Prema tujha rang konta..- 4 books and stories free download online pdf in Marathi

प्रेमा तुझा रंग कोणता.. - ४

प्रेमा तुझा रंग कोणता..-४

आधी प्रत्येक लेख आणि गोष्टीच भरभरून कौतूक करणारा रोहित एकदम बदलला... बदलला म्हणजे त्याचा कामाचा ताण इतका वाढला कि त्यातून त्याला वेळ मिळेनासा झाला... त्याला गिरीजा च लिखाण वाचायलाही वेळ नसायचा.. एक दिवस गिरीजा वैतागली आणि रोहित कडे गेली..रोहित नेहमीप्रमाणे काम करण्यात गुंग झालेला... त्यानी गिरीजा कडे पाहिलं देखील नाही.. ती लाडात येऊन रोहित ला म्हणाली,

“रोहित,काय करतोयस?”

“काम..दुसर काय करणार मॅडम..”

गिरीजा कडे न पाहताच रोहित नी उत्तर दिल... गिरीजा चिडली आणि बोलली,“सारख कामच करत बैस तू..रविवारी पण कसलं काम रे...”

“ऑफिस च.. हाहा!”

“काय वागण आहे तुझ? आणि सारखा सारखा हसू नकोस...” गिरीजा ची चिडचिड वाढत होती......

“का? मी काय केल? आणि का नको हसू?” गिरीजा कडे लक्ष न देता रोहित काम करत राहिला...

“ऐक...काम बंद करून माझ्याकडे बघून बोल..” रोहितला गुरकावत गिरीजा बोलली..

“ओके ओके... काम बंद करतो..." त्यानी लॅपटॉप बंद केला.." बोल काय म्हणती आहेस?”

“मी तुला मागे लिहिलेलं वाचायला दिल होत... ते कस लिहिलंय..काय बदल करू ते सांगितलं नाहीस.. तू काही बोलला नाहीस म्हणून मी ते मासिकाला दिल आणि ते मासिकात आलंय आणि ते पण तू वाचल नाहीस..? काय आहे हे वागण?”

“ओह.. गुड!! आणि अग,वेळ मिळाला नाही... मुद्दाम वाचल नाही अस थोडी करेन मी? मला माहितीये तू खूप सुंदर लिहितेस....” रोहित हसत बोलला..

“वेळ मिळाला नाही? वा वा! आणि प्लीज हसू नकोस..आधीच मी भयंकर चिडलीये...” गिरीजा च्या रागाचा पारा वर चढत होता..पण रोहित शांतपणे उत्तर देत राहिला...

“हो खरच वेळ नाही मिळाला... आणि इतकी का चिडलीस? मी पण कामच करतोय.. टाइमपास तर करत नाहीये ना? बाय द वे, तू माझ्यासाठी वेळ कधी काढतेस? मुद्दाम काढलेला वेळ? आठवतंय का?”

“तू बिझी असतोस आणि मी काहीच करत नाही का? मी पण बिझी असते.. कुठून देणार तुला वेळ?”

हे ऐकून रोहित हि एकदम चिडला... इतका वेळ रोहित शांत होता पण त्याला हि राग यायला लागला... आणि सुसंवादाच रुपांतर भांडणात व्हायला लागल...

“तुला वेळ नाही..मग माझ्याकडून कशी करतेस ग अशी अपेक्षा?” रोहित चिडून बोलला...

“मी लेखिका आहे...मला वेळ होत नाही.. तू काय जॉब करतोस..तू माझ्यासाठी थोडा वेळ काढू शकतोसच ना?”

“ओह हो..लेखिका...आणि मी जॉब करतो म्हणजे काहीच नाही? मला हि खूप जबाबदाऱ्या आहेत! मी काय फालतू काम करत नाही.. मी मोठ्या हुद्द्यावर काम करतो... मला खूप काम असत...खूप जबाबदारीच काम...”

“आहेच मी लेखिका...माझा लेख मासिकात आला कि लोक फोन किंवा मेल करून अभिप्राय देतात...त्यांना उत्तर द्यायची असतात...मला खरच वेळ होत नाही... इतकी लोकांना आपणहून बोलायचं असत माझ्याशी...त्यांना उत्तर दिलीच पाहिजेत ना...अनोळखी लोक आपणहून बोलतात आणि तू माझा नवरा असूनही एकदाही कौतुक करत नाहीस..”

“वेळ होत नाही.. आणि सारख सारख कौतुक काय करायचं? मला माहितीच आहे.. तू मस्त लिहितेस! आणि ते मी तुला किती तरी वेळा सांगितलं आहे... हल्ली काम वाढलय म्हणून वेळ नाही होत पण तू लगेच मी वाचतच नाही असा आरोप करू नकोस!”

“कौतुक नाही रे..पण २ चांगले शब्द बोलू शकतोस ना..पण नाही! तू आधी कसा होतास आणि आता कसा झाला आहेस! तू अगदी तुझ्या आई वडिलांसारखाच वागायला लागला आहेस... त्यांना पण मी केलेल्या कोणत्याही गोष्टीच कौतुक नाही... आणि त्यांच्या मनात असत म्हणे कौतुक...मनात असत मान्य पण बोलून दाखवायला नको का? कस कळणार समोरच्याला?”

गिरीजा च हे बोलण ऐकून रोहित भडकला...आणि आवाज चढवून बोलायला लागला..

“बास गिरीजा..माझ्या आई बाबांविषयी काही बोलू सुद्धा नकोस... त्यांना मध्ये आणायचं काहीही कारण नाहीये आत्ता! ते आहेत तसे आहेत.... आणि ते कधी तुला काही बोलत सुद्धा नाहीत.. त्यानी तुला कधी विरोधही केला नाही... माझी आई सुद्धा तुला काहीही त्रास देत नाही...आणि आपण दोघ बोलतोय आणि आत्ता त्यांचा संबंध सुद्धा नाहीये! माझ्या आई बाबांविषयी बोललेल मी खपवून घेणार नाही...”

“ठीके रे... मला कुठे हौस आहे त्यांच्याविषयी बोलायला...”

“बर झाल... बोलूच नकोस काही! जा तू तुझ्या फॅन्स ला उत्तर द्यायला... जे आहेत त्यांची तुला किंमत कधी कळणार नाही..” नेहमी हसतमुख असणारा रोहित त्या दिवशी मात्र भयंकर चिडला... आणि चिडूनच तो गिरीजा शी बोलला...

“ओके....” गिरीजा धुसपूस करत बाहेर निघून गेली...

गिरीजा आणि रोहित मध्ये एक प्रकारची दरी निर्माण व्हायला लागली.. दोघांमधला संवाद कमी व्हायला लागला.. दोघ कधी बोलले तर त्याचा शेवट भांडणानेच व्हायला लागला.. गिरीजाच लिहिण्यात लक्ष लागेनास झाल.. ती एक दिवस वैतागून बोलायला लागली..

“रोहित,आता बास रे..”

“काय बास...... मी काही बोललो देखील नाहीये... हल्ली मी तुझ्याशी कमीत कमी च बोलतो! उगाच भांडण नको... मला कामच पण टेन्शन असत.. त्यात आपली भांडणं नको! कामावर परिणाम नको व्हायला”

“काय? मी भांडते? तू अगदी धुतल्या तांदूळा सारखाच आहेस कि काय? अगदी कधीच भांडत नाहीस... असा असशील तर मला न्हवत ह माहित! आणि तू स्वताहून कधी भांडतच नाहीस ना?"

"मी कधीच भांडत नाही..."

"ओह.... आत्ता पण तूच भांडतो आहेस! मला आता रोजची भांडण सहन होत नाहीयेत.. वी नीड टू गिव्ह इच ऑदर सम टाइम.. आय नीड तो थिंक अबाउट अवर रिलेशनशिप... आधी कधीतरी भांडायचो.... पण आता सारखीच भांडण होतात आपल्यामध्ये! साध बोलण बंदच झालय...आणि रोजच्या भांडणामुळे मला माझ्या लिहिण्यात लक्ष केंद्रित करता येत नाहीये..मी डिस्टर्ब असते सारखी...”

“म्हणजे काय?”

“मी काही दिवस आई कडे जाऊन राहणारे.. मग मी पुढचा विचार करेन.. मला वाटत आपण आता वेगळ होण्याचा विचार करायला हवा..”

“मलाही तसच वाटतंय....रोज रोज ची भांडण मला हि सहन होत नाहीयेत... तू जाऊन राहा आई कडे... आपण एक महिन्यानंतर भेटू... आणि काय करायचं ठरवू..”मलाही आत्ता खूप महत्वाच प्रॉजेक्ट आहे.. मलाही शांतता हवी आहे... बर झाल तूच म्हणलीस कि आई कडे जाते! मी ते म्हणलो असतो तर भांडण चालू केल असतस..."

“गुड.. आपले हे विचार तरी पटले..गुड टू नो! आता मी आवरते सामान आणि थेट आईकडे जाते.. मला माझी कादंबरी पूर्ण करायची आहे.. डेड लाइन १ महिन्याची आहे...१ महिन्यात कादंबरी प्रकाशित करायची आहे... सो मला शांतता हवी आहे लिहायला..”

“ओके...”

इतक बोलून गिरीजा सामान आवरायला निघून गेली... आणि रोहित आपल काम करायला निघून गेला...