Mitra my friend - 7 books and stories free download online pdf in Marathi

मित्र my friend - भाग ७

४ वर्षांनी येत होता तो. किती बदल झाला .त्यात गेल्या वर्षीच घराची डागडुजी केली होती, विवेकनेच तर पैसे पाठवले होते. ते घर आता कसं दिसते ते बघायला विवेक उत्सुक होता.. घराजवळ पोहोचला तेव्हा वेगळाच नजारा. जरासं तुटक घर... आता एक मजली झालं होतं. व्वा !!! कमाल केली यांनी... घराचा आकार सुद्धा वाढवला.. आजूबाजूला झाडे देखील लावली होती. एकदम कायापालट... अनघा तर त्याच्या आधीच धावत घरी पोहोचली होती.. अनघा, आई एकत्र दारात उभ्या होत्या. विवेकलाही आईला बघून बरं वाटलं. डोळ्यात पाणी आलं दोघांच्या.. गळाभेट झाली. पाया पडून झालं. अनघा तितक्यात जाऊन आली कुठेतरी. विवेक घर न्याहाळत होता. किती सुधारणा केली... सुरेख अगदी.. आणि आई... विवेक कडे डोळे भरून पाहत होती.

" वाळलास रे बाळा... जेवतोस कि नाही... " विवेक हसायला लागला. टिपिकल प्रश्न ना.. ... या आईंना , त्यांचा मुलगा ... नेहमी बारीक झालेलाच दिसतो.

" जेवतो पण काम जास्त असते ना.... मग झोप वगैरे... कमी.... काय करणार... आराम नाही मिळतं... " आई विवेकच्या बाजूला येऊन बसली.

" बस्स झालं आता काम... एव्हडं पण काम करू नये... ",

" पैसे.... त्यामुळेच तर आता चांगले दिवस आलेत ना... अरे हो... बाबा... ते कुठे दिसत नाही ते... ",

" तुझ्या ताईकडे गेले आहेत..४-५ दिवसांसाठी... ",

" ताईलाच फोन करून आले आता... बाबांना घेऊन येईल ती दुपारपर्यंत... " व्वा !! सगळी तयारीच केली यांनी.

" कशाला बोलवायचे... आराम करायला गेले ना ते... आणि मी सुद्धा निघणार आहे संध्याकाळ पर्यंत.... " यावर अनघा आणि आई, दोघींचे चेहरे बघण्यासारखे झाले...

" आता नाही आलास आणि लगेच निघालास.. " अनघाने रागात विचारलं.

" मला वाटलं कि कायमचा आलास... " आई...

अरेच्या !!! हे काय... मी कधी बोललो यांना, मी जॉब सोडून आलो ते.

" तुमचा काही गैरसमज झाला आहे... माझं काही काम होतं म्हणून आलो होतो... आजच निघायचं आहे मला... ",

" मग हे कशासाठी केलं आहे...तुझ्या लग्नासाठी हे घर नव्याने बांधलं ना... बस्स झालं काम ते... इथेच बघ नोकरी जवळपास... " विवेकला काय बोलवं सुचत नव्हतं. माझ्याकडे पैसे मागून यांनी माझ्यासाठीच घर बांधलं... माझ्या लग्नासाठी.. मला न कळवता... wow !!! ...

" अनघा, त्याची बॅग ठेव जा.. वरच्या रूममध्ये... मी जेवणाच्या तयारीला लागते... विवेक.. जरा अंघोळ वगैरे करून ये... " आई किती आनंदात... चेहऱ्यावर दिसत होता नुसता.

विवेक अंघोळ करून तयार झाला. अनघा आणि आई जेवणात मग्न... काय करणार आता... प्रियाची आठवण झाली अचानक त्याला..

" आई !! .. मी येतो जाऊन पटकन.. ",

" वेळेवर ये रे... गरमा गरम जेवण करून देते तुला... " विवेक तडक संदीपच्या दुकानाकडे निघाला. दुकानात पोहोचला तर संदीप,प्रिया... दोघेही गायब.. " जेवायला गेलेत साहेब... " तिथल्या एका नोकराने सांगितलं. शेजारीच घर.. विवेकने आत डोकावून पाहिलं. प्रिया मॅडम जेवत होत्या. संदीप सोबत होताच. विवेकला बघून आत बोलावलं त्याने.

" जेवणार का साहेब... ",

" नको, थँक्स...जेवलो असतो पण आज आईच्या हातचं जेवायचं आहे... या मॅडम ला वाढ.. भूक लागली असेल.. गेले काही दिवस माझं डोकंच खाते आहे ना... " ,

" ये दाखवते तुला... " प्रिया तोंडातल्या घासासहित बोलली. त्यावर हसले दोघेही...

" तू जेव सावकाश.. आणि पोटभर जेव.. " विवेक प्रियाला म्हणाला. आणि संदीपला घेऊन घराबाहेर आला..

" संदीप... केशव बद्दल काही माहित आहे का तुला... ",

" तो आलेला भेटायला.. ",

" मग काही बोलला का ? " यावर संदीप विवेककडे पाहू लागला.

" तुला का एवढया चौकश्या... तो तर प्रियाचा बॉयफ्रेंड आहे ना.. तू पण प्रेमात पडलास कि काय त्याच्या... देवा !!! " संदीपने मस्करीत डोक्यावर हात मारला. काही सुधारणार हि बाल-बुद्धी...

" ओ काका... ती सध्या तुमच्या घरात जेवत बसली आहे ना.. तिच्यासाठी चालू आहे हे सगळं..... समजलं " विवेक रागात बोलला.

" अरे !! मस्करी केली यार... केशव बद्दल जास्त माहिती नाही... फक्त तो त्या दिवशी खूप घाईत होता... बघ ना.. प्रियाला पण माहिती नाही तो इथे आलेला ते... " ,

" मग आता काय करायचं.. ",

" आधी सांग... प्रियासोबत कसा तू... तू तर मुंबईला असतोस ना.. "

" ती मोठी गोष्ट आहे... ती सांगीन नंतर... प्रिया मुंबईत भेटली, केशवसाठी आलेली... तिथे कळलं केशव इथे, घरी आला. ... म्हणून इथे आलो.... इथेही केशव नाही.. " विवेक पटापट बोलला.

" हम्म ... किती दिवस आहेस तू.... ",

"आजच निघणार होतो.. आईने थांबवून ठेवले... बघू, जमलं तर उद्या सकाळी निघीन... ",

" चालेल.. तोपर्यत मी केशवबद्दल सांगीन तुला... त्याचे ओळखीचे आहेत चार-पाच जणं.. त्यांना विचारून बघतो.. आणि प्रियाचं काय... ",

" काय म्हणजे ? " ,

" आल्यापासून इथेच आहे.. तिच्या घरी जाणार कि नाही ... काही कळत नाही.. ", संदीपच्या या प्रश्नावर विवेक विचारात...

" तुला बोलली का ती... घर सोडून आली आहे ... " ,

" very good... आता काय हिला माझ्याच घरी ठेवू का.. " विवेक डोक्याला हात लावून उभा..

" थांब रे जरा ...विचार करू दे..... " विवेकला काय करावं कळेना... " मी आता जेवून येतो.. तोपर्यत राहू दे इथे.. " म्हणत विवेक स्वतःच्या घरी आला.

घरी आला स्तोवर बाबा आणि मोठी बहीण आले होते. सगळयांना आनंद. एकत्र जेवले सगळे... एवढ्या वर्षांनी विवेकला घरचे जेवण मिळालं. पोटभर जेवण.. खूप गप्पा-गोष्टी बहिणी -वडिलांसोबत... बोलता बोलता कधी झोप लागली ते कळलंच नाही. अचानक एका आवाजाने जाग आली. घड्याळात बघितलं तर दुपारचे ३:३० वाजत होते. बाहेर कोणीतरी मोठयाने बोलत होतं... आवाज ओळखीचा.... प्रिया !!... बापरे... इकडे कधी आली हि... विवेक डोळे चोळत पटकन बाहेर आला. प्रिया आलेली , विवेकच्या बहिणीसोबत गप्पा सुरु होत्या. लहानपणीच्या मैत्रिणी सगळ्या, विवेक सगळ्यांकडे पाहत होता. हसण्या-खेळण्यात सगळे दंग झालेले.... काय ना.... दोन दिवसापूर्वी हि मुंबईत आत्महत्या करण्याचा प्रयन्त करत होती, यावर कोणी विश्वास ठेवेल का...केशवचा सुद्धा लवकर पत्ता लागायला हवा ना... विवेक मग गावात फेर-फटका मारायला निघाला... गावात फिरून गावाचे "गावपण" समजून घेत होता.

=========== क्रमश : ================