corona - ek bhayankar sankat books and stories free download online pdf in Marathi

कोरोना... एक भयंकर संकट

America-13Lac, Spain-260000
Italy-217000 france-174000
आणि India मध्ये - एवढे कमी... Shittt.....
ए Hiiii ओळखलात का मला, कसे ओळखणार. मी दिसतोच कुठे ना. मी कोणालाही न दिसणारा पण संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवणारा .भयानक आणि विध्वंसक कोरोना , माझा जन्म डिसेंबर २०१९ ला चायना मधील वुहान या छोट्याशा शहरातील फिश मार्केट मध्ये झाला. पण मी कोण, कसा आलो, कसा पसरतो, माझ्यापासून कस वाचावं या सर्वांची उत्तर शोधेपर्यंतच मी पूर्ण चीन ला विळखा घालायला सुरुवात केली. अगदी कमी कालावधीतच मी पूर्ण चीन ला धडाशाही केल होत आणि माझी दहशत पूर्ण चीनभर पसरली. तिकडच्या लोकांनी मला खूपच कमी लेखलं आणि त्यांना त्याचे परिणाम भोगावे हे लागलेच.

आता हळूहळू मला माझ्या आस्थित्तवाची जाणिव होऊ लागली होती. पण लोक तर Sanitizer वापरु लागले होते त्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण होत होता आाणि Mask मूळे माझ एका शारिरातून दुसर्‍या शरिरात जाण्याचा प्रवासही आता थांबत होता. काही लोक म्हणत होते की हा तर एक साधारण ताप आहे याला घाबरण्याचे काहीच कारण नाही मग ठरवल की आता लढायचं. संगळे Sanitizer, Mask, लोक घेणारी काळजी हया सगळ्यांशी लढायच आणि संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवायच.

मला आठवतयना दुसऱ्यांचा शरीराचा वापर करुन का होईना माझा झालेला पहिलावाहीला विमानाचा प्रवास खरंच खूप Amazing होता. मग मी आलो इटली मध्ये तिकडे मी अजूनच रुद्र अवतार घेतला आणि आता दिवसाला हजारो लोक माझ्यामुळे मृत्युमुखी पडू लागले. काही लोक अजूनही मला सिरिअस घेत न्हवती काही कारण काढून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती तर त्यांना मी एवढंच सांगिन की अमेरिका सारख्या बलाढ्य देशाने सुद्धा आता माझ्यापुढे शरणागती पत्करली आहे. तिकडच पूर्ण जनजीवन आता माझ्यामूळे विस्कळीत झालं होत. अशाप्रकारे नंतर अनेक शरिरांचा वापर करून मी जगातल्या अजून देशांमध्ये पोहचलो आणि तिथे माझा मुक्त संचार चालू केला. रोम, बार्सेलेनो, मिलान, पॅरिस अश्या सुंदर- सुंदर शहरांमध्ये वावरताना मला खरच खूप मजा येत होती आता लोकच मला मदत करत होती एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जायला.

आता पुढे लक्ष होत Mission India......
भारतात जाताना मला एक गोष्ट लक्षात आली की World Tour करण तर माझ्या पाचवीलाच पूजलय. मी खूप excited होतो शेवटी जास्त लोकसंख्येचा देश ना...

मी येतोय भारतात लवकरच माझी हुकूमत गाजवायला...

पण इथे येऊन बघतो इकडचे मॉल्स, थेटर्स, जिम्स आणि मुख्य म्हणजे समुद्रकिनारे सरकारने आधीच बंद केले होते. रस्त्यावर वणवण करत मी एकटाच फिरत होतो माळाकोनीच सापडत न्हवत. अनेकांच्या शरीरात वास्तव करण्याची सवय झालेल्या मला हा सुनेपणा टोचू लागला होता, काय करू आणि काय नको असं झालं होत... पण मला आता हळू हळू कळू लागलं होत कि माझ्यामुळे किती भयंकर परिस्थिती ओढवली आहे सगळ्यांवर. माझ्या समोर रोज मृत्युमुखी पडणारे हजारो जीव. एकमेकांपासून विभाग झालेले लाखों कुटुंब. कुठे कोणाची आई,कुठे कोणाचे बाबा,कुठे कोणाचा भाऊ, कुठे कोणाची बहीण, कुठे प्रेयसी आणि कुठे प्रियकर. या सर्वांमध्ये माझं अस्थित्व होत पण ह्या एकमेकांपासून दूर गेलेल्या नात्यांना मात्र एकमेकांच्या अस्थित्वाची कणमात्र कल्पना ही न्हवती. नेहमी गजबजलेली शहरे आता शांत झाली होती, शाळा-कॉलेज यांचे दरवाजे अनिश्चित काळापर्यंत बंद करण्यात आले होते,मशिदीच्या अजाणपासून मंदिरातल्या आरत्यांपर्यंतचे आवाज सुन्न झाले होते.

का..का...का..झालं हे सगळं...? का झालं...?इतक्यात डॉक्टरांचा आवाज कानात घुमू लागला ,
" Please Corona, मला आणखी एका Patient चा जीव वाचवू दे रे, मग तू माझा जीव घे.." नर्स म्हणत होती," अरे माझंही कुटुंब आहे, माझं बाळ माझी घरी वाट पाहतय...या क्षणाला हिरकणी बनून माझ्या तान्ह्या बाळासाठी मला इथून जात येईल पण नाही तुझा खात्मा होईपर्यंत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लढीन मी..."
पोलीस तर ठीक-ठिकाणी माझा प्रसार थांबवण्यासाठी हातात काठी घेऊन उभे होते आणि साफ-सफाई करणारे कर्मचारी sanitizer ची फवारणी करून मला नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते. आता जो तो माझ्या जाण्याची वाट पाहू लागला.

उपासमारीने तडफडणार हजारो जीव, आपल्या मायभूमीकडे परतणारे,मैलोनमैल चालत जाणारे जीव आता मला समोर दिसू लागले होते, त्यांच्या पायांना लागणाऱ्या चटक्यांची काळ मला जाणवत होती,मी सुद्धा शोषत होतो त्यांची अवहेलना... पण ह्या सगळ्याला खरच मी जबाबदार आहे का..?या सगळ्यांचा रोष का येतो माझ्याकडे..? मी जबाबदार आहे का या भयंकर स्थितीला..? नाही...सॉरी नाही... या सगळ्या भयानक परिस्थितीला या विध्वसांला मी जबाबदार नाहीये... मी स्वतःहून नाही गेलो कोणाकडेच.... तुम्ही...तुम्ही स्वतः मला घेऊन लाट तुमच्याकडे .. तुम्ही स्वतः

घरी राहा, सुरक्षित राहा...!!!
घरी रहा आणि कोरोनाला टाळा...!!!