Different Aghori - 2 books and stories free download online pdf in Marathi

असा हि हा अघोरी - 2

बघता बघता ह्या मध्ये ८-९ वर्ष निघून गेली. मन प्रमाणे अमोघ ला डॉक्टरकी साठी ऍडमिनशन मिळाला होतं. आणि जवळपास त्याचा अभ्यास क्रम संपत आला होतं. त्याने त्याची आवडती ब्रांच निवडून त्यामध्ये स्पेसिऍलिझशन पूर्ण केला होतं. तसा तो खूप हुशार होताच पण मनापासून केलेल्या गणेश भक्तीची हि त्याला साथ होती. पण त्या अघोरी शक्तीला ते मान्य नव्हता त्याला फक्त आणि फक्त स्वतःच वर्चस्व प्रस्तापित करायचा होतं. आणि त्यामध्ये अमोघ ला मिळणारी गणेश भक्तीची साथ आता त्याला बघवत नव्हती. त्या काळ्या शक्ती ने आता आपले फासे फेकायला सुरवात करायला सुरवात केली. आणि अमोघला विचित्र स्वप्न पडण्याचा एक सत्रच चालू झालं. स्वप्नात तो स्वतःला पूर्ण काळ्या कपड्यां मध्ये संपूर्ण अंगाला राख फसलेल्या स्तिथीत दिसत असे आणि कोणत्या तरी स्मशानानात बसून तो समोर मोठं अग्नी कुंड लावून त्यात काही ना काही टाकून त्याची साधना करत होता. अतिशय घाबरट अश्या वातावरणात तो असे. रोज तो दचकून जागा होत होता. रात्री बरोबर ३ च्या सुमारास.

अघोरी शक्ती नेच घडवून आणलेला होता हे सगळं. आणि त्याचा परिणाम देखील बघायला मिळत होता अमोघ वर. अमोघच मन आता गणेश भक्ती मध्ये रामनास झाला. काही केल्या त्याचा चित्त काही एकाग्र होत नसे जेव्हा तो नामस्मरणाला बसे तेव्हा. ह्या मुले अमोघ खूपच नर्व्हस राहत असे. आणि कुठे तरी लांब कोणी तरी गालातल्या गालात हसत असे. पण लहानपणा पासून झालेले संस्कार अमोघ ला असे सहजा सहजी विसरता येत नव्हते. त्यामुळे त्याने भक्ती करायचे चालूच ठेवले होते त्यामुळे अघोरी साधना पूर्ण पाने त्या वर हवी होऊ शकत नव्हती. पण त्या काळ्या शक्तीला त्या वर आपला वर्चस्व गाजवायचाच म्हणून त्याने आता अमोघला स्वप्नात असा काही दाखवू लागला कि अमोघ ला वाटतायला लागला कि हि अघोरी शक्तीच मला मदत करते आहे. १२वीत मिळाले यश अघोरी शक्ती मुळेच, डॉक्टरकी शाखेत प्रवेश हि अघोरी शक्ती मुळेच, हेच नाही तर आवडत्या ब्रांच मध्ये स्पेसिऍलिझशन करण्याची संधी आणि पडत्या हॉस्पिटल मध्ये काम करण्याची संधी सुद्धा अघोरी शक्ती मुळेच मिळाला आहे असा त्याने अमोघ ला दाखवण्याचा प्रयन्त सुरु केला.

आता अमोघ ला असा पटू लागला कि हि अघोरी साधनाच आपल्याला हवा ते मिळवून देऊ शकते. गणेश भक्ती कडे आपोआपच त्याचा दुर्लक्ष होऊ लागला. आधी रोज गणेश भक्ती केल्या शिवाय ना झोपणारा अमोघ आता आठवडा आठवडा मंदिरातही जात नसे. भक्ती कार्याची जसा काय तो विसरूनच गेला होता. आणि ह्याचा फायदा त्या अघोरी शक्ती ने घ्यायला सुरु केला होतं. आता अघोरी शक्ती ने नवीनच स्वप्न अमोघ ला दाखवायला सुरु केलं होत. अमोघ स्वप्नात बघत होता कि तो खु नावाजलेला डॉक्टर झाला आहे आणि विशेष म्हणजे तो कोणत्याहि आजाराला बारा करू शकत होता अगदी त्याचा स्पेसिऍलिझशन नसलेल्या आजारालाही. अमोघ ह्या स्वप्न मध्ये हरवला लागला त्याला कुठे तरी ते स्वप्न खरा व्हावा असा वाटत होतं. पण त्या साठी काय करायचा हे मात्र त्याला काळात नव्हतं. काली शक्ती हि हे स्वप्न पूर्ण पाने त्यावर हावी होण्याची वाट बघत होती अगदी योग्य वेळी ते आपली आत पुढे ठेवणार होती. अमोघ ने स्पेसिऍलिझशन केलेल्या ब्रांच मध्ये अगदी बेस्ट डॉक्टर झाला होतं. आता त्याला घाई लागली होती सगळ्या ठिकाणी आपला वर्चस्व दाखवण्याची. खार तर ह्या मागे त्याच उद्दिष्ट फार वेगळा होतं. त्याला खरं तर गावातल्या मागासलेल्या ठिकाणी जाऊन रुग्ण सेवा कार्याची होती. पण त्याच हे स्वप्न जणू काही तो विसरूनच गेला होता आणि आता त्याला फक्त आणि फक्त प्रसिद्ध व्हायचं होतं.

त्याच्या कमी वयातल्या यश मुळे तो आता खूप मोठ्या नावाजलेल्या हॉस्पिटलच्या डीन या पदी जाऊन बसला होता. त्याला स्वतःचा प्रशस्त असा केबिन होतं. आनंद गगनात मावत नव्हतं त्याचा. खूपच आनंदी होता तो. त्याचे आई वडील देखील फार खुश होते. त्यांना आता त्याच्या लग्नाचे वेड लागले होते. आणि त्याने देखील आता लग्नाला होकार दिला होता. कॉलेज जीवन मध्ये तो फक्त त्याच्या ध्येयाच्या मागे होता म्हणून प्रेम करायला वेळच नव्हतं मिळला त्याला त्याने त्याच वेळी ठरवलं होतं कि लग्नाच्या बायको वरच प्रेम कारेन. त्याच्या आई वडिलांची वधू शोध मोहीम चालूच होती. अमोघ सारखा एलिजिबल बॅचलर लग्नासाठी आहे म्हटल्या वर त्याला खूपच स्थळ येत होती अगदी खूप श्रीमंतांची सुद्धा परंतु त्यांना श्रीमंत अशी मुलगी नको असून सगळ्यांना सांभाळून घेणारी आणि अमोघ ला समजून घेणार सालस अशी मुलगी हावी होती.

हल्ली काय झाला होतं काय माहिती पण अमोघ फारच शांत शांत राहू लागला होता. आई वडिलांनी फार विचारला त्याला पण तो काही सांगत नव्हता. काय होतं ह्या मागचा रहस्य. तर त्या अघोरी शक्ति ने त्याला असा दाखवला होतं कि आता त्याला हव्या त्या ब्रांचच नॉलेज मिळणार होतं पण त्या साठी त्याला त्या ब्रांच मधल्या बेस्ट पर्सन ला घेऊन यायचा आहे काळ्या शक्ती ने त्याच्या केबिन मध्ये तयार केलेल्या वलय समोर पण त्या वक्तीचा पुढे काय होणार माहित नसल्या मुळे अमोघ थोडा द्विधा मनस्तीतीत होता. पण करून तर बघायला हवा म्हणून त्याने त्याच्या एका प्रोबेशन वर असणाऱ्या एम्प्लॉयी वर प्रयन्त करण्याचा विचार केलं. खरं तर ज्याच्या वर तो प्रयोग करणार होता तो राहुल अजून शिकवू होता त्याचं अजून कशातच स्पेसिऍलिझशन नव्हतं पण ट्रायल साठी तो सगळ्यात बेस्ट होता कारण तो जर अचानक गायब झाला तरी कोणी त्याची दाखल नसती घेतली कारण तो नवीनच होता आणि कोनाला त्याच्या बद्दल अजून जास्त माहित नव्हतं. आणि त्याच्या घराचा हि कोणी विचारायला यायची शक्यता नव्हती कारण राहुल अनाथ होता फक्त त्याच्या हुशारीच्या जोरावर तो तिथं पर्यंत पोहचला होता.

तर त्याने ठरल्या प्रमाणे त्याला बोलावून घेतला आपल्या केबिन मध्ये आणि त्याच्याशी बोलता बोलता त्याने त्याला त्या वलय समोर उभा केलं. आणि काय झाला माहित नाही काही तरी हालचाल झाली त्या वालयातून कला धूर आला काही अमोघच्या अंगावर आला आणि काही राहुलच्या अंगावर गेला दोघेही तिथेच बेशुद्ध पडले. आणि जेव्हा दोघांनाही जाग आली तेव्हा राहुलला काहीच आठवतच नव्हतं कि तो केबिन मध्ये कशाला आला होता त्याचा फायदा घेऊन अमोघ पण बोलला कि त्यालाही माहित नाही आला आणि बेशुद्ध पडला तो म्हणून. राहुल डोकं खाजवत निघून गेला आणि अमोघ च्या चेहऱ्या वर पहिल्यांदाच क्रूर हास्य दिसलं. चार पाच दिवस शांततेत गेले अचानक अमोघ ला कविता लिहावीशी वाटली जे कि त्याच्या अजिबात ध्यानीमनी हि नव्हतं. त्याने नकळत पेन हातात घेतला आणि छान अशी कविता लिहून काढली. डोक्यावर खूप जोर दिल्या नंतर त्याला आठवला कदाचित हा राहुलमधला गुण असावा जो त्याला मिळाला. तो खूपच आनंदी झाला. परंतु राहुल मात्र इकडे खूपच दुखी झाला कारण कविता करणं हि एकच गोष्ट होती जी लहान पणा पासून त्याची सोबती होती आणि कविते मधूनच तो त्याचं मन मोकळा करू शकत होता. त्याला असा वाटत होतं जणू काही तो त्याच अस्तित्वच विसरला आहे. त्याला काळात नव्हतं कि असा कसा झाला? डोक्यावर फार ताण देऊनही त्याला काही काळातच नव्हतं.

इकडे अमोघच्या आई वडिलांना एक मुलगी अमोघ साठी फारच आवडली होती तिचा नाव होता सिद्धी. त्यांनी अमोघ ला त्या बद्दल सांगताच त्याने सुद्धा होकार दिला. आणि मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला, मुलगी अगदी अमोघ ला साजेशी होती त्यालाहि ती बघता क्षणी आवडली आणि सिद्धीलाहि अमोघ फार आवडला होता. मग जास्त उशीर ना करता लवकरच लग्नाचा मुहूर्त काढून दोघांचं लग्न करून देण्याचा बेत घरच्यांनी आखला.

६ महिन्या नंतरचा १ छानसा मुहूर्त पाहून लग्नाची तारीख पक्की केली. ह्या ६ महिन्यात अमोघ आणि सिद्धी ह्यांची एकमेकांशी फारच चांगली ओळख झाली आणि ते दोघं एकमेकांशी बरेच मोकळे झाले. आता ओढ होती ती सिद्धी लवकरच लग्न करून घरी यायची. ह्या गुलाबी स्वप्नात अमोघ असतानाच अघोरी शक्ती ने पुन्हा त्याच्या स्वप्नात येऊन त्याला साठवायला सुरवात केली. अघोरी शक्तीनं साठी तो १ प्रकारचा बळीच होता. अमोघ ला त्या शक्ती त्या वक्तिमधील गुण जरी अमोघ ला देत असली तरी स्वतःसाठी त्या वक्ती मधील आयुष्य घेत होता. अमोघ ला परत जाणीव झाली आता अजून एका व्यक्ती मधील गुण घेण्याची वेळ आली आहे. अमोघ १ नावाजलेला हार्ट सर्जेन होता आणि आता त्याला न्यूरॉलॉजि मध्ये खूप इंटरेस्ट यायला लागला होता. म्हणून त्याने त्याच्या हॉस्पिटलमधल्या एक खूपच अनुभवी अश्या न्यूरोसर्जेन डॉक्टर देशपांडे ह्यांना त्याने केबिन मध्ये डिस्कशन साठी बोलावलं. आणि त्याना त्या वलय समोर उभ केलं. देशपांड्यां बरोबर देखील तसाच झाला जसा राहुल बरोबर झाला होतं. दोघेही जेव्हा शुद्धीतून बाहेर आले तेव्हा डॉक्टर देशपांड्याना देखील राहुल प्रमाणे ते तिथे कशाला आले होते हे आठवेना. ह्याहि वेळेला अमोघने राहुलला जसा काहीच माहित नाही सांगितलं तसाच डॉक्टर देशपांडेंनाही सांगितलं. तेही अमोघ वर विश्वास ठेवून निघून गेले.

पुढच्या ८ दिवसांनी एक डॉक्टर्सची कॉन्फरेन्स होती. सगळे नामांकित डॉक्टर त्या कॉन्फरेन्स साठी तिकडे होते. सगळ्या ब्रान्चचे डॉक्टर्स येऊन तिकडे आपापले अनुभव आणि काही क्रिटिकल उस्सुएस असतील तर ते डिसकस करणार होते. अमोघ आणि त्याच्या हॉस्पिटलमधल्या सगळ्या डॉक्टर्स ला तिकडे आमंत्रण असता कारण त्या हॉस्पिटल मध्ये सगळ्यात बेस्ट डॉक्टर होते. तर सगळे कॉन्फरेन्सला गेले असताना हळू हळू सगळ्या ब्रॅंचेस चे सेशन चालू आटपाट होते. न्यूरॉलॉजिवर डिस्कशन होणार होतं. १ खूपच क्रिटिकल कोइ होती त्यात डॉक्टर देशपांडेंचं मत हवा होतं म्हणून ती केस त्या कॉन्फरेन्स मध्ये डिस्कशनला होती. सगळी केस एक्सप्लिन करून झाल्यावर सगळे डॉक्टर देशपांडेंच्या मार्गदर्शनाची वाट बघत असताना त्यांच्या आधी अमोघच बोलला आणि त्याने इतका अचूक मार्गदर्शन केलं कि सगळे आचार्यचकित होऊन त्याच्या कडे बघायला लागले. १ तर एवढ्या कमी वयात हे कोणाला सूचना अशक्यच आणि त्यातुन न्यूरॉलॉजिचा अनुभव नसलेल्या व्यक्ती कडून तर नाहीच नाही. सगळे अमोघ चा अभिनंदन करायला पुढे आले असता कोणाचा डॉक्टर देशपांडेंकडे लक्षच गेला नाही ते अगदी हरवल्या सारखे दिसत होते जणू काही त्यांना हा विषय पूर्ण पणे नवीन असल्याचे हावभाव होते त्यांच्या चेहऱ्यावर.

****

क्रमशः

****