matrutva - 7 books and stories free download online pdf in Marathi

मातृत्व - 7

#@मातृत्व@#(7)
सौ. वनिता स. भोगील

पारस हॉस्पिटला पोचल्यावर लगेच डॉक्टर ना शोधू लागतो,
तेवढ्यात काकू म्हणतात ... अरे पारस डॉक्टर आत आहेत.
काकू प्रिया कशी आहे, काही बोलले का डॉक्टर?
काकू म्हणाल्या,,
हो डॉक्टर म्हणालेत की प्रियाची डिलीव्हरी नॉर्मल होणे शक्य वाटत नाही,
सिजरीन करावं लागेल..
अस बोले पर्यंत एक नर्स वॉर्ड मधून बाहेर येते,
पारस धावतच तिच्याकडे जातो....
... मॅम कशी आहे प्रिया?
त्यावर ती नर्स म्हणते, बघा तिची डिलीव्हरी क्रिटिकल आहे,, बाळ किंवा आई यातून आम्ही एकाला वाचवू शकतोत....
....... पारस त्या नर्स पुढे हात जोडून उभा राहतो, मला दोन्ही हवेत प्लिज वाचवा न माझ्या बाळ आणी प्रिया ला........
....नर्स म्हणते बघा थोड्या वेळात डॉक्टर बाहेर येतील तुम्ही विचारून घ्या त्यांना,
अस बोलून ती निघून जाते,
पारस चे डोळे पाण्याने भरतात नकळत मन देवाचा धावा करू लागत,देवा सगळं नीट होऊदे म्हणून मनातच प्रार्थना सुरू होते,
थोड्या वेळात डॉक्टर बाहेर येतात...
पेशंटच्या जवळच कोण आहे हे विचारतात.....
पारस डॉक्टर जवळ जाऊन म्हणतो मी... मी प्रिया चा नवरा,कशी आहे प्रिया...
... डॉक्टर म्हणतात बघा सध्या परिस्तिथी आपल्या हातात नाही, तर आपल्याला लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल,,
पारस म्हणतो डॉक्टर जे करायच ते लवकर करा, माझ्या प्रिया ला काही होता कामा नये....
.. डॉक्टर म्हणतात आमचे प्रयत्न चालू आहेत, तुम्ही तिकडे काउंटर वर जाऊन फॉर्म वर सही करून या ,ऑपरेशन साठी तुमची परवानगी आहे म्हणून....
... पारस लगेच काउंटर कडे जाऊन तिथे बसलेल्या नर्स कडून फॉर्म घेतो ,सही करून देतो,,,,
तोवर डॉक्टर निघून जातात....वॉर्ड बाहेर नर्स ची घाईत ये जा सुरू असते,,
काकू पारस जवळ येतात,
पारस काळजी करू नकोस होईल सगळं ठीक,
आणि हो स्वाती चे महिने भरत आलेत,मला दोन दिवसाने बोलावलं आहे तिने,,
पारस झोपेतून जागा झाल्यासारखा झाला,
स्वाती च काय पुढे?
त्याला दरदरून घाम फुटला.....
....

थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आले पारस आणि प्रिया ची आई डॉक्टर कडे धावत गेले,पारस डॉक्टर ना विचारू लागला ,प्रिया कशी आहे?डॉक्टर म्हणाले आताच अजून काही सांगता येत नाही, आम्हाला आमचं काम करू दया....
... डॉक्टर आत निघून गेले,पारस पुढे दोन संकटे उभी होती.
.. प्रियाला वाचवणे आणि स्वातीच काय होईल याची,
....
थोड्या वेळात डॉक्टर बाहेर आले अन पारस ला म्हणाले अभिनंदन मुलगी झाली,
पण बाळाची कंडिशन खूप नाजूक आहे,
आम्ही बाळाला अंडरऑपझर्वेशन ठेवलं आहे,
वाट पाहावी लागेल.
पारस च्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते,
तो डॉक्टर ना म्हणाला मी प्रियाला भेटू शकतो का,
डॉक्टर ....
आताच नाही, थोडं थांबून जा.प्रिया अजून शुद्धीवर नाही, ती शुद्धीवर आली की जा,
प्रियाची आई पण खुश होती,
काकू तर जास्तच खुशीत दिसत होत्या,थोड्या वेळात नर्स बाहेर आली न म्हणाली प्रिया शुद्धीवर आली आहे, तुम्ही भेटू शकता...
पारस धावतच आत गेला, प्रियाला शुद्ध आली होती ,पारस ने प्रिया चा हात हातात घेतला अन दोघेही आनंदाश्रू ढाळु लागले.....
.. सगळं व्यवस्तीत झालं होतं,
तेवढ्यात काकू म्हणाल्या पारस आता आपण घरी जाऊ, सगळे फ्रेश होऊन परत प्रियाकडे येऊ,,,
प्रियाची आई म्हणाली तुम्ही दोघे जा मी थांबते प्रिया जवळ,,,,
,, तेवढ्यात काकू म्हणाल्या कशाला ? आपण सगळेच येऊ जाऊन.
त्यावर त्या नको होय करत तयार झाल्या,
बाळाला दुरूनच पाहून तिघेपन घरी जायला निघाले,
प्रियाला तस सांगून घरी निघाले,,
सगळेच खुश होते,, पारस ने जाताना पेढे अन नारळ घेतला,
वाटेतच गणपती मंदिर होते तिथे बाप्पाला नारळ पेढे चढवले,
तिघे घरी आले,प्रियाच्या आईने जेवण बनवले,
सगळे जेवण करून प्रियासाठी दूध फळ घेऊन पुन्हा हॉस्पिटल ला निघाले,,,

रिक्षा ने तिघे थोड्याच वेळात पोहचले,
तेवढ्यात नर्स समोरून घाईतच आली आणि म्हणाली तुमचं बाळ गेलं........
... पारस तर पूर्ण घाबरून गेला,अस कस झालं,आम्ही गेलोत तेव्हा तर छान होत,,,
एका तासात अस काय घडलं,
पारस धावतच प्रिया कडे गेला ..
प्रिया पण रडत होती.
... अचानक काय झाले काहीच समजत नव्हते,
तेव्हढ्यात डॉक्टर आले,
पारस म्हणाला डॉक्टर अस अचानक काय झालं?
तेव्हा डॉक्टर म्हणाले, बाळ झालं तेव्हाच त्याला श्वास घेण्यास थोडा त्रास होत होता, आम्हाला वाटले थोडी ट्रीटमेंट दिल्यानंतर होईल सर्व ठीक ,
पण सॉरी आम्ही प्रयत्न करूनही तुमच्या बाळाला नाही वाचवू शकलोत.
...... पारस रडवेला होऊन प्रियाकडे बघत होता, प्रिया खूप रडत होती,पारस ने तिला जवळ घेतले,समजवण्या पलीकडे गेलं होतं सार..
......
तेवढ्यात काकूंना कुणाचा तरी फोन येतो....
त्या मोबाईल वर बोलत वॉर्ड च्या बाहेर निघून जातात,
,,,, डॉक्टर म्हणतात थोड्याच वेळात बाळाची बॉडी दिली जाईल तुमच्याकडे,
आणि प्रियाला तीन चार दिवस अजून रिकव्हर होण्यास वेळ लागेल नंतर तिला डिस्चार्ज देऊ....
अस म्हणून डॉक्टर निघून गेले,,,
.........
प्रिया ची आई तिला खूप समजावत होती, पण प्रिया च रडणं काही थांबत नव्हतं...
थोड्याच वेळात वॉर्डबॉय कपड्यात गुंडाळले ल बाळ घेऊन आला, पूर्ण झाकलेला होत...
... ते पाहून प्रिया जास्तच रडू लागली,
पारस कडे त्याला देऊन वॉर्डबाय निघून गेला..
पारस प्रिया च्या आईला आणि काकूंना सांगून बाळाला घेऊन गेला,
शेवटचं सगळं आवरून पारस परत तासाभराने हॉस्पिटलमध्ये आला..
.. तेवढ्यात काकू म्हणाल्या पारस......
इकडे आपण अस कितीवेळ थांबायचं? चला घरी जाऊ.
तेव्हा प्रिया ची आई म्हणाली मी कुठे जाणार नाही ,तुम्ही दोघे घरी जा,
पारस तू पण थोडा आराम कर ,
प्रियाला समजावून पारस आणि काकू घरी निघाले,,
पारस विचार करत होता फक्त घरी जाऊन परत येईपर्यंत बाळ कस गेलं?
त्याला प्रियाची काळजी वाटत होती,
तिला कस समजवायचा?
तेवढ्यात घर येत, दोघे रिक्षातून उतरून आप आपल्या घरी जातात..
सगळा विचार करत पारस बेड वर तसाच बसून राहतो,
तेवढ्यात जेवणच ताट घेऊन जोशी काकू येतात,
जेवणाला पारस तयार नसतो,
त्या समजवतात,
प्रियाचा विचार कर तू असं जेवता राहून काय उपयोग होणार आहे का? जे व्हायचं होत ते झालं,पारस फ्रेश होऊन जेवायला बसतो, काकू तिथेच थांबतात, त्याला जेवण वाढून देतात...
.. दोन चार घास खाऊन झाले की काकू पारस ला म्हणतात स्वातीच फोन आला होता, तिला सात महिन्यातच डॉक्टरांनी ऍडमिट होण्यास सांगितले आहे,दोन दिवसाने मला बोलवले आहे,
तू तीच काय करायचं त्याचा पण विचार कर,
पारस च्या हातातला घास तसाच ताटात पडतो...
... काहीच सुचेनासे होत,
हे सर्व काय होतंय काहीच समजत नव्हतं,
,,
कसबस थोडस जेवून घेतलं, काकू म्हणाल्या मला जाताना तू पैसे दे,तिला डिलीव्हरी साठी ऍडमिट केलं तर मी काय करू?

पारस मानेनेच हो म्हणतो,
काकू निघून जातात,
रोज हॉस्पिटलमध्ये जावं लागणार ,प्रियाची पण काळजी म्हणून पारस ने ऑफिस ला सुट्टी टाकलेली असते,
दोन दिवसांनी काकू त्याच्याकडे जातात घाईतच असतात, त्या सांगतात पारस खूप घाई आहे मला लगेच निघावं लागेल. स्वातीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे,
तू लवकर पैसे दे मला मी लगेच निघाले आहे..
पारस कपाटातून पैसे काढून देतो,
काकू घाईत पैसे घेऊन निघून जातात, जात ना सांगतात स्वातीला काय होतंय ते मी तुला गेले की फोन करून सांगते..
पारस च डोकं काम करायचं बंद होत.
दोन दिवसाने प्रियाला डिस्चार्ज मिळतो, पण प्रियाची आई म्हणते मी प्रियाला माझ्या घरी घेऊन जाते,
म्हणजे तिला बर वाटेल, आणि ति खूप अशक्त झाली आहे तर मला तिची काळजी पण घेता येईल.
पारस तयार होतो,
डिस्चार्ज ची फॉर्मलिटी पूर्ण करून तिघे घरी जायला निघतात, पारस प्रियाला सोडायला तिच्या आईच्या घरी जातो,
तिला सगळं समजावून सांगून तो निघतो..
.... एक दिवस सकाळी ऑफिस ला निघताना पारस ला फोन येतो,समोरून काकू बोलत असतात,
हॅलो..... पारस मी बोलते काकू।
हा .. काकू बोला,
अरे स्वाती बाळंत झाली आहे, मुलगी झाली तुला
, पारस गोंधळून जातो,
काकू परत म्हणतात अरे ऐकलस न, स्वाती आणि तुला मुलगी झाली आहे.
..
पारस तेव्हढ्यातून विचारतो स्वाती कशी आहे काकू,
तेव्हा काकू म्हणताय स्वाती आणि मुलगी अगदी छान आहेत, डिलीव्हरी पण नॉर्मल झाली आहे,
पारस ला काहीच कळत नाही,
तिकडून काकू बोलत असतात ,
पारस मी थोडे दिवस इकडेच थांबते आणि पंधरा दिवसानंतर स्वातीला सोबतच घेऊन येते.
पारस फक्त हो काकू म्हणून फोन ठेऊन देतो.
....
आता स्वाती आल्यावर काय करायचं या विचारात असतो तेवढ्यात परत फोन ची रिंग वाजते,
हॅलो.......
. मी प्रिया बोलते ,कसा आहेस तू,
हा बोल प्रिया मी बरा आहे, तू कशी आहेस?
अरे मी पण बरी आहे,
एक न पारस मी आज रात्री आपल्या घरी येते,
तू पण तिथे एकटाच आहेस, जेवणाचे पण प्रॉब्लेम,
आणि आता मी पण ok आहे.
आल्यावर ऑफिस पण जॉईन करते म्हणजे मला ही बर वाटल.....
... पारस काहीच उत्तर देत नाही.
अरे ऐकतोयस न?
हो प्रिया ऐकतोय.
मी रात्री येतो तुला घ्यायला,
ऑफिस मधून सुटल्यावर तिकडेच येतो ,मग सोबतच येऊ.

ठीक आहे म्हणून प्रिया फोन ठेवते.
आता प्रिया येणार, मग स्वाती, बाळ। ..... कस काय करू?
पारस खूप विचार करतो की जर हे सगळं प्रिया ला समजलं तर काय होईल,
मी सगळं तिला विश्वासात घेऊन सांगितले तर?
नाही नको ती समजून घेईल की आणखीन गैरसमज होईल माहीत नाही काय करू.....

अश्या विचारात तो ऑफिस ला पोहचतो,,
संध्याकाळी प्रियाला ऑफिस सुटल्यावर घेऊन घरी येतो,
प्रिया आली तशी कामाला सुरुवात करते,
एवढ्या दिवसाचा पसारा सगळं आवरून घेते, पारस पण तिला मदत करतो.
..रात्री झोपताना प्रिया जवळ येते तर पारस म्हणतो प्रिया तुझी तब्येत ठीक नाही अजून,अस म्हणून तोंड फिरवून झोपतो,
त्याच त्यालाच कळत नाही काय करावं ते
स्वाती बद्दल सांगावं का?
पण आता नाही सांगितले तरी काकू म्हणतील च मग प्रियाला जास्त वाईट वाटेल,
मी नाही सांगितले तर तिला विश्वास घात केला असे वाटेल, अन सांगितले तरी असच वाटेल...
काय करू?
रात्र अगदी जागून काढली पारस ने,
सकाळी दोघे तयारी करून ऑफिस ला निघाले,
प्रिया म्हणाली पारस काही विचारू का तुला?
हो विचार न..
मी गेले काही महिने पाहते तू कुठल्यातरी विचारात हरवलेला असतोस,काही टेन्शन आहे का?
....तस काही असेल तर सांग मला, आपण मिळुन मार्ग काढू..

आग प्रिया अस काही नाही, जर दगदग होते ऑफिस मुळे बाकी काही नाही..
.... प्रिया म्हणते नाही पारस तुला मी आज ओळखत नाही नक्कीच काहीतरी आहे जे तू मला सांगत नाहीस,
...आग प्रिया खरच काही नाही,
प्रिया पारस चा हात हातात घेऊन स्वतःच्या डोक्यावर ठेवते,
आता सांग खरच काही नाही?
... पारस चे डोळे भरून येतात,
तसाच खाली बसतो,
प्रिया त्याच्या समोर बसते,
पारस बोल काय झालं ते, तू नाही सांगितले तर मला कसे समजेल,
.. पारस प्रियाचा हात हातात घेतो अन म्हणतो प्रिया मला समजून घे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस,
प्रिया म्हणते हो तू ही माझं सर्वस्व आहेस पण सांग काय ते......
पारस म्हणतो प्रिया मला सोडून जाणार नाहीस न हे मला वचन दे.
अस काय बोलतोस आणि मी का सोडून जाईल तुला?
दिल वचन ..
मग पारस स्वाती बद्दल सगळं प्रियाला सांगतो,
प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते,
पण ती शांत राहते , ती विचार करते पारस ने मला प्रपोज करायला किती वर्षे घेतली आणि तो अस काही कसा करू शकतो?
...
पण मनही मानायला तयार नसत,
मग स्वाती खोट का बोलेल,किंवा काकू स्वतःच्या मुलीला अस का वागू देतील,
नक्की काय झालं असेल?

...
प्रिया खूप समजूतदार असते, चुकला ही असेल पारस भावनेच्या भरात ..
क्षण भर हाही विचार येऊन जातो तिच्या मनात,
,,पारस हात जोडून प्रियाला समजावत असतो,मला माफ कर प्रिया मी तुझा विश्वास घात नाही केला, हे कसं झालं नाही माहीत,
,,
ती त्याला उठवते आणि म्हणते ठीक आहे पारस जाऊदे जे व्हायचं ते झालं, असपन माझी मुलगी गेली तर स्वातीकडून आहेच की आपल्याला बाळाचं सुख,
पारस मनात देवाचे आभार मानतो, की एवढी समजदार बायको दिलीस किती सहनशीलता आहे प्रियमध्ये,
तिच्या जागी मी ही असतो तर कसा वागलो असतो,
पारस ला स्वतःचीच लाज वाटते,
आता त्यांचं रुटीन चालू झालेलं असत ,
ऑफिस ,घर, ,,,
पारस स्वतःला भाग्यवान समजतो,
एक दिवस सकाळीच दार वाजत प्रिया दार उघडते,
समोर काकू उभ्या असतात ,
प्रिया काकूंना पाहून म्हणते या न काकू आत या.
...
पारस म्हणतो कोण आहे ग बाहेर,
अरे काकू आल्यात,
तेवढ्यात काकू म्हणतात नको ग प्रिया पारस कडे काम होत म्हणून आले होते,
हो का काकू ,काय काम होत पारस कडे?
आग ते हे...........

काकू मला पारस ने सर्व काही सांगितले आहे, अगदी स्वातीला मुलगी झाली हे सुद्धा..
.. काकू आश्चर्याने प्रिया कडे बघतच असतात,तेवढ्यात पारस म्हणतो काकू मी खूप नशीबवान आहे मला प्रियासारखी बायको मिळाली,
मी सगळं प्रियाला सांगितले आहे आणि तिने ते समजून पण घेतले...
काकू ना आश्चर्य वाटते अन त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन ही येते,
तरी त्या प्रिया ला म्हणतात की मी स्वातीला आणि बाळाला घेऊन आले आहे,
प्रिया आनंदात म्हणते कुठे आहे स्वाती?
घेऊन या काकू तिला,
पारस च बाळ आहे ,
काकू स्वातीला हाक देतात,
स्वाती हातात तान्ह बाळ घेऊन उभी असते,
प्रिया आत धावत जाते, जाताण स्वातीला दारात उभं राहण्याचा इशारा करते,

आत जाऊन औक्षणच ताट घेऊन येते...
पायावर पाणी घालून स्वाती अन बाळाचं औक्षण करून आत बोलावते.
स्वातीची विचारपूस करून बाळाकडे बघते
तस तिच्या डोळ्यात आश्रू उभे राहतात,
पारस समजून जातो,
प्रियाला जवळ घेऊन म्हणतो आग ही पण आपलीच मुलगी आहे,

स्वाती हात पुढे करून बाळाला प्रिया समोर धरते,
प्रिया बाळ हातात घेते, आणि तिला ममतेचा पाझर फुटतो
कोण जाणे तिला तिचच बाळ आहे असं वाटत क्षण भर....
तेवढ्यात काकू बोलतात पारस पुढे काय ठरवलस,
स्वाती अस कस राहू शकते?
समाज काय म्हणेल आम्हाला?
पारस काही बोलण्या अगोदर प्रिया म्हणते, काकू काही काळजी करू नका,
आपण पारस आणि स्वातीच लग्न लावून देऊ,
मोठ्यांच्या चुकीची शिक्षा बाळाला का द्यायची....
पारस म्हणतो काय बोलतेस तू हे?
लग्न ? कस शक्य आहे?
पण प्रिया तू माझी बायको आहे ,माझं तुझ्यावर प्रेम आहे, हे सगळं चुकून घडलं.
... प्रिया म्हणते हो पारस सगळं खरं आहे ,पण त्यात बाळाची काय चूक? तिला आई वडिलांच्या प्रेमाची गरज आहे,
आणि तू नको काळजी करू मी वकिलांशी बोले आहे आपल्या घटस्फोटाबद्दल,
पारस म्हणतो....
प्रिया तुला वेड लागलं आहे का? आणि तू मला वचन दिल होतास की सोडून जाणार नाही म्हणून.
अरे हो मी वचन दिलय की मी तुला सोडून जाणार नाही,
पण तुला स्वातीशी लग्न करायचं आहे आणि त्यासाठी माझ्याशी घटस्फोट होन गरजेचं आहे,
...
तेव्हा काकू मधेच बोलतात आग घटस्फोट घेण्याची काय गरज ,
,,
त्यावर प्रिया म्हणते, काकू अस नाही न होऊ शकत, आणि पारस वकील म्हणालेत लगेच नाही घटस्फोट घेता येणार, त्यांना पण काही कारण पुरावा लागतो,
तू टेन्शन नकोस घेऊ, सगळं नीट होईल....
..
अस म्हणत बाळाला जवळ घेते त्याचे पापे घेते,
बाळ जागे होते अन रडू लागते,
तेव्हा प्रिया बाळाला स्वातीकड देऊन खाण्यासाठी काही बनवते अस म्हणून किचन मध्ये जाते,
बाळ जास्तच रडायला लागत,
....
चहा गैस वर ठेऊन परत प्रिया बाहेर येते,
तेव्हा स्वाती बाळाला नुसताच मांडीवर घेऊन हलवत असते,
...
प्रिया म्हणते स्वाती भूक लागली असेल ग दूध दे तिला..
अस म्हणून पुन्हा किचन मध्ये जाते,
जस जसे बाळ रडू लागते तस प्रियाचा ब्लाउज दुधाने ओला होतो,
आपल्याला अस का होतंय हे तिलाही समजत नाही,
कुठेतरी जीवाची तळ मळ होते......

ट्रे मध्ये चहा घेऊन प्रिया बाहेर येते, बाळ जास्तच रडू लागते,

...
पण स्वाती त्याला काही दूध देत नाही,
प्रिया काकूंना विचारते स्वाती अस का करते, त्यावर काकू म्हणतात अग तिला दूध येत नाही,
गरोदर असताना काही सोपस्कार झालेच नाहीत मग अस झालं,
आम्ही तिला वरच दूध देतोत...
अस होय, म्हणून प्रिया कामाला लागली,
बॅग मधून स्वातीने दुधाची बाटली काढली,
ड्रॉप ने एक एक थेंब बाळाच्या तोंडात सोडत होती,
.....
पण प्रिया च छातीतून दूध वाहन काही थांबेना,
सगळं सविस्तर बोलणं झालं पारस बरोबर अन काकू निघून गेल्या जाताना प्रियाला म्हणाल्या जे करायचंय ते लवकर कर बाई, समाज माझ्या मुलीला जगू द्यायचा नाही,,,,,,
आणि पारस तुझ्या मुलीचा पण विचार कर ...
अस म्हणून काकू निघून गेल्या,
प्रिया समजदार होती सगळं कसं समजुतीने हाताळत होती...
....
पारस ला प्रियाचा अभिमान वाटत होता की एवढं सगळं जाऊन पण प्रिया शांत कशी राहू शकते,
,,,
मग प्रिया आणि पारस च रोजच रुटीन चालू झाला, आता प्रिया घर स्वातीची जीवावर सोडून जात असे,
पण जी घटना पहिल्या दिवशी घडली ती प्रियाला नंतर रोजच जाणवू लागली,
रात्री दिवसा बाळ रडू लागले की प्रियाला पान्हा फुटत असे,
प्रियाला वाटे आपलं बाळ गेलं म्हणून स्वातीची बाळाला पाहून अस होत असेल,....
एक दिवस ऑफिस ला सुट्टी असताना प्रियाची आई तिला भेटायला आली...
...
प्रियाच्या घरी काय चालले आहे याची त्यांना कसलीच माहिती नव्हती
प्रियाच्या घरात स्वातीला बाळासोबत पाहून प्रियाच्या आईला काही ठीक वाटले नाही....
.. बोल्या काहीच नाहीत मग प्रियाने आईला सगळं समजावलं
प्रियाची आई तिला म्हणाली तुला वेड लागले आहे का? तू। जावई बापुना घटस्फोट द्यायचा म्हणतेस? असा विचार तरी कसा केलास
प्रिया आईला समजावून सांगते , माझं पारस वर खूप प्रेम आहे आणि त्याच ही माझ्यावर खूप प्रेम आहे
पण आई त्याने मुद्दाम नाही केलं ग हे
चूक कुणाकडूनही होऊ शकते ,
मग त्याला सांभाळून घेणे आपलीच जबाबदारी नाही का?
...
कसबस आईला शांत करते,
तोपर्यंत बाळ झोपेतून उठत,
स्वाती बाहेर गेलेली असते,
बाळ रडू लागत
प्रिया त्याला पाळण्यातून काढून जवळ घेते,
..
परत तेच चालू होतं। परत दूध येऊ लागते आपोआप..
...
आई जवळ असते ,ही गोष्ट प्रिया लगेच आईला सांगते,
.....
आईला आश्चर्य वाटते, तुझं मूल गेलं पण मग स्वातीच बाळ रडू लागल्यावर तुला पान्हा का यावा?
....
अस शक्य नाही प्रिया,
आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकते.
... .रात्री आई घरी जाताना प्रियाची रिपोर्ट मागते,
प्रिया म्हणते आग आई आता काय करायचं याच?
आई म्हणते दे मला हवेत.
प्रिया सर्व हॉस्पिटल ची फाईल आईकडे देते,
बाहेर पर्यंत आईला सोडून आल्यावर प्रियपन विचार करते ,स्वातीच्या मुलींसाठी मला दूध का यावं?
....
ती दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी झाली त्या हॉस्पिटलमध्ये जाते,
ज्या नर्स डॉक्टर होते त्यांना भेटते,
माझं बाळ का गेलं नेमकं काय झालं होतं याची ती चौकशी करते,
पण हाती काहीच लागत नाही...
पण कुठेतरी काही कमी आहे याची तिला जाणीव होते,
मग एक दिवस प्रिया स्वातीला म्हणते आपण पोलिओ ढोस द्यायला बाळाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ,
अगोदर स्वाती तयार नसते, पण प्रिया तीच काही ऐकत नाही,
तिला नाईलाज म्हणून तयार व्हावे लागते,
दोघी हॉस्पिटल ला जातात,
बाळाला पोलिओ ढोस दिल्यानंतर प्रिया स्वातीला म्हणते तू पण खूप अशक्त झाली आहेस..
तुझं पण रेग्युलर चेकअप करून घे, मग आपण औषध पण घेऊ,
तू आई झाली सगळं घाईत झालं तुझ्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे..
...
स्वाती नाहीं नाही करत होती,
पण प्रिया ने काही एक ऐकले नाही
रक्त ,ब्लडप्रेशर अगदी सर्व नॉर्मल चाचण्या करून घेतल्या..
रिपोर्ट दोन दिवसात मिळणार होते..
दुसऱ्या दिवशी ऑफिस ला जाताना प्रिया पारस ला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली पारस विचारून थकला पण तिथे जाईपर्यंत तिने काहीच सांगितले नाही.
तिकडे गेल्यावर ती पारस ला म्हणाली तुझा dna चेक करायचा आहे..
...
पारस गोंधळून गेला
, अरे पण का? आता काय झालं प्रिया?
काही नाही पारस ,माझ्या इच्छेखातर एवढं तर करू शकतोस न?
अग हे काय विचारतेस , काहीपण करेल,
पारस dna टेस्ट साठी तयार होतो,
सगळं होत,
स्वाती अन पारस चा रिपोर्ट सोबतच मिळतो सोबतच ढोस द्यायला आणलेल्या बाळाचे पण प्रिया ने डोकटर ला सांगून ब्लड सॅम्पल घेण्यास तयार केले होते,
त्या दिवशी रात्रभर बाळ रडत असत,
स्वाती त्याला वरच दूध देण्याचा प्रयत्न करते,
पण बाळ शांत होण्याचं नाव घेत नाही, शेवटी स्वाती वैतागून बाळाला प्रियाकडे देऊन झोपी जाते,..
.....
प्रिया बाळाला जवळ घेते, स्वतःच दूध पाजले,
आणि तिच्यात एक वेगळीच ममता जागृत होते,
तिच्या डोक्यात असंख्य प्रश्न उठतात
दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आणायला सकाळीच प्रिया बाहेर पडते,
... हॉस्पिटलमध्ये पोहचण्या अगोदर बाहेरच गेट वर एक मावशी भेटते,
ती प्रियाला आवर्जून विचारते,
कस आहे ग तुझं बाळ,
तू डिलिव्हरी झाली त्या दिवशीच मी पाय घसरून पडले , पंधरा दिवस कामावर नव्हते बघ, तुला नसेल आठवत पण मीच जवळ होते तुझ्य........
...
तेव्हा प्रियाची डोळे भरून आले,
मावशी माझं बाळ नाही राहील...
. मावशी म्हणते हे कसं शक्य आहे?
तू आणि तुझी पोर अगदी ठणठणीत होतात...
मी माझ्या हाताने पोरीला न्हाऊ घातले...
...
प्रियाला अगोदरच शँका होती
आत गेल्यावर प्रिया पैसे देऊन रिपोर्ट घेते
तेवढ्यात तिला ती नर्स दिसते जिने प्रियाचा बाळ गेल्याच अगोदर सांगितलेलं असत...
.. प्रिया धावतच तिच्याकडे जाते,पण ती नर्स ओळख नसल्याचं दाखवते
मग प्रिया तिला म्हणते त्या दिवशी काय झालं प्लिज मला सांगा मी वाटेल तेवढे पैसे द्यायला तयार आहे....
....
तेव्हा नर्स म्हणते पैसे नको मला अगोदरच आईपासून लेकरू वेगळं केल्याचा पश्चाताप होतोय अजून पाप नको मला..
आणि मग ती सगळं सविस्तर सांगते...
तू जेव्हा गरोदर असताना चेकअप ला यायची तुझ्यासोबत जोशीबाई यायच्या त्यांनी मला हे सर्व करायला सांगितलं...
... अहो पण काय केलं आणि का केलं ?अस प्रिया विचारते...
....
ती नर्स म्हणते पैशाच्या मोहापायी
त्या बाईने मला खूप पैशाची लालसा दिली ,आणि मी चुकीचं केलं....
.. प्रिया बोलते ,,मग माझं बाळ?
जिवंत आहे......
.. ते दुसऱ्या दिवशी येऊन पैसे देऊन जोशींबाई घेऊन गेल्या....
प्रियाला आता कुठे समजून आलं होतं की नेमकं काय झालं...
प्रिया पारस ला फोन करून सांगते आज ऑफिस ला जाऊ नको घरीच थांब मी येते...
... प्रिया ताबडतोब घरी पोहचते,,
घरात जाऊन स्वातीची खाडकन कान फडात लगावते........
स्वाती मोठ्याने बोलू लागते,
आवाज ऐकून काकू पण धावत येतात,
स्वाती सांगते प्रियाने माझ्यावर हात उचल, यात पारस ला काहीच समजत नाही काय होतंय ते.....
...

काकू प्रियाला बोलू लागतात, तुला पोलिसात देईल माझ्या मुलीचा छळ करतेस म्हणून,
स्वाती ला प्रिया हात धरून घराबाहेर काढते,
.... प्रियाला सहन नाही होत ती रडू लागते,, पारस या दोघींनि माझं बाळ चोरल,
तुझी चूक नसताना तुला अडकवल.....
... तेवढ्यात स्वाती पुन्हा घरात येते आणि म्हणते माझं बाळ मला परत दे,
तेव्हा प्रिया म्हणते तुझं बाळ?
बाळ माझं आहे, मी त्याची आई आहे...
काकू म्हणतात कशावरून?
प्रिया सगळे रिपोर्ट पारस कडे देते पारस उघडून बघतो..
बाळाच्या dna शी प्रिया आणि पारस चा dna मॅच होत असतो स्वातीच नाही.....
...... मग पारस पण सगळं समजून जातो,
तो म्हणतो काकू मी तुम्हाला आई सारख्या समजत होतो आणि तुम्हीच अस करावं...
.... पण का केलात?

स्वाती खाली मान घालून सांगते पारस माझं तुझ्यावर प्रेम होतं, पण तुझं लग्न प्रियासोबत झालं ,,मला तू हवा होतास आणि आईला पैसा.....
म्हणून हे सगळं केलं
पारस स्वातीची अंगावर धावून जातो प्रिया थांबवते
म्हणते माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता म्हणून मी आज पत्नी म्हणून जिंकले,,,आपलं बाळ आपल्याला मिळालं नको काही करू......
माझं मातृत्व ही जिंकलं,,
आणि परत तिला मातृत्वाचा पान्हा फुटला अन आई सुखावली.