savat - 4 books and stories free download online pdf in Marathi

सवत... - ४

संध्या हरीच्या मागे थांबली होती, हरी हळूच मागे फिरला, पण संध्या हरीच्या समोर आली नाही, हरी त्याच्या सीट वर जाऊन बसला, ईशा झोपली होती....

सकाळ झाली, हरी आणि ईशा घरी पोचले....

"Finally home sweet home.... बर वाटलं आता".... ईशा

हरी ने काहीच उत्तर दिलं नाही तो शांतच उभा होता.....

संध्याकाळ झाली हरी बाल्कनी मध्ये थांबला होता, ईशाला काहीच कळत नव्हतं की हरी असा का वागतोय, ईशा हरी सोबत बोलण्यासाठी बाल्कनी मध्ये आली, पण तेव्हाच तिचं लक्ष हरीच्या हातावर गेला....

"हरी तुझ्या हातावरचा दोरा"... ???

हरी ने ईशा कडं पाहिलं आणि बोलला.... "माहीत नाही पडला असेल"

"असं कसं पडला"...

"ईशा stop it यार, बोललो ना माहीत नाही".... हरी अगदी रागात बोलला

"हरी तुला झालाय काय, तू का एवढा चिडतोय, कधी पासून बघतेय मी, एकटा एकटा बसून रहातो, ना नीट बोलतोय ना नीट वागतोय, काय झालंय का"....????

"ईशा just leave it यार, i am not in a mood of any conversation, please just leave it"..... हरीचा राग त्याच्या बोलण्यावरून स्पष्ट दिसत होता

"Oook... ठीक आहे जाते मी".... ईशा बेडरूम मध्ये जाऊन बसली, ईशा रडत होती, तिला काहीच कळत नव्हतं, हरीचं हे वागणं तिला अजिबात पटत नव्हतं

रात्र झाली.... हरी बेडच्या एक कोपऱ्यात तोंड करून झोपला होता तेच ईशा दुसऱ्या बाजूला, दोघे ही जागे होते पण एक मेकांसोबत बोलत नव्हते....

हरी ला माहीत होतं की चूक त्याची आहे, पण तो सध्या फक्त संध्या चा विचार करत होता की ती कुठे गेली....

दिवस असेच जात होते, संध्या परत हरी ला कधी दिसली नाही ना स्वप्नयात ना प्रत्यक्षात....

हरीने त्याची चूक स्वीकारली, त्याने ईशा सोबत भरपूर वेळा बोलण्याचा प्रयत्न केला पण ईशा च्या मनातून राग जात नव्हता......

सगळं एकदम विस्कटलं, हरी आणि ईशा च्या मध्ये वाद वाढायला लागले संध्या पण परत हरी ला दिसली नाही.......


एक दिवस हरी ऑफिस मध्ये डोळे मिटून खुडचिवर मान वर करून बसला होता....

तेव्हाच त्याला अचानक एक वेगाच ड्रीष्य दिसला, हरी ला त्याच्या केबिन मध्ये त्याच्या टेबल च्या समोर ईशा सोफा वर बसलेली दिसत होती....

हरी ला काहीच कळत नव्हतं की हे काय होतंय, हरी त्याच्या जागेवरून उठला आणि ईशा च्या जवळ गेला तेव्हाच ईशा सोफा वरून उठली आणि हरीच्या आर पार निघून गेली....

हरी हे बघतच रहायलं, त्याला काहीच कळत नव्हतं.... हरी मागे फिरला ईशा तितच थांबली होती, ईशा ने अचानक तिच्या डोक्यावर हाथ ठेवला, ईशा ला चक्कर येत होते, हरी तिला पकडायला तिच्या जवळ गेला आणि तिच्या कमरे वर हाथ ठेवून हरी ईशाला धरायला गेला, पण ईशा खाली पडली, हरी खाली बसून ईशा ईशा ओरडत होता, तिला उठवत होता पण ईशा बेशुद्ध झाली होती, हरी ईशा ला स्पर्श करण्याच्या प्रयत्न करत होता पण ते शक्य नव्हतं....

तेव्हाच हरीच्या केबिन मध्ये त्याची Assitant आली..... "सर काय झालं तुम्ही खाली काय करताय".....

हरी एकदम शुद्धीत आला, बघतोय तर तो त्याच्या ऑफिस मध्ये होता, त्याने खाली बघितलं तर ईशा तिथं नव्हती, हरी ने त्याच्या डोक्यावरचा घाम पुसला आणि उभा झाला....

"सर its everything oook".....

पण हरीने काहीच उत्तर दिलं नाही, हरी काही न बोलता पटकन ऑफिस वरून घरी जाण्यासाठी निघाला....

हरी सारखं ईशा ला फोन लावत होता पण ईशा फोन उचलत नव्हती, हरीला खूप टेन्शन येत होतं, फटाफट तो घरी पोचला, हरीने पटकन खिशातून घराची चावी काढली आणि दार उघडला, दार उघडताच त्याची नजर ईशा वर पडली, ईशा बेशुद्ध होऊन खाली पडली होती....

हरीने पटकन ईशा ला उठवायचा प्रयत्न केला पण ईशा उठत नव्हती, हरी धावत किचन मध्ये गेला आणि पाणी घेऊन आला, हरीने ईशा च्या चेहऱ्यावर पाणी शिंकडलं आणि ईशा शुद्धीत आली, हरी ला समोर बघताच ईशाने हरी चा हाथ धरला, हरीच्या पण जीवात जीव आला, त्याने ईशा ला त्याच्या ओंजळीत घेतलं....

हरी ईशा ला दवाखान्यात घेऊन आला....

"घाबरायची काय गरज नाहीये, अश्या situation मध्ये हे normal आहे पण, काळजी घ्या".... डॉक्टर

"सर म्हणजे"...... हरी

"Means तुमची wife pregnant आहे, soon you gonna have a baby"......डॉक्टर

हरी आणि ईशा हे ऐकून खूप खुश झाले.... हरी ईशा ला घेऊन घरी आला…..

घरी येताच ईशा बोलली..... "हरी what you think काय होईल, baby girl or boy"..... ईशा

"माहीत नाही पण i am damn excited dear".... हरी

"तुला माहीत आहे मी तर नाव पण ठरवून ठेवले आहेत"....ईशा

" अच्छा ".... हरी

"हो, हरी एकदम वेगाचा वाटाय आज"...

हरीने ईशा कडे पाहिलं आणि गालातल्या गालात हसला....

" हरी "..... ईशा एक दम हळूच बोलली

" हां ईशु बोलना ".... हरी ने अगदी प्रमाणे उत्तर दिला

"हरी सॉरी यार, please सॉरी".....

हे ऐकताच हरी पटकन ईशाच्या जवळ गेला.... "अरे काय झालं अचानक, आता तर एवढ्या चांगल्या मूड मध्ये होतीस.... अरे ईशु रडतोस का तू पागल झाली आहेस का".... हरी

"हरी खूप त्रास दिला ना मी तुला एवढ्या दिवस, तुझ्यासोबत नीट वागली नाही मी, आज जर तू धावत आला नसता तर".... ईशा

"तर काय.... ??? गप काही पण बोलू नकोस आणि चुकी तर माझी आहे ईशु, मीच येड्या सारखं वागत होतो.... am sorry" हरी

"नाही मी आधी बोलली ना sorry मग माझी चुकी आहे".... ईशा

" ईशु ".... हरी

"बस्स आता जाऊदेत तुझी चुकी आहे ".... ईशा

" अच्छा चापटर आहेस ".... हरी

" आता ना मला उचल आणि बेडरूम मध्ये घेऊन जा आठवतं ना डॉक्टर नि काय सांगितलं आहे, i need rest"..... ईशा

"अच्छा फक्त उचलून घेऊन जाऊ".... हरी प्रेमाने बोलला

"नको तसं, काही दुसरं विचार असेल तर काय हरकत नाही, manage करून घेईन मी"..... ईशा

अच्छा.... हरी ने पटकन ईशा ला उचललं आणि बेडरूम मध्ये घेऊन गेला....

रात्र झाली, जेवल्यानंतर दोघे ही बेडवर झोपले होते, हरी ईशाच्या केसांमध्ये हाथ फिरवत होता....

"हरी पण तुला कसं कळलं की मी बेशुद्ध होऊन पडली आहे घरी, तू तर ऑफिस मध्ये होता ना"..... ईशा

"ते काय ना त्याला प्रेम म्हणतात, मला पटकन कळतं की तू कुठे आहेस काय करतेय, काय विचार करतेय"....... हरी

"चल काहीही पकवू नकोस"..... ईशा

"अग बघ तुला खोटं वाटाय"..... हरी

"हो वाटाय, अच्छा येवडच आहे ना तर सांग आता मी काय विचार करतेय".... ईशा

"अच्छा सांगू... उममम आता ना तुझ्या मनात विचार चालू आहे की मी तुला असं जवळ घ्यावं".... हरी

हरी ने बोलता बोलता पटकन ईशा ला जवळ घेतलं....

"अच्छा, पण मी तर काय असला विचार केलाच नाही".....

"असं का.... ! तर मग आता कर"..... हरीने ईशाला त्याच्या मिठीत घेतलं

ईशा झोपली होती, पण हरीला झोप लागत नव्हती, तो सारखं आज जे घडलं, त्याला ऑफिस मध्ये जे सगळं दिसलं त्याच्या विचार करत होता, हरी ला खात्री होतो की जे काय झालं त्याच्या मागे संध्याच आहे, तिने ईशा चा जीव वाचवलं आणि मला ही येऊन सांगितलं पण संध्या आहे कुठे....

हरी मनातल्या मनात संध्याचं खूप आभार मानत होता, पण ती त्याला दिसत नव्हती.....

पण संध्या तितच होती..... संध्या बेडवर हरी आणि ईशाच्या मधेच झोपली होती, ती एकटक ईशाच्या पोटाकडे बघत होती आणि मग तिने हळूच तिचा हात ईशा च्या पोटावर ठेवलं आणि बोलली....

"वाट पाहतेय मी तुझी, बस लवकर ये"...... संध्या

----------------------------------------------------------- To Be Continued ---------------------------------------------------------------