Prema tujha rang konta..- 2 books and stories free download online pdf in Marathi

प्रेमा तुझा रंग कोणता... - २

प्रेमा तुझा रंग कोणता...- २

रोहित आणि गिरीजा आपापल्या आयुष्यात बिझी झाले... एक दिवस...रोहित त्याच्या कंपनी मधल्या मित्रांसोबत हॉटेल मध्ये गेला..... तो हॉटेल च्या बाहेर पडत असतांना समोरून गिरीजा तिच्या मित्रांबरोबर हॉटेल मध्ये शिरतांना त्यानी पाहिलं..... रोहित नी तिला पाहिलं आणि तो थांबला.. त्यानी त्याच्या मित्रांना पुढे व्हायला सांगितलं... आणि तो गिरीजा शी बोलायला गेला... गिरीजा समोर गेल्यावर तो म्हणाला..

“हे गिरीजा..आहे का ओळख?”

“हे रोहित ना...? हाय!”

“हो हो..रोहित! गुड यु रिमेम्बर मी! आणि आपण नेहमी योगायोगानेच भेटायचं का? आणि आपण फोन नंबर घेऊनही बोललो नाही कधी!”

“हाहा.." गिरीजा मनापासून हसली...."तू फोन केला नाहीस..आणि मला फोन करायला वेळ झाला नाही! आणि योगायोगानीच पण भेटतो आहे... ते महत्वाच!”

“अरे वाह! दिलखुलास हसतेस तू... गुड गुड!!! आणि काय करतेस सध्या? कुठे जॉब करतेस?”

“मी पण हसरीच आहे... आपण पहिल्यांदी भेटलो त्यादिवशी कोणतीच गोष्ट माझ्या मनासारखी होत न्हवती आणि तू मला धडकलास... मग माझी खूप चीड चीड झाली!!! तेव्हा चिडले म्हणजे मी सारखीच चिडत असते हे म्हणण साफ चुकीच होत तुझ!!! सध्या? हाहा! मी कुठेही जॉब करत नाही! पण जोरदार लिखाण चालूये..पेपर,मासिकात लिहिते! इंजिनीअरिंग केल पण जॉब न करता लिखाण करतीये...ऐकायला विनोदी वाटेल.. पण.... मला जॉब कधी करायचाच न्हवता! तू काय करतोस?”

“वाह! तू लिहितेस!!! भारी!!! ओह येस...मी परवा पेपर मध्ये पाहिलं होत तुझ नाव पण तीच तू असशील अस मला वाटलच नाही! म्हणजे एकाच नावाचे बरेच लोक असतात न त्यामुळे शुअर न्हवतो मी.... आणि खर सांगू का.. तू लिहितेस हे मी पूर्णपणे विसरूनच गेलो होतो! मी तो लेख वाचला पण लेख लिहिणारी तूच असशील अस खरच वाटल नाही! सॉरी! मी काही नाही...मनासारखा जॉब मिळालाय...एन्जॉय करतोय मनासारखं काम करण! तू सुद्धा मनासारखं काम करतेस.. नाइस!!”

“अरे डोंट बी सॉरी! इट्स ओके! आधी तुला कुठे माहित होत कि मी लिहिते? आय नो..एका नावाची हजारो लोक असतात... ती मीच हे तुला कळल नसेल हे मी समजू शकते!. डोंट थिंक अबाउट दॅट.... आणि बरोबर बोललास! मनासाख काम करता आल कि काम करतांना मजा येते! आणि ग्रेट! तू वाचलास माझा लेख! म्हणजे तुला वाचायची आवड आहे... आय थॉट.. तू अजिबातच वाचत नसशील!!!. तुला फक्त कामाची आवड आहे असच मला वाटत होत...”

“हे गिरीजा, कॅन यु डू मी अ फेवर?”

“हो...काय सांग कि!”

“तुझे लेख किंवा गोष्टी मासिकात किंवा पेपर मध्ये आल्या कि कॅन यु मेसेज ओर कॉल मी? तुझ्याकडे माझा नंबर आहे.. आहे ना? कि डिलीट केलास? मला तुझा लेख फार आवडला... तू खूप सुंदर लिहितेस... मला तुझे लेख आणि इतर लिखाण वाचायला नक्की आवडेल!!”

“नो नो.. नंबर डिलीट नाही केलाय! तुझा नंबर आहे माझ्याकडे... आणि थॅंक्स!!! मी नक्की तुला मेसेज किंवा कॉल करून तुला माझ लिखाण आल कि सांगत जाइन... आणि सांगायचं म्हणजे, ह्या महिन्यात मासिकात आलीये गोष्ट!”

“ग्रेट.. मासिकाच नाव सांग! मी घेतो ते मासिक विकत! आणि भारी ग! मला वाटल तरी मी लिहू शकणार नाही! हाहा!”

“अस नाही.. तू सुद्धा लिहू शकतोस... आणि तुला कामाची आवड आहे.. मला लिहिण्याची! बाकी काही नाही!! तुझी वाचून झाली गोष्ट कि रिपोर्ट दे बर का.... फक्त वाचून मासिक बाजूला ठेऊन देऊ नकोस!”

“नक्की.. वाचलं कि रिपोर्ट देतो! आणि तसहि तू मस्तच लिहितेस!!! आज परत योगायोगानी भेटून गप्पा झाल्या... नाइस मीटिंग यु! आता कधीतरी ठरवून भेटू..”

“ओके..आता मी जाते! मित्र थांबलेत खायला..”

“येस..मी पण जातोय बाहेर! माझे मित्र पण वाट पाहत असतील....”

“ओह... तुमच खाण झाल? आणि आम्ही आत्ता शिरलोय हॉटेल मध्ये! हाहा! भेटू असच”

“ओके..”

"आणि कधीतरी फोन किंवा मेसेज करत जा... इतकाही कंजूसपणा चांगला नाही! हाहा!"

"ओह माय गॉड... जस काही तू रोज १० मेसेजस आणि कॉल्स करत होतीस! हाहा!"

"हाहा.. टेक केअर!! होप टू सिया सून!!"

"सेम हिअर!! यु टू टेक केअर!!"

"बाय..."

इतक बोलून दोघ आपापल्या वाटेनी निघून गेले...पण त्यानंतर दोघांच बोलण एकदम वाढल.. गिरीजा न चुकता लेख किंवा गोष्ट आली कि रोहित ला सांगायला लागली! गिरिजाचे लेख किंवा गोष्टी वाचल्यावर रोहित न चुकता तिला अभिप्राय द्यायचा.. हळू हळू दोघांच भेटण चालू झाल.. त्यांच्यातली जवळीक वाढायला लागली.. आता दोघ एकमेकांना नीट ओळखायला लागले... आणि एक दिवस रोहित ला “साक्षात्कार” झाला,त्याच गिरीजा वर प्रेम आहे! त्याला गिरीजा आवडायला लागली...त्याला त्याच आयुष्य तिच्याबरोबर काढायचं होत... आणि रोहित ला ते लवकरात लवकर गिरिजा ला सांगायचं होत! पण रोहित नी ते लगेच सांगण टाळल.. बरेच दिवस दोघ भेटत राहिले..फोन वर त्यांच बोलण चालूच होत! पण रोहित तिच्याशी त्याच तिच्यावर प्रेम आहे ह्याबद्दल काहीच बोलला नाही! एका रात्री त्याला जाणीव झाली,आता लवकरात लवकर गिरीजा ला भेटून तो तिच्यावर प्रेम करतो हे सांगायला पाहिजे!! आता खूप दिवस थांबलो आणि आताच योग्य वेळ आहे अस वाटून आणि न राहवून त्यानी गिरिजाला सगळ खर सांगायचं ठरवलं...त्यानी गिरीजा ला भेटायला हॉटेल मध्ये बोलावलं...गिरीजा हि नकार न देता रोहित ला भेटायला आली..