Two points - 10 books and stories free download online pdf in Marathi

दोन टोकं. भाग १०

भाग १०


दुसऱ्या दिवशी परीला मस्त नवीन ड्रेस घातला, बांगड्या घातल्या. गजरा लावला. परी सोबत सगळेच नटले होते. मग आता नटल्यावर फोटोशुटचा कार्यक्रम तर झालाच पाहिजे ना 😜. सगळ्या जणी भरपुर पोझ देऊन फोटो काढत होत्या. विशाखा एकटी होती जी नटलीही नाही आणि फोटो काढिला पण गेली नाही.
सायलीच जवळ येऊन म्हणली,
" सगळ्यांनी छान छान ड्रेस घातलेत मग तुला काय प्रॉब्लेम आहे 🤨. "

" मला आवडत नाही 😒 " मोबाईलमधलं डोक वर न काढता विशाखा ने उत्तर दिलं.

" आवडत तरी काय तुला 🤨. शॉपिंग नाही आवडत, मेकअप नाही आवडत, नटायला नाही आवडत........ मग आवडत तरी काय ?? "

" झोपायला 😍😍. प्रचंड आवडतं बघ मला झोपायला पण मिळतच नाही 😣. "

" uhhhhh 😤😤 चल आवर पटकन. मस्त फोटो काढु तुझे. "

" ईईईईईईई मला नाही आवडत ते फोटो बिटो 😬. काय घालायचं ते घालावं, नटाव, खाव-प्याव मज्जा करावी पण हे फोटो कशाला काढायचे 😕 "

" मग फोटो जर काढायचेच नसतील तर नटायच कशाला ना 😤😤😡 "

" म्हणून तर मी नटले नाही ना 😜 "

" तुला काही सांगायच म्हणजे स्वत:च डोक सोडुन घेतल्यासारख आहे 😡😡😡😤 " आणि सायली मुली बसल्या होत्या तिथे गेली. विशाखा हसतच होती.तीच हसत बघुन सायली अजुनच भडकली आणि सगळ्या मुलींना एकत्र करुन काहितरी खुसरफुसर करायला लागली. विशाखाला कळतच नव्हतं त्यांच काय चालु आहे पण तरीही तीने आपल त्यांच्याकडे लक्षच नाही असं दाखवलं तरी सगळं लक्ष तिकडेच होत.

पाच मिनीटांनी सगळ्या जणी आलेल्या आणि तीच्या समोर येऊन उभ्या राहिल्या,

" काय 🤨😕 " विशाखा ने सगळ्यांवर एक नजर टाकत विचारलं.

" आमचे फोटो काढायचेत " सिया म्हणाली.

" मग काढा ना. मला का सांगताय 😒. "

" कारण ते फोटो तु काढायचेत " परी म्हणाली.

" काय 😳😲. मी ????? मी का ????? मी का काढु ??? " विशाखाने जोरात विचारलं कारण जे काम आवडतच नाही ते का ह्या पोरी करायला लावत होत्या.
विशाखा कितीतरी वेळ नन्नाचा पाढा लावत होती पण पोरींनी जबरदस्तीने ओढुन नेलं आणि फोटो काढायला लावले.

" हां घे काढला फोटो. " एक फोटो काढुन फोन त्यांच्या हातात म्हणली.

" अरे एकच कसं ?? भरपुर पाहिजेत ना फोटो 😏😜" सायली विशाखा कडे बघत म्हणाली.

" नाही हां. एक काढला बास झालं. "

" अरे एका फोटोत काय होणार आहे "

" अरे. एएएएएए फोटो काढलाय मी. हे काय कमी आहे का 😕 . "

" अरे पण एकच काढलाय ना. एकाने काय होणार बरं."

विशाखा पोरींना कटवायचा प्रयत्न करत होती खरं पण सायली आगीत तेल ओतायचे काम करत होती. आणि शेवटी हो नाही करत पोरींनी विशाखाला चांगलच दमवल. कधी पोझ देऊन, तर कधी खालच्या अँगलने काढायला लावुन, तर कधी चांगला आला नाही म्हणून परत काढायला लावुन डोकं उठवलं होतं तीच. विशाखा चिडायला लागली होती तरी एक जण ऐकत नव्हतं. तशीच फोन खाली ठेवून काकाकडे गेली.

" काका बघ ना रे. मला नुसतं त्रास देतायत ह्या सगळ्या मिळुन 😖. जबरदस्तीने फोटो काढायला लावतायत. "

" अगं मग दे की काढुन. "

" तु पण 🙁😳😢 काका 😩 "

" बघ तुला असंही ह्यांच्यासारख मिरवण्यात interest नाहीये मग ह्यांचे फोटो तर काढुन दे ना. "

" मी पण तेच सांगितले तिला " मागुन येऊन सायली ने म्हणलं तसं विशाखा ने तिला एक लुक दिला 😡.

" सगळे. सगळे एका बाजुला झालेत आणि मला एकटीला पाडलंय 😡😡. मला नेहमी एकटी पाडतात ना. बघुन घेईन मी पण. "
आणि रागारागात आत जातच होती की सायली मध्येच काकाला म्हणाली.

" काका. कसं होणार रे हिच...... " पुढे तीने बोलायच्या आधीच विशाखा भडकली.

" हो माहितीये. सासरी सगळ चांगलच होणार आहे माझं. ना मला तिथे सासु नवीन कपडे घालुन फोटो काढायला लावणार आहे ना सासरा. इथेच छळ मांडलाय तुम्ही लोकांनी माझा. "

" आम्ही छळ मांडलाय 😳. देवाला तरी घाबर गं 😏" सायली ने असं म्हणताच सगळे हसायला लागले फक्त विशाखाचा रडका चेहरा सोडुन.

सगळा कार्यक्रम झाला आणि सगळे जेवायला बसले. बाकिच्यांना गुलाबजाम वाढले होते पण विशाखाला श्रीखंड वाढलं.
" श्रीखंड का आणलय 😢 " विशाखा ने ताटात बघत विचारलं.

" कारण पुरी सोबत तेच छान लागतं म्हणुन. " सायली ने सांगितल्यावर तीने गुपचुप खायला सुरुवात केली. आणि पहिल्याच घासात ओरडायला लागली.

" काय राव 😩. माहिती आहे ना सगळ्यांना की मला विलायची नाही आवडत. मग आणुन आणुन हेच श्रीखंड का आणलं ??? ह्यात खुप विलायची आहे. "

" एक मिनिट. गोड एक वेळ समजु शकते मी पण विलायचीचा काय प्रॉब्लेम आहे 🤨 "

" ते कसं तरी लागत 😖 " तोंड वेड वाकड करत तीने सांगितलं.

" काय उलटी तर नाही होणार ना. खा गुपचुप. "

" तु मला सांगतियेस हे 😳 "

" हो. लाड जास्ती केलेत ह्या काकाने तुझे. सासरी गेली ना सासु उद्धार करेल मग कळेल. "

" एक मिनिट. पहिली गोष्ट तर मी श्रीखंड तसलं आणणारच नाही म्हणजे पुढचा उद्धार पण वाचेल 😜"
विशाखा ने असं म्हणल्यावर सगळेच हसायला लागले पण सायली ओरडली.

" हसु नका. ह्या काकामुळेच शेफारलीये जास्त 😤. गुपचुप खायचं. " सायली ने जोरात आवाज चढवुन म्हणल्यामुळे विशाखा मान खाली घालुन गुपचुप खायला लागली.

" आज तुम्ही तुमचे characters exchange केलेत का ?? " काकाने हळुच विशाखाच्या कानात विचारलं.

" म्हणजे ..... " पण तिला काही कळलंच नाही.

" अगं मंद, कोणत्या नक्षत्रावर जन्माला आलीस काय माहिती 😒😤 " चिडुन काका म्हणाला.

" मी मंद 😳🤨. " तो हळु बोलत होता पण हिने जोरात ओरडुन उत्तर दिलं. आणि तीचा आवाज ऐकुन सायली आली.

" काय झालं किंचाळायला 🤨. कितीही ओरडली तरी खायचं आहेच. " आणि विनाकारण सायलीच्या ओरडा खाल्ला म्हणून विशाखा काकाकडे रागात बघायला लागली.

ह्यांची मजा मस्ती चालुच होती. सायलीच्या घरीही आता विशाखाला ओळखत होते. जरा वाया गेलेली समजत असले तरीही तीला घरात यायला परवानगी नक्कीच होती. विशाखाचा फोन लागत नाही म्हणून पंडितच्या फोनवर फोन करून करून आता सायली पंडित आणि प्रीतीचीही मैत्रीण झाली होती.

आज पण सायली ने रोजच्यासारख विशाखाला फोन लावला पण नेहमीसारखं तीचा फोन लागलाच नाही. परत लावुन बघितला पण लागलाच नाही, म्हणून मग परत पंडितला लावला. त्याने पण पहिल्यांदा फोन उचललाच नाही परत लावला तेव्हा उचलला.

" तुला काही काम नाहीत का गं 🤨. सारखी फोन करून त्रास देते. " पंडितने फोन उचलल्या उचलल्या तोफ झाडायला सुरुवात केली.

" एएएएएए पांडु. विशा कुठे आहे. तीला फोन दे. "

" नाही देत जा. कामात आहे मी बाय. "

" 90**91**12 हा नंबर तुझ्याच गर्लफ्रेंडचा आहे ना रे 😜 " तो फोन ठेवणार तेवढ्यात सायली पटकन म्हणाली.

" तुझ्याकडे कसा आला 😳😳. तुला कसं माहिती. एक मिनिट तु........ तुला कुठुन मिळाला. "

" जाआआआआआआदु..... आता विशाला फोन दे नाहीतर तुझ्या लैलाला फोन करून सांगेन की तिचा मजनु माझ्यासोबत फिरतोय 😏😹. "

" 😤😤😤😡😡😡 बघुन घेईन मी तुला नंतर. आत्ता देतो फोन पण नंतर बघतो मी. "

" हाट हाट. तु नंतर पण काही करु शकणार नाही. 😹 "
हसत हसत ती म्हणाली. आणि विशाखाला घेऊन मिसळ खायला निघाली.

" मला पावभाजी. मिसळ नको 😖. " आता हे कोण म्हणलं असेल हे सांगायची गरजच नाहीये तुम्हाला 😂.

" प्लीज आता मिसळ आवडत नाही असं म्हणू नको. "

" अरे तिखट लागते खुप 😢. "

" मग आता काय मिसळमध्ये तुला साखर घालुन देऊ दे का 😤. पुण्यात राहुन जर तुम्हाला मिसळ आवडत नसेल तर तुम्हाला पुण्यात राहण्याचा अधिकारच नाही."

" अरे 😕. ज्याचा त्याचा प्रश्न ना. एखाद्याला आवडत एखाद्याला नाही आवडत. "

" एखाद्याला नाही गं. फक्त तुलाच आवडत नाही 😒. बरोबर म्हणतो काका. कोणत्या नक्षत्रावर जन्माला आलीयेस काय माहिती 😏 "

" घरात काका तर असतोच आता प्लीज तु तरी ते सासर पुराण नको चालु करूस. "

" बर नाही करत...... "

" मला ना तुला एक सांगायचंय. " विशाखा एकदम गंभीर चेहरा करत म्हणाली. तिला तसं सिरीयस बघुन सायली पण जरा घाबरली.

" काय झालं. सगळं ठिक आहे ना. सांग ना काय सांगायचंय. "

" कसं सांगु तेच कळत नाहीये. म्हणजे मला...... "

" हे बघ. टेन्शन घेऊ नको. जे असेल ते सांग. आपण sort out करू. "

" मला ती मिसळ टेस्ट करायची आहे मग एक घास दे हां मला 😜 " असं म्हणाली आणि विशाखा जोरजोरात हसायला लागली. सायलीला तर आधी कळालच नाही पण कळाल्यावर तीला बुक्की मारली.

" मुर्ख 😡😡😡😤. घाबरले होते मी. जा आता नसते देत. "

" एएएएएए फक्त टेस्ट करायला ना. "

" नाही. माझी मिसळ आहे. तुला तर आपण आवडत नाही. तिखट लागत ना ते. मग 😏. नसतेच देत आता. "
आणि दोघी तिथेच मस्ती करायला लागल्या.

विशाखा आणि सायली दोघींचही मस्त चालल होत सगळं. सायली ची बारावी झाली होती. आणि सगळं मस्त चालू असताना विशाखाच्या अंगावर काकाने बॉम्ब फोडला.