Julale premache naate - 23 books and stories free download online pdf in Marathi

जुळले प्रेमाचे नाते - भाग-२३

असेच दिवस जात होते. माझी आणि निशांतची आता घट्ट मैत्री झाली होती. वाटायचा तेवढा ही वाईट आणि खडूस तो नक्कीच नव्हता. राग यायचा पण माझ्यावर नाही... खुप काळजी घेणारा असा होता निशांत... आजकाल प्रॅक्टिस ही बंद होती माझ्या पायामुळे. बाकी कॉलेज, भेटणं चालूच होत. उद्या रविवार असल्याने मी निशांतच्या घरी जाणार होते.. तस मी आजोबांना प्रॉमिस जे करून आले होते. आम्हाला नर्सरीमध्ये जायचं होतं.


"निशांत.., तु येणार आहेस का उद्या आमच्यासोबत नर्सरीमध्ये..??" मी कॅन्टीनमध्ये बसल्या बसल्या विचारल.... "अरे यार.., मी तर पार विसरलो होतो. मला नाही जमणार वाटत, कारण मी बाहेर जाणार आहे कॉलेजच्या फ्रेंड्स सोबत." त्याने जरा नाखुषीनेच सांगितलं. मला ही वाईट वाटलं पण मग नंतर.., "जाऊदे आता काय करणार," अस स्वतःशीच बोलून मी क्लाससाठी निघून गेले.



आज काल हर्षु जरा विचित्र वागत होती. मधेच छान, तर कधी वाईट... झटका आल्यासारखी. मी जास्त लक्ष न देता स्वतःची बुक कंप्लेट करत बसले. लेक्चर्स संपवुन आम्ही घरी जायला निघालो. माझा पाय देखील बरा होत होता... घरी येऊन स्वतःचा अभ्यास पूर्ण करून आईला जेवणात मदत केली... "आई, उद्या निशांतच्या घरी जाते आहे. ते आजोबा आणि मी नर्सरीमध्ये जाणार आहोत." मी हातातलं काम करतच बोलले.


"हो ठीक आहे. जमल तर बाबा ही येतील असे बोलले आहेत. बघू मी पण आले तर येईन. जर काही काम नसेल तरच. " ती देखील माझ्याकडे न बघता हातातलं काम करत बोलती झाली.. "काय ग निशांत नाही का येणार आहे..??" तिच्या प्रश्नांवर मी जरा नाराजीनेच मानेने नकार दिला. "तो त्याच्या फ्रेंड्स सोबत बाहेर जाणार आहे. त्यामुळे नाही येणार बोलला." मी हात धुतले आणि एक नजर आईवर टाकुन मी हॉलमध्ये येत बोलले.. सोफ्यावर बसुन टीव्ही चालू केला.


तोच बेल वाचली.. मी उठुन उघडले तर बाबा समोर उभे.. "हॅलो बाबा, कसे आहात..?" मी बाबांच्या हातातील डब्यांची बॅग घेत विचारले. "थकलो ग जरा, आज ऑफिसमध्ये खुपच काम होत." ते आत येऊन सोफ्यावर बसुन बोलले. मी त्यांच्यासमोर पाण्याचा ग्लास धरला.. "थँक्स बेटा." त्यांनी ग्लासातल पाणी गटागट पिऊन टाकले.
"बाबा तुम्ही ठीक आहात ना.? ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम नाही ना.??" मी हातातलं ग्लास घेत विचारल. "नाही ग बाळा, ऑफिसची असतात तशीच टेंशन आहेत." आणि ते उठुन रूममधे निघून गेले.


रात्री आम्ही एकत्र जेवायला बसलो असता मीच विषय काढला.. "बाबा तुम्ही उद्या येणार आहात का..? मी आणि आजोबा जाणार आहोत नर्सरीमध्ये." मी जेवता जेवता विचारल. "हो, येणार आहे. आपण आपली गाडी घेऊन जाऊया का.??" त्यांनी विचारलं असता मी नको म्हटलं. "म्हणजे बाबा, आजोबा छोटा ट्रक घेणार आहेत." एक स्माईल देत मी बोलले. जेवुन मी स्वतःच्या रूमध्ये निघून गेले. निशांतला मॅसेज केला. तर त्याचा जाही रिप्लाय आला नाही. सो जास्त विचार न करताच झोपले.


मला तु आवडतेस हनी-बी... विल यु मॅरी........ येसssssss...... कुठे जातो आहेस. वाक्य पूर्ण तरी कर ना... आणि डोळे उघडले. जरा लाजतच मी उशील घट्ट मिठी मारली.. "प्राजु ग वेडी प्राजु.., हे फक्त एक स्वप्न होत.. आणि आपलं काही ही असत.. तस ही निशांतची "ती" आहेच. आणि त्यानंतर ती हर्षु....सो आपला काही नंबर लागणार नाहीये." मी स्वतःशी विचार करत बसले.. पण जर खरच निशांतने मला प्रपोज केलं तर.... मी स्वतःच्या डोळ्यांवर हात ठेवुन चक्क लाजले.. खरच अस झालं तर बरं होईल.. नकळत मी बोलून गेले.. "ये हनी-बी काही असत तुझं.., चल आता उठ आणि तय्यार हो." स्वतःशीच बोलत मी तय्यार होण्यासाठी गेले.



बाहेर आले तर आज बाबा एकदम तय्यारीत बसले होते.. शॉर्टस वैगेरे घालून. "गुड मॉर्निंग परी. जायचं आहे ना.. मी बघ मस्त तय्यार आहे जाण्यासाठी." स्वतःकडे हात दाखवत बाबा बोलले... "बाबा आपण सफारीचा नाही नर्सरीमध्ये जय आहोत." मी टेबलावर बसत बोलले. हे ऐकून आई ही हसली... "अग मी तर कधी पासून बोलते आहे यांना तर पटत नाहीये.., बघा आता तुमची लेक पण बोलली." हातातल्या ब्रेडला बटर लावत आई बोलली. बाबा जरा नजर झाले बघून मीच बोलले..., तस बाबा यात तुम्ही एकदम हिरो वाटतात हा.... एकदम मस्त." मी हाताची तीन बोट एकत्र करून चेहऱ्याजवळ करून एक डोळा मारत बोलले. हे ऐकून मात्र त्यांचा चेहऱ्या चांगलाच खुलला.


"आई ग तु येणार आहेस का..??" मी नाश्ता करत विचारल.... "नाही ग.., मला जरा काम आहे. मी तिकडे जाणार आहे. तुम्ही एन्जॉय करा." एवढं बोलून आई किचनमध्ये गेली. मी नाश्ता खात खातच मोबाईल चेक केला.. त्यात निशांतचे काल रात्रीचे मॅसेज होते. " हेय हनी-बी.., सॉरी हा. काल जरा कामात होतो.., म्हणून मॅसेज केला नाही.. गुड नाईट." एक स्माईल चा सिम्बॉल. असा तुपाचा मॅसेज होता.


मी लगेच त्याला गुड मॉर्निंग विश केलं. "गुड मॉर्निंग.., अँड इट्स ओके." आणि मी देखील एका स्माईल चा सिम्बॉल पाठवून दिला. तिकडून लगेच त्याचा रिप्लाय ही आला... "मग मॅडम येणार आहात ना..??" हे वाचुन तर माझी कळीच खुलली. म्हणजे तु देखील येत आहेस आमच्यासोबत..?".. मी हसत विचारल.. "नाही ग.., मी काल बोलले ना. फ्रेंड्स सोबत बाहेर जाणार आहे. तुम्ही मस्त एन्जॉय करा." हे वाचुन माझा चेहऱ्या मात्र लगेच पडला. "मला वाटलं की, तु देखील येशील. चल नंतर बोलु..," असा मॅसेज करून मी मोबाईल बाजुला ठेवुन दिला.




त्यानंतर मी आणि बाबा आमच्या गाडीने निशांतच्या घरी जायला निघालो. मी बाबांच्या बाजुच्या सीटवर बसले होते... तोच मला आमच्या कोकण पिकनिकची आठवण झाली.. "निशांत ही छान ड्राईव्ह करतो नाही...!! बाबांसारखी..माझी बडबड ही ऐकून घेतो..छान आहे तो." विचार करतच आम्ही त्यांच्या बंगल्यावर पोहोचलो. आत जाताच आजोबा तर तय्यारच बसले होते आम्हची वाट बघत.. "आजोबा, कसे आहात..??" मी जाऊन त्यांच्या पाय पडले. "मी एकदम मस्त.., तु कशी आहेस बाळा..?" "मी पण एकदम मस्त." मागून बाबा आले आणि ते देखील भेटले.


थोड बोलुन आम्ही घरात गेलो.. माझी नजर मात्र शोधत होती ती निशांतला... पण तो काही दिसत नव्हता. समोरून आजी आल्या.. "प्राजु बाळा कशी आहेस.???" मी त्यांच्या पाया पडत त्यांच्यासोबत बोलत होते.., पण नजर भिरभिरत होती. नजरेला शोध होता तो निशांतचा... "अग बाळा निशु सकाळची गेला आहे कुठे तरी..." आजींना कदाचित माझ्या नजरेतील ओढ दिसली असावी म्हणून त्यांनी सांगून टाकल. मी जरा ओशाळातच आजींकडे पाहिलं.. "हो का मला वाटलं झोपला असेल." मी काही तरी बोलायच म्हणून बोलले. आणि जाऊन सोफ्यावर बसले..



सगळं करून आम्ही निघण्याच्या वेळी ट्रकवाला ही आला. आजोबा आणि बाबा समोर जाऊन बसले.. "प्राजु बाळा तु मागे बस.. त्याच्या सोबत." येवढ बोलून आजोबा जाऊन बसलेही. मी जरा विचार करतच मग गेले. आणि.... डोळ्यांना विश्वास बसत नव्हता.. मागे निशांत होता.. हो तोच होता... "या मॅडम बसा..?" त्याने एक डोळा मारत त्याचा हात पुढे केला. मला चांगलाच शोक लागला होता. हे बघून त्याला हसु ही येत होतं. पण तस न दाखवता तो बाजूला गप्प बसला... आजींचा निरोप घेऊन आम्ही निघालो. मी अजून ही शोकमधेच होती... कारण अचानक हे सगळं घडलं. खरच निशांत आहे की, आपल्याला भास होत आहेत. हे निशांतला बघून खात्री करत होते.... "आता बोलणार आहेस की अशीच गप्प बसुन राहणार आहेस." निशांत माझ्याकडे बघत बोलला.


माझ्या चेहऱ्यावर पडलेले प्रश्न बघून तो परत हसला.. "अग किती ते प्रश्न.!" ... "मग तु काल खोट का बोललास की, आमच्यासोबत येणार नाहीयेस म्हणून..??" मी स्वतःचं तोंड बाजूला फिरवत विचारल. "मॅडम तुमच्यासाठी एवढा खटाटोप केला आहे आणि तु काय तोंड वाकड करत आहेस." त्याच्या या बोलण्यावर मी लगेच त्याच्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिलं.. "म्हणजे.??"



"अग फ्रेंड्स ला काल भेटुन आलो. एका मित्राच्या बर्थडेची पार्टी होती आणि मी नाही तर कोणी यायला बघत नव्हते., म्हणून काल सर्वांना मनवून घेऊन गेलो. आणि आज इकडे आलो." एक स्माईल देत तो बोलला. "माझ्यासाठी..??" माझ्या तोंडुन नकळत शब्द बाहेर आले.. "हो.." त्यानेही होकार दिला.. "म्हणजे तु आजोबांना आणि बाबांना बडबड करून बोर करू शकतेस म्हणून आले.."त्याच्या या वाक्यावर मात्र मी त्याला फटकेच दिले.. "काय बोललास...? मी बोर करते का.??? मग कशाला आलास. आम्ही बघून घेतलं असत हा.." मी माझे गाळ फुगवून चेहारा फिरवून बसले..


"अरे मस्करी केली ना हनी-बी." त्यानेही लगेच कान धरले. पण मी काही बघत नाही हे बघुन त्याने स्वतःच्या खिशातून एक डेरिमिल्क काढली... "ठीक आहे नको बोलुस. तुझ्यासाठी आणलेली डेरिमिल्क मीच खातो." अस बोलून तो खाण्याची ऍक्टिन करू लागला. हे बघुन मी लगेच त्याच्या हातातल डेरिमिल्क काढून घेतलं आणि स्वतःची जीभ काढून दाखवली.. अंगठा खाली करून ठेंगा पण बोलले.. हे ऐकून मात्र तो छान हसला ही.. मग चॉकोलेट थोडं बाबांना, आजोबांना आणि त्या ड्रायव्हर काकांना दिलं. थोडं निशांत आणि राहिलेलं मी खाल. पण सर्वांना वाटल्याने राहिलच नाही हे बघून निशांतने अजून एक डेरिमिल्क माझ्यासमोर धरली.. "ही फक्त तुझ्यासाठी कळलं ना.." ती मला देत तो बोलला. मी मनानेच होकार देऊन ती घेतली आणि माझ्या स्टाईन ने ती खाऊ लागले.. हे निशांत बघत होता..


त्याला बघुन मी नजरेनेच विचारलं असता त्याने फक्त एक स्माईल दिली.. माझ्या हातातली डेरिमिल्क संपताच त्यानेच माझे हात पुसुच दिले.. "लहान मुलांसारखीच आहेस एकदम लहान बाबु.." हे बोलताना तो छान हसला. पण त्याच्या त्या शब्दाने मी मात्र सुखावले.. स्वतःशीच हसत निशांतकडे पाहिलं... "किती काळजी आहे नाही याला आपली... माझ्यासाठी एवढं करतो. फक्त मित्र म्हणून की अजून काही.., की आपल्यालाच वेगळं वाटत आहे.. स्वतःच्या मनाशी बोलत असता आम्ही नर्सरीमध्ये पोहोचलो.




To be continued......