे प्रश्नच येत नाही न आवडण्याचा पण मला इतके महाग फोन वापरण्याची सवय नाही आहे.

ठीक आहे ना, आता करून घे!!

नाही नंतर मोडायला फार जड जातात! मला नंतर झेपणार नाही.

सिद्धांत ला तिच्या बोलण्याचं फार वाईट वाटलं, त्याचा चेहरा एकदम पडला.'इतकं का तोडून बोलते आर्या?'तो मानतच म्हणाला.

आर्याला त्याला वाईट वाटल हे जाणवलं, हे बघ सिद्धांत अस नको समजू की मी हा नाही घेतला म्हणजे तुझ्याकडून कोणताच नाही घेणार, फोन तर घेणार तुझ्याकडूनच कारण तूच फोडला ना! फक्त दुसरा मी सांगेल तो!ती हसुन म्हणाली.

त्याचा चेहरा एकदम खुलला. सांग लगेच घेऊ तो ही आनंदाने म्हणाला.

आर्या इतर मुलींसारखी नाही आहे हे निश्चित !कुठली मुलगी अशी सहजासहजी मिळणाऱ्या गोष्टींना नाही म्हणते, पण आर्या खरच वेगळी आहे, स्वाभिमानी आहे. मुळात वास्तवाचे भान ठेवून आहे. किती कठीण आहे हे सगळं खरच ! आम्हालाच माहिती नाही पुढे काय होईल. आर्याची आता इतकी सवय झाली आहे की सुरवातीला जी कटकट वाटायची, आता ती आजूबाजुला दिसली नाही तरी करमत नाही. ती सोबत असली की काहीच वाटत नाही. पण नसली की ती भयाण शांतता खायला उठते. पण आर्या खरच ग्रेट आहेस तू! मानलं तुला. तो एकटाच विचार करत होता.

किती सोपं आज सिद्धांत साठी मला फोन देणं, मी नाही म्हंटल्यावर मला क्षणभर वाटलं की तो चिडेल रागवेन आणि जबरदस्तीने का होईना तो फोन मला देईल. पण तो नाही तसा वागला त्याने नाही दिला फोन!उलट त्यानेही माझ्या मताचा आदर केला, आणि योग्यच नव्हतं मी त्याच्या कडून घेणं तो आज सोबत आहे पण पुढचं काय.....??? कारण वास्तव फार भयाण आहे. पण एक मात्र खर आहे ते म्हणजे माणूस हा मुळातून कधीच नाही बदलत, तो फक्त परिस्थिती नुसार बदलतो, सिद्धांत च ही नेमकं तेच झालंय तो जे वागतो ते ते परिस्थितीमुळेच. म्हणजे मुळात त्याचा स्वभाव, morals, काहिही बदललेल नाही. तो त्याच्या मतांवर तटस्थ असतो. ह्याच सिद्धांत वर मी प्रेम केलं होतं आणि आजही तो अगदी तसाच आहे.

क्रमशः
©Neha R Dhole