कादंबरी - जिवलगा .. भाग - ९

कादंबरी -

जीवलगा ...

भाग-९ वा 

----------------------------------

आतापर्यंत -

(भाग १ ते ८ भाग ८ - थोडक्यात सारांश ....)

एका लहानश्या शहरवजा गावातून आलेल्या नेहाची गोष्ट  आपण वाचीत आहात .लहानश्या गावातील एक मोठ्या कुटुंबातील नेहा ,शिक्षण पूर्ण करून मोठ्या शहरात नोकरी करण्याच्या उद्देशाने येते ..नोकरी म्हणजे काही तिच्यासाठी सर्वस्व नाहीये , परंतु ,या अफाट दुनियेत वावरणे, इथे लोकात रहाणे..हे शिकावे, हा उद्देश मनात आहे , अनायसे तिच्या हक्काचे एक कुटुंब  ,त्यांचे घर ,त्यातील माणसे .यांच्या सोबतीने नेहाचा हा प्रवास सुरु झाला आहे ..

सुधामाव्शीच्या घरात नेहाला मधुरीमाच्या रूपाने  एक मैत्रीण मिळाली आहे ,वयाने,अनुभवाने मोठी ,तरीपण ही मधुरिमा मैत्रीण नेहाला सांभाळून घेते आहे.नेहा मध्ये तिला एक निर्मल,सुबोध अशा सध्या स्वभाव्ची मुलगी दिसते , मधुरीमाला नेहाचे हे साधे रूप खूप भावते , नव्या जगाचे वारे या मुलीला लागले नाही, तिचा निभाव लागण्यासाठी आपण आता सतत नेहाला मदत करायची असे ठरवते.मधुरिमा आणि नेहा एकमेकीच्या सोबतीने ही नवी वाट कशी सुरु ठेवतात ..हे यापुढे आपल्याला वाचावयास मिळेल ....

*******************************************************************************************
आता पुढे ....

.भाग ९ वा

-------------------------------------------------------सहा महिन्यानंतर ....


नेहा आता बऱ्यापैकी स्थीरावत चालली होती . मधुरिमा बरोबर अधिकाधिक वेळ घालवल्यामुळे तिला बऱ्याच नव्या नव्या गोष्टी पहावयास मिळत होत्या ,शिकण्यास मिळत होत्या . गेले कित्येक दिवस नेहा मनाशी ठरवीत होती की ..मधुरिमाला तिच्या फमिली- लाईफ बद्दल विचारायचे ,तिच्या तोंडून फमिली आणि फमिली लाईफ या विषयवर कधी काही ऐकल्याचे नेहाला आठवत नव्हते . तिचे लग्न झालेले आहे, तिचा नवरा या देशात नसतो ,म्हणून इकडे फार कमी वेळा असतो .

आला तरी त्याच्या जवळ माझ्यासाठीच वेळ अजिबात नसतो ,कारण ..माझा एक नवरा ..अवलिया आहे , फक्त नवरा-बायको हे आमच्यातील नाते "त्याला नको असते , मी फक्त त्याची बायको नसावी ,तर विश्वासू सहकारी आणि जिवलग मैत्रीण असावी " असे माझ्या नवर्याचे सांगणे असते ..मला तो तसाच वागायला लावतो .पण..एक खर सांगते ..माझा हा अजब-गजब नवरा .मला मनापासून आवडतो ..माझ्या जीवाचा जिवलग आहे हा.....!


आणि त्याच वेळी मधुरिमाने .नेहाला विचारले ..

काय नेहाकाकू ..तुम्हाला आहे की नाही ..जिवलग कुणी ?

ज्याच्यावर तू मनापासून प्रेम करतेस , त्याचे तुझ्यावर तितकेच प्रेम आहे .
मधुरिमा असे काही विचारेल याची नेहाला बिलकुल कल्पना नसल्याने - गडबडून गेलेली नेहा म्हणाली -छे छे ..! असे काही नाही आणि असे कुणी नाही ,

असे प्रेम -बीम " गावाकडे असतांना स्वप्नात सुद्धा असे कधी वाटले नाही , आमच्या बाजूला ,आमच्या भवती इतक्या लोकांचा सतत पहारा असे की मुलांशी बोलणे तर दूरच , काही मुलीच्या बरोबर सुद्धा  बोलायची नाही ", असा कडक हुकुम असायचा .


रीमा - तुझ्या भाषेत सांगायचे  तर या नेहाचे आतापर्यंतचे सगळे लाईफ अगदी आळणी ,बेचव "असे गेले आहे.

कधी काही वाटले नाही का ?असे तू विचारशील , म्हणून आधीच सांगते ..आमचे घर म्हणजे सोन्याच्या पिंजरा होता ,यात रहाणे म्हणजे सुखाची कैद होती  आपल्या माणसाच्या सहवासात

.तरुण मन .हे प्रेम , तरुणपण , त्या सुलभ-भावना " हे सगळ तीव्रतेने कधीच मनापर्यंत आलच नाही.त्यामुळे ..मी आहे ती अशी आहे ..

आणि अशा मुलीकडे कोण त्या भावनेने पहाणार ? थोडक्यात काय , काही फरक पडणार नाही.


नेहाकडे पहात मधुरिमा म्हणाली ..अरे वा  नेहाकाकू ..तुम्ही तर खूपच छान बोलू शकता की हो .

 हे बघ नेहा , तुझ्या मनातील तुझ्याविषयी असलेली "ही अशी कमीपणाची भावना " तू तुझ्या मनातून अगोदर काढून टाक

.हे असेच मनात असेल तर, तू आत्मविश्वासाने नव्या जगात कशी वावरशील ?

तुला तुझ्यात वातावरणा प्रमाणे आवश्यक ते बदल करावेच लागणार आहेत, इतक्या दिवसा पासूनच्या तुझ्या मनावर ज्या गोष्टी ठामपणे आहेत ,त्या सहजा सहजी जाणार नाहीत,

पण ,त्या प्रभावातून बाहेर पडणे खूप गरजेचे आहे नेहा .


हे बघ नेहा - मी तुला असे कधीच म्हणणार नाही..की. घरी नुसते बसून काय राहतेस ?, बाहेर पडून नोकरी शोध ,चार पैसे मिळव ..ते तुझ्यासाठी ध्येय असे नाहीये",हे मला कळते .

म्हणून सांगते ..तू स्वतःला या नव्या सिस्टीम मध्ये कसे सोयीस्कर मिळून राहता येईल याचा विचार कर ..या कामात तुझ्यासाठी ही मधुरिमा सदैव तयार असेल.

आता बघ ..आनेवाले दिनो मे.. ये गुडीया ,कैसी परी बन  कर झुमेगी , तुला असे बदलवून टाकते की ..बघच..

तुला तुझा ..जिवलग ..अगदी शोधत शोधत येईल तुझ्या दिल के दरवाजे तक ....


मधुरीमाचा हात हातात घेत नेहा म्हणाली ..मधुरिमा ..आज मला खूप छान वाटते आहे .कुठेतरी मनात अस्थिर असायचे मी,

वाटायचे का आणि कशासाठी आले आहे मी इथे ? मावशीच्या घरी राहून मस्त खायचे आणि रिकामे बसून दिवस घालावयाचे "

याचे खूप मोठे ओझे माझ्या मनावर जमा झाले होते ..आज तुझ्या या आधाराच्या शब्दांनी मला खूप धीर दिला ..एक उभारी दिली...


ओके नेहा बेबी .आभार-प्रदर्शन पुरे झाले ..येते काही दिवस मी तुझ्या सोबत नसणार आहे,

कारण.. मेरा पिया ..घरी येतो आहे ,उदयाला .माझ्या जीवलगासाठी..खूप काही काही करायचे असते मला ..सांगेन कधी तरी...

मधुरिमा गेल्यावर ..नेहाला वाटले ..ही मैत्रीण भेटली नसती तर आपले काहीच खरे नव्हते ..

पण.काही घाबरायचे नाही ..एक नवी सुरुवात करायलाच हवी आता ......

बाकी नव्या भागात ....

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भाग दहावा लवकरच येत आहे ..

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी- जीवलगा ....

भाग-९ वा ..

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

९८५०१७७३४२ 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

***

Rate & Review

Shobha Patil

Shobha Patil 7 hours ago

Rani

Rani 8 hours ago

Pratiksha

Pratiksha 6 days ago

Mangesh

Mangesh 1 week ago

Kalpana Shedbal

Kalpana Shedbal 3 weeks ago