Mitra my friend - 9 books and stories free download online pdf in Marathi

मित्र my friend - भाग ९

पुन्हा रस्सीखेच.. " तुमच्या लफड्यात मला कशाला मध्ये ओढता... जा ना तू एकटी... ",अजूनही विवेक त्याचा हात सोडवू शकला नव्हता.

" तुला यावंच लागेल... समजलं ना.. " प्रिया मोठयाने ओरडली. तिचा आवाज ऐकून अनघा दुकानातून बाहेर आली.

" कुठे चालली आहेस ? ",

" दिल्लीला.. ",

" कशाला एवढ्या लांब.. " अनघाचा लगेच दुसरा प्रश्न..

" त्याचा एक काम असा... दिल्लीक... तुका जाऊचा असा काय दिल्लीक... " संदीप " वेगळ्या " भाषेत बोलला.

"मग दादाला काय झालं... ",

"याला बोलते कि चल ना माझ्यासोबत... मी एकटी कशी जाऊ... तर नाटक करतो आहे.. " प्रिया रडक्या आवाजात बोलली.

" जाईल तो... थांब.... आईलाच सांगते.. म्हणजे तो नक्की तुझ्यासोबत जाईल... " अनघा धावत घराकडे निघाली.

" और ये लगा ... six " संदीप ओरडला.. झालं... आता आईला कळलं तर जावंच लागेल. काहीतरी कारण शोधावं लागेल..

" प्रिया हात सोड.. मी नाही पळत कुठे... ",

" प्रॉमिस ??? " ,

" हो माझी आई.... प्रॉमिस... " प्रियाने हात सोडला.

" हे बघ.. दिल्ली काही जवळ नाही... शिवाय ट्रेनने खूप वेळ लागेल तिथे पोहोचायला. " ,

" there is that aeroplane... " संदीपचं इंग्लिश.. त्याकडे दुर्लक्ष करत विवेक प्रियाकडे पाहत होता.

" विमानाने जाऊ ना... " विवेक आता संदीपकडे रागाने पाहू लागला. संदीप उगाचच इकडे -तिकडे बघत , आपण काहीच बोललो नाही असं रिऍक्ट करत होता .

" तुम्ही दोघे ठार वेडे आहात.. विमानाने जाणे काय सोप्प वाटते का.. केवढा महाग प्रवास आहे तो... ",

" तुझ्या friend साठी एवढं सुद्धा करू शकत नाही का.. " emotional blackmail...

" तरीसुद्धा... तिकडंच काही माहित पाहिजे ना.... " आता प्रिया खरंच गप्प झाली..विवेकचं बोलणं बरोबर होतं. तिथे जाऊन कुठे शोधणार केशवला...

" हालो... हा सँडी कशाला हाय मग.. आपुन तो जाता रहता हे दिल्ली... " संदीप बोललाच.. तसे दोघे त्याकडे बघू लागले. " हो... आमच्या ऑर्डर असतात दिल्लीवरून ... महिन्यातून एकदा तरी जातो मी... " प्रियाचा चेहरा खुलला.

"बरं झालं.. संदीप घेऊन जाईल तुला... ",

" तो का घेऊन जाईल... त्याला आपण घेऊ सोबत... " प्रियाने परत विवेकचा हात धरला.

" मी कशाला आता.. " ,

"तू पाहिजेच मला.... " ,

" you have to.. " संदीप हसत म्हणाला. " मी सुद्धा कधी विमानाने प्रवास केला नाही.. विवेक मुळे मला विमानाचा प्रवास होणार... देवा !!! " संदीप हात जोडत म्हणाला.

" ओ मिस्टर ... कोणी जात नाही आहे विमानाने... ट्रेननेच जायचे आहे... आणि आता मला सुट्टी पण नाही मिळणार.. समजलं ना... २-३ महिन्यानंतर बघू.. दिल्लीच... " प्रियाला आला राग..

" आजच जायचे आहे ... आत्ताच जायचे... नाहीतर मी पुन्हा आत्महत्या करायला जाईन... " यावर मात्र संदीप आश्चर्यचकित झाला.

" पुन्हा म्हणजे... या आधी कधी केलास प्रयन्त... " याला आताच गप्प केलं पाहिजे..

" काही नाही... मस्करीत बोलली ती... " संदीपचं वाक्य मधेच तोडत विवेक बोलला. " जाऊया बाबा... जाऊया.. त्यासाठी मुंबईला जावेच लागेल.. ऑफिस मध्ये सुट्टीच लेटर टाकावं लागेल... आणि मुंबईवरूनच विमान पकडावं लागेल.. ",

" कित्ती छान आहेस रे तू... " प्रियाने जोराचा गालगुच्चा घेतला विवेकचा...

" अजून एक... सगळ्यांचे पासपोर्ट लागतील... आहेत का ... ? " विवेकने संदीपकडे पाहिलं...

" पासपोर्ट... आता कसले पासपोर्ट... आमच्यावेळेला असायचे पासपोर्ट..... ",

"आहे का सांग... ",

" पासपोर्ट लहानपणीच काढून ठेवला आहे... समाजलाव काय " कधी सुधारणार हा... त्याकडे दुर्लक्ष करत प्रियाला विचारलं...

"तुझं काय ? ",

"आहे माझा पासपोर्ट... केशवनेच सांगितलं होता.. २ वर्षांपूर्वीच काढला.. " ,

" पण तुझं तर सगळं सामान चोरीला गेलं ना.. आता नसेलच तुझाकडे ना.. ", प्रियाच्या चेहऱ्यावर तर तसं काही नव्हतं...

" हीच तर खरी गंमत आहे... १० दिवसापूर्वीच... आमच्या ऑफिस मध्ये सगळ्यांचे ओळखपत्र बनवण्यासाठी काही कागदपत्र घेतली होती... मी माझं पासपोर्ट दिलं आहे... अजूनही ते ऑफिस मधेच असेल... मज्जा ना.. " प्रिया आनंदाने उड्या मारू लागली. आता काहीच पर्याय नाही.. जावेच लागेल..

" चला ... मग... तयारी करू.. " ,

" you have to.." संदीप सवयी प्रमाणे मधे बोलला. " माझी ऑर्डर पण आहे,.... घेतो सामान सोबत... ",

"अरे पण ... पहिलं मुंबईला जायचे आहे... ",

" हा चालेल ना.. मला काहीच प्रॉब्लेम नाही ... मित्रांसाठी काही पण " विवेकने एकदा त्रासिक नजरेने दोघांकडे बघितलं.

" ठीक आहे.. काय ती लवकर तयारी करा... आजचं रात्री निघू मुंबईला... " प्रिया आनंदात, संदीप विमानाने जायला मिळणार म्हणून खुशीत... आणि विवेक... एक सोडून दोघे-दोघे त्याच्या सोबत म्हणून tension मधे... पण मैत्री खातर तरी केशवला शोधावं लागेल.. याच विचारात... संध्याकाळी तयारी करून... सामान बांधून संदीप ,प्रिया सोबत मुंबईकडे रवाना झाला विवेक.

=========== क्रमश : ================