The Infinite Loop of Love - 3 books and stories free download online pdf in Marathi

The Infinite Loop of Love - 3

ही तिसरी वेळ होती . यावेळी त्याला सारा घटनाक्रम पाठ झाला होता . मोबाईल वर येणारा त्याच्या मित्राचा मेसेज . नंतर वाजणारे क्या हुआ तेरा वादा हे गाणे . नंतर आदळणारी खिडकी . नंतर दारावर पडणारी थाप नि येणारा पिझ्झा डिलिव्हरी बॉय. नंतर निघून जाणारी प्रीती . नंतर होणारा तिचा मृत्यू . आणि पुन्हा एकदा होणारी सुरुवात . यावेळी तो सावध होता तिला अजिबात दुःखी करायचं नाही असं त्याने ठरवलं .

त्याने प्रीतीला सोफ्यावरती बसवलं . तिच्या समोर बसत तिचे दोन्ही हात हातात घेत तो म्हणाला...
" I love you too प्रीती .... लग्न करूया म्हणतेस ना , चल आजच्या आज आपण कोर्ट मॅरेज करून टाकू.... माझ्या दोन मित्रांना साक्षीदार होण्यासाठी आत्ता बोलावतो..... त्याचा मोबाईल वाजला . त्याने तो स्विच ऑफ करून बाजूला ठेवला .

" खरं म्हणतोस ......" प्रीतीला अगदी आभाळ ठेंगणं झालं .

" हो खरंच.... पण आधी आपण कोर्ट मॅरेज करू या मग तू घरी सांग..... " रवीला माहित होतं ती आज घरी गेली तर काय होणार होतं ....

" तसं कशाला ....? मी आज घरी जाते . सारं काही सांगते . मग तू भेटायला ये . मग आपण पद्धतशीरपणे सारकाही ठरवूया...." त्याच वेळी शेजारच्या रूम मध्ये क्या हुआ तेरा वादा हे गाणं वाजू लागलं .

" नको नको . तू एकट्यानं जायचं नाहीस . मी येतो तुझ्याबरोबर . आपण दोघे मिळून सांगू .... रवी म्हणाला ...

" नको रे..... मला माहित आहे माझे बाबा कसे आहेत ते.... माझं ऐक . मी जाते आधी सांगते . वातावरण शांत करते . मग तू भेटायला ये..... प्रीती म्हणाली . त्याच वेळी स्टडी रूम मधील खिडकी आदळली . तरीही रवी तिथेच बसला .

" नाही मी तुला एकटीला जाऊ देणार नाही .... " तो लाडीकपणे तिला जवळ घेत बोलला . " आता काळजी घ्यायला पाहिजे तू ... " तिच्या पोटावरती हात फिरवत तो म्हणाला .

" म्हणजे इतके दिवस तुला माहीत होतं...." प्रीती

" काय माहित होतं काय बोलतेस तू...." रवी गडबडून म्हणाला . त्याला माहीत होतं हा विषय निघाला की ती रागाला जाणार पण नकळत तो बोलून गेला .

" तू म्हणालास ना आता काळजी घ्यायला पाहिजे तू .... " प्रती

" हो कारण आता तू माझी पत्नी होणार आहेस...." हसण्यावारी नेत , विषय बदलत तो म्हणाला .
" तू काय म्हणतेस काय माहित होतं....? "

त्याच वेळी दारावरती थाप पडली . पिझ्झा डिलिव्हरी बॉय पिझ्झा घेऊन आला होता . रवीने पिझ्झा घेतला .
" काय म्हणत होतीस तू ...?

" काही नाही रे परत सांगेन तुला ... " प्रीती विषय टाळत म्हणाली ....
" सांग ना ... पिझ्झाचा घास तिला भरवताना रवी लाडिकपणे म्हणाला
" अरे मी प्रेग्नेंट आहे....
" काय....! यावेळी हा उद्गार आनंददायक होता
" ही तर आनंदाची बातमी आहे की ...
रवीच्या चेहऱ्यावरती आनंद बघून प्रीतीला अधिकच आनंद झाला .....
" मला वाटलं होतं घाबरशील म्हणून मी सांगितलं नव्हतं आय एम सॉरी ... प्रीती चेहरा पाडून त्याला बिलगली .
" वेडी कुठली मी कशाला घाबरू , घाबरायला तर तू पाहिजे . उलट तू तर खंबीर आहे , मग मला कशाची काळजी ....
" अरे पण मला abortion करू वाटत नाही....
" तुला कोण कर म्हटलंय का ...?
" अरे पण मग माझं ग्रॅज्युएशन कसं होणार....? मुलाकडे कोण लक्ष देणार आणि साऱ्या खर्चाचं काय करायचं....?
" तू नको टेन्शन घेऊ . मी माझ्या घरी आपल्या दोघांबद्दल सांगितले आहे . आमच्या घरी काही प्रॉब्लेम नाही....
" खरं.... " प्रीतीला खूप आनंद झाला होता .
" तू तुझ्या घरी सांगितले . मी अजून काही सांगितले नाही . आईला फक्त माहित आहे . म्हणून म्हणते मी आज जाऊन घरी सांगते . मग तू भेटायला ये . मग पुढच्या गोष्टी ठरवू ....
" काय काही गरज नाही घरी सांगायची . आपण दोघेही कायदेशीरपणे बालिका आहोत त्यामुळे आपण संमतीने लग्न करू शकतो .
" असं कसं म्हणतोस रे . हे मुलं वाढवायचा असेल तर दोन्ही घरी माहित असणं आवश्यक नाही का... एक माझं मी जाते...
" तू एकटीने जायचं नाही मी ही तुझ्या बरोबर येतो ...

आणि दोघेही प्रीतीच्या घरी जाण्यास निघाले . ह्यावेळी रवीला विश्वास होता . प्रीतीचा मृत्यू होणार नाही . कारण तो तिच्या बरोबर चालला होता . प्रीतीचा मृत्यू होण्याअगोदर तो स्वतःचा जीवही द्यायला मागेपुढे बघणार नव्हता .


दोघेही रेल्वेमध्ये बसले . एकमेकांच्या कुशीत दोघेही आनंदात होते . ते दोघेही त्यांच्या जगात होते बाहेरच्या जगाचा त्यांना पूर्णपणे विसर पडला होता . रेल्वेमध्ये अधून-मधून फेरीवाले येत होते . काही ना काही सामान विकण्यासाठी ओरडत होते . त्यांच्या समोरच्या बाकावरती एक वृद्ध माणूस बसला होता . डोक्यावरती cowboy टोपी होती . मोठा भिंगाचा चष्मा होता . पाढरी दाढी बोटभर वाढलेली होते . समोर त्याने पेपर धरला होता . पण त्याची नजर त्या दोघांवर स्थित होती . त्या दोघांना आनंदी पाहून जणु काही त्याचा जळफळाट होत होता . प्रीतीच्या गावी पोहोचता पोहोचता संध्याकाळ झाली . उतरल्यावरती ते एका हॉटेलमध्ये चहा प्यायले . त्यावेळी हॉटेलमध्ये रेल्वे मधील तो वृद्धही होता . दोघांकडे टकमक बघत होता . पण त्या दोघांचं अजूनही त्याच्याकडे लक्ष नव्हतं . स्टेशन पासून तिचं गाव बरच लांब होतं . त्यांना भाड्याच्या गाडीने जावे लागणार होते .

" माझं ऐक तू . येथेच हॉटेलमध्ये राहा उद्या सकाळी ये...
प्रीती
" नाही म्हटलं ना मी , काय व्हायचं ते होऊ दे ....

शेवटी दोघेही तिच्या घरी पोहोचले . वडील घरी नव्हते . आईने व मोठ्या भावाने त्यांचं स्वागत केलं . मोठा भाऊ त्याच्याकडे मारक्या बैला सारखेच बघत होता . आईला माहीत होतं . तिने त्याच्या भावाला ही सांगितलं . मग तर भाउ त्याच्यावरती धावूनच गेला . त्याला आडवत प्रीती म्हणाली
" आम्ही दोघं लग्न करणार आहोत .... आणि मी pregnent आहे .... " मग तर तिचा भाउ अधिकच चवताळून अभद्र शिव्या रवी च्या अंगावर धावून गेला . प्रीती ची आई मध्ये आली तिलाही त्याने बाजूला ढकलून लावले . प्रती मध्ये आली तिलाही बाजूला ढकलून लावले व रवी वरती धावून आला ....

प्रीतीला ढकलून दिल्यावरती ती भिंतीला धडकली . थोडंसं रक्त आलं व ती बेशुद्ध झाली . बेशुद्ध प्रीतीला बघून आई घाबरली . तिने प्रीतीला शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न केला पण ती काही जागी होण्याचं नाव घेईना ... तिकडेही रवीला चांगला चोप मिळाला होता पण प्रीतीला बेशुद्ध पडलेला पाहून तोही घाबरुन गेला . सरतेशेवटी तिचा भाऊ भानावर आला . तिघांनीही तिला दवाखान्यात नेलं . फारसं रक्त वाहत नव्हतं तरीही दवाखान्यात जाईपर्यंत तिचा मृत्यू झाला होता . पुन्हा एकदा रवीला चक्कर येऊ लागली . पाताळाचा खोल गर्तेत तो कोसळू लागला . आणि पुन्हा एकदा त्याला जाग आली . समोर प्रीती होती आणि तो त्याच्या खोलीत होता..... Time loop पुन्हा एकदा रीवाइंड झाला होता . रवीला कळून चुकलं होतं प्रीतीचा मृत्यू हा time loop rewind करत होता.