Jyotishshatra - 7 in Marathi Magazine by Sudhakar Katekar books and stories PDF | ज्योतिष शास्र। धनयोग - 7

ज्योतिष शास्र। धनयोग - 7

जन्म कुंडली :मोठा सम्पतीदायक योग

जन्म कुंडली :मोठा सम्पतीदायक योग :(१) चंद्राच्या लाभात रवि ,रवीच्या लाभत गुरु ,गुरूच्या लाभात शनी
(२) चंद्राच्या लाभात शनी ,शनीच्या लाभात हर्शल (३) चंद्राच्या लाभात रवि गुरु युती ,तिच्या लाभत शनी
(४)चंद्राच्या लाभात रवी व रविच्या लाभात गुरु ,शनी युती (५)चंद्राच्या लाभात बुध ,बुधाच्या लाभात शुक्र ,
शुक्राच्या लाभात गुरू व गुरूच्या लाभात शनी (५)गुरूच्या लाभात शनी .
अशा प्रकारचे योग मोठे व्यापारी व कारखानदार यांना असतात . लाखांनी/कोटींनी संपती मिळते असे ग्रह
भाग्यस्थानापासून पाहावेत.
(६)रवीच्या द्वितीय स्थानी शुक्र, गुरूच्या द्वितीय स्थानी शनी लग्नाच्या द्वितीय स्थानी बुध (७) भाग्यात गुरु लाभात शनी लग्नी रवि अथवा चंद्र हाही चांगला योग आहे.
कुंडलीतील अकल्पित धनयोग
(१) अष्टमेश अष्टमात (२)अष्टमेश, धनेश,वलाभेश उचस्त
(३) अष्टमेश लाभत व लाभेश अष्टमात
(४) अष्टमेश धनात व धनेश अष्टमात
(५) अष्टमेश लाभेश (६) अष्टमेश धनेश
(७) अष्टमेश लाभेश धनेश
मृत्रूपत्राधारे मिळणारे,बेवारशी,देणग्या मिळालेले ,जमिनीत सापडलेले
लौटरीत किवा सट्ट्यात अगर शर्यतीत मिळालेले अशा प्रकारचे जे धन
ते अकल्पित धन होय.अष्टमेश,लाभेश व धनेश हे बलवान असल्या
शिवाय हे धन प्राप्त व्हावंयाचे नाही
त्रीरेकादश योग अर्थात संपत्ती योग धनयोग कसे पाहावे.तूळ लग्न आहे.वृश्चिक राशीत मंगळ आहे.कन्या राशीत गुरु आहे.कन्या रास धरून वृशिक रास तिसरी येते.वृश्चिक रास धरुन कन्या रास अकरावी येते याचा अर्थ मंगळ गुरु या दोन ग्रहांचा त्रीरेकादश योग आहे.तसेच गुरु-चंद्र ,चंद्र व रवी,बुध,रवी,बुध वं शुक्र, शुक्र व शनी या ग्रहांचे ग्रहांचे त्रीरेकादश योग आहेत.अशा योगात सांपत्तिक स्थिती
अतिशय चांगली असते. व्यवसाय असो वा नोकरी आर्थिक उत्कर्ष होतो काहींच्या कुंडलीत दोन ग्रहात हा योग असतो.काहींच्या जन्मपत्रिकेत दोन पेक्षा अधिक ग्रहांचा योग असतो.या प्रमाणे जन्मपत्रिकेत योग पहा.
कृष्णमुर्ती पद्धत्ती प्रमाणे धनजोग.
प्रथम धन स्थानाचा उप नक्षत स्वामी पहावा.तो ज्या स्थानात असेल त्या प्रमाणे फल देतो
१) तो जर लग्नाचा कार्येश असेल तर स्व कष्टाने व स्व
कर्तृत्वाने धन मिळते.
२) धन स्थानाचे कार्येश असेल तर,व्याख्याने नोकरी,खाद्य
पदार्थाचे विक्री.
३) तृतीय स्थानाचे कार्येश असेल तर मुद्रण,प्रकाशन,लेखन,
पोस्ट खाते,,प्रवासी संस्था,एजन्सी,
,४) शेतीचे उत्पन्न,घर,या पासून फायदा,तसेच माते
कडून फायदा.
५) खेळ, मनोरंजनाचे साहित्य,क्रीडा,क्षेत्र, विद्या,
इत्यादी द्वारे उत्पादन मिळते.
६) साहावें स्थानाचा कार्येश असल्यास,नोकरी,पाळीव
प्राणी,मातुल घराण्याकडून फायदा.
७) व्यवसाय,भागीदारी,पत्नी,स्त्री या द्वारे धन मिळते.
८) वारसा हक्क द्वारे,मृत्यूपत्र, या द्वारे ,प्रॉव्हिडंट फंड
धन मिळते.
९) तीर्थ यात्रा,ट्रस्ट,प्रवासी कंपनी ,धार्मिक स्थळे
संस्था या द्वारे धन मिळते.
१०) सरकार,अधिकाराची जागा,राजकारण, या द्वारे.
११) या स्थानाचा कार्येश असल्यास आयुष्य भर आर्थिक
परिस्थिती चांगली राहते.मोठया भावाकडून मदत
मिळते.
१२) या स्थानाचा कार्येश असल्यास,जेल,हॉस्पिटल,परदेश
या द्वारे धन मिळते.
कुठल्याही व्यवसायात आगर नोकरीत प्रगती अथवा
चांगला काळ कोणता आहे हे पाहण्या करिता महा दशा
व अंतर दशा याचा विचार केला पाहिजे.उदा.एखाद्याचे
मिथुन लग्न आहे व गुरुची महादशा चालू आहे व गुरुचीच
अंतर दशा चालू आहे गुरू अष्टम भावात मकर राशीत
आहे.गुरू मकर राशीत नीचीचा असतो परंतु तो धनिष्ठा
नक्षत्रात आहे.धनिष्ठा नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे.मंगळ
धनस्थानी आहे शिवाय मंगल साहावे व अकरावे भावाचा
कार्येश गुरू मंगळाचे राशीत असल्यामुळे तो नक्षत्र स्वामी
प्रमाणे फल देणार.
कुंडलीतील राज योग
या मध्ये तीन भाग पडतात.1) नृप योग 2) राजाचा मांडलिक संस्थानाचा अधिकारी.राजाचा अधिकारी
व्हायसराय,गव्हर्नर,असेंम्बली चे सभासद तर तिसऱ्या प्रकारात राजाने नेमलेले अधिकारी,ज्यांना शिक्षा करता येते
असे अधिकारी.
कर्क,सिंह,मेष व मकर या राज राशी आहेत.चंद्र,सूर्य,मंगळ
हे राज ग्रह आहेत.गुरू व शुक्र हे राज मंत्री आहेत.
लग्न,दशम क्वचित चतुर्थ, सप्तम हे राज स्थाने आहेत.
लग्नेश व दशमेश,चतुर्थेश व सप्तमेश हे राज्येस आहेत.
केंद्राधी पती व त्रिकोणाधी पती यांचा योग किंवा अनोन्य
केंद्र योग्य होईल तर तो राज योग.कर्क,सिंह राशीचे महत्व
लग्न चतुर्थ दशम या स्थानात आहे.केंद्र योगामध्ये स्वावलंबन
व कर्तृत्व शक्ती तर त्रिकोण योगात भाग्य,उच्चत्वाची तृप्ती
आहे.
सु.गो. काटेकर
विशारद
Astrological Research Institute, Chennai




Rate & Review

Rushikesh Bidwai

Rushikesh Bidwai 1 month ago

shridhar adam

shridhar adam 8 months ago

gitesh

gitesh 10 months ago

Anand Deshpande

Anand Deshpande 2 years ago

milind dhotre

milind dhotre 2 years ago