Naa kavle kadhi - 2 - 31 books and stories free download online pdf in Marathi

ना कळले कधी Season 2 - Part 31

आर्या तुला सांगितलेले changes केले?, पलिकडून काहीही उत्तर नाही आले.

'आर्या i am talking with you dammit लक्ष कुठे आहे तुझं'.

sir this is Anvi not Aarya! आणि हे तिसऱ्यांदा होतंय. अन्वी ही त्याची बंगलोर च्या ऑफिस मधली assistant होती.

Shut !!! काय होतंय अस, extremely sorry Anvi!

its ok sir!

काय चालू आहे माझ्या सोबत सतत आर्याचंच नाव येत तोंडात. मला तर कुठेही तिच दिसतीये. कंट्रोल सिद्धांत इथे आर्या नाही आहे ह्या नंतर तीच नाव अस मीटिंग मध्ये नाही आलं पाहिजे. तो स्वतःलाच समजवून सांगत होता.

आज सिद्धांत ने एकही कॉल कसा नाही केला , काल तर दिवसभर करत होता , हा एका दिवसात विसरला की काय मला? मी करू का, हा करूनच बघते. आणि तिने सिध्दांत ला कॉल केला. त्याने कट केला आणि in a meeting चा मेसेज पाठवला. अरे हा मीटिंग मध्ये असेल करेल फ्री झाल्यावर अस म्हणून तिने आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले.
थोड्या वेळाने तिला रेवा चा कॉल आला. रेवा ने तिला मीटिंग मध्ये काय झाल सगळ सांगितलं.सिद्धांत ने कश्या प्रकारे तीन वेळेस अन्वी ला आर्या म्हणून बोलावलं हेही सांगितलं.आणि तिला काहीतरी काम आलं म्हणून तिने फोन कट केला.
आर्याला तर ऐकून आश्चर्य च वाटलं बापरे इतका मिस करतोय मला सिद्धांत, आणि इतका कसा वेडा आहे हा ह्याला कळू नये का की आपण मीटिंग मध्ये आहे. आर्या इथे नाही आहे इतकीच आठवण येतीये तर कॉल करायचा न मग, आता तर संपली मीटिंग. पण ह्याने काही कॉल केला नाही. विसरला असेल का? मीच करून बघते.

Heyy आर्या,अग बर झालं तू कॉल केला मी करणारच होतो आता माहिती आहे.

तू राहूच दे सिद्धां,तुला माझी आठवनच नाही येत , आता काय तुला नवीन लोक मिळाले ना माझी आठवन कशी येणार.

अग कोण नाविन लोक काहीही काय!

अन्वी!!!!

आर्या का जेलस फील करतीये त्या अन्वी चा काय संबंध? तो मनातच विचार करत होता.

अरे बोल ना आता गप्प का?

अग अन्वी चा च विचार करत होतो, फार मस्त आहे हा ती ! लुक्स मध्ये पण आणि कामात पण. तो मुद्दामून आर्याला चिडवण्या साठी म्हणाला. आणि त्याने पुढे तीच भरभरून कौतूक केलं.

बाय द वे आर्या आधी मी तुला तिच्या बद्दल काही सांगितलं नव्हतं मग तुला कस कळाल ?

तू नाही सांगितलं म्हणून काय माझं नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे कळलं!. त्यामुळे अस नको समजू की मला इथे बसुन काही कळणार नाही.

तुला काही जरी समजलं तरी तू काय करू शकणार आहे आर्या ? आणि मी का घाबरू तुला काहीही. आणि अन्वी च म्हणशील तर ती आहेच ग्रेट!

बर झालं तुझं अन्वी पुराण !ठेवू मी. आर्या चिडून म्हणाली.

आर्या चिडलीस तू?

मी का चिडू?

तुलाच माहिती कारण मी तर काही चिडण्यासारखं बोललोच नाही.

चिडण्यासारखं बोललो नाही म्हणे , इतक्या वेळ झाला तीच कौतुक करतोय, मी तिच कौतुक ऐकायला फोन केला का? आता मात्र ती बोलली .

सिद्धांत ला आर्याच फार हसायला येत होतं. किती इनसेक्युर फील करते ही लगेचच.

हे बघ आर्या कुणाच्याही चांगल्या गोष्टीच कौतुक कराव, आता आहेत तिच्या कडे काही गोष्टी चांगल्या, तुझं हे विनाकारण चिडणं चूक आहे हा! तो म्हणाला.

बर सिध्दांत तू बरोबर मी चूक,ठेवू फोन, छान वाटलं हा अन्वी बद्दल ऐकून, मला बरेच काम आहेत बाय!

good आर्या शेवटी तू मान्य केलं बाय! आणि त्याने फोन ठेवुन दिला.

काय आहे हे, ह्याला sarcastic बोललेलं कळत नाही का ! काहीही आपलं. आणि किती कौतुक करत होता इतकी आवडली असेल तर मग रहा म्हणा तिच्याच सोबत. मी इथे हा कधी येईल ह्याची वाट बघते आणि ह्याला तर काही पडलेलीच नाही. आता मी नाही बोलणार त्याच्याशी.

आर्या कधी मोठी होणार तू, मी कसा दुसरा कुणाचा विचार करेन, वाटत का?. पूर्ण गोष्ट ही ऐकून घ्यायची नाही उगाचच आपला काहिही विचार करायचा आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा. आताही तोच विचार करत बसली असेल. तिला कॉल करुन बघू का हा अजून मजा घेऊ थोडी तिची.

अरे काय हे तू ऑफीस मध्ये असताना व्हिडिओ कॉल नको करत जाऊ रे फार awkward वाटत मला.

तुझं न आर्या काहीतरी विचित्र च असत ह!

का केलास फोन? तिथे काही काम नाही का तुला?

आर्या आपल्या बॉस ला कुणी अस बोलत का ग? की काही काम नाही का? मनात नसली तरी थोडी रिस्पेक्ट द्यावी माणसानी.

आणि भरपूर काम आहेत ह मला परत रडशील कॉल नाही केला तर म्हणून केला. आणि माझं इथलं बरच काम अन्वी ने हलकं केलं, त्यामुळे थोडा निवांत होतो.

पुन्हा अन्वी!!!

आर्या, are you feeling jealous?

no, why should i

ok i feel that, कारण तू मागे पण असच केलं होतं न बघ जेव्हा तू आजारी होती आणि मला आई मुली बघण्यासाठी मागे लागली होती. तेव्हा पण तू चिडली होती. राईट!!!

सिद्धांत तुला आठवलं ते...... ओह माय गॉड म्हणजे तुला आठवतंय सगळं?.....आर्यने एकदम आनंदी होऊन विचारल.

shuttt उगाच बोललो, आता काय सांगू डायरी मधून कळाल! ते जर कळलं तर....नकोच ती कल्पनाच नको. नाही ग सगळं नाही थोडं थोडं म्हणजे पण मला हा इन्सिडेंट आठवला. त्याने दिली थाप मारुन.

ओके ओके!! तिचा चेहरा लगेच उतरला. पण ठीक आहे न काहीतरी आठवलं प्रोग्रेस म्हणावी लागेल, असच आठवेल बाकीचही ती थोडं नाराजीनेच म्हणाली.

hmmm hope soo !

तिचा चेहरा अजूनही तसाच होता. आता सिद्धांत ला माहिती होत की exactly ती काय विचार करत असेल. कारण डायरी वाचून त्याला कळलं होतं की ह्याचा आर्याला किती त्रास होतो.

आर्या.... काय झालं? इतका का विचार करते ह्या गोष्टीचा.

काही नाही,तू सोड तो विषय मला थोडं काम आहे बोलते नंतर अस .....ती डोळे पुसत म्हणाली.

आर्या , ऐक सिद्धांत पुढचं बोलेपर्यंत तिने फोन कट केला. आज त्याला पुन्हा आर्या च्या डोळ्यांतले अश्रू तितकेच त्रास देत होते, जितके आधी देत होते. उगाच काढला तो विषय किती त्रास झाला असेल तिला. पण तिने पुढचं ऐकूनही नाही घेतलं. आता फोन करूनही फायदा नाही ती नाही उचलणार.

क्रमशः
©Neha R Dhole