Bhatkanti - Aathvanichya gard ranatali - 4 books and stories free download online pdf in Marathi

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग ४

पूजा आणि कादंबरी जरी भटकत असल्या तरी उपजीविकेसाठी आणि रोजच्या , नित्याच्या वस्तू , कपडे यासाठी पैसे लागणारच. " Travel blog " लिहायची आयडिया कादंबरची. actually, लिहणारी पूजाच. पूजा अगदी लहानपणासूनच छान लिहायची. अक्षर तर मोत्याचे दाणे, कविताही करायची कधी. हा ग्रुप भारतात जिथे जिथे जाईल, त्या जागेची माहिती पूजा , एका वेगळ्याच , म्हणालं तर काळजाला हात घालणाऱ्या शब्दात लिहून काढायची. त्या जागेचे फोटो रूपात दर्शन घडवायची ते कादंबरी. असा दोघींचा मिळून एक "Travel blog " बनला. एका नामांकित ' TV channel ' ला त्यांचा ब्लॉग आवडला आणि झालं सुरु. प्रत्येक महिन्याला एका जागेची माहिती , फोटोसहित या दोघी ब्लॉग वर पोस्ट करायच्या आणि त्या चॅनलला देयाच्या. त्यासाठी, शहरात यायची गरज नव्हती, त्यांनीच लॅपटॉप आणि वायफाय ची सोय केलेली होती. असतील तिथूनच या माहिती , फोटो पाठवून देयाच्या. ठरलेली रक्कम , सांगिलेल्या बँक अकाऊंट मध्ये ट्रांसफर केली जायची. एकंदरीत हे सर्वच छान सुरू होते, आणि त्या दोघीही खुश होत्या , त्या ग्रुप सोबत.


कादंबरीच्या प्रश्नाचे उत्तर अजूनही पूजाने दिलं नव्हते. " ठीक आहे सांगते... पण जरासेच सांगेन , कारण तो आठवणीत आहे ना माझ्या .... त्याच्या आठवणी फक्त आणि फक्त माझ्यासाठीच राखून ठेवल्या आहेत मी. " पूजा भारावून बोलत होती.


" बर बाबा, राहू दे तुझ्याकडेच ' तो ' ... " कादंबरीने हात जोडले. पूजाने तिच्या डोक्यावर टपली मारली. आता ग्रुपचे उरलेले आले होते. यांची एक बस ठरलेली होती. ती बस आली तसे सारेच त्या बस मध्ये जाऊन बसले. एका ठराविक ठिकाणी सोडून बस तिच्या मार्गाने पुढे जाणार होती. पूजा-कादंबरी एकत्रच बसल्या. कादंबरीला झोप आलेली. पूजाच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. बस सुरु झाली. पूजा मात्र खिडकीतून बाहेर पाहत होती. दुपारचे काम संपवून सूर्यदेव विश्रांती साठी निघाले होते. संध्याकाळ त्याचीच वाट बघत होती. उन्ह परतू लागली होती. झाडे झोपायची तयारी करत होती. सांजवेळ झालेली. शहरातले उरले - सुरलेले पक्षी घराकडे परतत होते. पण पूजाचे लक्ष, आभाळात भरकटलेल्या काळ्या ढगांकडे होते. जास्त नसले तरी दिसून येतं होते. पूजाला बरं वाटलं.


" तो ना.. असाच अंदाज लावायचा पावसाचा. आणि अगदी बरोबर असायचा त्याचा अंदाज..... अश्या या ढगांना बघून ना... छान हसायचा..... काय आनंद होयाचा त्याला काय माहित...... त्याचंही कुटूंब होतं शहरात, माणसं नाही आवडायची त्याला.... निसर्गात जास्त रमायचा..... सतत भटकत राहायचा..... " ,


" प्रेम होतं का तुझं.... त्याच्यावर... " कादंबरीने डोळे न उघडताच पुढला प्रश्न केला. पूजा अजूनही बाहेरच बघत होती.


" प्रेम म्हणता येणार नाही... प्रत्येक वेळेला प्रेमाचाच का आधार असावा ... एखाद्या नात्याला,......... त्याचं आणि माझं नातं असंच काहीसं वेगळं होतं. त्या वेगळ्या नात्याने एकत्र होतो आम्ही. कधी बहीण व्हायचा तो, कधी आई, कधी वडील, आजोबा, आजी, मित्र.... कधी कधी पाऊसच वाटायचा तो.... वाटाड्या होता.. कधीच वाट चुकला नाही, मलाही माझी वाट दाखवून निघून गेला. " कादंबरी ऐकता ऐकता झोपी गेली. शहर एव्हाना मागे पडत चाललं होते. काळोखाचे साम्राज पसरत होते. पावसाच्या ढगांमुळे हवेत आलेला ओलसर थंडावा, खिडकीतून आत येतं पूजाचे केस उडवत होता. पूजाने हळूच बसमध्ये नजर फिरवली. दमले, भागलेले जीव शांत झोपी गेलेले. पूजा पुन्हा तिच्या विचारात गढून गेली. आणि आठवणींच्या गर्द रानात हरवून गेली.


========================================================


रात्रभर आकाशला झोप लागली नाही. कधी एकदा सकाळ होते असं वाटतं होते त्याला. सकाळ झाली आणि तो निघाला. आई-वडिलांचा निरोप घेतला आणि चालतच निघाला. photography compition मध्ये भाग घेण्यासाठी निघाला होता ना, त्यांच्या अटीनुसार , एका विशिष्ठ ठिकाणी , आधी सर्वांनी जमायचे होते. आकाश तिथेच निघाला होता. रेल्वे स्टेशन वर आला. घड्याळात पाहिले तर सकाळचे ६ वाजत होते. कपाळाला हात मारला त्याने. गाडी ८ वाजताची आणि आलो २ तास आधीच. स्वतःशीच हसला आकाश. एवढ्या लवकर कोण येते स्टेशनला. काय करावे, घरी जाऊ का पुन्हा... नको. एका रिकाम्या बेंचवर डोकं ठेऊन शांत डोळे मिटून बसला. कधी झोप लागली कळलंच नाही.


" ओ काका ... उठा ... उठा .... गाडी आली तुमची... " आवाज ऐकून खडबडून जागा झाला आकाश. बघतो तो सुप्री समोर.
" गेली कि काय ट्रेन... " आकाश डोळे चोळत आजूबाजूला बघू लागला.
" वाजले किती ? " सुप्री -संजना तिथेच उभ्या. आकाशने घड्याळात पाहिलं. ७ वाजले होते. म्हणजे अजूनही एक तास बाकी आहे गाडी यायला.
" तुम्ही कधी आलात ... " ,
" तुझा मोबाईल कुठे आहे ते सांग आधी... " सुप्री रागात बोलत होती जरा.
" का .... काय झालं... " आकाशने त्याच्या बॅग मधून मोबाईल बाहेर काढला. ३० मिस कॉल....
" सॉरी .... !! मी बघितलाच नाही मोबाईल... " आकाशने कान पकडले.
" पूजा तरी घालूया त्या मोबाईलची... निदान त्याला तरी शांती लाभेल .... " ....सुप्री.
" सॉरी ना ... रागावू नकोस .... येडू .... " आकाशने सुप्रीला मिठी मारली.
" काही कळते कि नाही तुला... किती टेन्शन मध्ये आम्ही दोघी. " आता संजना ओरडत होती.
" का ? " ,
" का म्हणजे... किती कॉल लावले. काहीच रिप्लाय नाही.... घरी गेलो तर कळलं निघालास कधीच... मग विचार केला... तू इथेच असणार.... इथे बघितलं तर झोपला आहेस आरामात... ",
" अगं ते .... excitement मध्ये लवकर आलो... " बोलत असतानाच अचानक थंड हवेची झुळूक आली. उन्हाळ्याची गर्मी अजूनही बघावं तशी ओसरली नव्हती. त्यामुळे या इतक्याश्या थंड हवेने तिघेही शहारले.
" मला ना ..... कळतच नाही काय करतो आहे ते... काल रात्रभर झोपलो नाही... ",
" का रे ... " , सुप्रीने विचारलं.
" दोन वर्ष.... दोन वर्ष झाली , मी कुठे गेलोच नाही. " बोलता बोलता आकाश पुन्हा त्या बेंच वर बसला. त्याच्या बाजूला या दोघी.
" खूप मिस केलंस का ... " सुप्रीने विचारलं.

हसतच आकाशने सुप्रीकडे पाहिलं. " मिस केलं ? .... श्वास होता तो माझा, निसर्ग... शहरात तसही मला जमायचं नाही. २ वर्ष कशी काढली ते मलाच माहित.... " ,
" मग बोलायचं ना मला ..... वेडा कुठला... " ....सुप्री .
" कसं बोलणार... तेवढी हिंमत झाली नाही कधी... तुला वाईट वाटलं असतं, आणि उगाचच कोणाला दुखवायला आवडत नाही मला... " सुप्रीने आकाशचा हात हातात घेतला. " बघ ना .... आता कसं वाटते, एकदम जुने दिवस आठवले.... जेव्हा मी नव्याने भटकंती सुरु केलेली.... किती वर्ष मागे गेलो मी .... क्षणात ... " यावर मात्र सुप्री बोलली.


" तू नक्की आकाशच आहेस ना .. मला तर बोलतोस ... आठवणी काढू नये... आणि आता स्वतःच जुनं आठवत बसला आहेस .. "


" काय आहे ना ... माझ्याही आहेत काही आठवणी... फक्त मी कधी त्या व्यक्त करत नाही. या दोन वर्षात ... आठवणीवरच तर होतो मी.. आठवायाचे मला ते गड - किल्ले .... डोंगराच्या रांगा..... कडे-कपारी... दऱ्या.. पावसाने ओथंबलेले ढग.... उंचावरून कोसळणारे झरे.. असा सुस्साट वारा... झाडाच्या पानांची सळसळ .... पक्षांचे थवेच्या थवे.... ती विजांची काळ्या आभाळात होणारी नक्षी..... होणार कडकडाट..... असा अंगभर शहारा आणणारा बोचरा वारा... " आकाश कसा अगदी भरभरून बोलत होता.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: