Bara Jyotiling - 10 books and stories free download online pdf in Marathi

बारा जोतिर्लिंग भाग १०

बारा जोतिर्लिंग भाग १०

काशी विश्वेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.
शंकराचे हे रूप काशीत पूजले जाते.
पूर्वी वाराणसीत काशी विश्वनाथ मंदिर होते.
हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर क्रूर आक्रमक कुतूबूद्दीन ऐबक याने पाडले.
या मंदिराच्या ठिकाणी मशीद उभारली.
अनेक वर्षे दुर्लक्षित आणि मुस्लिमांद्वारे प्रतिबंधित राहिल्यावर अकबराच्या काळात तोरडमल या अभिमानी राजाने या मंदिराचे पुनर्निर्माण केले.
परंतु क्रूर आणि धर्मांध औरंगजेब याने हे मंदिर परत पाडून टाकले.
अनेक शतके तशीच गेल्यानंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले.
राजा रणजितसिंग या हिंदू देशाभिमानी राजाने त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला होता.
परंतु तो मुसलमानांनी लूटमार करून नेला.
१६ व्या शतकात येथेच संत एकनाथांनी " श्रीएकनाथी भागवत" हा वारकरी सम्प्रदायाचा महान ग्रंथ लिहीला.
येथे त्यांची हत्तीवरुन मिरवणूक निघाली होती

या शहरात सुमारे १६५४ मंदिरे आहेत.
त्यामुळे यास मंदिराचे शहर असेही म्हणतात.
त्यात प्रमुख मंदिर काशी विश्वेश्वराचे आहे.
विश्वनाथाचे दर्शन घेण्याआधी धुंडीराज किंवा ढुंढीराज विनायकाचे दर्शन घेण्याचा येथे प्रघात आहे.
या मंदिराचे सभोवताली अष्ट दिशांचे अष्टविनायक आहेत.
साक्षी विनायक पश्चिमेला, देहली विनायक उत्तरेला, पापशार्थी विनायक दक्षिणेला, दुर्गा विनायक नैऋत्येला, भीमचंद विनायक वायव्येला, उदंड विनायक आणि ईशान्येला सर्व विनायक.

मुख्य मंदिर

काशी विश्वनाथाचे मंदिरात मुख्य पिंडी गाभाऱ्याचे एका टोकाला आहे.
त्यावर गंगाजल व बिल्वपत्रे वाहण्यात येतात.
ते काळ्या पाषाणाचे व सोन्या-चांदीने मढविले आहे.
तेथे दर्शन घ्यावयाचे तर तीन हार न्यायची पद्धत आहे.
एक हार शंकराला,दुसरा पार्वतीला तर तिसरा हार तेथील पुजारी त्या भक्ताच्या गळ्यात घालतो.
काशी विश्वनाथ बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वांत पवित्र मानलं जाणारं गंगा नदीच्या घाटावर काशी म्हणजेच बनारस येथे आहे.
विश्वनाथचा अर्थ विश्वाचा नाथ म्हणजेच स्वामी.
बनारस हे जगाच्या इतिहासातील काही प्राचिन शहरांपैकी एक शहर मानले जाते.
या शहराचा लिखित इतिहास ३५०० वर्षं जुना आहे.

लोक येथे केवळ दर्शनासाठीच येतात, असे नाही तर आयुष्यात मोक्षप्राप्ती व्हावी ती इथेच असे त्यांना वाटते. परदेशातूनही लोक येथे येतात आणि गंगेच्या घाटाच्या सानिध्यात वसलेल्यामठ-मंदिरात जाऊन मनाला शांती देऊ शकणार्‍या साधुसंतांच्या चरणी नतमस्तक होतात.
विश्वनाथ मंदिराच्या आत एक मंडप आणि गर्भगृह आहे.
गर्भगृहाच्या आत चांदीने मढविलेले परमेश्वर विश्वनाथांचे साठ सेंटिमीटर उंच शिवलिंग आहे.
हे शिवलिंग काळ्या दगडातून निर्मित आहे.
मंदिराचा आतील परिसर मोठा नसला तरीही तेथील वातावरण शिवमय आहे.

वाराणसी अर्थात काशीचे महत्त्व फार मोठे आहे.
पृथ्वीची निर्मिर्ती झाली तेव्हा प्रकाशाची पहिली किरणे काशीच्या भूमीवरच पडली असे मानले जाते.
तेव्हापासूनच काशी ज्ञान, अध्यात्माचे केंद्र झाले.
काशीची निर्मिती झाल्यानंतर काही कालांतराने शंकराने येथे काही काळ वास्तव्य केले होते.
ब्रह्माने दहा घोड्यांचा रथ (दशाश्वमेघ) घाटावर पाठवून त्यांचे स्वागत केले होते.

गंगेच्या किनार्‍यावर अरुंद विश्वनाथ गल्लीत विश्वनाथाचे मंदिर आहे
त्याच्या चहूबाजूने मंदिरे आहेत.
येथे एक विहीरही आहे. तिला 'ज्ञानव्यापी'ची संज्ञा दिली जाते.
ती मंदिराच्या उत्तरेला आहे.

या ज्योतिर्लिंगाची एक कथा अशी आहे
भगवान शिवजी आपली पत्नी पार्वतीसोबत हिमालय पर्वतावर रहात होते .
भगवान शिवजीच्या प्रतिष्ठेसाठी पार्वतीने राहण्यासाठी दुसरे ठिकाण शोधायला सांगितले .

शिवजीना राजा दिवोदासची वाराणसी नगरी खुप आवडली .
भगवान शिवजीच्यासाठी शांत जागा हवी होती म्हणुन निकुंभ नावाच्या शिवाच्या सेवकाने सर्व वाराणसी नगरी निर्मनुष्य केली .
त्यामुळे राजाला फार दुःख झाले .
राजाने घोर तपश्चर्या करून ब्रह्माजीना प्रसन्न केले आणि त्याना आपले दुख्ख दूर करण्याची प्रार्थना केली दिवोदास म्हणाला की देवांनी देवलोकात रहावे
पृथ्वी तर फक्त माणसांसाठी आहे .
ब्रह्माजीच्या सांगण्यानुसार शिवजी मंदराचल पर्वतावर निघुन गेले .
ते तेथुन निघुन गेले पण काशी नगरीचा मोह त्यांना आवरला नाही .
तेव्हा भगवान विष्णुजीनी राजाला तपोवनात जायचा आदेश दिला .
त्यानंतर वाराणसी हे शिवजीचे कायम राहण्याचे ठिकाण झाले .
दुसर्या कथेनुसार
एकदा ब्रह्माजी आणि विष्णु भगवान यांच्यात वाद झाला की त्यांच्यात मोठे कोण आहे.
त्यावेळी ब्रह्माजी आपल्या वाहनावर,हंसावर बसून स्तंभाचे वरचे टोक शोधु लागले आणि विष्णुजी खालचे टोक शोधु लागले तेव्हा स्तंभामधुन प्रकाश बाहेर पडला .

त्या प्रकाशातून भगवान शिवजी प्रकट झाले .
विष्णुजीनी कबुल केले की ते शेवटचे टोक हुडकू शकले नाहीत.
मात्र ब्रह्माजी खोटे बोलले की मी ते टोक शोधले आहे असे .
तेव्हा शिवजीनी ब्रम्हाजीना शाप दिला की त्यांची पुजा कधीच केली जाणार नाही .
कारण ते खोटे बोलले आहेत .
तेव्हा त्याच स्थानावर शिवजी ज्योतिर्लिंगच्या रूपात विराजमान झाले .
असे म्हणतात की भगवान शिवजी भक्ताच्या स्वप्नात आले आणि सांगितले की तु गंगेत स्नान करशील तर तुला दोन शिवलिंगांचे दर्शन होईल .
या दोन्ही शिवलिंगांना जोडून तुला स्थापित करावे लागेल.
तेव्हा दिव्य शिवलिंगाची स्थापना होइल .
तेव्हापासुनच भगवान शिवजी माता पार्वतीच्या सोबत इथे विराजमान आहेत .

काशी हिन्दू विश्वविद्यालय

काशी हिन्दू विश्वविद्यालयाच्या प्रांगणात सुद्धा एक विश्वनाथाचे मंदिर बनवले गेले आहे .
या मंदिराचे ही तितकेच महत्त्व आहे जितके जुन्या विश्वनाथ मंदिराचे आहे .
या नव्या मंदिराविषयी एक गोष्ट अशी सांगितली जाते जी मदन मोहन मालवीय संदर्भात आहे .
मालवीय शिवाचे उपासक होते .
एक दिवस त्याना शिव भगवानची पूजा करताना एक भव्य मूर्ति चे दर्शन झाले .

त्यातुन त्यांना आदेश मिळाला की बाबा विश्वनाथची प्रतिष्ठापना केली जावी .
त्यांनी तिथे मंदिर बांधायला सुरवात केली .
पण ते अचानक आजारी पडले .
तेव्हा हे मंदिर उद्योगपति युगल किशोर विरला यांनी स्थापन केले .
इथेही हजारोंच्या संख्येने भक्तगण दर्शन करण्यासाठी येत असतात .
विद्यालय आवारात स्थापित झाल्यामुळे हे विद्यार्थ्यांचे आकर्षण केंद्र आहे .

इथेच विशालाक्षी शक्तिपीठ मीरघाटावर बांधलेलं आहे .
हे 51 शक्तिपीठापैकी एक आहे .
या देवीच्या उजव्या कानातला मणि पडला होता .
तेव्हापासून या जागेचे नाव मणिकर्णिका शक्तिपीठ आहे .
या नगरीमधले प्रसिद्ध घाट दशाश्वमेघ घाट, मणिकर्णिका घाट, हरिश्चंद्र घाट आणि तुलसीदास घाट आहेत .
या नगरीमध्ये प्रवेश करताच भक्तगणांची संकटे दूर होतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात .
हे मंदिर रोज भल्या पहाटे 2.30 वाजता मंगल आरतीसाठी खुले केले जाते.
ही आरती सकाळी 3 ते 4 वाजेपर्यंत चालते.
भाविक तिकिट घेऊन या आरतीत भाग घेतात.
त्यानंतर 4 वाजेपासून सकाळी 11 वाजेपर्यंत सर्वांसाठी मंदिर खुले होते.
11.30 पासून दुपारी 1 वाजेपर्यंत नैवैद्य आरतीचे आयोजन होते.
12 वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत परत या मंदिरात सार्वजनिक दर्शनाची व्यवस्था आहे.
संध्याकाळी 7 ते 8.30 पर्यंत सप्तऋषी आरती चालते त्यानंतर रात्री 9 वाजेपर्यंत सर्व भाविक मंदिराच्या आत दर्शन करू शकतात.
9 वाजेनंतर मंदिर परिसराबाहेरूनच दर्शन घ्यावे लागते.
शेवटी 10.30 वाजता रात्री शयन आरती प्रारंभ होते.
लोकानी वाहिलेला प्रसाद, दूध, कपडे आणि अन्य वस्तू गरीबांमध्ये वाटल्या जातात.

हे मंदिर ऐतिहासिक काळात निर्माण झाले होते, असे मानले जाते.

इसवी सन 1776 मध्ये इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मोठी रक्कम दान केली होती.

लाहोरचे महाराजा रणजीतसिंह यांनी मंदिराच्या शिखरासाठी एक हजार किलो सोने दान दिले होते.
1983 मध्ये उत्तरप्रदेश सरकारने मंदिराचे व्यवस्थापन आपल्या हातात घेतले आणि काशीचे माजी नरेश विभूती सिंह यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती केली.

क्रमशः