Chinu - 4 books and stories free download online pdf in Marathi

चिनू - 4

चिनू

Sangita Mahajan

(4)

रकमाला थोडे हायसे वाटते, कारण इतके दिवस एकटीच बिचारी घुसमटत होती. तिसऱ्या दिवशी घरमालक येतो पैसे न्यायला लगेच रकमा पोलिसांना इशारा करते, पोलीस लक्ष्य ठेऊनच होते. लगेच ते घरमालकाच्या भोवती गोळा झाले. घरमालक पण थोडा गोंधळला. "मी इन्स्पेक्टर देशपांडे, मला सांग हे घर भाड्यानं कोणी घेतलं होतं? आणि खरं खरं सांगायचं, काही होशियारी नाही करायची." देशपांडे आपली ओळख देत बोलले. "साहेब मी त्याला ओळखत नाही पहिल्यांदाच बघितला त्याला." घरमालक म्हणाला. "त्याची काही कागदपत्र वगैरे आहेत का?" देशपांडे. "नाहीत" घरमालक. "काही चौकशी न करता घर कसं दिलं भाड्याने? बरं त्याचे वर्णन करू शकता ना?" देशपांडे. "हो साहेब" घरमालक. "ठीक आहे, शिंदे sketch आर्टिस्टला बोलवा आणि sketch काढून घ्या त्याचं." देशपांडेंनी ऑर्डर सोडली. १/२ तासाने sketch आर्टिस्ट आला, घरमालकाने वर्णन केल्याप्रमाणे त्याने sketch तयार केले. घरमालकाला विचारले, "असाच दिसतो तो?" "होय अगदी असाच दिसतो." घरमालक उत्तरला. देशपांडे रामाच्या मित्राला घेऊन गावात गेले चौकशीसाठी. दोघे बराच वेळ फिरले, २-३ तासांनी त्यांना एक माणूस सांगितला कि या माणसाला तो रोज संध्याकाळी दारूच्या अड्ड्यावर बघतो. त्याच दिवशी संध्याकाळी लगेच दोघं त्या माणसाबरोबर दारूच्या अड्ड्यावर गेले. त्या माणसाला यांनी सांगून ठेवलं, "तो आल्यावर लगेच आम्हाला इशारा करायचा." रोजच्या ठरलेल्या वेळात तो माणूस आला. लगेच इशारा झाला, दोघांनी लगेच त्याला घेरलं आणि सोबत घेऊन आले. आता सगळे एकत्र जमले. "सांग रकमेला घर भाड्यानं घेऊन द्यायला तुला कोणी सांगितलं होतं?" देशपांडे करारी आवाजात बोलले. आधी त्यानं थोडे अधे-वेढे घेतले. पण देशपांडेंसमोर त्याचं काही एक चाललं नाही. उत्तर देण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता आता. तो म्हणाला, मी त्याला बघितलं नाही साहेब आम्हाला फोनवर सूचना मिळत असतात. "मग फोन नंबर सांग त्यांचा" देशपांडे. फोन नेहमी private नंबरवरून येत असतात, हा पण एकदा त्याने फोन केला होता तेव्हा मला मागून बारीकसा आवाज आला होता, काहीतरी डुडुळगाव डुडुळगाव असा ओरडतेला. "बाकी काही आठवतं का अजून त्यांच्याबद्दल?" देशपांडे. "नाही साहेब ते काहीच थांगपत्ता लागू देत नाहीत" तो माणूस. "बरं, काही आठवलं तर लगेच सांगायचं, जा तू आता आणि आम्ही सांगितल्याशिवाय गाव सोडून कुठेही जायचं नाही. आणि तुझ्या बॉसला यातलं काही कळता कामा नये. काही चालाकी झाली तर सरळ आत टाकून देईन, समजलं काय?" देशपांडे. "होय साहेब." तो माणूस. तो माणूस निघून गेला. आता पोलिसांची चक्रं वेगाने फिरायला लागली. देशपांडेनि लॅपटॉप उघडून लगेच डुडुळगाव शोधून काढलं. डुडुळगाव खूपच लांब होतं, देशपांडे जायची तयारी करू लागले, सोबत ५-६ जणांना घेऊन ते निघाले. पूर्ण एक दिवसानंतर ते त्या गावात पोचले. गाव अगदी छोटंसं होतं, फारसं कोणाला माहित होणार नाही असं. आता त्या गावात पोचले खरे पण त्याचा चेहराच माहित नसल्यामुळे त्याला शोधणं म्हणजे कसोटी होती. पोलीस गावात वेगवेगळ्या दिशेला चक्कर मारून आले, पण असं कोणी संशयित त्यांना आढळला नाही. देशपांडे विचार करू लागले, एवढ्यात त्यांना रक्माने सांगितलेली एक गोष्ट आठवली, त्यातला जो माणूस ऑर्डर सोडत होता त्याच्या हाथावर गोंदण म्हणजेच टॅटू होतं. आणि हाच तो माणूस ज्याने रकमेला घर घेऊन देण्याची ऑर्डर केली होती. म्हणजेच याच्या हातावर टॅटू असला पाहिजे. गावाच्या जवळ एक शहर होतं, तिथं टॅटूची किती दुकानं आहेत हे त्यांनी शोधून काढलं. एकूण १५ दुकानं होती. आज सगळे तिकडेच निघाले, पण साध्या वेशातच जेणेकरून तो माणूस सावध होणार नाही. सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचे ठरवून प्रत्येकजण आपापल्या दिशेनं निघाला. दुपार झाली, १५ पैकी ८ दुकानं फिरून झाली, पोलीस अथक प्रयत्न करत होते. संध्याकाळचे ५ वाजले होते, आता दोनच दुकानं राहिली होती. ७ वाजता सगळे एकत्र जमले. एकूण चार जणांनी गरुडाचे टॅटू काढून घेतले होते. त्यांचे फोटोही मिळाले होते. बाकी तिघे तर त्या शहरातले होते, म्हणजे राहिलेला माणूस तो अपराधी असला पाहिजे आणि डुडुळगावचा असला पाहिजे असा तर्क पोलिसांनी काढला. त्याने दिलेला पत्ता पण चुकीचा होता, यावरून नक्की तोच असावा. या सगळ्यांमधून एक चांगलं झालं ते म्हणजे त्याचा फोटो मिळाला. आधी पोलिसांनी गावात तो फोटो दाखवून चौकशी केली, एकाने सांगितले त्याचं घर माहिती आहे एकदा त्याला तिथे जाताना बघितलं होतं म्हणून, पोलीस त्याला घेऊन गेले तिकडे, घर दाखवून तो परत गेला. पोलिसांनी दाराची बेल वाजवली पण कोणी दार उघडले नाही. मग पोलिसांनी त्यांच्या मास्टर कीने दार उघडलं. दोनच खोल्या होत्या आणि सामान पण जास्त नव्हतं. कोणाला समजू नये म्हणून या दूर आणि छोट्या असलेल्या गावात तो राहत असावा. त्याच्या घरात काही फारसं कामाचं सापडलं नाही. थोड्या वेळाने पोलीस बाहेर पडले. विचारत विचारत ते जवळच्या highway ला आले. तिथे एका पानाच्या टपरीवाल्याला त्यांनी विचारलं, त्याने सांगितलं "५ मिनिटापूर्वीच हा माणूस इथून cigarette घेऊन गेला इकडे डाव्या बाजूने तो गेला गाडी घेऊन." पोलीस लगेच त्या दिशेने वेगाने निघाले. बरंच अंतर पुढे गेल्यावर तिथे एक टोल नाका लागला. तिथे त्यांनी चौकशी केल्यावर त्या गाडीचा नंबर त्यांना मिळाला. सगळ्या टोल नाक्यावर आणि कंट्रोल रूम मध्ये हा नंबर देऊन हि गाडी दिसताच थांबवायला सांगण्यात आले आणि त्यांना कळवायला सांगितले. आणि त्याच दिशेने जात राहिले. थोड्या वेळातच फोन आला. "गाडी थांबवले साहेब तुम्ही लवकर पेंढारकर रोडला पोचा." पोलीस १/२ तासात तिथे पोचले. तोच फोटोतला माणूस होता आणि त्याच्या हातावर गरुडाचा मोठा टॅटू होता. दिसायला एकदम भारदस्त असा होता. गॉगल, कोट, गळ्यात सोन्याची चैन, असा त्याचा पेहराव होता. पोलिसांना बघून तो पूर्ण घाबरून गेला. तो पळण्याचा प्रयत्न करू लागला पण पोलिसांच्या होशियारीसमोर त्याचं काहीच चाललं नाही. त्याला घेऊन पोलीस परत फिरले, त्याची चांगली कसून चौकशी सुरु झाली. त्याचं नाव होतं राका. काही केल्या तो काही सांगत नव्हता, त्याचं ठरलेलं एकच उत्तर यातलं मला काही माहित नाही. सांगून ऐकत नाही हे बघून देशपांडेंनी त्याला एक ठेऊन दिली. "सांग खरं काय ते नाही तर third डिग्री घ्यावी लागेल. यावर तो थोडासा नरम आला, दुसरा हात उठणारच होता इतक्यात तो म्हणाला, "सांगतो साहेब, मारू नका. मला तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे दिले होते." "सांग लवकर त्याचं नाव." देशपांडे रागाने बोलत होते. आता मात्र राका पूर्ण हताश झाला, खरं काय ते सांगण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नव्हता. तो रडत रडत सांगू लागला, "मला हे काम करण्यासाठी तिच्या स्वतःच्या काकानेच पैसे दिले होते.

******