The Infinite Loop of Love - 2 books and stories free download online pdf in Marathi

The Infinite Loop of Love - 2

प्रती बोलत होती .....
" I love you
रवीच्या मोबाईलची नोटिफिकेशन रिंग पुन्हा एकदा वाचली . त्याच्या मित्राचा मेसेज होता ' Come tonight , project work ' मेसेज वाचत वाचतच रवी म्हणाला.
" I love you too ....

रवी चक्रावूनच गेला . म्हणजे त्यांनं जे काही पाहिलं ते भविष्य होतं का ...? स्वप्न होतं ...? ते घडलं होतं का घडलं नव्हतं ....? का पुन्हा तसेच घडणार होतं ..... त्याला काहीच कळेना.....

" मग लग्न करायला काय हरकत आहे तुझी .... " प्रीती पुन्हा म्हणाली ... . त्याच्या हातात मोबाईल होता त्याने मेसेज टाईप केला ' c u then '

रवीला पुढे काय बोलायचं ते कळेना . तो नकळत बोलून गेला ..." मी नाही म्हणत नाही पण आत्ताच नको , आपली डिग्री तर कम्प्लीट होऊ दे....." त्याने मोबाइल बाजूला ठेवला .

आतापर्यंत त्याने जे काही पाहिलं होतं अगदी तसंच्या तसं झालं होतं . नक्की काय चाललं होतं हे त्याला कळेना...... ?

" डिग्री झाल्यावरतीही करायचंच आहे , आणि आताही करायचंच आहे ......" प्रीती पुन्हा तेच म्हणाली , " तू करणार आहेस की नाही....? शेजारच्या रूम मध्ये पुन्हा एकदा गाणं वाजलं ' क्या हुवा तेरा वादा.... '

मग तर त्याची खात्रीच पटली . सारं काही पुन्हा एकदा घडत होतं . मागच्यावेळी रागाच्या भरात काय झालं होतं हे आता त्याला माहीत होतं . तो शांतपणे तिला म्हणाला
" प्रीति पिझ्झा येउदे आपण पिझ्झा खात शांतपणे बोलू..... " सारं काही तसेच घडत असल्यामुळे रवी जरा बावरला होता . त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं .
त्याच वेळी स्टडी रूम मधील खिडकी जोरात आपटली ... रवी खिडकी लावायला स्टडी रुम मध्ये गेला त्याच्यापाठोपाठ प्रीती ही आली . कपाटातल्या वह्या इकडे तिकडे फेकत ती म्हणाली .

" काय बोलतेय मी ...... लक्ष तरी आहे का तुझं .....? "
यावेळी तो काहीच न बोलता शांत राहिला त्याच वेळी फोन वाजला . त्याने फोन उचलून पाहिला फोन प्रोजेक्ट गाइडचाच होता . त्याने फोन उचलला नाही तो तसाच शांतपणे उभा राहिला . त्याला काय करावं कळत नव्हतं आश्चर्य भीती सार्‍या भावनांचा मेळ झाला होता .

" काय उभा आहेस ढिम्मासारखा .... कोणाचा फोन आहे बघ तरी....? प्रती

रवीला काय बोलावं कळत नव्हतं . त्याच्या चेहर्‍यावरचे भाव विचित्र होते . तो अस्वस्थपणे हालचाल करत होता .
" मी काय बोलतेय तुझं काय भलतच चाललय....?
त्याचवेळी दारावरची थाप पडली तो पिझ्झा डिलिव्हरी बॉय होता . रवीने दार उघडत पिझ्झा घेतला .
पिझ्झा ठेवत त्याने प्रितीला खाली बसवले .

" प्रीती माझं ऐकून घे प्लीज .... मला माहित आहे तू प्रेग्नेंट आहेस म्हणून . आपण लग्नही करूया ... पण तू घरी जाउ नकोस घरी गेलीस तर तुझा मृत्यू होईल मी पाहिलय....

" तुला कसं माहित आणि काहीही काय बोलतोयस ....? प्रेग्नेंट आहे म्हणून मला लग्न करायचं आहे असं वाटतंय का तुला.....? तुला वाटते का मी तुझ्या गळ्यात जबरदस्ती पडतेय.....

" तसं नाही म्हणायचं मला हे सारं अगोदर घडलंय आणि पुन्हा एकदा घडतय....

" तुला जबाबदारी नको असेल तर तसं सांग मला कोणा पुरुषाची गरज नाही.....

" प्रीती जबाबदारीचा विषय नाही . उगाच काहीही बोलू नकोस . माझं एकूण तरी घेशील का....?

" काय ऐकून घ्यायचा आहे अजून.....?

" माझं तुझ्यावरती प्रेम आहे तुझ्यासोबत लग्न करायचं आहे . पण दोन दिवस थांब फक्त दोन दिवस . तू आज जर घरी गेलीस तर तुझा मृत्यू होणार आहे.....

" मी घरी जायचं नावही काढलेले नाही... काहीही काय बोलतोयस ? नको असेल तर सरळ नाही म्हणून सांग... उगाच अभद्र बोलू नकोस . सरळ सरळ सांग निघून जा म्हणून.....

आणि पुन्हा एकदा प्रीती बॅग भरून घरी निघाली . यावेळीही रवीला तिला थांबवणे शक्य झाले नाही . मात्र यावेळी तो तिच्या पाठोपाठ घरी गेला . पण यावेळीही त्याला वेळेवर पोहोचता आले नाही . पुन्हा एकदा त्याला मृत प्रीती दिसली . पुन्हा एकदा तो जमिनीवर कोसळला आणि पातळाच्या खोल गर्तेत कोसळतच गेला . यावेळीही तो अचानक थांबला. त्याने डोळे उघडले समोर प्रीती होती . ती बोलत होती

" I love you .....

रवीला आता कळालं होतं तो एका टाईम लुपमध्ये फसला होता . ठराविक वेळ तो पुन्हा-पुन्हा जगत होता . यावेळी त्याने कसेही करून प्रीतीला थांबवण्याचे ठरवले .

क्रमःश .....