Julale premache naate - 15 books and stories free download online pdf in Marathi

जुळले प्रेमाचे नाते - भाग-१५

"वाह, प्राजु मस्त हा रोमान्स आणि हम्म..." प्रियांकाने डोळा मारतच बघितल. "रोमान्स तर हवाच ना.... जसा तुमचा तसा माझा" मी देखील लगेच रिप्लाय दिला. माझ्या बोलण्यावर मात्र सगळेच हसले. पण काही बोल हा प्राजु तुझ्या लाईफमध्ये तर लव्ह ट्रँगल आहे. यावर मात्र मी स्वतःचे दोन्ही हात बाजूला वर करून..,"मी तरी काय करणार" अस दाखवलं.

"जाऊदे तु पूढे सांग मला ऐकायचं आहे की, अजुन काय काय झालं ते." वृंदाच्या या वाक्यावर दोघीनी माना डोकावून संमती दर्शवली.


तर आदल्या दिवशी भटकंतीला गेलो नाही; म्हणून मीच सकाळी लवकर उठून फ्रेश झाले आणि सर्वांना उठवायला गेले. आधी हर्षुच्या रूममधून गेले. दार वाजवुन माझाच हात दुखायला लागला, पण पोरगी काही उठायला तय्यार होत नव्हती. शेवटी कंटाळुन मी राजच्या रूममध्ये गेले. माझ्या एका हाकेनेच तो उठला आणि त्याने दरवाजा उघडला.


"बोला मॅडम एवढ्या सकाळी काय काम काढलं माझ्याकडे..??" तो आळस देत बोलता झाला. "अरे ते काल गेलो नाही ना भटकंतीला म्हणून उठवायला आले होते." मी एक मोठी स्माईल देत म्हटलं.
मी हसतच त्याला गुड मॉर्निंग विश करत निशांत ला उठवायला गेली. निशांतच्या रूमचा दरवाजा ठोठावणार होते की, त्याचा दरवाजा माझा हात लागताच आत ढकला गेला. वाटत रात्री विसरला असावा लावायला. असे स्वतःशी बोलत मी आत गेले. हा चांगलाच लोळत बेडवर झोपला होता.

मी आत जाताच त्याला उठवायला लागले. पण हा काही उठायला तय्यार होत नव्हता. मग मी त्याच्या कानाकडे जाऊन जोरात ओरडले... "निशांत उठ.....सकाळ झालीये." माझ्या आवाजाने तो ताडकन उठुन बेडवर बसला. त्याच्या चेहऱ्याकडे बघून मला चांगलंच हसु येत होतं. मी हसतच त्याच्या बाजुला बसले. तो परत चादर डोक्यावर घेऊन बेडवर आडवा झाला, म्हणुन मी त्याला ओरडतच त्याच्या डोक्यावरील चादर काढायला गेली... "निशांत यार उठ ना.. काल तुझ्यामुळे गेलो नाही आहोत. आज तुझ्यामुळे परत उशीर होईल हा." पण हा काही उठायला तय्यार दिसत नव्हता.

"ठीक आहे तु रहा झोपून मी जाते राजसोबत. तसही काल त्याचा मुड खूपच खराब होता. आपण गेलो नाही म्हणुन.."
हे बोलून मी निघणारच होते की, निशांतने माझा हात धरला आणि मला त्याच्या जवळ खेचले.. ओढल्यामुळे मी त्याच्या अंगावर पडले... "हा काय बालिशपणा आहे निशांत......?"
काय बोललीस तु..?? राज सोबत जायचं आहे तुला...? मग मला कशाला बोलावलंस या पिकनिकला... कबाब मे हड्डी सारखं..! बोलायच होत तुला राजसोबत जायचं आहे. मी आई-बाबांकडून तुला परवानगी घेऊन दिली असती... जा मग आता त्याच्या सोबत.. मी थांबतो. नाही तर एक काम करतो हर्षल ला घेऊन बाहेर जातो. छान वाटेल ना आमचं कपल..?!!"... हे बोलताच का म्हाहित, पण माझ्या डोळ्यात टचकन पाणी तरंगल..... मी काही न बोलता स्वतःला त्याच्यापासून सोडवत निघु लागले.

त्याला ही जास्त बोलल्यासारख वाटलं म्हणून लगेच बेडवरून उठुन माझ्या मागे आला. पण तोपर्यंत मी माझ्या रूममध्ये निघून गेले होते. स्वतःच्या डोक्यावर हात मारून निशांत तय्यार व्हायला गेला. मी माझ्या रूममध्ये येऊन दरवाजा बंद करून घेतला आणि थोडे रडलेच. निशांतचे शब्द मनाला टोचत होते. परत फ्रेश होत मी खाली आले. खाली तिघेही माझी वाट बघत बसले होते. "चला मग नाश्ता करून निघुया आपण...," राजने सर्वांना नाश्तासाठी विचारल.

"हा., तुम्ही घ्या खाऊन मला भुक नाहीये...," अस बोलून मी मी बाहेरील गार्डनमधे जाऊन बसले. तिघेही नाश्ता करून बाहेर आले. निशांतने माझ्याकडे पाहिलं, पण मी माझी नजर फिरवली आणि हर्षु सोबत जाऊन गाडीमध्ये बसले.


बाहेर छान थंड वारा सुटला होता. गाडीमधून आम्ही एका डोंगरावर जायला निघालो. गाडी हळूहळू डांबरी रस्तासोडुन पायवाटेला लागली. काही अंतरावर राजने गाडी थांबवली.
"आपल्याला इथुन पुढे चालत जावं लागेलं..आम्ही तिघे गाडीबाहेर आलो. आम्ही सर्वे ट्रॅक पॅन्ट, टिशर्ट आणि त्यावर हुडी.. तर खाली स्पोर्टशूज असे घालून तय्यार होतो. राज ने एका बाजुला गाडी लावली आणि स्वतःचा कॅमेरा घेतला.
"अरे वाह..!! तु कॅमेरा कधी आणल्यास".... मी आश्चर्याने त्याच्याकडे बघत विचारल.. "अग.., तो इकडेच असतो बंगल्यावर. इकडे आलो की आम्ही कधी बाहेर गेलो की, फोटो काढता यावेत म्हणुन ठेवला आहे."

सगळे चालत जात होतो. त्या लाल मातीवरून जाताना आजूबाजूचं गवत पायाने बाजुला करत आम्ही पुढे निघालो. आमच्या पायाचा स्पर्श त्या गवताला होत होता, तस त्यावरील छोटे किडे, बेडुन बाजुला उडी घेत. हे मला बघून गंमत वाटत होती. तर हर्षु मात्र चांगलीच कंटाळत होती.... "काय यार भाई...! तुला म्हाहित आहे ना मला नाही आवडत अशा जागा. तूच जायचं होतस ना आम्हाला कशाला घेऊन आलास." "ए हॅलो.., मला आवडतं हा अस निसर्गात रमायला. काही तरी नवीन शोधायला." मी हर्षुच वाक्य तोंडतच बोलले...

खर तर ती नव्हती येणार पण निशांत होता म्हणून ती आली होती. तीच अख्ख आयुष्य हे मुंबईतील सोकॉल्ड गार्डन मधेच गेलं, त्यामुळे तिला निसर्गाची गोडी कशी लागणार. फिरायला ही नेहमी भारताबाहेर जाण फिक्स असायचं. असो..., मी मात्र निसर्गात छान रमले होते. अशी पुढे चालत जात असता राजने आम्हाला मागे वळायला सांगितलं.... "गाईज मागे बघा." आम्ही मागे फिरलो तसा त्याने एक आमचा छान असा फोटो काढला. आता तो आजू बाजूच्या पक्षांचा.., फुलांचा फोटो काढत होता. मी आणि हर्षु चालत होतो. मधेच मला एका ठिकाणी सुंदर रानटी फुलं दिसली तशी मी पळत जाऊन ती स्वतःच्या ओंजळीत घेतली. छान सुगंध येत होता. "हर्षु इकडे ये, बघ या फुलांना मस्त सुगंध आहे...." पण घाबरत हर्षु काही आली नाही.

सकाळ झाली असली तरी काही पक्षी आपले घरटे काही सोडायला तय्यार नव्हते. कदाचित त्यांना ही या थंडगार हवेत अजून झोपायची इच्छा झाली असावी. या सर्वांत माझा बंगल्यावर खराब झालेला मुड कुठच्या कुठे निघून गेला होता. एकदम प्रसन्न वाटत होतं. आम्ही चालत पुढे गेलो. सुर्यदेवाने दर्शन ही दिले. काही वेळाने गावातील गावकरी आपल्या गुरांना चरायला घेऊन आलेले आम्हाला दिसले.

मग मी त्या काकांची ओळख करून घेतली..... "अहो काका तुम्ही कुठले...? रोज येता का इकडे गुरांना घेऊन...? त्या काकांना कळलं असावं आम्ही मुंबईतील माणस.. "व्हय तर.. रोज हयसरच येतंय घेऊन यांका...हय गवात बरा असता ना...! तुम्ही खयचे...? मुंबईतसून इलात काय.???" चाललात खय..???"
"हो आम्ही मुंबई वरून इलोत... हय डोंगर बघुक इलो आसव... कसा जायचा वर...? मी मला जमेल तशी मालवणी बोलत होते.... मला बोलताना बघून तिघेही अवाक झाले... मी त्या काकांसोबत बोलत असताना राजने माझे फोटो ही काढले. मी काकांना सांगून एका वासरुसोबत फोटो काढला... " चला काकांनु येतंय." काकांना बाय करून आम्ही पुढे निघालो...


"प्राजु काय ग...? मालवणी कधी शिकलीस..???" हर्षु ने लगेच प्रश्न केला. "अग माझे आजोबा इकडेच राहायचे कोकणात. मी जेव्हा गावी जायचे ते मला शिकवायचे मालवणी." "मग जायचं का आपण त्यांना भेटायला...??" राजने आनंदाने विचारलं. हे ऐकून एक क्षण मला वाईट वाटलं.. आणि माझा चेहरा गंभीर झाला... मागून निशांत बोलला.... "तिचे आजोबा आता या जगात नाहीत..." यावर हर्षुने मला मिठी मारली. मग काही वेळ मी शांत झाले.. ते बघुन निशांतला मात्र बरच वाईट वाटत होतं. कारण सकाळी त्याच बोलणं आणि आता अजोबांचा विषय..


पण काही वेळाने परत माझी अखंड बडबड चालू झाली. राज एक एक फोटो काढत होता..... आणि मला दाखवत होता. मी पण ते बघण्यात भारी रमले होते. मागे हर्षु निशांतसोबत बोलण्यात बिझी होती... त्या बोलण्यात निशांतला काही इंटरेस्ट नव्हता पण त्याच्याकडे दुसरा ऑपशन ही नव्हता, म्हणुन तो तिची बडबड ऐकत होता. या सर्वांत माझी आणि निशांतची नजरा नजर होत होती., पण मी माझी नजर दुसरीकडे वळवायचे.. कारण आज निशांतने मला खुपच दुखावले होते.

आम्ही चालत सगळे डोंगरावर पोहोचलो. दूरपर्यंत पसलेल्या डोंगररांगा.... खाली अजून ही झोपलेलं गाव. सगळं काही आम्हाला वरून दिसत होतं. समोर सूर्यदेव दर्शन देत होते. छान वाटत होतं तिथे. मी तो नजारा माझ्या नजरेत भरून घेत होती. काही वेळ आम्ही तिथेच बसून राहिलो. मग खाली जायचं म्हणून निघालो. मी आणि राज अजून ही पुढेच होतो तर हर्षु आणि निशांत मागे. मी चालत असताना अचानक एका दगडाला आपटले... पण जास्त काही न लागल्याने परत चालणं सुरू झालं.


बोलतात ना चढणं कठीण असत, पण उतरण सोपं तसच काही झालं. चढताना खुप वेळ लागला होता, पण उतरायला आम्हाला त्यापेक्षा ही कमी वेळा लागला. आम्ही लवकर खाली पोहोचलो.
चालत चालत अचानक हर्षु कशाला तरी अडकून पडली. तिला निशांतने हात देऊन उठवलं. पण तिला काही चालता येत नसल्याने निशांतने गाडीपर्यंत तिला उचलून घेतल. याचा का कोण जाणे पण मला मात्र प्रचंड राग येत होता. हे बघून मी लगेच जाऊन गाडीमध्ये बसले. स्वतःचे गाल फुगवुन. गाडी परत राजच चालवत होता. त्याच्या बाजुच्या सीटवर मी बसले होते, तर मागे निशांत हर्षुला सांभाळत होता. काही वेळाने हर्षुला झोप लागली आणि ती निशांतच्या खांद्यावर झोपुन गेली. हे मी माझ्या समोरच्या काचेमधुन बघत होते. याचा ही मला रागच येत होता.

शेवटी राग करण्याशिवाय दुसर काही नव्हतच म्हणा माझ्याकडे.. पण कळत नव्हतं राग का येत होता. पण त्याचा विचार सध्यातरी मला नको होता; म्हणुन मी बाहेर बघत बसले.
आम्ही काही वेळाने बंगल्यात पोहोचलो. सगळे उतरून आप-आपल्या रूममध्ये फ्रेश वाहायला गेला. फ्रेश होऊन मी एकटीच गच्ची मध्ये जाऊन बसले होते की, निशांत आला. त्याला बघून मी निघालेच होते. त्याने माझा हात पकडून मला थांबवले...


"हनी-बी....! सॉरी यार सकाळी जरा जास्तच बोललो.... कान धरून माफी मागतो.." तरीही मी काहीच बोलत नाहीये बघुन त्याने माझा हात धरला आणि मला खाली घेऊन आला..... "निशांत सोड मला... मला नाही यायच कुठेही... सोड माझा हात." "मी काही ही ऐकणार नाहीये गप्पपणे चल.." त्याने मला जबरदस्ती गाडीत बसवले आणि मला घेऊन गेला..... "आता काय आहे नवीन...!" अशा भावाने मी त्याच्याकडे पाहिलं... काही वेळाने आम्ही एका हॉटेल मध्ये पोहोचलो.. ते एक मालवणी हॉटेल होत. मी हॉटेल बघत खाली उतरले...


"इकडे कशाला घेऊन आला आहेस..., निशांत..??" मी हॉटेलची पाटी वाचत विचारल.. "तु चल ग सोबत." मला ओढतच तो आत घेऊन आला. एका टेबलावर आम्ही बसलो. एक वेटर आमच्याकडे आला. मेनुकार्ड आणि पाणी देऊन गेला... "काय मग मॅडम...!! काय खाणार..?" मी काहीही बोलत नाही बघून त्यानेच काही तरी ऑर्डर केले. काही वेळाने जेवण आले... "निशांत घरी आपलं जेवण बनवल असेल.... तु मला इकडे का घेऊन आला आहेस...??"


"डोन्ट वरी घरी मी सांगून आलो आहे की, आपण बाहेर खाऊन येणार आहोत." "बर पण त्या दोघांना ही घेऊन यायच होतस ना." "मॅडम डेट वर दोघेच येतात ग्रुप घेऊन नाही." आणि जोर जोरात हसायला लागला. या जोकवर मला काही हसु आला नाही. छान मालवणी बेत होता.. कोंबडी-वडेची थाळी.

जेवण जेवुन आम्ही निघालो.... एका शॉपमध्ये गेलो जिथे याने काही खरेदी केली. काजू, लाडु, कोकम सरबत वैगेरे मालवणी पदार्थ...... तिथून एका साड्यांच्या शॉपमध्ये गेलो... तिथे त्याने तीन साड्या घेतल्या. त्यात एक डार्क गुलाबी आणि गोल्डन काठाची अशी साडी देखील घेतली., "ही कशी वाटते...??" त्याने मला विचारलं.. " सुंदर..! छान आहे." मला ही आवडली ती साडी. "हे सगळं तर मुंबईमध्ये ही मिळत मग इथे कशाला घेतलंस," मी त्याला प्रश्न केला... "छान आहे प्रश्न, पण काय आहे ना इकडचे लोकं फक्त एखाद्या सणाला दुकानात जाऊन शॉपिंग करतात. पण आपल्या सारखे मुंबईतील लोकांनी कधी गावी शॉपिंग केली तर काय वाईट आहे नाही...!!" हे ऐकून मला ही छान वाटलं. मग तिथून आम्ही घरी जायला निघालो. पण एका वाटेत निशांतने दुसरीकडे गाडी वळवली....

"अरे.., आता काय झालं...?? घरी जायचा रस्ता उजव्या बाजूच्या होता... तिकडे का घेऊन आलास...??" "तु थांब तुला काही दाखवायचं आहे..," एवढं बोलून तो गाडीमधून उतरला. "मी बोलवायला स्वतः येईल तोपर्यंत तु खाली उतरायचं नाहीस." एवढं बोलून तो गेला ही. मी एकटीच त्या गाडीत त्याच्या बोलावण्याची वाट बघत बसले.


काही वेळाने तो परत आला... "चला मॅडम उतरा खाली.. मी खाली उतरताच त्याने माझ्या डोळ्यांवर आपले हात धरले.. "आता हे काय नवीन." "तु चल.." हळूहळू चालत आम्ही समुद्रावर आलो. पायाला वाळूचा होणाऱ्या स्पर्शाने आणि दूरवरून ऐकू येणारा समुद्राच्या लाटांचा आवाज...

त्याने मला एका ठिकाणी उभं करत माझ्या डोळ्यावरील हात काढले. समोरच दृश्य बघून एक क्षण मला कळलंच नाही की काय करू....माझ्या समोर वाळूमध्ये त्याने एका मोठया हार्टमध्ये "सॉरी" हा शब्द लिहिला होता... आणि अजून कमी म्हणून की काय, निशांत माझ्यासमोर गुढग्यावर बसुन माझी माफी देखील मागत होता. हे सगळं बघुन नकळत माझ्या डोळ्यात आसवं जमली. त्याला उठवत मी त्याला मिठी मारली.... त्याक्षणी तो देखील रडला. परत परत त्याने माझी माफी मागितली. "सॉरी.., हनी-बी मला माफ कर... मी परत तुझं नाव कधीच कोणा सोबत जोडणार नाही. तुला प्रॉमिस करतो मी." एवढं बोलुन तो देखील एखाद्या लहान मुलासारखा रडु लागला..

"ए पागल.., तु रडताना कसला भारी वाटतोस.... जास्त रडु नकोस मी प्रेमात पडेल तुझ्या.." हे बोलताच त्याच्या चेहऱ्यावर छान कळी खुलली... सोबत आणलेल्या मोबाईलमध्ये आम्ही छान फोटो काढले.. फोटो काढून आणि आम्ही परत घरी जायला निघालो. घरी पोहोचताच राज आणि हर्षुने आम्हाला गाठलं..." गाईज होतात कुठे तुम्ही.... किती वाट बघावी लागली आम्हाला." "अरे इथेच होतो." निशांत मला बघून बोलत होता. त्याच्या बोलण्याने माझ्या गालावर छान अशी लाली आलेली. तो लाजरा चेहरा घेऊन मी वर गेले. परत खाली आले तर निशांत ही बसला होता. सोबत आणलेल्या वस्तु तो राज आणि हर्षु ला दाखवत होता.

"आम्ही ना एका दुकानात गेलो होतो, तिकडून मी माझ्या आजी, आई आणि एका खास व्येक्तीसाठी साडी घेतली आहे." खास व्येक्तीवर त्याचा जरा जास्तच जोर होता. खास व्येक्ती ऐकताच हर्षु जरा लाजली. राजने मुद्दामच त्याला प्रश्न केला.... "कोण आहे ती "खास व्येक्ती" म्हणजे आम्ही ओळखतो की, आम्हाला अजून म्हाहितीच नाही... कुठे असते ती.." त्याने डोळा मारतच प्रश्न केला.

"हो हो सांगेल.. एकदा का आपण मुंबईला गेली की, सर्वांना कळेल की कोण आहे ती स्पेशिएल व्येक्ती. डान्स कॉम्पेटेशन नंतर तिला मी प्रपोस ही करणार आहे ही साडी देऊन." या वाक्याला त्याने हर्षुकडे पाहिलं... आणि माझ्या चेहऱ्यावरचा सगळा आनंद कुठच्या कुठे पळाला. मला वाटलं की, निशांतला हर्षु आवडू तर लागली नाही ना.. पण त्यात काहीच चुकीचं नव्हतं. तेच तर ठरलं होतं. आपण फक्त डान्स पार्टनर आणि मैत्रीण होतो बाकी काही नाही. असा विचार करत मी बाजूच्या सोफ्यावर जाऊन बसले.

जेवणाची वेळ झाली म्हणून आम्ही जेवुन घेतलं. मी बाहेर गार्डन मध्ये बसले असता निशांत आला.. त्याचा मोबाईल पुढे केला.." घे बोल.."... मी प्रश्नार्थक चेहऱ्याने मोबाईल घेतला आणि कानाला लावला.. दुसऱ्या बाजुला आजोबांचा आवाज ऐकून छान वाटलं... "काय प्राजु बाळा कशी चालू आहे पिकनिक..??" "आजोबा कसे आहात..??" छान चालू आहे पिकनिक." "मी एकदम मस्त आहे बघ. तुझ्यासाठी नवीन झाडं घेऊन ठेवलीत आलीस की ये इकडे आपण लावुया." माझं आणि आजोबांच छान बोलणं चालू असता हर्षु आली..

"कोणाशी बोलते आहे प्राजु..?" "अरे ती माझ्या आजोबांशी बोलतेय.." निशांतने माझ्याकडे बघत उत्तर दिलं. त्याच्या या वाक्यावर हर्षु मात्र चांगलीच रागावली. काही वेळाने गप्पा मारून मी कॉल ठेवला. माझ्या चेहऱ्यावर छान स्माईल आली होती. हे बघुन निशांतच्या ही चेहऱ्यावर स्माईल आली. पण हर्षु मात्र चांगलीच रागात दिसत होती. मी जवळ येताच ती निघून गेली.. "अरे हिला काय झालं..??" अशी का निघून गेली..??" मी निशांतकडे बघत विचारल. त्याने स्वतःचे हात वर करून म्हाहित नाही बोलला.

"थँक्स निशांत.. आजोबांशी बोलून छान वाटलं." मग थोडा वेळ बोलून आम्ही आमच्या रूममधे निघालो. मी माझ्या रूममधे बसले होते आजचे फोटो बघत. सगळे फोटो छान होते.. एक फोटो होता त्यात निशांत माझ्याकडे बघत होता आणि मी समोर कॅमेरामध्ये... "हा नेहमी माझ्याकडेच बघत असतो.. मी काय कॅमेरा आहे का..??" या वाक्यावर मी हसत होते पागल सारखी. तोच माझ्या रूमचा दरवाजा कोणी तरी ठोठावला... दार उघडलं तर समोर हर्षु.. ती मला धक्का मारून आत आली...


"प्राजु जरा बोलायच आहे. महत्त्वाचे आहे. म्हणून आताच आले." मी जरा घाबरतच तिला विचारल.... "हा.., बोल ना काय झालं..??" "तुझी आणि निशांतच्या आजोबांची ओळख कशी काय.???" आता माझ्याकडे काही ऑपशन नसल्याने मी तिला सगळं सांगायला सुरुवात केली.. निशांतच माझ्याकडे मदत मागन... त्यानंतर त्याच्या घरी जाण.. तिकडे आजोबांची ओळख.. नंतर त्याचे आजोबा आणि माझे आजोबा मित्र होते हे कळण... मी सर्वकाही तिला सांगून टाकलं... माझ्या प्रत्येक वाक्याला तिचा राग आणि संताप वाढत होता.. माझं बोलणं संपल्यावर तिने माझ्याकडे एक रागाने कटाक्ष टाकला.


"प्राजु तुम्ही फक्त मित्रच आहात ना..??.. नाही काय आहे ना.. तेच बेस्ट आहे तुझ्यासाठी... तु माझी बेस्ट फ्रिएन्ड आहेस म्हणून मी काहीच बोलत नाहीये आणि करत ही नाहीये.. नाही तर आतापर्यंत खुप काही केलं असत.. तु अस समजु नकोस की, मला काहीच दिसत नाहीजे.., तुझं आजकाल जे निशांतच्या मागे पूढे करण आहे ना ते थांबवायचं.., कळलं ना.... काय आहे ना मी माझ्या आयुष्यात मला हवं असलेलं मिळवतेच... निशांत फक्त माझा आहे एवढं लक्षात ठेव... आणि जाऊ लागली.. परत मागे फिरत तिने एक वाक्य पूर्ण केलं.. " तु त्याच्या पासुन दूर रहा नाही तर तुमची मैत्री देखील तोडायला मागे पुढे बघणार नाही... आणि अजून एक ती साडी माझ्याचसाठी असेल हे लक्षात ठेव." आणि रागात निघून गेली.


या सर्वावर मी काय रियाक्त होऊ हेच मला माझं कळत नव्हतं. आज माझी बेस्ट फ्रिएन्ड खुप काही बोलून निघून गेली होती. एवढं वाईट बोलावं आपल्याच जवळच्या व्येक्तीने.. मी बेडवर पडून विचार करत होते.. काय होऊन बसलय सगळं.. हर्षु माझ्यावर चिडत आहे. तिकडे निशांतला ही कदाचित हर्षु आवडू लागली आहे असेच वाटतंय.. कारण त्याने ते वाक्य हर्षुकडे बघून म्हटलं .. मग यासर्वात मला का त्रास होतो आहे.. निशांतला हर्षु आवडत आहे तर मला का वाईट वाटतय.. याच उत्तर मात्र मला सापडत नव्हतं.

या पिकनिक मध्ये माझं आणि निशांतच नातं नव्याने फुलत होत तर...,इकडे माझं आणि हर्षुच नात मात्र खराब होत होतं. एक मैत्रीचं नाते तर दुसरं मैत्रीच्या पुढचं.. दोन्ही नाती मला हवी होती., पण नियतीने मात्र वेगळच काही लिहून ठेवल होत माझ्या आयुष्यात.. यासर्वांचा विचार करतच मी झोपी गेले..

to be continued........